असा प्रश्न मी आज प्रो.देसायानां केला.मला खात्री होती की भाऊसाहेब मला ह्यावर काहीतरी समजावून सांगतील.थोडावेळ विचार करून मला म्हणाले,“हा कायमस्वरूपी प्रश्न असून हा प्रश्न आपल्या अस्तित्वाबद्दल आणि आपल्या मुल्याबद्दल असलेल्या मुलभूत आकांक्षांचं ज्ञान प्रकट करतो.”“तेच ज्ञान काय आहे हे मला तुमच्याकडून आज समजावून घ्यायचं आहे.”असं मी म्हणताच,प्रो.देसाई म्हणाले,“मी मला काय वाटतं ते सांगण्याचा प्रयत्न करीन,पण ते तुम्हाला किती पटतं किंवा तुम्ही त्यातून किती समाधान मानून घ्याल ते तुमच्यावर अवलंबून आहे.”“सांगा तर खरं”असं मी म्हणाल्यावर भाउसाहेब सांगू लागले, ”माझं इथं अस्तित्व कशासाठी आहे?ह्याचा विचार केल्यावर माझ्या मनात येतं की माझ्याबाबत बहूतांश लोकाना स्पष्ट कल्पना असावी,ती अशी की, माझ्या पत्नीला वाटत असावं की मी तिला मदत म्हणून घरातला केरकचरा साफ ठेवावा,मुलांना गृहपाठ करून घेण्यात मदत करावी,आणि जरूर वाटल्यास तिच्या स्वयंपाकात मी तिला मदत करावी.माझ्या बॉसला वाटतं की मी त्याचा जॉब सांभाळावा. माझ्या मोगोमाग येणार्याला वाटतं माझ्या गाडीमुळे ट्रॅफिकमधे अडथळा येत असावा. परंतु,ह्या सर्वांच्या अपेक्षा सांभळत जर मी राहिलो तर मला हवं असलेलं उत्तर काही मिळणार नाही. पण असा विचार करण्यात काही काळ जाऊं दिल्यानंतर मला वाटतं पूर्ण नाही तरी काही प्रमाणात मला उत्तर मिळेल.अगदी स्पष्टपणे मला आठवतं,ह्या जगात माझ्या अस्तित्वाची चुणूक मला यापूर्वीच मिळाली आहे.“ते कसं?”असं मी म्हणाल्यावर प्रो.देसाई म्हणाले,“मला जुन्या गोष्टींची आठवण आली.मी जिथे काम करीत होतो त्या संशोधन संस्थेत एकदा गच्चीत दुर्बिण उभी केली होती आणि सर्वांना आकाशात पहाण्याची सोय करून दिली होती.एक दिवशी आम्हाला शनी हा ग्रह दिसणार म्हणून सांगितलं,आणि शनीवर ती दुर्बिण फोकस करून ठेवली होती.मी प्रथमच त्या दुर्बिणीतून शनी पाहिला.यापूर्वी मी फक्त हे ग्रह चित्रातून पाहिले होते.एखाद्या लहानश्या वॉशरमधे एक तितकाच लहान मणी तरंगत ठेवावा तसा तो शनीग्रह दिसत होता.त्यावेळी मात्र ह्या विश्वाकडे पहाण्याचा माझा दृष्टीकोनच अचानक बदलला.माझ्या बौद्धिक क्षमतेच्या आधारावर मला नेहमीच माहित असायचं की आकाशात जे झगमगतं ते आकाशातले तारे आणि ग्रह आहेत.पण अगदी सहज मनात आल्यावर मी विचार केला की हे सर्व ग्रह-तारे दुसरं तिसरं काही नसून विश्वाच्या छ्प्परामधून टोचून भोकं पाडलेल्या टांचण्यांच्या वरच्या टोप्या-pinheads- आहेत.शनीग्रहाला दूर्बिणीतून पाहिल्यावर खरं वाटायला लागलं.ग्रह-तारे-आकाशगंगा ह्या खर्याच आहेत.हे विश्व अनंतापर्यंत एव्हडंपसरलंय की ते माणसाच्या समजूतीच्या पलिकडचं आहे.मनात यायला लागलं ह्याच कारणास्तव मोठ मोठ्ठ्या संशोधकानी अवलोकन करताना ते इतराना समजावून सांगण्याच्या प्रयत्नात त्यानी तुरुंगात जाण्यापासून ते देहदंड मिळेपर्यंत तो धोका पत्करला.आणि अशाच काहीश्या कारणास्तव भावीवक्ते पण तुरुंगात आणि फाशी जाऊन पण धर्मसंबंधाने आपले ऊपदेश देत राहिले.त्यानी काहीतरी अद्भुत गोष्टी शोधून काढून मनुष्याच्या ज्ञानात भर घालताना ह्या जगतसृष्टित आपलं स्थान काय आहे हे दाखवण्याचा प्रयत्न केला.तसं पाहिलं तर बरेचसे लोक जिथे आहेत तिथे सुखी आहेत.आणि त्यांच्या सध्याच्या असलेल्या विचारसरणीत फरक झाला तर ते प्रतिकार करायला मागे पुढे पहाणार नाहीत.पण माझी खात्री आहे की मनुष्य आपली प्रगती करीतच रहाणार आणि नवीन नवीन ज्ञान मिळवण्याच्या प्रयत्नात असणार. मग ते ज्ञान शास्त्रीय असो अथवा आध्यात्मिक असो.विज्ञान आध्यात्माशिवाय भावशून्य आहे आणि आध्यात्म विज्ञानाशिवाय अभिलाषा कल्पित चिंतन होईल.मग आपलं इथलं अस्तित्व कशासाठी आहे?ह्याचं उत्तर असं वाटतं की आपला जीवनमार्ग काटत असताना आपण कशावर विश्वास ठेवतो आणि प्रत्यक्ष काय समजतो ह्याचा समतोल संभाळण्यासाठी कदाचीत हे अस्तित्व असेल.आणि मला वाटतं अशा समजूतीवर मला समाधान मानून घ्यायला हरकत नाही.तुमच्या प्रश्नाचं उत्तर मी मला वाटतं तसं दिलं असं मला वाटतं.”मी म्हणालो,“भाऊसाहेब मला पण तुम्ही समाधान मानून घेता तसं घ्यायला हरकत नाही.”
श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)shrikrishnas@gmail.com
Wednesday, May 13, 2009
Monday, May 11, 2009
“तुझ्या डोक्यावर आलेली बला टोपीने झेलली.”
आज मी गुरूनाथला विचारलं,“तुझी ती गांधी टोपी,किंवा सफेद टोपी म्हणूया ती वापरायचं तू केव्हा पासून सोडून दिलंस?” त्याच्या त्या सफेद टोपीची “ष्टोरी” माझ्या अजून लक्षात आहे हे समजल्यावर गुरूनाथ हंसायला लागला.“अरे तू एव्हडा हंसतोस का?”असं मी त्याला म्हणालो.“ती टोपी आणि मी हंसतो कां? ह्या दोन्ही गोष्टी मी तुला सांगणार आहे.”असं म्हणून गुरूनाथने पहिल्या पासून सुरवात केली,“आमच्या आजोळी खूप गाई-गुरं होती.सहाजीकच मी पण आमच्या गुराख्यांबरोबर रानात जात असे.ह्या गुराख्यांकडून मी त्यावेळी खूपच शिकलो.मी नेहमी पाहिलंय की माझ्या जीवनाच्या वाटेवर प्रत्येक पायरीवर कुणी तरी मार्ग दाखवायला यायचं. एकाअर्थी ते माझे संरक्षण करणारे जणू देवदूतच होते आणि मला योग्य मार्गदर्शन करायचे.मनाशी कोणताही प्रश्न न करता ही जीवनात येणारी विक्षिप्त वळणं मी स्विकार करीत असायचो.”मी म्हणलो,“तू अगदी लहान होतास त्यावेळी.”
“मी त्यावेळी दहाएक वर्षांचा असेन.त्यावेळी खानोलीच्या तरूआक्काचा बबन्या माझा मित्र होता. त्याने मला नदीतून मासे कसे पकडायचे,जाळं कसं फेकायचं, मोठा बुळबुळणारा मासा हातात कसा घट्ट धरून ठेवायचा,असल्या गोष्टी शिकवल्याच आणि त्यापुढे जाऊन प्रेमळ कसं असावं आणि जीवनात विपत्ति आल्यावर त्याला हंसत-खेळत तोंड कसं द्यायचं हे ही शिकवलं.“अरे गुरूनाथ,मला आठवतं त्यावेळी खादी टोपी सर्रास लोक वापरायचे.शाळेत तर प्रत्येक मुलाच्या डोक्यावर खादीची टोपी असायची.काही त्याला गांधी टोपी पण म्हणायचे.मुंबईहून मी सुट्टीत गावाला आल्यावर तुम्ही लोक मला टोपी शिवाय पाहून बोडका म्हणून चिडवायचे.”हे मी बोलल्यावर गुरूनाथ परत हंसला,आणि म्हणाला,“ती दिवाळसणाची वेळ होती.माझ्या वडीलानी मला एक पांढरी शुभ्र टोपी दिली होती.दुकानात निरनीराळ्या कपड्यांच्या टोप्या होत्या पण ही जाड खादीची शुभ्र टोपी मला जास्त आवडली.मी ती मोठ्या दिमाखाने डोक्यावर चढवायचो.मी त्याटोपीची नीट नीगा ठेवायचो.त्यादिवशी आम्ही- माझी मामेबहिण यमी- तिच्याकडे जेवायला गेलो होतो.यमीताई माझ्यापेक्षा वयाने खूप मोठी होती.मी तिच्या मुलांचा मामा असून त्या माझ्या भाचांच्याच वयाचा होतो.त्यादिवशी संध्याकाळी आम्ही बाजारातून आणलेली रताळी, कणगी,करांदे बाहेरच्या अंगणात शेकोटी सारखी आग करून त्यात भाजत होतो.अशी भाजून आलेली ही कंदमूळं खाताना गोड लागतात.बाहेर तसं बरंच थंडहोतं.आम्ही सर्व इकडच्या तिकडच्या काटकोळ्या जमा करून त्या आगीत टाकण्यासाठी तयार ठेवीत होतो.माझा एक भाचा -कुमार- आम्हाला जादूचे प्रयोग करून दाखवत होता.ते झाल्यावर त्या शेकोटीभोवती बसलो असताना दुसरी भाची-कल्पना-वि.स.खांडेकरांच्या पुस्तकातल्या वाचलेल्या लहान लहान गोष्टी सांगत होती.तू सांगतोस तसं त्यावेळी आम्ही सर्व मुलं घराच्या बाहेर पडल्यावर डोक्यावर टोपी चढवून जात असूं. परत घरी येई पर्यंत टोपी डोक्यावरच असायची.मला तर टोपी खूपच आवडायची म्हणा.
आमच्या डोक्यावरून एक काळा गरूड पक्षी उडत उडत निघून गेला.त्याची ती लांबच लांब आणि काळीकूट्ट पंख हलत असताना मोठ्ठा आवाज झाला.आणि झपकन माझ्या डोक्यावर काहीतरी पडल्याचा आवाज आला.क्षणभर सगळेच आवाक झाले.आणि एकामागून एक माझ्या टोपीकडे बघून हंसायला लागले.कां ते कळायला मला वेळ लागला नाही.कारण तोपर्यंत मला टोपीच्या खालच्या भागातगरम वाटत होतं,आणि दुर्गंधीचा दर्प येऊं लागला.लगेचच उठून मी आणि यमीताईचा गडी -भगवान-विहीरीकडे धांवत गेलो.आणि कळशीभर पाणी काढून टोपी साफ करायला लागलो.पण वरची घाण जरी निघून गेली तरी त्याचा डाग काही जाई ना.त्या गरूड पक्षाने जे काय खाल्लं होतं ते जब्बर होतं.आमच्या शिकोटीच्या वरून उडताना त्यांच्या अंगाला आगीची धग लागली असावी आणि घाबरून त्या पक्षाने हा प्रकार केला असावा.भगवानाने माझी टोपी त्याच्या जूनकट राठ हातात घेऊन तो त्या डागावर घासायला लागला. घासता घासता त्याच्या चेहर्यावरचं ते दांतविचकतानाचं हंसं मला अजून आठवतं.आणि माझी समजूत घालण्यासाठी मागाहून बोलल्याचं ते धीर देणारं वाक्य आठवतं,“तुझ्या डोक्यावर आलेली बला टोपीने झेलली.”बोलून झाल्यावर परत आपले डोळे मिचकावत तोंडावर हंसं आणून मग मोठमोठ्यांदा हंसायला लागला.“मग ती टोपी तू टाकून का दिली नाहीस?”असं मी विचारल्यावर गुरूनाथ म्हणाला,
”नंतर ती माझी टोपी माझ्या जवळ खूप दिवस होती.आणि त्यावर आणखी खूप डाग ही पडले होते.परंतु,त्या पहिल्या डागाचा धडा मी कधीच विसरलो नाही.ते त्या भगवानाचे शब्द पूढे कसल्याही संतापजनक प्रसंगातून सावरायला मला उपयोगी पडले.मला ते त्याचं वाक्य, मी आणि माझं स्वामित्व ह्या मधलं खरं अंतर दाखवत राहिलं.माझ्या मनासारखं काहीही झालं नाही तर चेहर्यावर हंसूं आणण्याची मला आता संवय झाली होती.त्या संवयीमुळेच मी आता मनासारखं झालं किवा नाही झालं तरी हंसत रहातो.”गुरूनाथचं हे हंसत रहाण्याचं तंत्र मला आवडलं.

Saturday, May 9, 2009
मातृदिन
“अगं, आई!
कमलमूखी तू सुंदर असता
रूप विधात्याचे कसे वेगळे?”
ह्याचं उत्तर जाणण्यासाठी,
आईला “आई”च का म्हणतात हे जाणण्यासाठी,
ज्यांची आई हयात आहे त्या सौभाग्यांसाठी,
ज्यांची आई हयात नाही त्या माझ्यासारख्या अभाग्यांसाठी,
“बाळा! तुला लागलं कारे?”
हा आईचा प्रश्न जाणण्यासाठी
आईची व्यथा जाणण्यासाठी,
आईचे डोळे नेहमीच ओले का असतात हे समजण्यासाठी,
चिमुकली तनुली आईला काय सांगते हे समजण्यासाठी,
प्रत्येक व्यक्तिच्या पोटावरची खूण कां आहे ते जाणण्यासाठी,
आई..! तुझी, आ..ठ..व..ण येते…!
हा माझा लेख वाचला असेल तर आज परत वाचण्यासाठी,
वाचला नसेल तर प्रथम आज जरूर वाचण्यासाठी,
माझ्या ब्लॉगवर “Top Post” च्या यादीत
“आई तुझी आ…ठ…व…ण येते!”
ह्या शिर्षकाचा लेख
किंवा
माझा May 10, 2008चा हाच लेख आज मातृदिनी जरूर वाचण्यायोग्य आहे.
shrikrishnasamant.wordpress.com ही माझी website
आणि
कृष्ण उवाच हे माझं होम पेज.जरूर भेट द्या
प्रत्येकाची आई अगदी अशीच असते.
आजच्या मातृदिना सारखा जरूर आठवण आणणारा दिवस चुकवून कसं चालेल?
आईला ह्या मातृदिनी आठवणार नां?
श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Thursday, May 7, 2009
निदान त्याचा तुम्हाला अपाय होणार नाही.
आज प्रो.देसाई हंसत हंसत येताना पाहून मला खात्री झाली की काही तरी ते मला आनंदाची बातमी सांगणार आहेत.वाटेत ओळखीचा असो नसो ते सर्वांशी हंसत होते.हे जरा मला निराळंच वाटलं.एका लहान मुलाने त्यांना,
“हाय ग्रॅन्डपा!”
असं म्हटल्यावर थांबून त्याच्या पाठीवर थोपटून हंसत होते.
जवळ आल्यावर मी त्याना विचारलं,
“काय भाऊसाहेब,आज बरेच आनंदी दिसता.मघापासून मी बघतोय तुम्हाला तुमचा चेहरा हंसरा दिसतो.म्हणजे तो एरव्ही नसतो अशातला भाग नाही,पण आज जरा विशेष,काय गौडबंगाल आहे.?”
“कर्माचं गौडबंगाल,अहो मला तुम्हाला माझी जुनी एक आठवण न विसरता सांगायची होती.म्हणून निघतानाच त्याची पूर्व तयारी करीत आलो आहे.”
हे त्यांच्याकडून ऐकल्यावर माझं कुतूहल वाढणं स्वाभाविक होतं.
“सांगा तर तुमची जूनी आठवण.”
असं मी म्हणाल्यावर,जरा खाकरून भाऊसाहेब सांगू लागले,
“साधारण तिस वर्षापूर्वी म्हणजे मी जेव्हा पन्नाशित गेलो तेव्हा माझ्या लक्षात आलं की माझे सहकारी, कॉलेजातले विद्यार्थी ज्यांना मी शिकवत असायचो, आणि माझे मित्र हे सगळेच मला विचारायचे,
“तुम्ही थकला का?
तुम्हाला बरं नाही काय?
काही विषेश झालं नाही ना?”
अर्थात माझं प्रत्येक प्रश्नांना उत्तर
“नाही ” हेच होतं.
परंतु,माझ्या त्या वयाच्या जवळपास,चेहर्यावरची उत्सुकता जाऊन गांभिर्य आलं होतं.
खरं पाहिलं तर,मी ज्यावेळी विसावलेला आणि शांत असायचो,त्यावेळी मी जरा गंभीर आणि थकलेला दिसायचो.तो दिसू नये म्हणून मी चेहरा हंसरा ठेवायला लागलो.”
“मग हेच तुम्ही आता पुन्हा चालू केलं की काय.?”
असं मी म्हणाल्यावर भाऊसाहेब म्हणाले,
“ऐकातर खरं,ज्याच्या त्याच्याशी मी त्यावेळी हंसून पाहू लागलो.तसं काही कारण नसतानाही केवळ दिखावा म्हणून सहज हंसायचो.कुठे रस्त्यात,दुकानात गेलो तर, माझ्या कॉलेजमधे,कॉलेजच्या लॉबीमधे कुणी दिसल्यास.
आता हंसायची मला एक संवयच झाली.आणि ते लोकांच्या लक्षात यायला लागलं. कॉलेजच्या हॉलमधे एकदा एक अनोळखी व्यक्ति मला म्हणाली,
“तुम्ही खूप खुशीत दिसतां”
मी माझा चेहरा जास्त हंसरा करून, मान हलवली आणि चालू पडलो.
मला वाटतं की आपण जसा अविर्भाव करतो तसेच आपण दिसतो.”
मी म्हणालो,
“मला आठवतं त्याप्रमाणे- अर्थात तुम्हीच सांगितलं होतं- की त्यावेळी तुम्ही कॉलेजात शिकवत होता.”
“हो मी कॉलेजात शिकवत होतोच पण बरोबरीने नाटकातही काम करीत होतो ते दिवस मला आता आठवतात.तो काळ माझ्या तिशीच्या शेवट शेवटचा होता. नाटकात भुमिका करायचो,करून घ्यायचो,शिकवायचो, लिहायचो, आणि त्याबद्दल विचारही करायचो.जवळ जवळ आणखी वीस वर्षं असं करत होतो.कॉलेजात शिकवणं हा माझा दुसरा व्यवसाय होता.
एक वर्षी एक दिवस असा आला की मला खरंच वाटू लागलं की मी जात्याच कलाकार आहे.
जसं एखादा एकाएकी भक्तिभावात आपलं मन रमवून घेतो अगदी तसं.जे काही मी करायचो ते माझ्या कलेच्या भिंगातून पाहायचो.”
असं म्हणून भाऊसाहेबानी जरा उसंत घेतली.
मग म्हणाले,
“हे जर खरं असेल तर–जे एखादा करतो तसा तो होतो-तर मग मला वाटलं हंसतमुख असणं म्हणजेच आनंदी असणं. खोटं हंसू आणि खरं हसूं ह्यातला फरक आपल्या सर्वांना माहित असतो.आपण कॅमेर्या समोर उभे राहून,
”आता प्लिझ हंसा”
असं म्हटल्यावर हंसतो ते खोटं हंसू.ज्या लोकांचा व्यवसायात चेहर्यावरचे हावभाव पाहून निर्णय द्यायचा असतो,किंवा ज्यांना कोर्टातले ज्युरी निवडण्याचं काम असतं, किंवा ज्यांचा वकिली व्यवसाय असतो की ज्यांना गुन्हेगाराकडे बघून प्रश्न विचारायचे असतात त्या सर्वांना हे हंसू माहित असतं.चेहर्यावरचे स्नायु पाहून जे स्नायु खरा आनंद प्रकट करतात ते स्नायु ते बरोबर ओळखून काढतात.”
“चेहर्यावरून असं ओळखून काढण्यासारखं असं खास काय आहे.? माणूस हंसायला लागला की त्याचा चेहराच ते प्रदर्शित करतो.”
असं मी म्हणाल्यावर मला ह्या बाबतीत,अज्ञान आहे असं प्रोफेसरांच्या लक्षात बहुदा आलं असावं. माझ्याकडे बघून हंसत हंसत-पण हे त्यांच हंसणं जरा निराळं होतं- मला म्हणाले,
“तुम्ही अपेक्षा कराल तसे हे स्नायु चेहर्याभोवती नसतात.हे स्नायु गालांच्या वरच्या भागात,नाकाच्या आणि डोळ्याच्या अवती-भोवती असतात.हे स्नायु जेव्हा आकुंचन पावतात,तेव्हा मेंदू चारही प्रकारचे आनंद पावण्याचे रस सोडतो आणि तुम्ही आनंदी होता. तेव्हा आनंदी होण्यासाठी आपले हे “हंसमुख” करणारे स्नायु क्रियाशील केले म्हणजे झालं.मला वाटतं हे मी म्हणतो ते खरं आहे.”
असं सांगून झाल्यावर आपल्या खिशातलं एक पेन काढीत मला म्हणाले,
“तुम्हाला फक्त एव्हडंच करावं लागेल.हा आवाज काढा,
“ईईईईईईई. प्रयत्न करा ईईईईईई.”
वाटलं तर जरा शांत राहून पहा.एखादी पेन्सिल दातांच्यामधे आडवी ठेवून पण पहा तोच परिणाम दिसेल.मी एक निर्दिष्ट केलेलं हे पेन माझ्या जवळ ठेवतो. आणि आठवण होईल तसा त्याचा वापर करतो.कधी एखादवेळी हंसण संभवनीय नसेलं तरी-एखाद्या संकट काळीही- हे हंसमुख करणारे रस मेंदू कडून सोडण्याच्या प्रयत्नात रहा,आणि आनंदी नसला तरी ज्ञात व्हा.
माझं स्वतःचं हंसू तसं शक्तिशाली आहे.मला त्यानं जास्त आनंदी केलं आहे.आणि ते “संसर्गजन्य” आहे हे मात्र नक्कीच.
प्रयत्न करा निदान त्याचा तुम्हाला अपाय होणार नाही.
मी म्हणालो,
“भाऊसाहेब,ह्यालाच मी मघाशी सांगा तुमचं गौडबंगाल असं तुम्हाला म्हणालो होतो.”

Tuesday, May 5, 2009
अंकिता नव्हे प्रश्नांकिता.
काल माझी आणि अंकिताची धाकेकॉलनीच्या अपनाबाजारात अचानक गाठ पडली. अंकिताचं लग्न झालं असं मला कुणी तरी सांगितलं होतं.मी तिला म्हणालो,
“काय तू मला लग्नाला बोलवायला विसरलीस वाटतं?”
“असं काय काका? कुणाचं लग्न म्हणता?माझ्या लग्नाला मी तुम्हाला विसरेन कशी? आणि लग्न झालं तर माझ्या गळ्यात तुम्हाला मंगळसूत्र दिसणार नाही काय?”
नेहमी प्रमाणे प्रश्नावर प्रश्न विचारणार्या अंकिताला मी गंमतीत “प्रश्नांकिता” असं नाव ठेवलं होतं.
ह्यावेळीपण ती प्रश्न करायला विसरली नाही.
“अगं, लग्न झाल्यावर सुद्धा तुम्ही मुली साड्या नेसत नाही.आणि मंगळसूत्र म्हणे साडीशिवाय इतर पोषाखावर “ऑड” दिसतं.असं कुणी तरी म्हणाल्याचं मला आठवतं. तेव्हा म्हटलं…. म्हणजे माझी कुणीतरी फिरकी घेतलेली दिसते.पण ते जाऊदे. मला एक आठवलं,त्याला खूप वर्ष झाली म्हणा.तू पाच सहा वर्षाची असशील. तू एकदा तुझ्या आजोबाना विचारलं होतंस,
“आजोबा,तुम्ही माझ्या लग्नाला याल का?” आठवत असेल तुला”
थोडी आश्चर्यचकीत होऊन मला अंकिता विचारते,
“म्हणजे काय? ते तुम्हालाही माझ्या आजोबानी सांगतलं होतं?”
परत तिचे प्रश्न पाहून मी मनात हंसलो.
“हो,पण मला पूर्ण किस्सा माहित नाही.”
मी म्हणालो.
सध्या आंब्यांचा सिझन असल्याने अपनाबाजारने त्यांच्या दुकानाच्या बाहेरच्या लॉबीमधे मंडप घालून आंब्याच्या पेट्या विकण्यासाठी ठेवल्या होत्या. गिर्हाईकं तिकडे येऊन आंब्याच्या पेट्या खरेदी करायाची.त्यांना बसण्यासाठी एक दोन बाकं ठेवली होती.
अंकिता म्हणाली,
“काका,चला आपण त्या बाकावर जाऊन बसूया.मी तुम्हाला तो किस्सा सांगते.”
मला तिचं मन मोडवेना. आम्ही दोघं एका बाकावर जाऊन बसलो.
अंकिता म्हणाली,
लहानपणी मी आणि माझी धाकटी बहिण आमच्या आजीआजोबा बरोबर सदा आमचा अवसर घालवायचो.
माझ्या आईकडच्या मंडळींचे संबंध अगदी घनिष्ठ असायचे.
आमच्या मावशांची घरं जवळ जवळ होती.माझे नातावईक हेच माझे खरे मित्र मी समजते.आणि म्हणून त्यांना हृदयात जपून ठेवायला हवं.
मला आठवतं,त्यावेळी मी पाच एक वर्षाची होते.मला माझे आजोबा एकदा देवळात घेऊन गेले होते.घरी परत येताना पौर्णिमेचं पिठूळ चांदणं पडलं होतं. आम्ही दोघं हातात हात घालून चालत असताना वर आकाशात हजारो लाखो तारे पाहून माझ्या मनात आलं. आणि मी आजोबाना म्हणाले,
“आजोबा तुम्ही माझ्या लग्नाला येणार ना?
लग्न आणि लग्न समारंभाचं मला त्यावेळी का कुणास ठाऊक विशेष आकर्षण होतं.
मला आजोबा म्हणाले,
“हे बघ बाळा”,
मला माहित होतं,माझ्या आजोबांकडून असला प्रतिसाद मला ऐकाचा नव्हता.
“मी तोपर्यंत कुठे असणार?”
मी ती त्यांची थट्टा असं समजून त्याचं उत्तर उचित वाटावं म्हणून मी त्यांना म्हणाले,
“आजोबा, असं कसं?माझं लग्न तुम्हाला कसं चुकेल?”
तेही हंसले आणि मी पण.
“हो गं, माझ्या नाती! मी नक्कीच असणार”
असं ते मला म्हणाले.
मी ज्यावेळी सहा वर्षाची झाले म्हणजे त्यानंतर एक वर्षानंतर माझे आजोबा गेले. ती चांदणी रात्र मला अजून आठवते.ते पुस्सट आणि उदास चलचित्र मी तुटू-फुटू कसं देऊं?
मला आठवतं रात्रीचे दहा,अकरा वाजले असतील, इतक्या उशिरापर्यंत न जागणारी मी डुलक्या काढू लागले होते.
तोपर्यंत माझे आईवडील घरी आले.माझी मावशी आमच्याबरोबर होती.त्यांची कुजबुज त्या त्यावेळच्या शांत वातावरणात ऐकूं येत होती.मी माझ्या अंथरूणात उठून बसले.त्या कुजुबूजीकडे कान लावून ऐकलं आणि समजले.
माझ्या आजोबानी मला वचन दिलं होतं.पण….
मरण हे कुणाला चुकलेलं नाही हे मला समजतं.पण आपलं प्रेमळ माणूस सर्वांसम्मत जुळून येणारी वेळ साधून कसं जाणार?
मी पण माझ्या लग्नात सप्तपदी करताना, होमा भोवती फिरताना, देवा-ब्राम्हणासमोर माझ्या भावी पतीला,
“मी जन्मो-जन्मी तुझ्याबरोबर राहिन”
हे वचन आतूरतेने ऐकणार्य़ा त्याला देणारच आहे ना?”
असं म्हणून तिच्या आजोबांची आठवण काढून अंकिता डोळे पुसत होती.आम्ही दोघं जाण्यासाठी उठलो.
तिला बरं वाटावं म्हणून मी तिला जवळ घेत म्हणालो,
” व्हायचं ते होऊन गेलं.तू वाईट वाटून घेऊ नकोस.
मी येईन ना तुझ्या लग्नाला.तुझ्या आजोबांच वचन खरं करायला.पण मला बोलवायला विसरूं नकोस हां!”
” असं काय म्हणता काका?मी तुम्हाला कसं विसरीन?”
खरंच,असं जाता जाता प्रश्न विचारून जाणारी अगदी नावासारखी प्रश्नांकिताच ती म्हणा.

Sunday, May 3, 2009
मन तृप्त झालं आहे पण उत्साह स्वस्थ बसूं देत नाही.
माझ्या “कृष्ण उवाच” ह्या ब्लॉगवर आज पावलाख वाचनं झाली.
निरनीराळ्या विषयावर एकूण ३९२ लेखनं मी केली.
त्यामधे,
अनुवादीत कविता (129) आई विषयी (8) माझ्या कविता (43)
माझ्या कवितेतून माझे विचार (18) गम्मत (12) गोष्ट (23) चर्चा (6) चिंतन (14) टिका (2) प्रश्नोत्तरे (1)भाषण (2) लेख (87) वर्णन (2) विचार (31)
विडंबन(1) व्यक्ती आणि वल्ली(11) श्रद्धांजली (1)
२००७ जानेवारी पासून मी माझं लेखन लिहायलासुरवात केली.
२००७ मधे एकूण —–३,५१८ वाचनं झाली.
२००८ मधे एकूण ——१४,७११ वाचनं झाली.
२००९ मधे एप्रिल पर्यंत —-६,७५१ वाचनं झाली.
२००९ मधे दर महिन्याला सरासरी १,६०० वाचने होत आहेत.
१०जानेवारी २००९ मधे ह्या एका दिवशी –१६८ वाचनं झाली.
दर दिवशी सरासरी ५० वाचने होत असतात.
मी माझ्या सर्व मायबाप वाचकांचे आभार मानतो. आणि माझ्या ब्लॉगवर त्याचं स्वागत करतो.

Friday, May 1, 2009
मला काय वाटतं आणि मला काय ज्ञात आहे.
काल मी तळ्यावर प्रो.देसायांची वाट बघून बघून थकलो.आता घरी जावं म्हणून उठून चालायला लागलो.वाटेत एका बाकावर एक गृहस्थ पुस्तक वाचताना मी पाहिलं.वाचनात ते अगदी गर्क झालेहोते. सध्या पानांच्या पडझडीचा-फॉलचा- मोसम असल्याने माझ्या पावलांची पाचोळ्यांवरून जातानाची होणारी चूरचूर ऐकून पुस्तकातून डोकं वर काढून मान वळवून माझ्याकडे पाहून ते हंसले.सहाजिक मीही हंसलो.हलो-हायचे सोपास्कार झाल्यावर,त्यांच नांव श्रीकांत फडके असं कळल्यावर त्यांच्या जवळच बसलो.बोलता बोलता कळलं की हे डॉ.फडके इंग्रजीतून पीएचडी करून साऊथ इंडियामधे कुठल्यातरी कॉलेजमधे प्रोफेसर राहून आता निवृत्तीत आपल्या मुलाकडे राहत होते.त्यांनी बरीच पुस्तकं लिहिली आहेत. असं त्यांच्या बोलण्यावरून कळलं.
“मी कल्पित कथा-फिकशन- लिहितो,कधी कधी काव्यपण करतो.”असं मला म्हणाले.
मला सुद्धा काव्यात आणि कथेत दिलचस्पी आहे हे मी त्याना सांगितल्यावर सहाजिकच त्यांना बरं वाटलं.
मग काय विचारता! फॉल संपून वसंत ऋतूचं आगमन होण्याच्या खूणा दिसत असल्याने सूर्यास्त जरा लांबणीवर पडायला लागला होता.कोळख होईपर्यंत गप्पा मारायला संधीच मिळाली.
“तुम्ही तुमच्या कथानका विषयी सांगाल कां?”
त्यावर ते म्हणाले,
“काही व्यक्ति भिन्न वेळी नाना विषयामधे विश्वास ठेवतात,आणि त्यासुद्धा कधी कधी एकाच दिवशी.
ह्या वयातही माझ्या मनात सहज विचार आला की सृजनात्मक लेखन हा मनुष्याच्या मुल्यांकनाचा एक भाग असावा. मग ते लेखन काव्य असो किंवा कल्पित कथानक असो,किंवा यथार्थतेचा वा आत्म-अभिव्यक्तिचा प्रकार असो,किंवा कदाचीत तो उत्पतिचा आणि चैतन्याचा जो डबल चमत्कार आहे त्याच्या सन्मानाचा प्रकार असो.
वाचकाशी संपर्क ठेवण्याच्या ह्या खास प्रकारच्या मुल्याच्या विरोधात,जर तथ्यात्मक प्रतिवेदन आणि विश्लेषण करण्याचं लेखन केलं तर तो एक सुस्पष्टता करण्याचा प्रकार होईल.
या उलट कथानक किंवा काव्य ही अनुभवाची वास्तविक रचना किंवा गुढता असून ते लेखन वाचकाशी निकटता आणतं.”
मला हे त्यांच प्रकटन आवडलं.मी त्यांना म्हणालो,
“कल्पित कथानकात काल्पनिक व्यक्ति खर्या वाटतात.त्याउलट एखाद्या खर्या कथेत नावाजलेल्या प्रतिष्टित व्यक्तिंचा नुसता आभासही एखाद्या अफवेच्या घटनेत उल्लेखलेला असला तरी त्याचा खरा मामला आणि कपटी व्यवहार अंधरात ठेवावा लागतो.”
“अगदी बरोबर “
असं म्हणून मला त्यांनी छान उदाहरण दिलं.ज्याला मी ही परिचीत होतो.
ते म्हणाले,
“एखादी कल्पित रूपरेखा उदाहरणार्थ चि.वी.जोश्यांचा “चिमणराव” आणि “गुंड्याभाऊ” लक्षात ठेवण्या इतपत उजेडात राहतात.आणि त्यांच्या बरोबर त्यांच्याबद्दल वाटणारी सहानुभूति,करूणा आणि त्यांच अभिज्ञान चांगलच लक्षात राहतं.
माझ्या स्वतःच्या लेखनात फक्त कल्पित कथानक आणि क्वचित काव्य, पूर्णपणे मला काय वाटतं, आणि मला काय ज्ञात आहे हे समजण्यासाठी माझ्या मर्यादेची कसोटी पहात असतं.माझ्या एखाद्या लेखनातला साधा-स्पष्ट तपशिल ह्या लेखनाच्या पेशामधे वापरत असताना, मला सनसनाटीची आणि त्याच्या वापर करण्याच्या प्रवृत्तीला दोन हात दूर ठेवावं लागतं.”
हे ऐकून मला प्रो.देसाय़ांची आठवण आली.भाऊसाहेबांना हा आमचा संवाद आवडला असता. त्यांनीही ह्यात भाग घेतला असता.
माझा शास्त्रज्ञ जागृत झाला.मी डॉ.फडक्यांना म्हणालो,
“लौकिक दृष्ट्या पाहिलं तर माझं मन द्विधा होतं.आकाशगंगेचं अणू,परमाणू आणि त्यांच्याहून अतिसुक्ष्म कणांशी असलेल्या चालचलनाबद्दल भौतिक विज्ञानाची समजावून सांगण्याची क्षमता विवादित आहे हे मान्य करावं लागेल.आणि ही क्षमता आधुनिक बुद्धिची सर्वोपरि कीर्ति आहे हे तितकंच खरं आहे.”
“तुम्हाला काय वाटतं?”
असा प्रश्नही मी त्यांना केला.त्यांना तो प्रश्न आवडला.
हातातलं पुस्तक त्यांच्या पिशवीत टाकून,
“चला आपण निघूया.कोळोख होत आला आहे.आपण चालता चालता बोलूया मी तुमच्या प्रश्नाचं उत्तर देतो”असं म्हणून उठता उठता ते मला म्हणाले,
“उलटपक्षी मनातली हलचल,आकांक्षा आणि कदाचित भ्रमसुद्धा विचारात घेऊन केलेली रचना म्हणजे आपल्या अस्तित्वाचं मुळ आणि धर्मविचार ह्या गोष्टींचं निरनीराळ्या रूपातलं निवेदन आणि निर्मिती असून ते वाचकांच्या समाधानीला कारणीभूत होतं.
मला वाटतं,धर्मश्रद्धा ही मनुष्य जीवनाची एक आवश्यकता होऊन रहाणार आहे. जशी मलाही या वयात वाटते.”
“नंतर आपण कधी तरी बोलूं”
असं म्हणत आम्ही दोन दिशेला गेलो.
आज तळ्यावर भाऊसाहेबांची गैरहजेरी मला भासली नाही.

Subscribe to:
Posts (Atom)