“इतिहासाने दाखून दिलं आहे की अहिंसा आणि रचनात्मकता ह्यामधे समाजात यशस्वी परिणाम आणण्याची क्षमता असते”
आज मी प्रि.वैद्यांच्या घरी गेलो होतो.आम्ही दोघे मिळून तळ्यावर फिरायला जाणार होतो.प्रो.देसाई सध्या आपल्या मुलाच्या घरी थोडे दिवस राहायला गेल्याने त्यांची कंपनी थोडे दिवस आम्हाला मिळणार नव्हती.
पण झालं असं की मला कळलं वैद्य पण काही आवश्यक काम आलं म्हणून त्यांच्या पत्नीबरोबर बाहेर गेले होते.वैद्यांचा मुलगा- गिरीश- घरी भेटला.
मला म्हणाला,
“काका, मी आज तुमच्याबरोबर तळ्यावर येतो.आज मला काही कामानिमीत्त सुट्टी घ्यावी लागली होती.काम काही झालं नाही आणि घरी राहून मी पूर्ण बोअर झालो आहे.”
मी त्याला म्हणालो,
“अलभ्य लाभ.नाहीतरी रोज तू एव्हडा कामात गुंतलेला असतोस,माझ्या वाट्याला कसा येणार.?चल जाऊया.”
चालता चालता मी त्याला म्हणालो,
“हल्ली होत असलेल्या हाणामारी,सुयीसाईड बॉम्बर्स,आतंकवादी आणि जास्त करून एका धर्मात काही लोकात उसळून निघालेली जीहादची घोषणा आणि त्यानुसार मनुष्यहानी करून तथा-कथित क्रान्ति आणण्याचे त्यांचे विचार पाहिल्यावर वाटतं हे लोक इतिहासातून काही शिकलेले दिसत नाहीत.
“जे लोक इतिहास शिकत नाहीत ते नक्कीच इतिहासाची पुनरावृती करायला अभिशापित होतात.”
असं कुणी तरी म्हटलं आहे.तुला कसं वाटतं.?”
गिरीश मला म्हणाला,
“रोज पेपरात आपण वाचतो त्या घटना अगदी सारख्याच नसल्या तरी जवळ जवळ सारख्याच अर्थाच्या असतात.मग त्या काल ऐकलेल्या असो वा परवा ऐकलेल्या असो वा एक आठावड्यापूर्वी ऐकलेल्या असोत.इतिहासाकडून शिकायची संवय मला वाटतं लोक विसरून गेले आहेत.”
आज प्रि.वैद्य नसले तरी त्यांचा गिरीश मला चर्चा करायला चांगलाच सापडला हे पाहून मी मनात खूश झालो होतो.
मी त्याला म्हणालो,
“काय रे गिरीश,तुला शाळेत इतिहासाचा विषय शिकावा लागला असेलच.काही आठवतं का तुला एखादा किस्सा?”
“मला लहानपणी माझ्या वर्गातली गोष्ट आठवते.माझ्या मनावर तीचा चांगलाच परिणाम झाला आहे.”
गिरीशने विषयाला हात घातला.
मधेच त्याला अडवीत मी म्हणालो,
“एक गोष्ट माझ्या लक्षात आली की आपण ज्यावेळी परिणामकारक बदलाव आणण्याच्या प्रयत्नात असतो तेव्हा रचनात्मकता ही नक्कीच हिंसा करण्यापेक्षा जास्त परिणामकारक ठरते.
पण ते जाऊदे तू काही तरी वर्गातल्या गोष्टीबद्दल सांगत होतास.”
“हो,वर्गातल्या गोष्टीबद्दल मी म्हणालो,”
गिरीश सांगू लागला,
“त्याचं असं झालं,एकदा आमचे इतिहासाचे शिक्षक जगाच्या इतिहासाबद्दल बोलत होते.आम्हाला त्यानी आतापर्यंत जगात झालेल्या अनेक क्रान्तिबद्दल यादी तयार करून प्रत्येक घटनेबद्दल चार ओळीत टीप लिहायला सांगीतली होती.
त्या यादीचा विचार केल्यावर एक ठरावीक चित्र दिसलं ते आमच्या शिक्षकांनी आमच्या लक्षात आणलं.जेव्हड्या म्हणून क्रान्ति झाल्या होत्या त्या सर्वांमधे रक्तरंजीकता जास्त होती.त्या हिंसेने परिपूर्ण झालेल्या क्रान्ति असायच्या.त्यातली एकही क्रान्ति रक्त न सांडता झालेली नव्हती.जेव्हा क्रान्ति विषयी विचार केला जाई तेव्हा त्यात आपल्या उद्देशासाठी जीवीताची प्रचंड हानी करायला लोक उद्युक्त झालेले दिसले.त्यावेळी,तुम्ही म्हणता तसं, आमच्या पैकी कुणाच्याही असं लक्षात आलं नाही की क्रान्ति अहिंसक पण होऊ शकते.
आमच्या शिक्षाकानी ह्य विषयावर चर्चा करायला चालना दिल्यानंतरच आमच्या लक्षात आलं की अहिंसक क्रान्ति झाल्याची इतिहासात नोंद आहे.
त्यामधे वैज्ञानिक क्रान्ति, औद्योगिक क्रान्ति,ज्ञानोदय आणि नवजागरण ह्या गोष्टी प्रकर्षाने लक्षात घेतल्या पाहिजेत.ह्या प्रकारच्या सर्व क्रान्तिमधे रचनात्मक विचार,आणि कार्यकुशलतेचा अंतर्भाव होता आणि हिंसा बिलकूल नव्हती.वर्गात क्रान्तिबद्दल आम्ही सुरवातीला विचार करीत होतो तेव्हा आमच्या मनात ह्या गोष्टी लक्षात अजिबात आल्या नाहीत उलट हिंसा आणि रक्त सांडण्याचे प्रकार लक्षात आले.
कल्पकता किंवा रचनात्मकता विषयी विचारच सुचला नाही.हे सुचल्यानंतर मात्र माझा विचार बदलला आणि वृद्धिंगत झाला.”
मला गिरीशचे विचार सकारात्मक वाटले.
मी म्हणालो,
“हिंसा होऊन झालेली क्रान्ति नेहमीच परिणामकारक होत नाही.एकदा का हिंसा होऊन क्रान्ति झाली की नंतर शांती मिळेलच ह्याची खात्री नाही.आणि त्या क्रान्तितून उपलब्ध झालेली ध्येयं साध्य होतीलच याची खात्री नाही.उलट हिंसात्मक क्रान्तितून आणखी हिंसा होण्याचा संभव बळावतो.”
“काका,तुमचं म्हणणं मला एकदम पटतं.मी पुढे जाऊन म्हणेन,
अहिंसात्मक क्रान्तिमधून समाजावर जास्त परिणामकारक आणि कायमचा ठसा बसतो.असंच मलाही वाटतं.”
गिरीश माझ्याशी सहमत झाला हे मला जरा बरं वाटलं.
मी त्याला म्हणालो,
“तू मघाशी उल्लेख केलेल्या अहिंसात्मक क्रान्तिंचे परिणाम शेकडो वर्षं होऊन गेली तरी आजही प्रत्यक्षात दिसतात. त्यातून मिळालेली उदाहरणं आणि त्याची उपयुक्तता नंतरच्या पीढीशी पायाभूत राहून अजूनही व्यवहारात आहे. इतिहासाने दाखून दिलं आहे की अहिंसा आणि रचनात्मकता ह्यामधे समाजात यशस्वी परिणाम आणण्याची क्षमता आहे.”
“काही वेळा हिंसेची जरूरी नसते उलट हिंसाच समाजात आणायच्या नव्या बदलावाला पायओढ करायला कारणीभूत ठरते.आणि ह्याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे आता काय चाललं आहे ते. आतंकवाद्यांच्या दृष्टीने त्यांनी त्यांच्या धर्मात सांगीतलेल्या काही गोष्टींचा त्यांच्या सोयीनुसार अर्थ लावून घेतला आहे.पण असं करणं जास्त वेळ टिकणार नाही.”
गिरीशचं हे म्हणणं ऐकून मी त्याला म्हणालो,
“म्हणून बदलाव आणायचा असल्यास रचनात्मकतेचं समर्थन जास्त झालं पाहिजे.हे इतिहासातून शिकून असा इतिहास घडवला गेला पाहिजे.पण तू मघाशी म्हणालास तसं लोक इतिहासाकडून शिकायला विसरून गेले आहेत,ही चूक त्यांच्या ज्यावेळी लक्षात येईल,तो पर्यंत हे सगळं आपल्या सारख्याला सहन करावं लागणार आहे,असं मला वाटतं.”
दोघेही आम्ही एकमेकाशी एव्हडे सहमत झालो होतो की मी सुरवात केलेल्या ह्या विषयावर पुढे चर्चा करण्यासारखं काहीच राहिलं नव्हतं.
श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com
Thursday, January 14, 2010
Tuesday, January 12, 2010
प्रदीप गावड्याची वेगळीच भूक
“परंतु,एक गोष्ट मला नक्कीच माहित आहे की भूक असणं चांगलं ठरतं जेव्हा पोटात प्रभावशाली आवेश येण्याचं ईन्धन ती भूक पेटवते.आणि जीवनात प्रगति आणते.”
ती शनिवारची दुपार होती.अंधेरी लोकल पहिल्या प्लॅट्फॉर्मवर येणार असं चर्चगेटचा इंडीकेटर दाखवत होता.अंधेरी आल्यावर पटकन उतरून ब्रिजवर चढता यावं म्हणून मी प्लॅटफॉर्मच्या बाहेरच्या टोकाला जाऊन एका बाकावर बसलो होतो.दुपारचा पेपर वाचत होतो.तेव्हड्यात माझ्या बाजूला एक सदगृहस्थ येऊन बसले.गाडी यार्डातून आल्याने रिकामीच होती.चटकन चढून खिडकीच्या जवळ बसलो.समोरच्याच बाकावर ते गृहस्थ बसले.गाडी सुटायला अजून पाच मिनटं होती.शनिवारची दुपारची वेळ असल्याने तशी गाडी रिकामीच होती.आम्ही एकमेकाशी हंसलो.आणि नंतर बोलता बोलता कळलं की तो प्रदीप गावडे होता. आणि त्याचा मोठा भाऊ मला ओळखतो.
त्याचा मोठा भाऊ शंकर गावडे लहानपणी माझ्या वर्गात होता.ह्या गावड्यांचं घर आमच्या शाळेच्या बाजूला होतं.शंकर धरून हे पाच भाऊ आणि एक बहिण.आमच्या लहानपणी त्या जनरेशनमधे पाचसहा मुलांचं कुटूंब सर्रास असयाचं.”हम दो हमारे दो” ही घोषणा तोपर्य़ंत झाली नव्हती.आणि छोटा परिवार ठेवल्याने परिस्थिती सुधारता येते वगैर वगैरेचा प्रचार करणं त्यावेळी जरा अप्रशस्त भासायचं.
मुळात घरची परिस्थिती चांगली असेल तर मुलांचं जीवन निभावून जायचं.पण त्या व्यतिरिक्त घरचा कमवता माणूस मुलं वाढत असताना दुर्दैवाने आजारी झाला आणि कमाईवर गदा आली तर मग सर्वांचेच हाल व्हायचे.
गावडे कुटूंबाचं असंच काहीसं होतं.
प्रदीपची आणि माझी ह्याच विषयावर गाडीत चर्चा झाली.
मला तो म्हणाला,
“मी लिहायला वाचायला शिकायला लागल्या नंतरच माझ्या लक्षात आलं की बाकी इतर कुटूंबातली मुलं मी जसं जीवन जगतो तशी ती जगत नव्हती.
आमच्या गावातल्या लायब्ररीमधे माझी अधून मधून खेप व्ह्ययची. हावरटासारखी मी हाताला लागतील तेव्हडी आणि वेळ असे पर्यंत पुस्तकं वाचायचो.मला माहित नसलेल्या जगातल्या निरनीराळ्या ख्याली-खुशालीचं जीवन जगणार्या मुलांच्या जीवनाबद्दल माहिती काढण्याचं साहस करण्याच्या प्रयत्नात असायचो.
ही मुलं भुकेलेली कधीच नसायची आणि असलेल्या त्यांच्या गरजा सहज पुर्ततेला यायच्या.
बरेचदां मी स्वतः एका अलिशान बंगल्यात रहात असल्याचं दिवास्वप्न करायचो.बंगल्याच्या बाहेर सुंदर दिसणारं पांढर्या रंगाचं कुंपण,घरासमोर रंगीत फुलांची बाग,मोठाले कुत्रे,आणि नोकरमाणसांची धावपळ असलेलं त्या बंगल्यातलं वातावरण स्वप्नात पहायचो. “
दिवास्वप्नातून बाहेर आल्यावर मला खर्या जीवनाला सामोरं जावं लागायचं.माझ्या पाच भावंडांबरोबर जगण्याचं ते प्रात्यक्षीक असायचं.दम्या सारख्या दुर्दैवी रोगाने पछाडलेल्या माझ्या बाबांची सेवा करण्यात आमचा वेळ जायचा.ते स्वतःच अपंग असल्याने घरातली आवक सहाजीकच तुटपूंजी असायची.”
प्रदीप गावडे हे मला सांगत होता ते ऐकून मला खूपच गहिवरून आलं.
मी म्हणालो,
“तुझा थोरला भाऊ शंकर शाळेत खूपच हुशार मुलगा म्हणून ओळखला जायचा.शिक्षक त्याच्याकडे विशेष लक्ष द्यायचे.मला ते अजून आठवतं.मॅट्रिकला तो आमच्या शाळेतून पहिला आला होता.”
आपल्या थोरल्या भावाची माझ्या तोंडून स्तुती ऐकून प्रदीपला सहाजीकच बरं वाटलं.
मला म्हणाला,
“आमच्या घरी वीज नसायची.त्यावेळी मिणमिणत्या दिव्यात आम्ही रात्रीचा अभ्यास करायचो. माझे वर्गसोबती ह्या बद्दल माझ्याकडे पृच्छा करायचे. मला वाटतं वेळ मारून नेण्यासाठी मी त्यांना खोटी खोटी उत्तरं द्यायचो.आमची शिक्षणांत जशी प्रगती होत राहिली तशी घरची परिस्थिती पण सुधारूं लागली.”
आमची गाडी कुठपर्यंत आली ते मी खिडकीच्या बाहेर बघायला लागलो.ते पाहून प्रदीप मला म्हणाला,
“मी तुम्हाला बोअर तर करीत नाही ना?”
हे ऐकून मला खूपच वाईट वाटलं.
मी म्हणालो,
“आपण अजून दादरला पण आलेलो नाही.तुझी जीवनकथा ऐकायला मला कसं बोअर होईल? तुमच्या विषयी ऐकून मला नक्कीच तुम्हा सर्वांचा अभिमान वाटेल.”
प्रदीप पुढे सांगू लागला,
“अगदी लहानपणापासून माझ्या भावंडांबरोबर मिळेल ती कामं पत्करून,नवे करकरीत कपडे सोडाच पण वापरलेले कपडे मिळाले तरी त्यात समाधान राहून निदान रोजचं थाळीत जेवण पडलं तरी भले अश्या परिस्थितीत आम्ही दिवसांची गुजराण करायचो.अशावेळी इतर मुलं आपला वेळ संगीत शिकण्यात,सायकली घेऊन सहलीला जाण्यात,नवीन नवीन खेळणी विकत घेण्यात आपलं जीवन जगायची.
आमची आई काबड-कष्ट करायची.आमच्या घरी आम्ही दोन चार कोंबड्या पाळल्या होत्या.त्यांची अंडी विकून थोडे पैसे यायचे. त्याशिवाय आमची आई कुणाच्या घरी मदतीला जाऊन त्यांच्याकडून काय मिळेल ते घेऊन यायची.त्यामुळे आमची उपासमार क्वचीतच व्हायची.”
मी प्रदीपला म्हणालो,
“आणि आपल्या त्या वाढत्या वयात राक्षसी भूक लागते.तुमच्या त्या परिस्थितीत आणि एव्हड्या मुलांना उपासमार न होईल ह्यासाठी काबाडकष्ट करणारी तुझी आई खरीच “धन्य ती माऊली” असं माझ्या मनात आलं.”
“पण खरं सांगायचं तर माझी खरी भूक दुसरीच असायची.”
भूकेचा विषय निघाल्यावर प्रदीप आपल्या मनातलं खरं ते सांगू लागला,
“माझे आईवडील जे जीवन जगले त्यापेक्षा जरा चांगलं जीवन जगण्याची माझी भूक होती.आमच्या कामचालावू अस्तित्वापलिकडच्या अस्तित्वाच्या ज्ञानाविषयीची ती भूक होती.माझ्या बाबांना वाटायचं की आमचं असंच चालणार ती त्यांची समजूत खोटी करून दाखवण्याची माझी भूक होती.
माझीच नाही तर ही भूक माझ्या भावंडांची प्रभावकारी शक्ती होती ज्यामुळे ते प्रेरित होऊन आईवडीलांच्या अपेक्षेपेक्षा जास्त सफल करण्यात यशस्वी झाले.मिळेल त्या शाळेत जाऊन शिकण्याचं आम्ही सर्वानी हौशीने पत्करलं.कारण शिक्षणच आमचं भावी आयुष्य उज्वल करण्याची पहिली पायरी होती.”
हे ऐकून मला प्रदीपच्या ह्या विचारसरणीचा खूप आदर वाटू लागला.
मी म्हणालो,
“कोण कोण काय काय शिकले ते ऐकून मला खरंच आनंद होईल.”
“माझी भावंडं निरनीराळ्या व्यवसायात आपआपली कार्यसिद्धि करून परिपूर्णतेला आली आहेत.माझा मोठा भाऊ शंकर आर्ट प्रोफेसर आहे.एक भाऊ फार्मासिस्ट आहे.एक व्हेट डॉक्टर आहे.एकाचा कपड्याचा धंदा आहे. मी के.सी.कॉलेजमधे क्लार्क आहे आणि माझी एकुलती एक धाकटी बहिण मुलींच्या शाळेत शिक्षीका आहे.”
प्रदीप सांगत होता.
मला राहवलं नाही.मी प्रदीपला पटकन म्हणालो,
“ह्या भुकेच्या तीव्रतेबद्दल जर का तुम्हाला एव्हडी चिंता नसती,किंवा प्रतिभेचं अगोदरच वरदान असतं,किंवा तुमचं जीवन छानछोकीचं असतं तर मला वाटतं तू कधीच जाणू शकला नसतास की तुला आणि तुझ्या भावंडांना हे यश संचित करता आलं असतं.”
माझं हे ऐकून प्रदिप खरोखर सद्गदीत झाला.आणि त्याला माझं म्हणणंही पटलं.आणि आम्ही अंधेरीला उतरण्यापूर्वी डोळ्यात पाणी आणून शेवटचं सांगून गेला.

प्रदीप गावडे आणि त्याच्या कुटूंबाची चर्चगेट-अंधेरीच्या प्रवासात ही कहाणी ऐकून माझा वेळ सत्कारणी गेला असं मला वाटलं.

Sunday, January 10, 2010
शब्दांच्या ओळी शिवायला स्मृतिची सूई.
“कंप्युटर जवळ बसून शब्दांच्या ओळी स्मृतिच्या सूईने शिवल्या नाहीत तर तुमचं लेखनाचं स्वप्न साकार होणं कठीण.”
त्या दिवशी माझी प्रो.देसायांबरोबर चर्चा चालली होती.विषय होता लेखनाबद्दल.
मी त्यांना म्हणालो,
“मला वाटत होतं की मी कंप्युटर जवळ बसलो की मला आपोआप शब्द सुचंत जाणार.मला वाटत होतं की लेखन करणं म्हणजे पेटी शिकणं,सायकल दुरुस्त करणं,चित्र काढणं यासारखं संवयीने होत असावं.कुठचीही कला कार्यान्वित करावी लागते.तसंच कार्य करायला गेलं की कल्पना सुचत जातात, विचार सुचत जातात.लेखनाबाबत असाच माझा समझ होता.”
भाऊसाहेब म्हणाले,
“मला जी माहिती आहे त्याप्रमाणे लेखन करायला स्मरणशक्ति उभारून यायला हवी.”
“तुमचं म्हणणं अगदी बरोबर आहे.”
प्रो.देसायांना दुजोरा देत मी म्हणालो.
“मला माझ्या लहानपणाची एक गोष्ट आठवली.आमच्या शेजारी एक पानपट्टीची गादी होती.असाच एक माणूस त्या दुकानात पान खायला आला की पन्नास पैशांचं नाणं द्यायचा. पंचवीस पैशाचं उरलेलं नाणं तो कानाला अडकवून जायचा. हे असं करताना मी त्याला बरेच वेळा पाहिलं होतं.”
माझ्या एका लेखाच्या संदर्भाची आठवण येऊन मी त्यांना पुढे म्हणालो,
“माझ्या लेखनातल्या गोष्टीतला हा संदर्भ लक्षात ठेवून मी आणखी अवांतर माहिती त्यात लिहू लागलो.दुपार पर्यंत हजारएक शब्दाची गोष्ट लिहिली गेली आणि त्या गोष्टीची सुरवात त्या पानपट्टीच्या गादी पासून झाली. असंच मी आणखी दोन तीन दिवस लिहीत लिहीत माझ्या मनाला पूर्ण आनंद होईतो लिहीत राहिलो.आता माझ्याजवळ गोष्टीची सुरवात,गोष्टीचा अर्धा राहिलेला शेवट आणि गोष्टीचा मध्य भाग लिहीला गेला होता.”
“म्हणजे तुम्ही अर्ध्यावर गोष्ट सोडून दिलीत का?”
भाऊसाहेब मला आवर्जून विचारू लागले.
“हे झाल्यावर मी पुढचं लेखन थांबवलं.मी काय लिहीलंय याचा मागोवा घ्यायला लागलो पण यापुढे काय लिहायचं ह्याची कल्पना येत नव्हती.मला वाटायचं की सगळं चुकीचं लिहलं गेलं आहे.आणि नंतर एक विराम आला.अशा विरामाला आतापावेतो मी चांगलाच परिचीत झालो होतो.कदाचीत गोष्टीला पुन्हा पहिल्यापासून सुरवात करणं जास्त सोपं वाटायला लागलं.किंवा सर्व विसरून जायचं असंही वाटायला लागलं.”
प्रो.देसायांच्या प्रश्नाचं कुतूहल मी जास्त वाढवीत त्यांना असं सांगीतलं.
माझं म्हणणं ऐकून त्यांना एक तुलना सुचली.ते मला म्हणाले,
“मला वाटतं प्रेरणा ही प्रेमासारखीच चंचल बाब आहे.प्रेमाच्या निर्मितीची उपस्थिती जशी लग्नजीवनात असते अगदी तसंच लेखनाच्या प्रेरणेचं आहे.ज्याप्रमाणे काही झालं तरी तुम्हाला लग्नजीवनात रोजचंच उपस्थित राहून समर्पित व्हावं लागतं.पण जर का तुम्ही म्हणाल,
“मला जेव्हा प्रेरणा येईल तेव्हा मी घरी असेन”
तर असं म्हणून लग्नजीवन चालेल का? काहीतरी भलताच घोटाळा व्हायचा.वरवर पृष्टभाग सांचपल्यास, खोलवरच्या गुढतेकडे डोळेझाक केल्यासारखं होईल.तुमचं काय मत?”
मी माझ्याकडून त्यांना सांगण्याचा प्रयत्न केला.मी म्हणालो,
“कंप्युटर जवळ बसून शब्दांच्या ओळी स्मृतिच्या सूईने शिवल्या नाहीत तर तुमचं लेखनाचं स्वप्न साकार होणं कठीण.
लिहीत असताना जेव्हा विराम येतो तेव्हा समजावं की अजून खरं लेखन व्ह्यायचं राहिलं आहे.जे सुरवातीला मी घाई करून लिहीत होतो ते परिपूर्ण झालं नाही असं वाटायला लागतं,लेखन जास्तच झालं असंही वाटायला लागतं,कुठेतरी जरा ढील आली आहे आणि थोडी दुरूस्ती हवी असंही वाटायला लागतं.गेले दोन दिवस जे मी लिहीत आलो ते फुकट जाणार असं ही मनात येतं.पण त्यातली खरं समजायची गोम अशी आहे की ही सर्व आपली हार आहे असं मानता कामा नये.”
भाऊसाहेबाना पुन्हा तुलना करून सांगण्याची हुक्की आली.
ते म्हणाले,
“विरामाचा उपयोग गोष्टीचं पुनःमुल्यांकन करण्यात करावा.काही काटछाट करावी.अगदी सुरवातीला काहीच नव्हतं आता निदान थोडं फार आहे.थोडातरी ढांचा आहे,सुंदर तुळा तयार आहे,पाया मजबूत आहे,आता फक्त घराची मजबूत बनावट कशी होईल ते शोधून पहायचं राहिलं आहे असं समजावं.”
मी भाऊसाहेबाना म्हणालो,
“खरं सांगू का,माझा प्रामाणिक विचार असा आहे की कधीकधी असं वाटतं लेखन करणं हे काही येर्यागबाळ्याचं काम नाही. कदाचीत मला लेखनाची पुन्हा सुरवात करावी लागणार आहे,पण अगदी सुरवातीपासून नाही.कुठेतरी मधेच चालू करावं लागेल,की जीथे खरा अर्थ प्रकट होईल.सगळं जुळून आल्यासारखं वाटायला लागेल. सरतेशेवाटी अखेरच्या हस्तलेखात दिसावेत तेव्हड्याच शब्दांची काटछाट झालेली असणार.”
“लेखन करण्यासारखं असं दुसरं कुठलं काम असावं?”
अ्सा प्रश्न मी प्रो.देसायांना केला.
ते लागलीच मला माझ्या प्रश्नाचं उत्तर मलाच प्रश्न विचारून देऊं लागले.
“एखाद्या पेटीवादकाकडून गाण्यातले एखाददुसरे स्वर गाळून पुर्ण गाण्याची अपेक्षा करता येईल काय?
एखाद्या सुताराकडून कुंडा-कचर्याच्या टोपल्या न भरता घर बांधून घेता येईल काय.?
झगडा-बखेडा न होता एखादं लग्न निरंतर सुखात राहिल असं म्हणता येईल का?”
पंचवीस पैशाचं नाणं कानात अडकवलेल्या त्या गोष्टीतल्या माणसाच्या भुमिकेला आठवून तुमची स्मरणशक्ती उभारून आली त्या स्मरणशक्तीवर तुम्ही भरवंसा ठेवला.मला वाटतं जशी गोष्टीला सुरवात झाली तसाच तीचा शेवट होणार.”
“गोष्ट पूर्ण झाल्यावर तुमचं मत मला द्या “
असं म्हणून आम्ही चर्चा थांबवली.

Thursday, January 7, 2010
हरी आणि त्याचा चित्र रंगवायचा कुंचला
“आयुष्यमान किती ही दीर्घ असो नसो, आयुष्याची मर्यादा एकमेकाच्या गोष्टीत हिस्सेदार होण्याइतपत ती नक्कीच मर्यादीत असते.”
एकदा माझ्या पुतण्याची सहा वर्षाची मुलगी खेळता खेळता चक्कर येऊन पडली.त्यातून थोडीशी सावध झालेली पाहून त्याने तीला जवळच्या क्लिनीकमधे डॉक्टरच्या देखरेखीखाली ठेवली होती.तीला पहाण्यासाठी मी पुतण्याबरोबर त्या क्लिनीकमधे गेलो होतो.
तीला तपासत असलेला डॉक्टर माझ्या ओळखीचा निघाला.डॉ.अशोक गोखले.गोखले क्लिनीकचं उदघाटन त्याच्या वडीलांनी केलं होतं.त्याचे वडील माझ्या ओळखीचे होते.
मला पाहून त्याला आनंद झाला.नंतर तो मला त्याच्या कॅबिनमधे घेऊन गेला.त्याच्या बैठकीच्या खूर्चीच्या मागे भिंतीवर एक सुंदर हस्तचित्र टांगलेलं होतं.चित्र मला आवडलं.निरखून पाहिल्यावर चित्राच्या खाली डॉक्टर अशोक अशी सही होती.
अशोक नुसता डॉक्टर नव्हता,चांगला चित्रकारही होता हे पाहून मला त्याचं कौतूक वाटलं.
चित्रात एक मुलगी दाखवली होती.तीने डाळींबी रंगाचा झगा घातला होता.वय असेल तेरा-चवदा वर्षाचं.समुद्रकिनार्यावर पाण्यात असलेल्या एका होडीत ती एक पाय टाकतेय आणि दुसरा पाय पाण्यात होता. तीच्या हातात वल्हं होतं.आणि होडीचं पांढरं शीड वार्यावर फडफडत होतं.खरं तीचं वय वीस-पंचवीस होतं हे नंतर मला डॉक्टरकडून कळलं.चित्रात दिसायला लहान दिसत होती.
मी कुतूहल म्हणून अशोकला म्हणालो,
“तू चित्र फारच सुंदर काढलं आहेस.पण ही मुलगी कोण आणि त्याला काही पार्श्वकथा आहे काय?”
“हे चित्र पाहून मला सगळेच असं विचारतात.”
अशोक म्हणाला.
“सर्वांनाच मी त्या मुलीची कथा सांगत नाही.पण तुम्हाला सांगेन.पण एका अटीवर तुम्ही माझ्या घरी आलं पाहिजे.माझ्या बाबांनापण तुम्हाला बघून आनंद होईल.तुम्ही क्लिनीकमधे येऊन गेला असं सांगीतल्यावर ते मला नक्कीच तुम्हाला घरी बोलावलं का नाही म्हणून विचारणार. त्याशिवाय ह्या चित्राला जी कथा आहे ती दोन ओळीत सांगता येण्यासारखी नाही.”
माझं कुतूहल जास्त वाढवीत अशोक मला म्हणाल्याचं पाहून मी त्याला म्हणालो,
“तू डॉक्टर आहेस,चित्रकार आहेस,आणि मला वाटतं कथाकार पण आहेस.मी एक दिवस नक्कीच तुझ्या घरी येईन.पण ह्या चित्राची कथा मला सांगायला विसरू नकोस”
आणि एक दिवस मी त्याच्याकडे गेलो.मला पाहून त्याच्या वडलांना खूपच आनंद झाला.
विषय निघाल्यावर मला अशोक म्हणाला,
“मला वाटतं गोष्टी ऐकणं हे मनाला चांगलं औषध आहे.
मी माझ्या मुलांना रात्री झोपण्याच्यावेळी नियमीत एखादी गोष्ट सांगतो.आणि कधी कधी माझी नेहमीचीच आवडणारी गोष्ट पण सांगतो.गोष्टीचं नाव आहे,
“हरी आणि त्याचा चित्र रंगवायचा कुंचला”.
अशोकच्या घरात गेल्यावर भिंतीवर टांगलेली बरीच चित्र माझ्या नजरेतून सुटली नाहीत.बैठकीच्या खोलीत एक भलं मोठं चित्र मी पाहिलं.अशोक सांगत असलेली गोष्ट त्या चित्रात दृश्य म्हणून मला दिसली.
अशोक पुढे सांगू लागला,
“गोष्ट अशी आही की हरी हा एक अगदी विरळ केसाचं डोकं असलेला मुलगा एका मोठया कागदावर चित्र काढीत होता आणि कुंचल्याने ते चित्र रंगवीत होता.अशी त्या गोष्टीची सुरवात आहे.आणि नंतर सर्व साधारण त्याच्या वयाची मुलं चित्र काढतात तसंच हरी चित्र काढायला लागतो. त्या चित्राच्या आधारे तो आपल्या जीवनाची गोष्ट तयार करतो . पहिल्यांदा तो एक मोठी रेषा काढतो. मग एक मोठं क्षीतीज काढतो.नंतर काढतो,एक चंद्र काळ्याभोर आकाशात.आणि मग एक जमीनीवर वळणावळणाची पायवाट काढतो जणू ती पायवाट म्हणजे त्याचा जीवनमार्गच आहे. ह्या मार्गावर तो
आपल्या जीवनात होणार्या सहासाच्या घटना दाखवण्याच्या प्रयत्नात असतो.नंतर तो एक मोठं अरण्य दाखवतो.आणि त्या अरण्यात इतर झाडांबरोबर एकच मोठं आंब्याचं झाड काढतो.
त्या आंब्याच्या झाडाच्या मुळा़शी एका मोठ्या सापाचं वारूळ काढतो.त्या वारूळात रहाणारा साप त्या झाडावर लागलेल्या रसबाळ आंब्यांचं संरक्षण करण्यासाठी असतो.पण एव्हडं काढून झाल्यावर हरीला स्वतःलाच त्या सापाबद्दल अचंबा वाटतो.तो स्वतःच त्या सापापासून एव्हडा भयभीत होतो की तो पुढे सापाबद्दलची गोष्ट लिहिण्यापासून माघार घेतो.त्याचा त्या थरथरणार्या हातामुळे जांभळ्या रंगाची ती कागदावरची रेष वाकडी-तीकडी काढली जाते.
आणि हे त्याला कळण्यापूर्वीच त्याचं ते जीवनाचं कथानक एका संकट-स्थितिला पोहचलेलं असतं असं त्याला भासतं.तो एकाएकी पुढे समुद्र दाखवून स्वतः त्या समुद्रात बुडत्या स्थितित आहे अशी कल्पना करतो.पुढे हरीची गोष्ट पुन्हा त्याला विस्मयीत करते.त्याला त्यावेळी हवं तेच त्याच्या डोक्यात येतं.स्वतःला समुद्रात बुडण्यापासून वाचवण्यासाठी एक सुंदरशी होडी काढून ती घेऊन तो किनार्याला जाण्याच्या मार्गाला लागतो.
ही गोष्ट ऐकायला माझ्या मुलांना आवडतं.म्हणून नंतर मी त्याचं एक चित्रच काढून लावलं आहे.चला तुम्हाला दाखवतो.”
असं म्हणून अशोक मला आतल्या बैठीकीच्या खोलीत घेऊन गेला.
अशोक पुढे म्हणाला,
हरीची ही गोष्ट मला संपदाची आठवण करून देते.”
“ही कोण संपदा?”
मी अशोकला विचारलं.
“तुम्ही माझ्या क्लिनीकमधे त्या चित्रात पाहिली ती संपदा.”
असं सांगून अशोक पुढे म्हणाला,
“त्याचं असं झालं की मी माझ्या क्लिनीकचं नुकतंच उध्गाटन केलं होतं.एक दिवशी रस्त्यावरच्या एका कचर्याच्या पेटीजवळ एका सफेद कपड्यात गुंडाळून टाकून दिलेलं मुल आमच्या क्लिनीकची आया माझ्या जवळ आणून देते.ती मुलगी असते.ते निष्पाप मुल पाहून मला त्याची दया येते.मी त्या मुलीला ठेवून घेतो.एक संपत्तिच सापडली असं समजून मी त्या मुलीचं नाव संपदा ठेवतो.
संपदा नंतर वयाने जरी मोठी झाली होती तरी दिसायला ती एखाद्या पोरकट मुली सारखी दिसायची.ती हळू हळू शाळेत ही जाऊ लागली. ती वाढत असताना माझ्या लक्षात आलं की तीला जन्मतःच एक रोग झाला होता.त्या रोगामुळे तीची वाढच खुंटली होती.त्यामुळे ती सदासर्वकाळ खुरटलेलीच दिसायची.पण संपदा तीचं हे जीवनाचं भावनेने भरलेलं सामान पाठीवर ठेऊन कधीच फिरत नव्हती.तीचा गोड आवाज आणि तीच्या बडबड करण्याच्या संवयीचा वापर करून स्वतःबद्दल तीने असं चित्र रेखाटलं होतं की तीच्या जीत्याजागत्या जगाला कशाची सीमाच नव्हती.कुणी जरी तीचं
बडबडणं ऐकायला कबूल झालं तर ती सर्व बोलून टाकून ऐकणार्याला प्रसन्न करायची. त्या बडबडीत तीची भावि-स्वप्न असायची.
कॉलेजबद्दल,करीयरबद्दल,लग्न आणि नंतर मुलांबद्दलची तीची स्वप्न असायची.”
मला अशोकच्या संपदाबद्दलच्या माहितीचा आणि चित्रातली संपदा आणि होडीचा काय संबंध असावा ह्याचं कोडं पडलं.
मी म्हणालो,
“तीला कोणा कोळ्याने कचर्याच्या डब्याजवळ टाकून तो निघून गेला का?”
माझ्या प्रश्नाचं अशोकला हसूं आलं.
मला म्हणाला,
“असंच एक दिवशी,मी माझा स्टेथॅस्कोप माझ्या कानावरून दूर करून खरंच तीच्याकडून ऐकायला सुरवात केली. संपदाला तपासण्यासाठी, किंवा तीच्या प्रकृतीचं निदान करण्यासाठी नव्हे तर नुसतं तीच्याजवळ बसण्यासाठी, तीच्याकडून काहीतरी शिकण्यासाठी.
तीचं जीवन बघून मला हरीच्या गोष्टीची आठवण येऊ लागली.
हरीने काढलेल्या गोष्टीतल्या सापासारख्या नित्यनियमाने भयंकर, अतिक्रुर सापांशी संपदा सामना करीत होती. आजाराशी,दुःखाशी,भेदभावाशी ती सामना करीत होती.
तीला माहित होतं की एक दिवस तीचा अंत होणार आहे.तो दिवस फार दूर नव्हता.परंतु,ह्याशिवाय आणखी काहीतरी तीला माहित होतं.आयुष्यमान किती ही दीर्घ असो नसो, आयुष्याची मर्यादा एकमेकाच्या गोष्टीत हिस्सेदार होण्याइतपत ती नक्कीच मर्यादीत असते.
ते अरण्य आणि त्यातलं ते एकच एक आंब्याचं झाड असलेल्या कहाणी पुरतं आयुष्य मर्यादीत नसतं.नव्हेतर,अशी जीवनाची कहाणी की ज्यात तीच्या जीवनाचा अनुभव ऐकण्यासाठी अन्य कुणीही भाग घेत असताना तीला होत असलेल्या यातनांची साक्ष म्हणून ते आयुष्य हजर असतं.
तीची जीवन कहाणी डॉक्टरना,शिक्षकाना,मित्राना संपदा सांगत असताना ती नुसती त्या रोगाने जर्जरलेली व्यक्ती, अशी दृष्टोप्तीत न येता उलट ती अशी व्यक्ती दिसायची की जीला अपेक्षा आहेत, स्वप्नं आहेत आणि इच्छाही आहेत.
आपली कहाणी सांगण्याची तीची क्षमता ही त्या समुद्रातल्या होडी सारखी होती त्या होडीच्या सहाय्याने ती निराशेच्या समुद्रात न डुबता किनार्याला येऊ शकली.
ती गेल्याचं मला कळल्यानंतर मी खूपच दुःखी झालो.तीलाच माझ्या कल्पनेत आणून ते चित्र मी तयार केलं.त्या होडीत ती चढली आहे आणि त्या होडीचं वल्हं म्हणजे तीची आशा आणि त्या होडीचं शीड म्हणजे तीचं स्वप्न असं मी त्यात रेखाटलं आहे.”
संपदाबद्दल ऐकून मला खूपच गहिवरून आलं.मी अशोकला म्हणालो,
“रात्री झोपताना सांगीतल्या जाणार्या गोष्टी सारख्या ह्या जीवनाच्या गोष्टी साध्या आणि दिलासा देणार्या असू शकतील किंवा कदाचीत खिचकट,भ्रामक आणि भयभीत करणार्या पण असू शकतील.पण मला वाटतं असल्या कसल्याही प्रकारच्या कहाण्या ऐकण्याची क्रियाच व्याधी मधून बरं होण्याचा महत्वाचा उपाय असू शकतो.”
माझ्याशी सहमत होत,अशोक मला म्हणाला,
“तसंच “हरी आणि त्याचा कुंचला” ह्या कहाणीशी तुलना करताना मला वाटतं त्या कहाणीतल्या क्षीतीजा प्रमाणे औषधाचं नवीन क्षीतज तयार करून त्या क्षीताजा पर्यंत शीतल चंद्राच्या चांदण्याखालून चालत जाण्यासाठी चित्रातल्या रेषेसारखा दोघानी मिळून तयार केलेल्या जीवनाचा मार्गाचा उपयोग डॉक्टर आणि आजारीमाणूस करतील.”
एका सर्वपल्ली माणसाबरोबर माझा वेळ मजेत गेला.आणि मी त्रुप्त झालो.

Tuesday, January 5, 2010
ती सुखद स्वप्नें बालपणाची
अनुवाद.(गुजरा जमाना बचपन का….)
आठव आली फिरूनी मला
लोपलेल्या आततायी बालपणाची
हाय! एकली मला सोडूनी गेली
ती वेळ निक्षूनी परतण्याची
ते खेळ ते संवगडी अन झुले
पळत जाऊनी म्हणती ते शीवले
विसर पडेना त्या दिवसांची
ती सुखद स्वप्नें बालपणाची
सर्वां नसे जाण त्या बालपणाची
नको तुलना दोन दिसाच्या पाहुण्याची
नसे तेव्हडी सुलभ असे महाकठीण
बालपणाच्या प्रीतिला विसरण्याची
मिळूनी रडावे अन फिरूनी आठवावे
लोपलेल्या त्या दिवसाना
भेटेल् का वाटेत कुणी ओळखीचा
तो मित्र जुना माझ्या बालपणाचा
श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com
आठव आली फिरूनी मला
लोपलेल्या आततायी बालपणाची
हाय! एकली मला सोडूनी गेली
ती वेळ निक्षूनी परतण्याची
ते खेळ ते संवगडी अन झुले
पळत जाऊनी म्हणती ते शीवले
विसर पडेना त्या दिवसांची
ती सुखद स्वप्नें बालपणाची
सर्वां नसे जाण त्या बालपणाची
नको तुलना दोन दिसाच्या पाहुण्याची
नसे तेव्हडी सुलभ असे महाकठीण
बालपणाच्या प्रीतिला विसरण्याची
मिळूनी रडावे अन फिरूनी आठवावे
लोपलेल्या त्या दिवसाना
भेटेल् का वाटेत कुणी ओळखीचा
तो मित्र जुना माझ्या बालपणाचा
श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com
Sunday, January 3, 2010
मोटरबाईक
“तो माणूस किती विचारशून्य आणि किती बेपर्वाई होता याचा विचार येऊन माझं मन सुन्न होतं.त्यांच्या अपघाता नंतर माझ्या बाबांच्या जन्मदिवशी, आणि इतरांच्या जन्म दिवशी माझी आई आणि आजी रडताना आणि उदास झालेले मी पहात आलो आहे.”
मोटरबाईक चालवणं मोठं धाडसाचं असतं.छातीवर हात ठेऊन कुणी सांगेल का की आतापर्यंत मला लहान किंवा मोठा अपघात झालाच नाही.कदाचीत शंभरात एखादा असं सांगणारा असेलही.पण सांगण्याचा मतीतार्थ असा की दोन चाकावर तोल सांभाळून चालवण्याचं हे वहान असल्याने अपघात होण्याची जास्त प्रवृत्ती असते हे अगदी उघडच आहे. आणि भर रस्त्यावर आणखी वहानं धावत असल्याने आपली चुकी नसतानाही दुसर्याच्या चुकीमुळे ह्या वहानाची जास्त नुकसानी होण्याचा संभव असतो हे नक्कीच.आणि ह्या वहानाच्या चालकाला तसं कसलंच संरक्षण नसतं.
तरूण वयात हे वाहन चालवण्याचा नुसता विचार जरी मनात आला तरी बरेच वेळा घरातून आक्षेप येतो तो आईचा.
“काय हवं ते कर पण हे वहान नको चालवूस बाबा!”
असं जनात नसलं तरी मनात म्हणणारी हमखास व्यक्ती म्हणजे आईच.
त्यानंतर दुसरी व्यक्ती म्हणजे पत्नी.नवर्याच्या प्रेमाव्यतिरीक्त तीला तीच्या भवितव्याची सुद्धा काळजी असणं स्वाभाविक आहे.
मला आठवतं,अनंत करंदीकर अगदी तरूण वयापासून मोटरबाईक चालवायचा.कसं तरी त्याने आपल्या आईला पटवून दिलं होतं की तू एव्हडी काळजी करू नकोस.मी संभाळून हे वहान चालवीन.एव्हडे लोक मोटरबाईक चालवतात असं घाबरून कसं चालेल.?वगैरे वगैरे.
नंतर अनंताचं लग्न झालं.त्याच्या पत्नीने पण आईचा सल्ला पुढे सारला.तीला ही त्याने समजूतीने सांगीतलं.आणि पटवलं.
पण “होणारे न चुके” म्हणतात ना तशातला प्रकार झाला.एकदा अनंता कुर्ला-अंधेरी रस्त्यावरून येत असताना त्याला अपघात झाला.आणि त्यात तो दगावला.त्याचा मुलगा अविनाश त्यावेळी दोन वर्षाचा होता.
हल्लीच मी एका बसस्टॉपवर बसची वाट बघत उभा असताना अविनाशने आपली गाडी थांबवून मला गाडीत बसायला सांगीतलं.मला त्याच्या घरी घेऊन जाण्याचा त्याचा विचार होता,पण मी नंतर येईन म्हणून त्याला सांगीतलं.आणि मला त्याने स्टेशनजवळ सोडलं.
नंतर खूप दिवस निघून गेले.एके दिवशी अविनाश माझ्या घरी येऊन त्याच्या मुलीच्या सोळाव्या वाढदिवशी मला आमंत्रण द्यायला आला होता.
मी त्यादिवशी त्याच्या घरी गेलो होतो.रात्री त्याच्याबरोबर गप्पा करीत बसलो होतो.त्याच्या वडीलांचा विषय निघाला.
मला म्हणाला,
“खरं म्हणजे हा अपघात, अपघात म्हणून वर्गीकृत होऊंच नये.
एक माणूस दारू पिऊन जाणून बुजून गाडी चालवायला जातो आणि दारूच्या नशेत असल्याने रस्त्यावरची आपली बाजू सांभाळू शकत नाही आणि सरळ सरळ माझ्या बाबांवर -जेव्हा ते मोटरसायकल चालवीत होते तेव्हा- त्यांच्या अंगावर गाडी घालतो.गाडीची आणि मोटरसायकलची बरोबरी कशी व्हायची?तीचा चक्काचूर होऊन माझे बाबा जागच्या जागी प्राण सोडतात.”
मी अविनाशला म्हणालो,
“मला सर्व आठवतं.तू त्यावेळी अवघ्या दोन वर्षाचा होतास.तुझ्या आईवर आणि आजीवर काय गुजरलं होतं ते मी माझ्या डोळ्याने पाहिलं आहे.”
मला म्हणाला,
“त्या रात्री झालेली ही घटना समजून घेण्याच्या वयात जेव्हा मी आलो त्यानंतर ज्या माणसाने मि.अनंत करंदीकर यांचा जीव घेतला त्या माणसाचा मी द्वेष करूं लागलो. ते वडील होते, पती होते आणि मुलगा होते त्याशिवाय बर्याच लोकांचे ते विशेष होते.
द्वेष,तीटकार हे जरा जास्त तिखट शब्द आहेत.पण हेच शब्द माझ्या मनात येतात जेव्हा, त्याने जे माझ्या बाबाना केलं त्याची आठवण येऊन माझं मन उद्विग्न होतं तेव्हा.
तो माणूस किती विचारशून्य आणि किती बेपर्वाई होता याचा विचार येऊन माझं मन सुन्न होतं.त्यांच्या अपघाता नंतर माझ्या बाबांच्या जन्मदिवशी, इतरांच्या जन्म दिवशी माझी आई आणि आजी रडताना आणि उदास झालेले मी पहात आलो आहे.”
“खरं आहे तुझं.ज्याला लागतं त्याला कळतं.पण तरीही मी म्हणेन त्याचा आता विसर पाडून घेतलं पाहिजे.मला सांगायला सोपं आहे.पण अशा माणसाला क्षमा करण्य़ापलिकडे आपण काय करू शकणार?”
असं मी त्याला सांगून त्याची समजूत घालण्याचा प्रयत्न करीत होतो.
मला अविनाश म्हणाला,
“क्षमेवर माझा विश्वास आहे,पण एक साधा प्रश्न माझ्या मनात येतो.मी ज्याला ओळखतच नाही त्या माणसाचा मी तीटकार तरी कसा करू? आणि अशा माणसाला मी क्षमा तरी कशी करू की ज्याला मी ओळखतच नाही.वेळो वेळी हा प्रश्न मी मलाच विचारत असतो.
खरं म्हणजे हे दिवस आनंदाचे मानले पाहिजेत परंतु ते आनंदाचे क्षण अप्रिय काळ्याकुट्ट ढगानी विभूषित केले जात होते.ह्या सार्या गोष्टींचा विचार केल्यावर माझ्या मनाला एव्हडं दुःख होतं की माझ्या बाबांच्या गोष्टी आणि त्यांच्या चित्रांची माहिती मला माझ्या नातेवाईकांकडून ऐकावी लागते.
माझ्या झालेल्या नुकसानीचा विचार येऊन बेचैन होऊन त्या माणसाबद्दल विचार करायला बसल्यावर असं वाटतं काय होत असेल त्याला?”
“कुणा दुसर्याचं जीवन उध्वस्त करणं हा विचार सुद्धा मला भयंकर वाटतो. त्याच्या उरलेल्या आयुष्यात तो भोगत असलेली सजा ही तुझ्या त्याच्या विषयीच्या तीटकार्या पेक्षा दामदुप्पटीने जास्तच असणार. एका अर्थी असा विचार केल्याने हा विचार मला एक आशेचा किरण दाखवतो.अशी आशा की ज्या माणसाला तू केव्हाही पाहिलेलं नाही असं असून सुद्धा तुझ्याकडून त्या माणसाला क्षमा केली जावी. असा माणूस की ज्याने तुझ्या आठवणी ज्या तू जमवून ठेवल्या असत्यास त्या आठवणीच तुझ्याकडून त्याने चोराव्या.”
अविनाशला शांत करण्यासाठी मी त्याला समजावून सांगण्याचा एक प्रयत्न केला.
“काका,तुमचं म्हणणं मला पटतं.कधी तरी एक दिवस ह्या माणसाला क्षमा करून मी एव्हडे दिवस माझ्या खांद्यावर वाहिलेलं त्याच्याबद्दलच्या तीरस्काराचं ओझं उतरून ठेवीन.त्यामुळे आता मला असा विश्वास करायला हरकत नाही की वेळ आली की सर्व विचार सोडून देऊन त्या माणसाला फक्त क्षमा करावी.म्हणूनच मी क्षमा करण्यावर विश्वास ठेवायला लागलो आहे.जरी अजून ती वेळ आली नाही तरी ती लवकरच येईल असा माझा दृढविश्वास आहे.”
अविनाश सद्नदीत होऊन मला म्हणाला.
अविनाशचा हा दृढविश्वास पाहून मला ही बरं वाटलं.

Friday, January 1, 2010
रात्र संभ्रमात पडली
अनुवाद. (आज तुमसे दूर हो कर….)
दूर जाऊनी तुझ्यापासूनी
प्रितीने आंसवे ढाळली
चंद्र रडला साथ देऊनी
रात्र संभ्रमात पडली
तुलाच तू घातलीस बंधने
अन मलाच माझी अटकळ
जर वैर साधले नशिबाने
तर साथ देईल कशी वेळ
दूर राहूनी खूशीपासूनी
मनोकामना अंतरली
अर्थच नसे ह्या जीवनी
जगण्याची उमेद संपली
भाग्यावरती ठेवूनी विश्वास
करीतो जगण्याची अपेक्षा
कधी वाटे घेईन शेवटचा श्वास
तसे करू देईना तुझी प्रतिक्षा
श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com
दूर जाऊनी तुझ्यापासूनी
प्रितीने आंसवे ढाळली
चंद्र रडला साथ देऊनी
रात्र संभ्रमात पडली
तुलाच तू घातलीस बंधने
अन मलाच माझी अटकळ
जर वैर साधले नशिबाने
तर साथ देईल कशी वेळ
दूर राहूनी खूशीपासूनी
मनोकामना अंतरली
अर्थच नसे ह्या जीवनी
जगण्याची उमेद संपली
भाग्यावरती ठेवूनी विश्वास
करीतो जगण्याची अपेक्षा
कधी वाटे घेईन शेवटचा श्वास
तसे करू देईना तुझी प्रतिक्षा
श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com
Subscribe to:
Posts (Atom)