मी पालघरला पहिल्यांदाच गेलो.माझा मित्र पावलु फर्नांडीस माझ्या नेहमी मागे लागायचा,की एकदा तरी ये आमच्या घरी.पावलु मुळचा वसईचा.वसईला एव्हडी वस्ति वाढायाला लागली की त्याने तिथून स्थलांतर करायचं ठरवलं.त्याचे मामा आजी वगैरे मंडळी पालघरला रहायचे.पावलू ने तिथे एक छोटसं एक-मजली घर बांधलं.वसईची जागा आणि शेतीवाडी विकून त्याला बराच पैसा मिळाला. त्याच्या घराजवळ आणखी काही छोटी छोटी बंगलेवजा घरं होती.प्रत्येकाच्या घरामागे परसात असून भरपूर झाडी होती.त्यामुळे पालघर थोडं खेड तर थोडं शहर वाटायचं.
पावलुच्या घरी जाता जाता त्याचा सर्व आजूबाजूचा परिसर मला खूपच छान वाटला.
मी त्याला म्हणालो,
“आजूबाजूचं सृष्टीसौंदर्य बघून ते तसं ठेवल्या बद्दल लोकांच कौतूक करावसं वाटतं.”
त्यावर पावलु मला हंसून म्हणाला,
“ही जी पहाट तुला दिसते आहे त्याच्यापूर्वी रात्र होती.”
आणि पुढे थोडासा दम घेऊन म्हणाला,
“मी येण्यापूर्वी इथे खूपच बेशिस्त होती.जो तो आपलं घर मात्र साफ ठेवायचा आणि घरातला कचरा आपल्याच घराच्या समोर बाहेर फेकून द्दायचा.
आमच्या बाल्कनीत उभं राहून बिल्डिंगच्या सभोवती मी ज्यावेळी बघत असायचो त्यावेळी मला कसं मनात अगदी समाधान वाटत असायचं.आणि ज्यावेळेला मी माझी दृष्टी आणखी चारीबाजूला फिरवायचो तेव्हा असं दिसाचं की ज्याला आपण सर्व साधारण कचरा समजतो अशा वस्तू म्हणजे,फेकून दिलेल्या प्लॅस्टिक पिशव्या,रबराच्या वस्तू,जूनी वर्तमानपत्र,लाकडाचे तुकडे,जूने कपडे ह्या सर्व वस्तू कारण नसताना साठा करून घरी वाढवत असतो.आणि मग कधी तरी बाहेर फेकून देतो.प्रत्येक वस्तू कधी ना कधी उपयोगात येत असते,आणि त्याचा तसा उपयोग जर आपण करू शकलो तर? हे ह्या समजूतीचं कारण असावं.आणि म्हणून आपण त्याची सांठवण करून ठेवतो.वस्तू पुन्हा वापरात आणण्याच्या समजूतीवर मी जास्त भिस्त बाळगून होतो.
आमच्या आजूबाजूच्या परिसरात लोक आपल्या मागच्या परड्यात किंवा समोरच्या अंगणात पडत असलेली झाडांची पानं,फुलं वगैरे घराच्या समोर ढिग करून ठेवतात मग म्युनिसीपालीटीची गाडी येऊन घेऊन जाईल ह्या इराद्दाने,तसं करतात.
माझ्या ह्या कचर्याबद्दलच्या-पुन्हा वापरात आणण्याच्या- समजूतीचा प्रेमाप्रित्यर्थ मी एक नवी योजना आखली.जे जे त्यांच्या घरासमोर पालापाचोळा टाकत असत त्या जागी लाकडाचे तळ नसलेले लांब लचक खोके तयार करून “ह्यात तुमचा पालापाचोळा टाका” अशी पाटी लिहून ठेवली.जसजसा त्यात कचरा वाढत चालला तसतसं मी त्यात पावसाळी गटारातलं पाणी शिंपडू लागलो.त्या साठी आणखी काही होतकरू कच्चेबच्चे मला मदत करण्यात उपयोगात आणले.आजू बाजूची गटारातली माती त्या पाल्यापचोळ्यावर टाकून त्याची उपयुक्त माती तयार करून जागोजागी सजावटी बाग तयार केली.रंगीबेरंगी रानटी फुलांच तो बगिचाच झाला.
टाकून दिलेली वस्तू पुन्हा वापरत आणणं ही गोष्ट मी क्षुल्लक ही समजत नाही किंवा विलक्षण ही समजत नाही.जो कचरा आपण तयार करतो तो बहुदा आपण अति गर्दीच्या जागी जिथे गरिब लोकांची वस्ति असते तेथे नेऊन टाकतो.
खरंच कुठचीच वस्तू फेकून देण्यालायाक नसते.थोडी मेहनत घेतली तर प्रत्येक वस्तू पुन्हा वापरात आणता येते. उदाहरणार्थ,आंघोळीचं पाणी बागेला वापरता येतं.फुलं,भाजी तयार करता येते.
मला वाटतं चूका आणि कमजोरी मधूनच काही तरी शिकायचं असतं.नक्कीच त्याचं परिवर्तन चांगल्या गोष्टीत होतं.
आमच्या पपीचंच घे.ह्या कुत्रीला मी ज्यावेळी न्याहाळून बघतो त्यावेळी ती माझ्या जीवनातली एक आनंददायी बाब म्हणून पहातो.पण खरं तर ही पपी कुणीतरी रस्त्यावर सोडून दिली होती.अगदी लहान असलेल्या त्या पिल्लाला डोळे उघडायला सुद्धा येत नव्हते.ती आता झकास पपी झाली आहे.तिला पाहिल्यावर कसल्या संकटातून तिला जावं लागलं याची आठवण येऊन माझं मन खिन्न होतं.
कधी कधी वाटतं,होईन कदाचित मी पण एकदा असाच पुन्हा वापरण्या साठी उपयोगी.आणि माझ्यातलं गुप्त धन हूडकून काढायला कुणाचं तरी मन धजावेल. जसं मी पुन्हा वापरात आणण्यासाठी प्रत्येक वस्तूकडे पहातो अगदी तसं.जसं त्या रानटीफुलांच्या छोट्या छोट्या बगिच्याकडे पाहून एखादा बाजूने जाणारा म्हणेल,
“किती सुंदर दिसतात हे फुलांचे ताटवे!”
हे सर्व ऐकून झाल्यावर मी त्याला म्हणालो,
“खरंच,मी जर तुझ्या घरी प्रत्यक्ष पाहायला आलो नसतो तर नुसतं वर्णन करून समजून घेण्यासारखं हे प्रकरण नव्हतं. रिसायकलींग हा प्रकार मी ऐकला आहे.म्युनीसिपालीटी प्लास्टीक,रबर,लाकडाचे तुकडे जूने कपडे यांची विल्हेवाट लावेल पण पाल्या पाचोळ्याचा विनीयोग तू खरंच मोठया कल्पकतेने केलास म्हणूनच मी प्रथमच ज्यावळी हे फुलांचे ताटवे आणि बगीचे प्रत्येक घरसमोर पाहिले तेव्हा मनात म्हणालो कुणाची तरी मनापासून आणि तू म्हणतोस तशी प्रेमाप्रित्यर्थ केलेली मेहनत असायलाच हवी.”
पावलु फर्नांडीस मिश्कील हंसत म्हणाला,
“म्हणूच मी तुला पालघरला ये म्हणून मागे लागलो होतो.हे बघून तू ऍप्रिशीयेट करणार हे मला ठाऊक होतं.”
श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com
Saturday, November 15, 2008
Thursday, November 13, 2008
दयाशील आणि परोपकारी हृदय
नंदा प्रधान मॉन्ट्रीयला गेल्यापासून बरीच वर्ष परत आलीच नव्हती.तिला एक मुलगा आणि एक मुलगी होती हे मला नक्कीच माहित होतं.तिची मुलं लहान होती त्यावेळेला ती दोन एक महिने इकडे राहिली होती.तिचा मोठा मुलगा दिलीप का नाही आला असं मी विचारल्यावर तिचा चेहरा कावराबावरा झालेला पाहून मलाही थोडं धक्कादायी वाटलं.
नंदाने सुरवात अशी केली की काहितरी अघटीत झालं असावं ह्याची मला खात्री झाली.
ती मला म्हणाली,
माझ्या मुलामुळे माझा दृढविश्वास वाढला. निस्वार्थी होवून कुणालाही देण्यात मी विश्वास मानू लागले आहे.
आठ वर्षापूर्वी माझा मुलगा दिलीप हृदय विस्तारल्याने आजारी झाला होता.डॉक्टरी भाषेत सांगायचं झाल्यास- दुःखी आईला त्याचा अर्थ तेव्हडाच महत्वहीन म्हणा-”कार्डीओमायोपथी”.
बरेच महिने दिलीप लाईफ सपोर्टवर होता.आम्हावर- तो हळू हळू निष्प्रभ होत असताना- त्याच्या जवळ उभं राहून त्याला पहाण्याची एक प्रकारची सक्ति झाली होती.आणि त्याचवेळी त्याचे मित्र निरनीराळे खेळ खेळताना,आपआपल्या मित्रांबरोबर हातात हात घालून फिरताना,स्वतःच्याच बिछान्यावर झोपताना पाहून, माझ्या मुलाला मात्र हॉस्पिटलच्या बिछान्यावर झोपून जवळच हृदय चालू परिस्थितीत ठेवणार्या मशिनला जोडलेल्या परिस्थितीत मला पहावं लागत होतं.
आईच्या भुमिकेतून माझं रडून झाल्यावर,नंतरची प्रतिक्रिया म्हणजे क्रोध,आणि नंतर मी देवाकडे सौदा करण्याच्या प्रयत्नात.
“देवा! मी खूप आयुष्य भोगलं रे! पण त्याला अजून खूप काही करायचं आहे.”
तसंच माझ्या अवतिभोवती जे लोक जमले होते ते कुणाचं तरी हृदय मिळावं म्हणून प्रार्थना करित होते.पण माझा मलाच खूपच राग आला होता आणि मी थोडी चक्रावलीपण होते.कारण मला माहित होतं तसं घडायला हवं असेल तर कुणाच्या तरी बाळाला मरण प्राप्त व्हायला हवं.मग अशा परिस्थितीत त्यासाठी कुणी प्रार्थना करावी?
मला अजून चक्क आठवतं सकाळी आम्हाला फोन आला की एक हृदय मिळण्याजोगं आहे.जेव्हा आम्ही दिलीपच्या हॉस्पिटलच्या खोलीत असताना त्याला शस्त्रक्रियेसाठी तयार करताना पाहून कडूआनंदाचा खर्या अर्थाने अनुभव घेत होतो तेव्हा दिलीपचे वडील आणि मी नकळत सहमत झालो होतो, एकामुद्दावर. आणि तो मुद्दा म्हणजे अगदी त्या क्षणाला आम्ही त्याच्याजवळ एव्हडे उमेदीने आणि इतके प्रेमाने उभे असताना,अगदी त्याचवेळी दुसरं एखादं कुटूंब कुठेतरी कुणाला अलविदा म्हणत असणार.
आम्ही एकमेकाचा हात घट्ट हातात घेऊन रडलो. आम्ही त्या कुटूंबासाठी देवाची प्रार्थना केली,आणि निस्वार्थी राहून त्यांनी दिलेल्या ह्या भेटी बद्दल त्यांचे आभार मानले.
दहा दिवसानंतर दिलीपला बर्याच महिन्यानी घरी आलेला पाहून आम्ही विस्मयीत झालो आणि आमच्याच डोळ्यावर आमचा विश्वास बसेना.
हॉस्पिटलातच तो चवदा वर्षाचा झाला होता.आणि इतक्या कोवळ्या वयात त्याला पुनर्जन्म मिळाला होता.पुढल्या दोन वर्षात त्याला शाळेत जायला लागलं मित्रांबरोबर खेळायला मिळालं.त्याच्या बरोबर आम्हा सर्वांना हिंडायला मिळालं.
दिलीपने आपल्या करकरीत नव्या हृदयाचा उपयोग रोज देवाची प्रार्थना करण्यात,वयस्कर गरजूना मदत करण्यात आणि हंसण्यात खिदळण्यात केला.
दिलीपचं नवं हृदय तो सोळा वर्षाचा असताना बंद पडलं.दुर्दैवी घटना नक्कीच,पण आम्ही ह्या घटनेला अद्भुत चमत्कार म्हणून पाहू लागलो.कारण आम्हाला अमुल्य अशी दोन वर्ष त्याच्यासंगतीत राहायला मिळाली.आणि त्या दुसर्याने त्याच्या हृदयाची भेट दिली नसती तर हे शक्यच नव्हतं.
आमच्या जवळ दिलीपचे बरेच फोटो आहेत. त्याच्याबरोबर घालवलेल्या क्षणांच्या आठवणी आहेत आणि अत्यंत संतोषजनक परिस्थितीची जाणीव आहे की तो त्याच्या आयुष्याच्या उत्तेजित घटना आणि प्रमुख टप्पे अनुभवू शकला.
जेव्हा तो गेला ते आम्हाला खूपच कठिण गेलं. परतफेड करण्याच्या दिलीपच्या वृत्तीची जाणीव लक्षात ठेवून त्याचे डोळे ज्या कुणाला जग पहायचं होतं त्याला दिले गेले.एखादा ज्याला आपल्याला प्रेम करणार्या कुटूंबाचे चेहरे पहाण्याची उत्सुकता असेल अशाला दिले गेले.
मला वाटतं एक-ना-एक दिवस मी असा चेहरा पाहीन की तो कुणाच्या मुलाचा किंवा मुलीचा असावा आणि ते दिलीपचे काळेभोर डोळे मला टवकारून पहातील-निस्वार्थी राहून दुसर्याला देण्याची साक्ष म्हणून.”
नंदाचं हे सगळं कथनाक ऐकून माझं डोकंच सून्न झालं.

Tuesday, November 11, 2008
“हलो” ह्या शब्दातली क्षमता.
आज तळ्यावर प्रो.देसायांचा नातु नितीन- आणि त्याच्याबरोबर त्याचा मित्र असावा- असे दोघे येताना पाहिले.
नेहमी प्रमाणे भाऊसाहेबानी त्यांना येता येत नाही म्हणून त्यांच्या नातवाबरोबर मला निरोप देण्यासाठी पाठवलं होतं.
नितीनने त्याच्या मित्राची ओळख करून देताना सांगितलं,
“हा माझा मित्र सुरेश पेंढारकर.ह्याने कॅडवर-कंप्युटर एडेड डिझाईन वर-पिएचडी केली असून आता एका कंपनीत व्हाईस प्रेसिडेंट म्हणून काम करतो.मघाशी येता येता आमचं पब्लिक रिलेशनवर बोलणं चाललं होतं.”हलो” ह्या शब्दात किती पावर आहे हे मला सुरेश त्याचा अनुभवातून सांगत होता.मी त्याला म्हणालो नाहीतरी तुमच्या जवळ अर्धा तास बसल्यावर काही तरी विषय निघणारच मग तुम्हाला घेऊनच बोलूया.”
मला हे ऐकून खूपच बरं वाटलं.
मी म्हणालो,
“सुरेश ऐकू या तर खरं तुझा काय अनुभव सांगतोस ते”
सुरेश सांगू लागला,
” मला जे समोर दिसतात त्या सर्वांशी मी बोलतो.मग मी कुठेही असलो तरी.मला कळालंय की लोकांशी बोलण्याने त्याच्या विश्वात एक मार्ग करता येतो.आणि ते पण मग माझ्याही विश्वासाच्या मार्गात येतात.
मी जिथे काम करतो तिथे शेकडो लोक काम करतात.मी नक्की सांगू शकणार नाही की मी त्या सर्वांना ओळखतो म्हणून. पण बर्याच लोकाना ओळखतो हे नक्कीच. मला वाटतं बहुतेक सर्व मला ओळखत असावेत.आणि त्यामुळेच मी म्हणेन की हेच कारण आहे की मला जिथे वाटेल तिथे मी जाऊ शकतो कारण तसंच विश्व मी माझ्या भोवती केलं आहे. आणि ते एकदम साध्या सिधान्तावर आधारीत आहे.आणि तो सिधान्त असा की प्रत्येक स्वतंत्र व्यक्ति ओळख करून घेण्यास पात्र असते.
मी जेव्हा दहा वर्षाचा होतो आणि माझ्या आईच्या हातात हात घालून एकदा रसत्यावरून जात होतो. माझी आई करमरकरांशी बोलायला थांबली.माझं लक्ष दुसरीकडेच होतं.समोरच्या “स्टॉप” साईनच्या “ओ” कडे बघण्यात मी गर्क होतो.मी त्या गृहस्थाना पूर्वी पाहिलं होतं.म्हणून मी त्यांच्याकडे जास्त लक्ष दिलं नाही.
“बरंय”असं त्यांना आईने सांगून झाल्यावर आम्ही पुढे निघाल्यावर मला आई जे म्हणाली ते अजून पर्यंत माझ्या डोक्यात बसलेलं आहे.
ती म्हणाली,
” आता जे केलंस ते शेवटचं समजून जा.कुणाशी ही मी थांबून बोलत असताना तू निदान तुझं तोंड उघडून थोडं तरी बोलायला हवं.कारण एखादं कुत्र्याचं पिल्लू ही तुला रसत्यात पाहून आपली शेपटी हलवतं.”
हे तिचं उदाहरण दिसायला अगदी साधं वाटतं.पण माझ्या दृष्टीने ते एक दिशा दाखवणारी पाटी आहे, आणि माझ्या “स्व” त्वाचा पाया आहे.
स्वतःला आरशात न्याहाळून आपण कोण आहे हे पहावं आणि आपलं आचरण काय आहे हे ही लक्षात आणावं.माझ्या लक्षात आलं की माझं आचरण दहा वयावरच मजबूत झालं होतं. मला दिसून आलं की जेव्हा मी कुणाशीही बोलत असतो तेव्हा ते पण माझ्याशी बोलतात.आणि त्यामुळे मला ही बरं वाटतं.
ही काही माझी नुसती समजूत नाही,तर ते एक माझ्या आयुष्यातलं वळण झालं आहे.मला वाटतं प्रत्येक व्यक्तिला वाटत असतं की त्याचं तिथे असणं हे दुसर्याच्या लक्षात आलं पाहिजे.भले ती व्यक्ती कितीही नम्र वृत्तिची का असेना किंवा ती किती महत्वाची का असेना प्रत्येकाला तसं वाटत असतं.
कामावर असताना मी माझ्या बॉसच्या बॉसशी पण हलो करतो आणि कसं काय चालंय म्हणून विचारतो. आणि कॅन्टीन मधल्या लोकांशी पण बोलतो आणि चपर्याशी पण बोलतो त्यांची मुलंबाळं कशी आहेत म्हणून पण विचारतो.माझ्या कंपनीच्या डायरेक्टरशी असंच हलो-हाय करण्याच्या संवयीमुळे एकदा त्यांच्या बरोबर मिटिंग घेण्याचं धारिष्ट पण मला झालं.आम्ही दोघं खूप बोललो.एकदा तर मी त्यांना विचारलं, त्यांना काय वाटतं की ह्या कंपनीत मी किती वर्ष अजून राहू शकतो?त्यानी मला चक्क सांगितलं की तुला जितकी वर्ष राहयचं आहे तितकी वर्ष तू राहू शकतोस नव्हे तर माझी जागा मिळे पर्यंत राहू शकतोस.
आता मी ह्या कंपनीत व्हाईस प्रेसिडेंट झालो आहे.पण माझी लोकांशी बोलण्याची संवय काही मी अव्हेरली नाही.मी अजून माझ्या आईचे ते शब्द आठवतो.
मला जे समोर दिसतात त्या सर्वांशी मी बोलतो.मग मी कुठेही असलो तरी.मला कळालंय की लोकांशी बोलण्याने त्याच्या विश्वात एक मार्ग करता येतो.आणि ते पण मग माझ्याही विश्वाच्या मार्गात येतात.
तुम्हाला कसं वाटतं?”
असा शेवटी प्रश्न मला त्याने केला.
मी म्हणालो,
“खरंच साधं हलो म्हणून ओळख केल्यावर त्याचे दूरवर किती फायदे असतात हे तूं तुझ्या अनुभवातून छानच पटवून दिलं आहेस.इतका खोलवर विचार मी तरी केला नव्हता.”हलो” ह्या शब्दातली क्षमता मला समजली”

Sunday, November 9, 2008
कार्यरत राहिल्याने हिम्म्त येते.
स्मिता करमरकरला जर का तुम्ही लहानपणी पाहिली असतीत तर आता एव्हडं धारिष्ट दाखवणारी आणि एव्हडं विश्वासाने बोलणारी हीच का ती, असा मनात संभ्रम झाला असता.निदान मला तरी तसं वाटतं.
“तुझ्यात एव्हडं परिवर्तन कसं झालं?”
ह्या माझ्या प्रश्नाला उत्तर द्दायला सुंदर संधी आली आहे असा विश्वास चेहर्यावर दाखवून ती मला म्हणाली,
“माझा भाऊ एका अपघातात गेला.माझ्या आईला त्या घटनेचा एव्हडा धक्का बसला होता की तिचं सान्तवन करणं महाकठीण होतं.मी त्यावेळी फक्त चार वर्षाची होती.त्यामुळे माझ्या आईचा सुरक्षतेकडे बघण्याचा कल किती बदला ते माझ्या लक्षात आलं. एकाएकी आमच्या सभोवतालचं सर्व विश्वच संभवतःच धोक्याचं झालं होतं.एका रात्रीत आमचं विश्व खेळाच्या मैदानाकडेही खतरनाक जागा आहे अशा दृष्टीने पाहू लागलं.
मला वाढताना माझ्यात बरेचसे प्रतिबंध अणि नियमावलीत बसून वाढावं लागलं.कारण तसं करणं हे माझ्या संरक्षणासाठी होतं असं गृहित धरलं जात होतं.मला एकटिला शाळेतून घरी येता येत नव्हतं.माझ्या मैत्रिणी मात्र बिनदास्त येत असायच्या.
मला शाळेच्या सहलीवर जाता येत नव्हतं.कारण मला काहीतरी झालं तर.?
जशी मी मोठी होत गेले तशी माझी ह्या भितीची यादी मोठी व्हायला लागली.दीर्घ आयुष्यासासाठी माझं सारं जीवनच काही गोष्टी टाळल्या पाहिजेत आणि काही गोष्टी केल्याच पाहिजेत अशा दोन समजूतीत वाटल्या गेल्या होत्या. मला माहित होतं की माझी आई मी सुरक्षीत रहावी म्हणून हे करीत होती.माझ्या भावाच्या जाण्यानंतर मी घरातली एकटीच होती म्हणून हे आई करीत होती ह्याची मला जाणीव होती.आणि मला काहीतरी झालं तर?असा तिच्या मनात प्रश्न यायचा.
त्यामुळेच आता मी स्वाभाविक चिंता करणारी झाली. मला कॅन्सर झाला तर,माझी पर्स हरवली तर,मी कुठच्या गाडी खाली आले तर,माझा जॉब गेला तर,म्हणजेच संकटं लहान मोठी, खरी, काल्पनीक आली तर?
गमंत म्हणजे ही गोष्ट माझ्या जीवनाकडे बघून तुमच्या मुळीच लक्षात येणार नाही.कारण जी गोष्ट मला चिंतेत टाकते किंवा ज्या गोष्टीमुळे मी भितीग्रस्त होते त्याच गोष्टी करण्यात माझ्यावर मी जोर करते.
खरं तर मी माझाच एक नियम बनवला आहे.जर एखादी गोष्ट मला भितीग्रस्त करीत असेल तर मी एकदा करून बघते.माझ्या आईने काळजी केल्या असत्या अशा मी बर्याच गोष्टी केल्या आहेत.
आणखी एका गोष्टी बद्दल मी सहसा बोलत नाही.तो माझ्या आयुष्यातला महत्वाचा टप्पा आहे.मी चवदा वर्षाची असताना माझी आई गेली.तिला गाडी खाली अपघात झाला.माझ्या आईचं जाणं आणि माझ्या भावाचं त्या अगोदर जाणं ह्याने मला लटकच करून टाकलं असतं.पण मी माझी आई गेल्यावर एक निश्चय केला होता.एकतर मी उरलेल्या आयुष्यात “सुरक्षीत” रहाण्यात दक्ष राहावं नाहीतर साहसपूर्वक सामना करून संतुष्ट,उत्तेजीत,आणि होय, भयग्रस्त जीवन जगावं.
माझ्या आई बद्दल असं लिहून मी तिच्याशी प्रातारणा करते असं माझ्या मनाला खातं.पण तिच खरी माझ्या जीवनाचा मार्ग दाती होती.आणि सरते शेवटी माझी खात्री आहे की तिला माझा गर्वच वाटला असता.
हिम्मत ही काही माणसाची नैसर्गिक विशेषता नाही.मला वाटतं त्या हिम्मतीसाठी आपल्याला प्रयत्न करायाला हवेत.जणू स्नायु विकसीत करतो तसंच. जेव्हा जेव्हा म्हणून काही गोष्टी करताना मी भयभयीत होते,किंवा मला त्या गोष्टी बेचैन करतात त्यामधूनच माझ्या लक्षात येतं की मला जमणार नाही, ह्या माझ्या समजूती पेक्षा मी काही जास्त करू शकते ही समजूत जास्त महात्वाची वाटायची.
जरी मी माझ्या आईचा सतर्क रहाण्याचा स्वभाव आई कडून घेतला असला, तरी एक माझ्या लक्षात आलं की भय असणं ही खरीच चांगली गोष्ट आहे.जर का आपण तिच्याशी सामना करू शकलो तर?.आणि ह्यावर विश्वास ठेवल्याने माझं विश्व कमी भितीग्रस्त झालं आहे.
मी स्मिताला म्हणालो,
“तुझ्याकडून मी एक शिकलो की तुझ्या मनाला जे योग्य वाटलं ते करण्यासाठी भावनाशील न होता जास्र्त व्यवहारीक काय आहे ह्याच्याकडे तू जास्त लक्ष दिलंस,म्हणून आता तू तुझं विश्व कमी भितीग्रस्त करू शकलीस.”

Friday, November 7, 2008
दुःखाची देवाण-घेवाण.
श्रीधर त्या दिवशी आपल्या पत्नी बरोबर तळ्यावर फिरायला आलेला पाहून मला आनंद झाला.आणि त्या आनंदात भर पडण्याचं कारण त्याच्या अंगावर एक चिमुकलंस मुल पाहून झाला.
गेल्या वर्षी मी त्याच्या घरी गेलो होतो ते त्याचं सांत्वन करण्यासाठी.त्याला त्यावेळी लग्न होऊन वर्ष झालं होतं आणि नवीन पाहूण्याच्या आगमनाच्या बातमीने तो खूपच खूष झालेला दिसला होता.मुलाचा जन्म झाल्या नंतर ती त्याची खूषी जास्त दिवस टिकली नाही.दुरदैवानं ते मुल होता होताच गेलं.त्या धक्क्यातून सावरता सावरता हे दुसरं मुल पाहून मला सहाजिकच आनंद झाला.मला त्याच्या बरोबर त्या घटनेचा विषय काढायचा नव्हता.पण त्यानेच तो विषय काढला आणि म्हणाला,
“मला वाटतं,दुःख करणं बरं असतं.कधी कधी माणूस दुःख कसं करायाचं ते विसरून जातो.गेल्या वर्षी झालेल्या घटनेची आठवण येण्यासाठी तुम्हाला पाहून मला अवसर मिळाला.
माझी पत्नी सातव्या महिन्यावर गरोदर होती.आणि तिचा रक्तदाब एकाएकी उंचावला.तिची लिवर बंद पडायच्या मार्गावर आली.तेव्हा डॉक्टरनी तिचं सिझरीन करून बाळंतपण कराण्याचं ठरवलं त्यामुळे आईचे आणि बाळाचे प्राण वाचणार होते.
पहिल्यावेळी जेव्हा माला माझ्या मुलाचं दर्शन झालं,ते त्याला इनक्युबेटर मधे ठेवलं असताना.त्याच्या नाकापासूनच्या श्वास नळ्या नर्ससीस साफ करीत होत्या.एखादा पाण्यातला मासा पहातो तसं त्याने मला पहिल्यांदा पाहिलं असा मला भास झाला.मी अशी कमजोर चिमुकली बेबी पहिल्यांदाच पाहिली असेल.
पुढल्या दोन आठवड्यात माझ्या पत्निची प्रकृती बरीचशी स्थिर झाली होती.पण माझ्या मुलाची स्थिती खपूच बिघडली होती.अपरिपक्वपणे जन्मलेल्या बाळाची फुफ्फुसं कोपर्यातल्या त्या कोळ्याच्या जाळ्यासारखी नाजूक,कमजोर असतात आणखी हलक्याश्या दबावाखाली चक्काचूर होतात.क्षणभर मला वाटलं की मी त्याला माझ्याच छातीच्या आत ठॆवावं आणि माझी फुफ्फुसं देऊन श्वास घ्यायला मदत करावी.आम्ही त्या बाळाला आमच्या छातीजवळ घेतलं,त्याच्या इवल्याश्या कपाळ पट्टीवर हात ठेवला आणि शेवटी सगळ्या तारा आणि नळ्या दूर सरकवून त्याच्या हाताच्या मागे एकच बोट सरकवून हाताला आधार द्दायला यशस्वी झालो.
काही वेळाने त्याची फुफ्फुसं निकामी झाली आणि आम्हाला तो सोडून गेला.तो कधीच रडला नाही.मी आणि माझ्या पत्नीने दोघानी त्याला जवळ घेतलं, त्याला आंघोळ घातली,त्याचे केस पुसले,त्याला इवलेसे कपडे घातले आणि मग तो त्याच्या शेवटच्या प्रवासाला निघून गेला.एक देवदूत येऊन त्याने आमच्या मुलाच्या सभोवती हात घालून त्याला उचलून घेऊन जणू एखादं सोन्याचं नाणं खिशात ठेवतात तसंच ठेवलं असं माझ्या मनात आलं.त्यावेळी तुम्ही माझ्या घरी आला होता ते मला आठवलं.
जसे दिवसा मागून दिवस जाऊ लागतात,तसं तुम्ही डोळे मिटून तुमच्या दुःखाला एक एका बोटातून निसटू देऊन,अपरिमीत झालेली हानी तुमच्याच आत प्रस्थापीत करायला बघता.तुम्ही आणि तुमचं दुःख ह्या मधली ही देवाण घेवाण म्हटली पाहिजे.मनातल्या तणावाचा पूढे मागे होणारा हा एक झोका समजला पाहिजे.एखादी होडी पालथी होवून पाण्यात डुबून जावी असं जीवन वाटतं.सरते शेवटी तुमचं दुःख तुम्हाला स्थीर करतं,आणि आलेल्या वाईट परिस्थितीत स्थैर्य निर्माण करतं.
मी एक चांगला पति आहे.तसाच चांगला बाप आणि चांगला माणूस म्हणून माझ्या हानीकडे मी पहातो.मी दयाशिल,आणि सहानुभूती ठेवणारा आणि जरूरी प्रमाणे गोष्ट करणारा आहे.आमचं लग्न नव्याने रुपाला आलं.आमच्या संबंधात असलेली घाण मुलाच्या मरणाच्या भट्टीत जळून गेली.आपल्या मुलाजवळ त्याच्या आयुष्याच्या प्रत्येक क्षणाला त्याच्या सहवासात राहायला मिळणारं भाग्य थोड्याच भाग्यवान लोकांच्या नशिबात असतं.आणि माझा मुलगा त्याच्यावर प्रेम करणार्यांच्या बाहूपाशात राहून मग गेला.
आता दहा महिन्यापूर्वी माझ्या पत्निने एका सुदृढ मुलीला जन्म दिला.आणि माझ्या मुलाच्या जाण्याने झालेल्या हानीची भरपाई माझ्या मुलीच्या जन्माच्या आनंदाने भरून आली.कारण आता आमच्याकडे काय राहिलं आहे त्याची आम्हाला जाणीव झाली.देवदूताने आपले दोनही हात फैलावले आहेत.जेव्हा माझी मुलगी माझ्याकडे पहिल्यांदा पाहू लागली तेव्हा मी तिला जवळ घेऊन सुखावलो.आता मी खूष आहे.
माझी पत्नीपण आनंदात असते.त्यामुळेच मी सुरवातीला म्हणालो की मला वाटतं,दुःख करणं बरं असतं.कधी कधी माणूस दुःख कसं करायाचं ते विसरून जातो.”
मला त्याचं हे सर्व बोलणं ऐकून खूप वाईट वाटलं.विषय बदलण्यासाठी मी लगेचच त्याला विचारलं ह्या मुलीचं नांव काय तू ठेवलंस.तो समजायचा ते समजून गेला.
श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gamil.com

Wednesday, November 5, 2008
तनुलिचं गद्य,पद्य
तनुलीचे आजीआजोबा जेव्हा परत जायला निघाले त्यावेळी तनुली आपल्या आईबाबाबरोबर त्यांना पोहचवायला गेली होती. त्याचवेळी तिच्या लक्षात आलं की हे आता परत येणार नाहीत,त्यांच्या डोळ्यातले अश्रू पाहून नंतर ती मनांत म्हणाली
का असे गेलात तुम्ही
ना बोलता ना सांगता
सहवासाच्या संगतीची
हिच का हो वाच्यता?
नंतर घरी अल्यावर आईबाबांचे बोलणे तिने ऐकले.
आईबाबा आले घरी
म्हणती एकमेकामधे
ठेऊया हिला उद्या डेकेअरमधे
तनुली रात्री झोपली नाही.आजीआजोबांची तिला सतत आठवण येत होती.
झोप येई ना मला
वाटे आईला मज भूक लागली
जवळ घेऊनी देई दुदु मला
कसे सांगू मी तिला
येई आठवण त्यांची मला
दुसर्या दिवशी डेकेअरमधे टॉम,जेरी,क्याथरीन आणि सेरा म्हणाली तिला
” रडूं नकोस अशी, येतील तुझी आईबाबा संध्याकाळी.”
मी मनात म्हणाले
“कसं सांगू मी त्याना की,आईबाबांचे पण आईबाबा असतात,ते आता कसे परत येणार?”
समजाविले मला आईने रात्री
रडूं नकोस तूं त्याच्यासाठी
येतील ते पुढच्या वर्षी
आहे मला त्याची खात्री
हे एकून तनुलीला बरं वाटलं.ती आईला म्हणाली.
लाविला मी त्यांना लळा
रडुन सुकला माझा गळा
असतील ते तिथे बेचैन
जातील हे ही दिवस झटकन
होईन मी तोवरी मोठी पटकन
लुडुलुडु चालण्या एव्हडी
गुलुगुलु बोलण्या एव्हडी
घेतील ते मज कमरेवरती
सांगिन मी मग त्यांना सत्वरी
“का असे गेलात तुम्ही
ना बोलता ना सांगता
सहवासाच्या संगतीची
हिच का हो वाच्यता?”

Monday, November 3, 2008
बार-ऍट-लॉ
त्यादवशी मी मुंबईच्या चौपाटीवर अमळंसा फिरायला गेलो होतो.सूर्य अस्थाला जाण्याची वेळ आली होती.
सूर्यास्त पहायला मला खूपच आवडतं.तिथे ठेवलेल्या एका बाकावर बसायला गेलो.आणि त्याच बाकावर आणखी एक बसलेली व्यक्ती माझ्या बरोबर जणू जूनी ओळख आहे असं दाखवून माझ्याशी हंसली.मी पण हंसलो.मला खरंच त्या गृहस्थाला ओळखता आलं नाही.
“अहो मी,समीर शिरवईकर.गोव्याला आपण शेजारी शेजारी राहयचो.तुम्ही तुमच्या वहिनीच्या माहेरी लहानपणी सूट्टीत राहायला यायचा.कित्येक वर्षानी आपली भेट झाली.”
मी त्याना म्हाणालो,
“तुम्ही मला पटकन इतक्या वर्षानी कसं ओळखलत?”
“तुमच्या गालावरची खळी कुठे लपणार.तुम्ही माझ्या जवळ बसताना हंसलात त्याचवेळी मला लक्षात आलं.
की तुम्ही सामंतच असणार.”
“मग तुम्ही काय करता?”
असा पुढचा प्रश्न मी त्याना केला.
“मी कॉलेजात कायदा शिकवतो.आता काळोख बराच झालाय.मी चर्चगेट स्टेशन समोरच राहतो.चला आपण माझ्या घरीच जांऊया.”
नंतर आम्ही दोघे चालत चालत त्यांच्या घरी गेलो.
मला समीर म्हणाला,
“सध्या माझी बायको आणि मुलगी गोव्याला गेली आहेत.आता जेवायची वेळ झाली आहे आपण गिरगावतल्या अनंताश्रमातून डबा मागवूया.”
मला कुणाचा आग्रह टाळता येत नाही.मी ओके म्हणालो.
त्याने त्याच्या नोकराला पाठवून सरंग्याची तळलेली काप,तिसर्याचं सुकं,कोलंबीची आमटी,तळलेली कोलंबी,सोलाची कढी,भात आणि चपात्या आणायला सांगितल्या.
डबा येई पर्यंत,काही तरी बोलत रहावं म्हणून मी त्याला म्हणालो,
“तू ह्या वकिलाच्या लाईन मधे गेलास त्याचं मला नवल वाटत नाही.कारण मला आठवतं,तू त्यावेळीसुद्धा तुझे मामा लंडनला राहतात आणि ते बॅरिस्टर आहेत,त्यांच्या सारखं तुला शिकायचं आहे म्हणायचास ते मला आठवतं.तसच केलंस की काय?”
समीर म्हणाला,
“हो मी मामाकडे लंडनला राहात होतो.तिथे बार -ऍट -लॉ झालो.आणखी इकडे आल्यावर थोडे दिवस प्रॅक्टीस करत होतो.मला मुळात शिकवायची आवड असल्याने मी इकडच्या लॉ-कॉलेज मधे शिकवतो आणि प्रॅक्टीस पण करतो.”
मी म्हणालो,
“तू क्रिमीनल केसीस घेतोस,मग त्या लाईनची मला माहिती ऐकायला मजा वाटेल”
समीर सांगू लागला,
“मी माझ्या विद्दार्थ्याना नेहमी सांगतो की कुणाचाही बचाव करायला मागे पुढे पाहू नका.मग त्या व्यक्तीने काही केलेलं असो.
“तुम्ही पटाईत गुन्हेगाराचा बचाव कराल काय?तुम्ही एखाद्दा खून्याचा बचाव कराल काय?”
असे मला नेहमीच प्रश्न विचारले जायचे.माझं त्याला एकच उत्तर असायचं,
”होय,मी करीन.”
आणि असंच उत्तर हवं.कारण मला वाटतं,कुणी काहिही केलेलं असलं तरी त्या व्याक्तीची कमीत कमी कुणी एकाने तरी बाजू घेतली पाहिजे.
माझं पूरं आयुष्य गुन्हेगाराच्या वकिलाचं काम करण्यात गेलं.मी जनतेचा समर्थक होतो.माझी अशिलं अत्यंत घृणा येईल असे कल्पना करवणार नाही असे गुन्हे केलेले असायचे.मी माझं सर्व कसब वापरून,रचनात्मकता आणून,असेल ती दृढता लक्षात घेऊन त्यांचा बचाव करायचो.
शेवटाला माझ्या अशिलाना कहिना काही कारणाने गुन्हेगार ठरवलं जायचं. कारण गुन्ह्याची गार्हाणी ऐकणार्या न्यायपालीकेचं ते स्वरूप होतं.कारण कुणावरही गुन्हेगारीचा आरोप झाल्यावर त्या न्यायपालेकेशी मुकाबला करणं कठीण काम होतं.त्या प्रांतात असलेली त्यांची शक्तिशाली ताकद,साधन, पोलीस यंत्रणा,आणि अभियोग त्या व्यक्तीवर फेकलेले असायचे.आणि फक्त त्याचा बचाव करणारा म्हणजे एक वकील.पण असं अजीब असून सुद्धा मी बर्याच लोकांची सुटका करण्यात मदत केली आहे.कधी कधी मी न्यायमूर्तीला कायदेशीर तृटी दाखवून राजी करत असायचो.कधी कधी ज्युरींकडून “निरपराधी” म्हणून निकाल मिळायला यशस्वी व्हायचो.
बर्याच लोकांची मी सुकटा करून घेत असे ते दोषी असायचे.काही सुटून पुन्हा गुन्हा करायचे.एकाला तर खूनाच्या गुन्हातून मुक्त केल्यावर सुटल्यावर त्याने दुसर्या कुणाचा खून केलेला असायचा.आणि मी परत त्याचा बचाव केला असायचा.तरीपण त्याला शिक्षा व्हायची पण त्यावेळी माझ्या कडून त्याचा बचाव करण्याचा जोश कमी नसायचा.
हे काम करून आता तीस वर्ष झाल्यावर मला आता कसं वाटत असेल असं विचारलंत तर मी म्हणेन मला माझ्या कामाचा गर्व आहे.माझ्या विवेकाशी नैतीक संवाद ठेवून मी झुंज दिली म्हणत असाल तर खरंच आहे ते.
कोर्टात मी गुन्ह्याचा आरोप असलेल्या व्यक्तिशी सामना केला आहे.त्यांच जीवन,शरिर,बहूतेक वेळा त्यांचा आत्मा, कायमचा दुखावलेला असायचा.बरेच वेळां मी त्यांच्या डोळ्यात माझ्या कुटूंबातली व्यक्ति पाहायचो.कधी कधी त्यांच्या डोळ्यात मी मलाच पहायचो.
माझ्याच आतल्या माझ्याशी होणारा संघर्ष भिषण असायचा.आणि तो संघर्ष रात्रीच्या जागरणात,चिंतेत, आणि उदासिन ठेवण्यात माझा वचपा काढायचा. पण अखेर शेवटी,मी जे काय अंगिकारलं होतं त्यावरच्या माझ्या श्रद्धेची माझ्या आशंकावर जीत व्हायची.
मला माहित आहे की बर्याच लोकाना हे कळायला जरा कठिण व्हायचं.खरंतर काही ऐकून भयभयीत व्हायचे.आणि क्षणभर दर्शवायचे पण.
लोकशाहीचा हा एक फायदा आहे की प्रत्येक व्यक्तीचं व्यक्तीस्वातंत्र्य संभाळलं जातं.आपण कायद्दाचा आधार घेऊन निषेध करण्यासारखं जरी कुणाचं वर्तन पाहिलं तरी त्याला कायद्दाचं संरक्षण दिलं जातं.ते वर्तन कसंही असलं तरी त्या व्यक्तीची बाजू घेणारी आणखी एक व्यक्ती असूं शकते.
हे संरक्षण काढून घेतलं की आपले लोकशाहीचे सर्व हक्क निरर्थक होतात.वकिलाकडून जर का प्रतिकार झाला नाही तर तो वकिल आणि ज्यांच्यावर अभियोग चालवला जातो ते त्याचे प्रतिनीधी असतात, त्या सर्वांच्या स्वातंत्र्यावर गदा येते. कारण जे शक्तीशाली असतात ते त्यांच्या शक्तीचा गैरवापर ज्यांच्याजवळ नाही त्यांच्यावर करू शकतात.
माझ्या विद्दार्थ्याना मी अशावेळी त्या लोकांसाठी झुंज द्दायला सांगतो.परंतु,ती झुंज फार दृढ निश्चय ठेवून,त्यांच्याकडे असलेल्या प्रतिभा,आणि कौशल्याची वापर करून झाली पाहिजे.
तुम्ही काहिही गुन्हा केलेला असो एक व्यक्ती तुमची बाजू घेणारी असली पाहिजे.त्याचमुळे आपलं व्यक्तीस्वातंत्र्य जोपसलं जाणार.अशी माझी श्रद्धा आहे.”
वेळ कसा गेला ते कळलंच नाही.तोपर्यंत अनंताश्रमातून डबा आला.भूकही दाबून लागली होती आणि त्यातल्या त्यात अनंताश्रमातलं मालवणी जेवण.मग काय विचारता!

Subscribe to:
Posts (Atom)