सकाळ म्हणाली दुपारला
ही संध्याकाळ,
रोज कुजबुजत असते काळोखाशी
ऐकून हे,
दुपार सांगे तिला (सकाळला)
घेऊन तूं पण जाशी की
पहाटेला रोज फिरायला
अन,
देयी निरोप तुला ती (पहाट)
लगेच,पाहुनी सुर्याला
ऐकुनी त्यांचा संवाद
दिवस म्हणे रात्रीला
दोष असे हा सुर्याचा
करी तो
उदय अन अस्थ दिवसाचा
ऐकून हे,
रात्र सांगे दिवसाला
दोश नको देऊं तूं सुर्याला
दोष असे हा प्रुथ्वीचा
गर,गर फिरुनी सुर्याभोवती
जन्म दिला तिने ह्या सर्वांना
पाणावल्या डोळ्याने
म्हणे प्रुथ्वी सुर्याला
भलेपणाचे “दिवस”संपले
जन्म देऊनी ह्या सर्वांना
अन
मिळे दोष आपल्या दोघांना
स्तिथप्रद्न्य तो सुर्यनारायण
समजावी त्या माउलीला (प्रुथ्वीला)
आठवशी त्या सुभाषीताला
कालाय तस्मै नम:
श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com
Saturday, February 14, 2009
Thursday, February 12, 2009
भिंगरी
आज माझी भेट प्रो.देसायांशी तळ्यावर झाली तेव्हा भाऊसाहेब जरा मला “फारमात” दिसले,हे माझं भाकित खरं ठरलं जेव्हा ते मला म्हणाले,
“मी आज तुम्हाला लेक्चर देणार आहे.आज मला माझ्या करीयरची आठवण येऊन एखादा विषय घेऊन त्यावर “चर्वीचरण” करायला हूक्की आली आहे”
मी म्हणालो,
“भाऊसाहेब तुमच्या चर्चेचा विषय तरी काय आहे.? मला जरा फोकस होऊं दे”
मला म्हणाले,
“भिंगरी,भोंवरा”ज्याला इंग्रजीत “स्पायरल” म्हणतात.”
“म्हणजे,भाऊसाहेब तुम्ही गेले काही दिवस ह्याच विषयावर चिंतन करीत होता की काय?कारण त्यादिवशी लायब्ररीतून येताना मी तुमच्या हातात दोन तीन पुस्तकं बघीतली,एकावर चक्क “स्पायरल” लिहिलं होतं.मी हा काय विषय आहे म्हणून विचारणार होतो पण बोलताना दुसराच विषय निघाल्याने राहून गेलं.” असं मी म्हणालो.
त्यावर भाऊसाहेब म्हणाले,
“आता जे काय जगात चालंय,ते पूर्वी पासून जवळपास असंच होतं की काय?की जसजसा माणूस सुधारू लागला तसतसा तो आजच्या परिस्थितीला आला.ह्यावर माहिती काढण्यासाठी ही तीन पुस्तकं मी वाचली.त्या तिन्ही पुस्तकात तात्पर्य हेच होतं की हे सर्व जीवन भिंगरी सारखं आहे.आपल्याच भोवती गोल गोल फिरत आहे.”
भौतिकवादी लोक जन्माला येण्यापूर्वी मनुष्याची ईश्वरावर श्रद्धा होती. देव मानायचे. आणि आजूबाजूला देवाचंच चैतन्य आहेअसं मानित.त्यात हवा, पाणी,वनस्पती, प्राणीमात्र, धरती,आकाश आणि समुद्र ह्यांची गणना होती.आणि त्यामुळे हे सर्व पवित्र आहे अशी समज असायची.पूर्वज आजूबाजूच्या पर्यावरणाबरोबर समानता ठेवून राहायचे. आणि नंतर आपण हे सर्व विसरलो.असंतोषामुळे आणि विवादामुळे आपण कृर बनलो.कृरतेच्या भूकेला सीमा नव्हती.कितीही पोषण केलं तरी त्यांची समाधानी होत नव्हती.ही धरती दुर्लक्षीत झाल्याने एकाकी राहिली आणि उजाड झाली.वनस्पती,प्राणी आणि धरतीची ताकद नाहीशी झाली.कारण कुणीच लक्ष देईना. पूर,भीषण आगी,वादळं,आणि भूकंपामुळे जवळ जवळ सर्व नष्ट झालं.धरती हादरली. आणि ह्या र्हासातून नवं जग प्रकट झालं.
आता लोकाना ऐकू यायला लागलं,दिसूं लागलं आणि खरोखर आपण कोण आहोत हे लक्षात यायला लागलं.आपण कुठून आलो आणि कुठे चाललो आहोत सर्व मिळून, हे पण लक्षात यायला लागलं.ह्या परिस्थितीत आपण त्या सुंदर स्मृतीत टिकून राहिलो.आणि ज्याला कायमचा विश्राम दिला पाहिजे होता ते परत प्रकट झालं.मग तो तिरस्कार करणारा प्रेमी असेल,भावाभावातली भाऊबंदकी असेल,मित्रा मित्रातली ईर्ष्या असेल,किंवा एखादा लोभी शासक असेल.मनोभावातली ही एकच भिषण चिरफाड होती आणि राहिलेलो आपण त्याचं अनुकरण करीत गेलो.नाहीतरी मनुष्यप्राणी तसा कमजोर असल्याने कधी तो जंगली असतो आणि कधी प्रेमळही असतो.
त्यामुळे पुनःच्छ तिच कहाणी निर्माण झाली.गांभिर्य,व्यसनाधीनता,प्रेम आणि आवश्यकता हे सर्व त्याच सामुग्रीमधून परत निर्माण झालं.आणि पुन्हा आपण त्याच परिस्थितीत शिरलो आहो. आणि स्मृतिभ्रष्ट झाल्या सारखं करून दाखवित आहो.स्वच्छ आणि ताजं पाणी असतं हे आता फक्त आठवण म्हणून ठेवलं पाहिजे. धरतीमातेची स्तुतीसुमनं गाणारे थोडकेच रहिले आहेत.जन्म-मृत्यूच्या घटना, ज्या आयुष्यात स्थित्यंतर आणतात, ज्या आपल्याला एकमेकाच्या बंधनात जखडून ठेवतात त्यावर आता संघठित धंदेवाईकांच्या व्यवस्थेत धातू,धन आणि यंत्र यानी आपल्याला जखडून ठेवलं आहे.असा जेव्हा दूवाच तुटतो तेव्हा आपली बुद्धिमत्ता आपण हरवून बसतो.सुरवात कशी करावी आणि शेवट कसा करायचा हेच विसरायला झालंय.हे दैत्य आता शासकांचं,पुढार्यांचं,दफ्तरशाहांचं,आणि ख्यातीवंतांचं वेषांतर करून जगत आहेत.लोकांना उत्पादन वाढवण्यासाठी गुलामगिरीत जखडून ठेवलं आहे.आणि ह्या दैत्यांच्या बॅन्का संपत्तिने भरल्या जात आहेत.पैशेवाल्याना सन्मान दिला जात आहे.मग त्यानी तो पैसा कुठल्याही मार्गाने कमवला असला तरी हरकत नाही.
काय म्हणावं ह्या जगाला?मला एकच वाटतं की ईश्वरावरच्या श्रद्धेच्या प्रकाशाची झोत मनुष्याच्या चुकांमधूनच त्याला मार्ग दाखवते. “
उन्हाळ्याचे दिवस असल्याने सूर्यास्त जवळ जवळ रात्री नऊ वाजता होतो.नऊ वाजले हे घडाळाकडे पाहिल्यावरच कळाले.
प्रो.देसायांचं चिंतन ऐकता ऐकता वेळ कसा निघून गेला हे दोघांनाही कळलं नाही.

Tuesday, February 10, 2009
असंच एक स्वप्न.
मी एका ओढ्याच्या कडे-कडेने जात होतो.दोन्ही बाजूला सर्व प्रदेश एकदम नागवा दिसत होता.मैल दोन मैल तरी उंच उंच वाढलेलं गवत आणि रानटी फुलं सपाट करून टाकली होती.ओढ्यातल्या पाण्याची खळखळ -आता पाणी तळाला गेल्याने- कमी झाली होती.सगळीच तळातली मातीच-माती होती.कुठेतरी मधून मधून पाण्याचं डबकं दिसे.काही डबक्यात अगदी लहान मासे चिखलात डोकं रूतून पाण्याचा शोश करून घेत पुन्हा डोकं वर काढून डुचळ्या मारत वर येत होते.हिरवी गार बेडकांची डोकी आजूबाजूला प्रकट होत होती.काही सूर्यस्नान घ्यायला डोकं वरकरून राहायची तर काही कुणाची चाहूल लागल्याचा भास होऊन झटकन डबक्यात डुबकी मारीत होती.
एक तरतरीत आणि अक्कलमंद बेडूक काळसर खडकाचा आधार घेऊन वर बसून रात्रीचं जागरण विसरून पेंगत बसला होता.
मी त्या बेडकाच्या अंमळ जवळ बसून कुतहलाने त्याच्याकडून शिकायला बघत होतो.हल्ली बेडूक कमीच दिसतात. बरेचसे शेतातल्या पेस्टीसाईड आणि इतर खतामुळे नाहीसे होत राहिले आहेत.हा बेडूक आणि ह्याचे भाऊबंद बरेच वर्षात एकत्रीत मी पाहिले.आम्ही दोघे एकमेकाशी काही न बोलता निळ्या आकाशाच्या क्षीताजाकडे बघत असता मधूनच डबक्यातल्या माशांची पाण्यातली धक्काबूक्की बघत होतो.शेवटी तो चाणाक्ष्य बेडूक माझ्याशी बोलायला लागला,
“माणसं ह्या ओढ्याकडे येत जात असतात.”
पुन्हा एक बगळ्यांची रांग आवाज करीत आमच्या डोक्यावरून निळ्या क्षितीजाकडे झुकली.
सध्या जग कुठे चालंय आणि मानवजातीत किती क्लेष निर्माण झाले आहेत ह्याचा विचार येऊन आम्ही दोघे दुःखी आणि हताश झालो.
“प्रगती करता करता मनुष्य गोंधळला आहे आणि त्याची वाट चुकत आहे.काहीना त्यांची वाट अजून ध्यान्यात आहे.”
असं मी बेडकाला म्हणालो.
“मी जिथे जिथे जातो तेव्हा ह्या लोकाना हूडकून काढायाला प्रयत्न करतो.”असं मी म्हणालो.
त्याने मान हलवून संमत्ती दिली.
दिवस उतरंडीला जात होता.परत भेटायचं ठरवून आम्ही वेगळे झालो.एकमेकाचे आभार मानले.मी मागे वळून पाहिल्यावर तो अजून त्या खडकावर होता.मासे चिखलात डोकं रूतून पाण्याचा शोश करून घेत पुन्हा डोकं वर काढून डुचळ्या मारत वर येत होते.आणि तो बेडूक ते पहात होता.
पण हे असंच एक स्वप्न होतं.

Sunday, February 8, 2009
शिरोड्याचं हवामान.
बरेच दिवसानी मी कोकणातल्या शिरोडे गावात गेलो होतो.गोव्यातपण एक शिरोडे आहे.रेडीचा समुद्र किनारा जवळच आहे.ह्या समुद्रामुळे जवळच्या या गावात हवामानवर खूपच परिणाम होत असतो.
आपण ज्यावेळी भेटतो त्यावेळी बहुदा हवामान हा विषय म्हणून कधी कधी आपल्या बोलण्यात येत असतो.हवामान हे एक कारण आहे.ते आपला दुवा सांधून वास्तविकतेला आकार देते.आपण त्या हवामानातून श्वसन करतो.आपण त्यातच असतो. आता ह्या क्षणी मी शिरोड्या गावात आहे तिथे असाधारण गरम, ह्युमीड आणि स्थीर अशी हवा आहे.जमिनीकडून समुद्रावर आणि उलट जाणारे वारे हे आपले नैसर्गिक एअरकंडिशनर आहेत.
शिरोड्याचं हवामान प्रसिद्ध आहे.तुम्हाला ते हवामान आवडत नसेल तर एक मिनीट थांबा,ते लागलीच बदलेल.एकाएकी वावटळ येऊन आकाश ढगानी भरून जाऊन पावसाचे शिंतोडे पडायला वेळ लागणार नाही. कधीही तुम्ही पेपरात इकडचं हवामान बघीतलंत तर ते नेहमी गरम,ह्युमीड असंच लिहिलेलं असेल.आणि ते पण दिवसभर.सदाची इकडे हिटवेव्ह असते.
माझे मित्र नेहमीच मला सांगतात की पृथ्वीवरचं हवामान कसं बदलत राहिलंय ते.धृवावरचं बर्फ वितळायला लागल्या पासून तिकडची अस्वलं पाण्यात डुबत आहेत.आणि कुठे प्रचंड दुष्काळ पडतोय तर कुठे वाळवंटं तयार झाली आहेत. वाटतं जरा आपल्याच आजूबाजूला न्याहाळून ह्या धरतीची काळजी घेण्याची वेळ आली आहे.वनस्पती,प्राणी,वारे,पाऊस,सूर्य आणि चंद्राचे आभार मानले पाहिजेत.ह्या सर्वानी आपली इतकी वर्ष काळजी घेतली आहे आणि आपली जोपासना केली आहे.आणि त्या विधात्याचे पण आभार मानले पाहिजेत.आपण इतकं सगळं सहजगत्या स्विकारलं असंच करतो.बरेच आपल्यातले आपण ह्या धरतीवर खरोखर कोण आहोत हे विसरून गेलो आहोत.
माझा एक ह्या विषयावर अभ्यास केलेला मित्र सांगतो,
“हे एका टोकाला गेलं तर?-आणि ते जाणारही-जर का आपण आपल्याच वागणुकीत बदल केला नाही तर.?
आपल्याला परत आदिवासी व्हावं लागेल.” वनस्पती,प्राणी आणि वार्यांची स्तुतीसुमनं गावी लागतील,की ज्यांच्यामुळे आपण जगलो आहो.मला वाटतं,आताच सुरवात केली पाहिजे.हवामान अनुकूल आहे आणि ते आपल्या विचारांचं आणि क्रियेचं समापन आहे.
काल शिरोडे गावात खेळाचे सामने झाले.खो खो,हुतुतू,आट्यापाट्या,आणि कुस्तिचे खेळ.हे खेळ कौशल्याचा आधारावर आहेत.एक तरी भिडू शेवट पर्यंत टिकण्यावर त्याचं कौशल्य दिसून येतं. कुस्तिच्या खेळातून आपल्याला रोजच्या आयुष्यात शक्तिमान बनयाला मदत होते.त्यामुळे घरातली जड वजनं उचलायला मदत होईल.बाजारातून जड पिशव्या घरी आणायला सोपं जाईल.आणि चालायचा व्यायाम केला किंवा धावायचा व्यायाम केला तर कदाचीत जवळपास पायी जायला सोपं जाईल.आणि गाडीत इंधन कमी घातलं जाईल.आणि त्यामुळे प्रदुषण कमी होईल.आणि चिकन तंदुरीचे पाय भिरकावून दिल्यास?चरबी सकट तळलेले तिन चार पाय खाऊन झाल्यावर जरूरी नसलेला उरलेला पाय किती लांब भिरकावता येतो ते पाहिल्यावर तुमचं काही पौन्ड वजन कमी होईल आणि कदाचीत एकाददोन वर्षानी आयुष्य वाढवील.
आपण प्रत्येकजण असेच जीवनातल्या खेळात सामिल झालेलो आहोत.आणि ही धरती आपलं खेळाचं मैदान आहे.जन्माला येऊन जीवन कंठताना आपलं चैतन्य घेऊनच आपण जगणार आहोत.आपल्याला आव्हान असं आहे की,आपल्या यशापयशाची एक चमकदार कहाणी आपल्याकडून निर्माण झाली पाहिजे. आपलं हताशपण आणि आपली प्रसन्नता याचा उपयोग- आपल्या एकमेकाची आणि एकमेकाच्या योग्यतेची- काळजी घेण्यात झाला पाहिजे.
कधी अगदीच कंटाळा आला की मग मी रेडीच्या समुद्रावर जाऊन एखाध्या काळ्या खडकावर बसून पाडगांवकरांच्या कविता वाचत बसतो.खडकावर आपटणार्या लहान लहान लाटा परत जाताना फेसाळपणा सोडून जातात.त्या फेसात जमलेली हवा पुन्हा लाट येई पर्यंत बाहेर पडताना आवाज करतात.तो आवाज ऐकून ग्लासात सोडावाटर ओतल्यावर फेसाळ पाण्याला आवाज येतो तसाच काहीसा वाटतो.क्रिया एक असल्याने परणिम सारखेच असणार.हेच तर पदार्थ-शास्त्राचं तत्व आहे.रेडीच्या किनार्यावरून -आकाश स्वच्छ असेल तर- दूरवर वेंगुर्ल्याच्या बंदराचा भाग दिसतो.दुपारची वेळ असेल तर शुभ्र स्पटिकासारखी वाळू तापल्यानंतर चमकते आणि कधी कधी किनार्याच्या पाण्याचं प्रतिबिंब दिसतं.ते विलोभनीय असतं. बंदरावर येणार्या बोटीना रात्रीचा मार्ग दाखवायला भर समुद्रात लाईट हाऊस असतात.त्या रात्रीच्यावेळी रेडीच्या समुद्रावरून स्पष्ट दिसतात.
शिरोडा सोडून परत जायला खूप वाईट वाटतं.पण काय करणार.?

Friday, February 6, 2009
"हो ना गं आई....."
अंधाराची भीति मज वाटे
तरी मी ते कुणा न सांगे
तुला ही मी ते सांगत नाही
कदर तुझी करीतो मी आई
माहित आहे तुला सर्व काही
हो ना गं आई........
गर्दीमधे मला नको सोडून जाऊं
घराकडे आई कसा मी परत येऊं
दूर दूर मला नको असा पाठवूं
सांग कसा मी तुला मग आठवूं
एव्हडा व्रात्य असेन का मी
हो का गं आई.........
बाबा देती कधी उंच उंच हिंदोळे झुल्यावरी
गं आई
नयन माझे तुला शोधिती वाटे तू त्या थांबविशी
गं आई
नाही सांगत मी त्यांना परि मी मनात गोंधळून जाई
गं आई
चर्या माझी दिसत नाही परि मनोमनी हबकतो मी
गं आई
ठाऊक आहे तुला सर्व काही
हो ना गं आई......
नेत्र माझे मूक होती जिव्हा माझी निःशब्द होई
नसती कसल्या वेदना नाही राहिल्या भावना

Wednesday, February 4, 2009
आजार्याकडून डॉक्टरने ऐकणं हेच उपचाराचं प्रभावी औषध आहे.
मी आणि भाई नेरूरकर एकाच गावातले.एकाच शाळेत शिकत होतो.भाईचे वडील डॉक्टर होते.निरनीराळ्या खेड्यात जाऊन ते आजार्याना भेटून उपचार करून येत असत.पण नंतर नंतर त्याना त्यांच्या मोटरबाईक वरून प्रवास जमे ना.
तोपर्यंत भाई ग्रॅन्डमेडिकल कॉलेजमधून एम. बी. बी. एस. पुरं करून एम. डी. झाल्यावर वडीलांच्याच दवाखान्यात प्रॅक्टीस करू लागला.
दुरदैवाने भाईला वयाच्या एकेचाळीशीवर कसला तरी स्नायुचा आजार झाला.
हे मला पण माहित नव्हतं.बर्याच वर्षानी मी गावाला गेलो असताना त्याला व्हिलचेअरवर बसून रोग्यांवर उपचार करताना पाहून मी अचंबीत झालो.
एकदिवस वेळ काढून मी त्याच्याकडे गेलो होतो.तो रविवारचा दिवस होता. त्याच्याही दवाखान्याला सुट्टी होती.
गप्पा करताना भाई सांगू लागला,
” आमच्या डॉक्टरी पेशाच्या दृष्टीकोनातून पाहिल्यास आजारी काय सांगतोय ते ऐकायला लागणारी किंमत, ही त्या आजार्याच्या रोगाचं निदान करण्यासाठी लागणार्या माहागड्या किंमतीपेक्षा नक्कीच कमी असते.परंतु, ते ऐकणं हे रोगाच्या निदानासाठी आणि तो रोग बरा होण्यासाठी एक चांगलाच उपाय होऊ शकतो.
म्हणून मला वाटतं ऐकणं हा उपायावरचा प्रभावी उपचार आहे. “
अभ्यासू लोक सांगतात की,आजारी बोलू लागल्यावर त्याला मधेच बोलण्यापासून रोखायला फक्त अठरा सेकंद लागतात.
तुला एक गंमतीची गोष्ट सांगतो.ही मी आजारी पडण्यापूर्वीची गोष्ट आहे.
तो रविवार होता.मी शेवटचा आजारी तपासत होतो.मी तिच्या खोलीत घाईत गेलो आणि दरवाज्याजवळ उभा राहिलो.ती एक वयस्कर बाई होती.तिच्या बिछान्यावर एका कडेवर बसून ती सुजलेल्या पायावर मोजे चढवत होती.मी उंबरठा ओलांडून नर्सबरोबर पटकन बोलून घेतलं,तिच्या चार्ट मधून नजर टाकली.तिची प्रकृती स्थिर आहे हे पाहिलं.सर्व काही ठीक होतं.
मी तिच्या बिछानाच्या कडेवर जरा वाकून तिच्याजवळ बघत राहिलो.ते मोजे तिच्या पायावर चढवायला ती मला मदत करायला सांगत होती.ते करीत असताना मी स्वगत बोलू लागलो ते असं होतं,
” तुम्हाला आता कसं वाटतं?.तुमची रक्तातली साखर आणि ब्ल्डप्रेशर उंचावलं होतं पण आज ते ठीक आहे.नर्स सांगत होती की तुम्हाला तुमच्या मुलाला भेटण्याची उत्सुक्ता वाढली आहे.आज तो तुम्हाला भेटायला येणार आहे म्हणे.कुणी तरी नात्यातला भेटायला आल्यावर नक्कीच बरं वाटतं.मला नक्कीच खात्री आहे त्याची तुम्ही वाट पहात असाल.”
मधेच ती अधिकारपूर्ण आवाज काढून मला थांबवीत म्हणाली,
“बसा डॉक्टर,ही माझी बाब आहे, तुमची नाही.”
मला जरा आश्चर्यच वाटलं आणि तिने मला अडचणीत टाकलं.मी खाली बसून तिला मोजे चढवले.ती मला सांगायला लागली,की तिचा एकूलता एक मुलगा जवळच राहतो.पण तिने त्याला गेली पाच वर्ष पाहिलं पण नाही.तिच्या प्रकृती अस्वास्थाच्या अनेक कारणात तणाव आणण्यात हे पण एक कारण आहे.तिचं सर्व ऐकून आणि तिच्या पायावर मोजे चढवून झाल्यावर मी आणखी काही तिच्यासाठी करू शकतो कां? म्हणून विचारलं.तिने मान हलवून नाही म्हणून सांगितलं आणि माझ्याशी स्मित केलं.मी तिचं ऐकावं हेच तिला हवं होतं.
प्रत्येक कहाणी निराळी असते.काही पूर्ण स्पष्ट असतात तर काही अस्पष्ट असतात. काही कहाण्याना सुरवात,मध्य आणि अंत असतो.काही कहाण्या एकडे तिकडे भटकत निष्कर्षाशिवाय राहातात. काही खर्या असतात,काही नसतात.पण हे सर्व काही फरक पाडत नाही.मात्र सांगणार्याला फरक पाडत असेल तर त्याची कहाणी रुकावट न आणता,तसंच कोणतंच अनुमान न काढता,आणि निर्णय न घेता ऐकली जावी एव्हडंच.
त्यानंतर ती बाई मला काय शिकवून गेली ह्याचा मी नेहमीच विचार करायचो.आणि माझ्या मलाच मी ते माझं थांबून,तिच्या जवळ बसून खरोखरीने ऐकलं ह्याच महत्व समजावून सांगायचो.
आणि त्यानंतर बराच काळ काही गेला नाही.जीवनात आलेल्या एका अनपेक्षीत वळणाने मी स्वतः आजारी झालो.माझ्या एकेचाळीस वर्षी मला स्नायुंचा रोग झाला.आता दहा वर्षानंतर मी कायमचा बसून असतो एका व्हिलचेअरवर.
जेव्हडं मला जमतं तेव्हडं मी ह्या खूर्चीवर बसून आजार्याना तपासत असायचो.पण जेव्हा माझ्या हातानाही ह्या रोगाकडून जखडलं गेलं तेव्हा हे तपासणं सोडून द्दावं लागलं.अजून मी मेडिकल स्टूडंटना आणि इतर सुशृषा करणार्या व्यवसायी लोकाना शिकवीत असतो.पण हे सर्व चिकित्सक आणि आजारी अशा दृष्टीकोनातून असतं.
मी त्याना सांगतो की मला वाटतं आजार्याचं ऐकणं हा उपायावरचा प्रभावी उपचार आहे.मी त्याना सांगतो की मला प्रत्यक्ष माहित झालंय की माझ्यावरच जे मी सांगतो ते इतराकडून ऐकून घेण्याच्या प्रक्रियेने अपरिमित उपचार होत राहिलाय, मात्र जेव्हा कुणी थांबून,माझ्या जवळ बसून मी काय सांगतो ते माझं शांतपणे ऐकलं जातं तेव्हा.
जसा तू आता माझ्या जवळ बसून ऐकत आहेस तसा.”
भाई नेरूरकरने त्या व्हिलचेअरवर बसून मला हे त्याच्या मनातलं चिंतन सांगितलं ते मी कधीच विसरणार नाही.
श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmai.com

Monday, February 2, 2009
कवनासाठी कोण बरे विहंगाचा कवी
गुंजन करण्या का कष्ट विहंग घेई
ही समस्या सदैव माझ्या मनी येई
गीत लिहूनी कवी ते गाण्या देई
सप्तसूरातून गायिका मग गान गाई
कवनासाठी कोण बरे विहंगाचा कवी
अपुले कवन सहजगत्या तो गाई
प्रीति कशी एकमेकावरी करावी
गाऊनी गाणे तेच विहंग शिकवी
अपुली प्रीति सहजगत्या व्हावी
हीच कामना कवनातूनी मिळावी
श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com
ही समस्या सदैव माझ्या मनी येई
गीत लिहूनी कवी ते गाण्या देई
सप्तसूरातून गायिका मग गान गाई
कवनासाठी कोण बरे विहंगाचा कवी
अपुले कवन सहजगत्या तो गाई
प्रीति कशी एकमेकावरी करावी
गाऊनी गाणे तेच विहंग शिकवी
अपुली प्रीति सहजगत्या व्हावी
हीच कामना कवनातूनी मिळावी
श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com
Subscribe to:
Posts (Atom)