केला विचार पत्र तुला लिहू
मनी माझ्या मी लागले घाबरू
माझे हे पत्र तू वाचशिल
का तू ते फाडून टाकशिल
केला विचार पत्र तुला लिहू
मनी माझ्या मी लागले घाबरू
रुसले मी मग तू समजाविशी
समजाविन मी जेव्हा तू रुसशी
जे जीवन राहिल उरूनी
नयनाश्रूनी जाईल वाहूनी
हे जीवन ही तुला अर्पूनी
समय घेईन मी मिळऊनी
केला विचार कसे तुला भेटू
मनी माझ्या लागले मी घाबरू
तेव्हा मी घाबरे मरण्याला
शिकविलेस कसे ते जगण्याला
एकाकी सोसले मी जीवनाला
आलास तू जणू चंद्र नभी उगवला
ठोकरिले मी माझ्याच सुखाला
काय म्हणू माझ्या वेडेपणाला
केला विचार कसे तुला भेटू
मनी माझ्या लागले मी घाबरू
श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com
Tuesday, August 12, 2008
Monday, August 11, 2008
विनम्र राहिल्याने अंगात एक प्रकारची क्षमता येते.
एका विद्वान माणसाने मला सांगितलं,
“तू काहीच करीत नाहिस असं नाही.स्वतःच्या दुःखाला एव्हडं सामोरं जावं हेच मुळात खूप कठिण काम आहे.”
कोकणातला पाऊस सर्वाना माहित आहे.एकदां पडायला लागला की मग मागे वळून बघणार नाही.
तो अति प्रचंड वृष्टीचा दिवस होता.दिवसाच रात्र झाली आहे असं वाटत होतं.ढगानी सारं आकाश व्यापलं होतं.सर्व घराच्यादारं खिडक्या लाऊन लोक घरात घुडूप होऊन बसले होते.अशा प्रसंगी माझ्या पतिना एका एकी हृदयाचा झटका आला.कुणाला मदतीला बोलवायला जायला शक्यच नव्हतं.पावसाच्या कहराबरोबर माझ्याही घरात असाच कहर झाला होता.
ती घटना होऊन गेल्यावर नंतर जवळ जवळ तीन चार दिवस पाऊस सतत पडत होता.मी घाराच्या पडवीत बसून त्या संततधारा बघत होते.मनात ना ना तर्हेचे विचार येत होते.
माझ्या घराच्या समोर नुसतं तळं झालं होतं रस्ता दिसत नव्हता.अशा परिस्थितीत दोन गृहस्थ खोरी फावडी घेऊन माझ्या घरासमोर माझ्यासाठी वाट करून देत होते.मी घरात जाऊन खिडकीतून त्याना न्याहाळत होते.माझी मलाच लाज वाटत होती.
माझ्या मनात पहिला विचार आला की मी यांची परत फेड कशी करूं? माझे केस मला फणी घेऊन विंचरायला त्राण नव्हता.माझ्या पतिच्या निर्वतण्यापुर्वीच्या आयुष्यात मी कधीही कुणाकडून मदत किंवा सहाय्य मागितलं नव्हतं.आणि त्याबद्दल मला विशेष वाटायचं.माझं स्वातंत्र्य आणि माझ्या क्षमतेवर मी मला बांधून घेतलं होतं.आता नुसती घरात बसूनपडणार्या पावसाकडे बघण्यात मी स्वतःला काय समजू?
आता माझ्यासाठी येणारी मदत आणि प्रेम मला स्विकारायला सोपं नव्हतं.मला शेजारी जेवण आणून द्दायचे.मला त्यांच स्वागत करायला ही त्राण नव्हता.पतिच्या एकाकी जाण्याने मी अगदीच हतबल झाली होती.पूर्वी मी अशी आळशी नव्हती.मी ओक्साबोक्शी रडत होती.शेवटी माझी शेजारीण मंदा मला म्हणाली,
“तुला जेवण आणून देणं हे तुझ्यासाठी विशेष काम मला पडतं असं मी समजत नाही.उलट मला असं करायला बरंवाटतं.तुला काही तरी माझ्या कडून मदत होते ह्याचा मला खूप आनंद होतो.”
त्या माझ्या अशा प्रसंगाच्या वेळी मदत करणार्या सगळ्यांकडून मी असेच उद्गार ऐकत होते.तिथल्याच एका विद्वान माणसाने मला सांगितलं,
“तू काहीच करीत नाहिस असं नाही.स्वतःच्या दुःखाला एव्हडं सामोरं जावं हेच मुळात खूप कठिण काम आहे.” आता मी पूर्वीची राहिले नाही.आता माझ्यात खूपच बदल झाला.माझ्या जीवनाचं लक्तर आतां उपकृततेने आणि विनयशिलतेने विणलं गेलं होतं.मी आश्चर्य चकित होऊन पाहू लागले की अशा परिस्थितीत माणसाला असाह्यतेतून पण धैर्य येतं.मला आता वाटायला लागलं की
विनम्र होण्यात अंगात एक क्षमता येते.

Saturday, August 9, 2008
रात्र जागूनी झोपीजाण्याचे दिन आले
तुझ्या माझ्या मनोरथाचे दिन आले
रात्र जागूनी झोपीजाण्याचे दिन आले
बिछाने गारठलेले,श्वास भाजलेले
बाहू स्फुरलेले,ओठ नरमलेले
काही हरवून काही गवसण्याचे दिन आले
पावसाच्या सरीमधे दोन जीव भिजलेले
भिजलेल्या जीवानी दोन प्याले झोकलेले
मदिरा पिऊन झिंगण्याचे दिन आले
रात्र जागूनी झोपीजाण्याचे दिन आले
दवांनी पडावे फुलांवर,फुलानी अमुच्यावर
उमललेल्या फुलानी गंध उधळल्यावर
गुलाबी गुलाबी स्वपनांचे दिन आले

Thursday, August 7, 2008
उलगता बाजार
“सामावून घेण्यावर माझा विश्वास वृद्धिंगत झाल्याने मला वाटू लागलं की मी आणि माझी आई येईल त्या प्रसंगातून मार्ग काढून जीवंत रहाण्याची धडपड करूंच.”
मी आणि माझी आई संध्याकाळच्या उलगत्या बाजारात जाऊन आमची घरासाठी रोज लागणारी खरेदी करतो.उलगत्या बाजारात जाऊन खरेदी करण्याचा फायदा असा की सकाळ पासून आलेले विक्रिकर-लोकं सध्याकाळी अगदी थकून जातात.आणि उरली सुरलेली भाजी,फूलं,फळं कमी किंमतीत किंवा वाटे काढून विकून टाकतात.फळं थोडी जास्त पिकतात,भाजीचा ताजेपणा कमी होतो,आणि फूलं तर बरिच कोमेजलेली असतात.ही फूलं देवाला वाहिली तरी त्याचं त्याला काहिच वाटणार नाही असं मनात येतं.आमच्या परिस्थितीचा कुणावरही ठपका ठेवता येत नसल्याने,
“काय करणार? ही परिस्थिती यायला तूच कारण आहेस मग तुला ताजी टवटवीत फूलं वाढत्या भावात सकाळीच आणून तुझ्या पुजेला कशी वहायला आम्हाला परवडणार. अशी तर अशी मानून घे देवा”
असं मनातल्या मनात पूजा करताना आईच्या तोंडून हळूवार आलेले उद्गार ऐकून तिची आणि त्या देवाची मला दया यायची.
यापूर्वी साकाळीच उठून दरखोरी करून ताज्या ताज्या गोष्टी खरेदी करून आणण्याचे आमचे दिवस सध्या तरी संपले होते.
आम्ही खेडेगावात राहत असल्याने आमच्या सारख्या जेमतेम परिस्थिती असलेल्या लोकाना ह्याचा खूपच फायदा होतो.
ह्या उलगत्या बाजारात खरेदी करण्यातही काही त्रुटी दिसून येतात.अगदी कठिण गोष्ट म्हणजे इतक्या स्वस्तात विक्रिकर विकायला तयार होत असताना इच्छा असूनही तुटपुंज्या पैशात सर्व खरेदी करण्याचा हव्यास कसा पूरा करायाचा असं हळहळून मनात यायचं.
“आणखी थोडे पैसे कमी दे वाटलंतर”
किंवा,
“आता पैसे नसतील तर उद्दा दे जमलं तर”
असं म्हणून तो माल गळ्यात टाकण्याच्या उद्देशाने नव्हे तर आमच्या परिस्थितीची किंव येऊन त्याने काढलेले उद्गार काळजाला भिडून जायचे.आम्हाला नाही जमलं तर आमच्या मागे उभे असलेले आमच्या सारख्याच परिस्थितीचे लोक
“तुम्ही नसाल घेत तर सांगून टाका आम्हाला तरी घेऊ देत”
असं कदाचित मनात म्हणत असतील,किंवा तो विक्रिकर आपल्या मनात म्हणत असेल,
“तुम्हाला नसेल घ्यायचं तर बाजूल व्हा त्याना तरी घेऊं द्दा असं जणू मनात म्हणत असेल”
असं उगाचच माझ्या मनात येऊन मन कष्टी व्हायचं.
आणि त्याही पेक्षा मन कष्टी व्हायचं की जेव्हां ते आमच्या चेहर्याकडे बघून आमच्या निर्णयाची क्षणभर वाट बघायचे.माझी आई कदाचित तसा माझ्या सारखा विचार करितही नसेल किंवा कदाचित तसाच विचार करूनही चेहर्यावर दाखवतही नसावी.बिचारी आई.
“काल घेतलेल्या वस्तू अजून आहेत आमच्याकडे”
असं सांगून एकदाचा पळ काढावा इथून असं वाटायचं.
त्या संध्याकाळच्या उलगत्या बाजारात खरेदी करायला मला खरंच कसंसंच वाटायचं.
एखाद्या माझ्या वर्गातल्या सुखवस्थु मैत्रिणीने माझ्या बाजूने जाताना मला पाहिलं असेल ह्या मरणाच्या भितीने मी चूर होऊन जायची.
एकदा मी माझ्या आईला माझी ही भिती सांगितली.तिच्या डोळ्यात आलेलं पाणी बघून तिच्या नाराजीला मी कारण झाले ह्याचंच दुःख मला जास्त झालं.कधीकधी सकारण सुद्धा मला तिच्या बरोबर खरेदीला जाता आलं नाही तरी माझ्यामुळे तिच्या नकळत भावना दुखावल्या जातात ह्याचा विचार येऊन मी हताश व्हायची.
आणि यासाठीच मी सामावून घेण्याच्या क्ल्पनेला घट्ट पकडून धरायला लागली. कशातही सामावून घेणं म्हणजेच आगे बढो असा संदेश माझं मन मला देऊ लागलं.
सामावून घेण्याच्या ह्या वृत्तिमुळे दुसर्यापेक्षा आपली परिस्थिती निराळी आहे याची मला लाज वाटण्यापासून सुटका झाली.दुसर्या कसल्याही प्रसंगात अशी वेळ आली की मला तो संध्याकाळचा उलगता बाजार आठवतो.
त्याचं कारण सध्या आमचे असे दिवस आले असतील पण तेही दिवस काही कायमचे नसावेत.सामावून घेण्यावर माझा विश्वास वृद्धिंगत झाल्याने मला वाटू लागलं की मी आणि माझी आई येईल त्या प्रसंगातून मार्ग काढून जीवंत रहाण्याची धडपड करूंच.”
एकदा वासंतीला मी भेटलो असतां,
“कसं चाललं आहे?”
असं विचारल्यावर मला हे सर्व तिने सांगितलं.

Tuesday, August 5, 2008
असूनी दोस्त करितो दुष्मनी
केला आहे दुष्टपणा दुष्टानी
केले तरी कुठे कमी दोस्तानी
येतो काळ आसाही जीवनी
असूनी दोस्त करितो दुष्मनी
लागे दोस्तीला कुणाची नजर
बदल होता तुला नसे ती खबर
नाही राहिल्या आणा अन शपथा
साथ साथ मरण्याचा एकही इरादा
दौलतीला राहती सर्वस्व मानूनी
येतो काळ आसाही जीवनी
असूनी दोस्त करितो दुष्मनी
प्रीतिचा लवलेश नसे तुझ्या नयनी
मित्र होऊनी अर्थ मैत्रीचा घे समजूनी
दौलत कसली कसली दोस्ती
नाती गोती सर्वच नावा पुरती
पश्चातापे जे होईल ते अनुभवूनी
सच्चाईचा मार्ग ही अंगिकारूनी
असूनी दोस्त करितो दुष्मनी
श्रीकृष्ण सामंत (स्यान ओझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com
केले तरी कुठे कमी दोस्तानी
येतो काळ आसाही जीवनी
असूनी दोस्त करितो दुष्मनी
लागे दोस्तीला कुणाची नजर
बदल होता तुला नसे ती खबर
नाही राहिल्या आणा अन शपथा
साथ साथ मरण्याचा एकही इरादा
दौलतीला राहती सर्वस्व मानूनी
येतो काळ आसाही जीवनी
असूनी दोस्त करितो दुष्मनी
प्रीतिचा लवलेश नसे तुझ्या नयनी
मित्र होऊनी अर्थ मैत्रीचा घे समजूनी
दौलत कसली कसली दोस्ती
नाती गोती सर्वच नावा पुरती
पश्चातापे जे होईल ते अनुभवूनी
सच्चाईचा मार्ग ही अंगिकारूनी
असूनी दोस्त करितो दुष्मनी
श्रीकृष्ण सामंत (स्यान ओझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com
Sunday, August 3, 2008
प्रत्येक गोष्टीला पर्याय असतो.
त्या दिवशी मी दिल्ली एअरपोर्टवर फ्लाइट चुकली म्हणून निवांत दुसरी फ्लाइट मिळेपर्यंत वेळ काढत बसलो होतो.माझी एक खूर्ची सोडून दुसर्या खूर्चीवर-व्हिलचेअरवर- एक सदगृहस्थ बसले होते.सायंटिफिक जगतात ते विषेश नावाजलेले होते.त्यांची विषेश गोष्ट अशी होती की त्यांना स्नायू हळू हळू क्षीण होण्याचा एक व्याधी झाला होता.तरीपण ते आपल्या कामात नेहमी व्यग्र असायचे.त्यांच्या बाजूला एक गृहस्थ बसून ते जे काही बोलत होते ते तो लिहून घेत होता.
लेट फ्लाइट बद्दल आमचा विषय निघाला आणि दोन तास इथं बसून राहण्याला पर्याय नव्हता.मीच त्यांच्याशी जास्त जवळीक आणून त्यांची चौकशी करू लागलो होतो.
त्यांची ही परिस्थिती पाहून मीच त्यांना प्रश्न केला की ते हे सर्व कसं मॅनेज करू शकतात.
त्यावर ते मला म्हणाले,
"मला नेहमीच वाटतं की मला पर्याय पहाण्याची क्षमता आहे.हरकत नाही मी काय करीत असेन,हरकत नाही मी कुठे असेन,हरकत नाही मी कसल्या प्रसंगातून जात असेन,पण मला पर्याय पहाण्याची क्षमता आहे.
आज मी कुणाची तरी मदत घेऊन माझ्या मनात आलेले विचार त्याच्या कडून लिहून काढण्याचा प्रयत्न करीत आहे.ह्या पूर्वी माझं आयुष्य हजारो कागदाच्या फोली घेऊन त्यावर काही ना काही तरी लिहिण्यात गेलं होतं.परंतु आता मला बोटात पेन धरून कागदावर खरडण्यासाठी ती बोटं वापरता येत नाहीत.
मला अशा प्रकारचा व्याधी झाला आहे,की हा व्याधी हळू हळू माझे एकएक शरिरातले स्नायू निकामी करून शेवटी माझ्या शरिरातले असतील ते स्नायू निकामी करणार आहे. सरते शेवटी मी सरकू शकणार नाही,बोलू शकणार नाही,आणि शेवटी श्वास पण घेऊ शकणार नाही.आत्ताच मी दुसर्यानवर अवलंबून आहे.म्हणून मी रोज माझ्या पर्याया विषयी तपासणी करीत असतो.
ह्या व्याधी बरोबर दिवस काढणं म्हणजे जणू कोर्टातल्या साक्षीच्या पिंजर्यात उभं राहून कोर्टाला माझ्याच विषयी मला काय माहित आहे ते सांगणं.मी कसा दिसतो,मी कसा वागतो,मी जगाशी कसा रदबद्ली करतो आणि हे सर्व आता झपाट्याने बदलत चाललं आहे.तरीपण ह्या बद्दला बरोबर मला अजून पर्याय पहाण्याची क्षमता आहे.
ज्यावेळी मी कागदावर लिहू शकत नाही हे मला कळलं,त्याचवेळी कुणा दुसर्याची मर्जी संपादून त्याच्याकडून लिहून घेण्याची खडतर खटपट मला करावी लागणार आहे हे ही समजलं.पण गंमत म्हणजे ह्या पद्धतीने मी पूर्वी पेक्षा जास्त लेखन करू लागलो.
आणि जास्त क्रियाशील पातळीवर रोज माझा पर्याय पहाताना मी कसा जगणार आहे? हे न पहाता, जर का मी जगलो तर?ह्या पर्यायावर आधार घेऊ लागलो आहे. माझ्यावर कुठल्याच प्रकारचा धार्मिक बंधनाचा पगडा नाही की जेणे करून मला आयुष्यरेषे बद्दल अमुकच तर्हेने विचार करावा लागणार आहे. आणि ह्या माझ्या व्याधीला त्यामुळे तिच्या मर्जीप्रमाणे काय करायचं हे करायला मुभा मिळणार नाही. आणि अगदी इथेच मला माझ्या पर्याय पहाण्याच्या क्षमतेचा खरा अर्थ मिळतो. ही व्याधी ही जणू मला फाशिची शिक्षाच आहे अशा दृष्टीने तिच्याकडे मी पहातो.किंवा ही व्याधी मला मी खरा कोण आहे हे पडताळण्यासाठी मिळणारं आमंत्रण समजतो.
कोर्टातल्या पिंजर्यातल्या साक्षिदारालासुद्धा त्याच्या बद्दलची मुलभूत दृष्टी बदलता येत नाही. मग माझी तरी माझ्या विषयी दृष्टी काय असणार? असला काही तरी विचार मी रोज मनात आणून शिकत असतो.आणि आता पर्यंत मी बर्याच विषेश गोष्टी शोधून काढल्या आहेत.पण ह्यातली एक गोष्ट इतर गोष्टीमधे जरा वरचढ आहे.माझ्या मधेच मी एक गोष्ट शोधून काढली आहे आणि ती अशी की आता मला माझ्यातच काळजी करणं आणि करून घेणं हे चांगलच कळायला लागलं आहे.
हा व्याधी होण्यापूर्वीच्या माझ्या आयुष्यात जेव्हडं मला माहित नव्हतं त्याहिपेक्षा जास्त आता मला माहित झालं आहे.
मी पूर्वी एव्हडा स्वतंत्र आणि स्वतःची खासगी ठेवायचो,तो मी आता आजूबाजूच्या मित्र आणि परिवारांकडे एव्हडा मोकळा झालो आहे की ते सर्व माझ्या जीवनाचा हिस्सा झाले आहेत.पूर्वी हे असं होणं मला महाकठीण होतं.मला वाटायचं की ह्या व्याधीच्या मगरमिठीत राहण्याशिवाय मला तरणोपाय राहिला नसून, खडतर आयुष्य काढणं आणि एकाकी राहण्याला पर्याय नाही. त्याऐवजी आता वाटतं नेहमीच पर्याय पहाण्याचा मला मार्ग मिळाला आहे, मला आता इतर शक्यतांचा वापर करता येईल. आणि आता ज्या गोष्टीला मी कटकट किंवा नकोशी म्हणायचो त्याच गोष्टीने माझं जीवन अविट गोडीने सुखद केलं आहे.ते तसं पूर्वी होतच पण आता मी तसं पहाण्याच्या पर्यायाची निवड केली आहे. ही गोडीच मला जणू ठसाकावून सांगते की मला कसलाही पर्याय पहाण्याची क्षमता आहे."
हे त्या गृहस्थांचं संभाषण ऐकून मी थक्कच झालो.आणि आयुष्यात पर्याय पहाण्याच्या त्यांचा विचार पाहून नविन काही तरी शिकलो.

Friday, August 1, 2008
तू काय बरे मिळवीशी
प्रीति मजसी करूनी
तू काय बरे मिळवीशी
दुःख पिडांची वस्ति जिथे
असे मी तिथला रहिवाशी
कमनशिबी असूनही मी
राहिलो आहे जीवानिशी
कसले स्वप्न मी पाहू
जे ऐकून तू लाजशी
शरमी मजसी करूनी
तू काय बरे मिळवीशी
साथ मला देऊनी
का कष्टी तू होशी
दुनिया माझी झाली एकटी
राहूदे तिला एकटी तशी
यात्रा या जीवनाची
असेल तुला साजेशी
साथी मला करूनी
तू का बरे पस्ताविशी
एकटाच मी नसूनी
अनेक दिवाणे पाहशी
शहनाईचे सूर गुंजूनी
प्रीतिचे तराणे ऐकशी
समजेल तुला जीवनातूनी
किल्मीषे अनेक जसजशी
जाशील मला विसरूनी
असे का बरे समजशी

Subscribe to:
Posts (Atom)