अनुवाद. (बहे न कभी नैन से नीर…..)
वाहू न जावी आसवें माझ्या लोचनातूनी
उठेना! काहूर नाजूक माझ्या अंतरातूनी
सजणा! हीच का रे प्रीतिची रीत
मनातल्या आशा जाती लुप्त होऊनी
जाईना! आर्तस्वर माझ्या हृदयातूनी
पाहूनी मृदुहास्य तुझ्या ओठातूनी
घेईना अंतरीची ओळख पटवूनी
ह्यातच झाली तुझी रे जीत
सजणा! हीच का रे प्रीतिची रीत
दीप जळे घरी अन पतंग असे बाहेरी
खेचून आणी प्रीत तयाला दीपा जवळी
शुद्ध हरपूनी विसरे भीति जळण्याची
आवेश येऊनी उमंग आली प्रणयाची
गात राहिली दुनिया त्याचे गीत
सजणा! हीच का रे प्रीतिची रीत
श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com
Tuesday, March 16, 2010
Sunday, March 14, 2010
जीवनातली सूत्रं.
“हळू हळू उन्हं कमी व्हायला लागली.अंगावर सावली पडल्यावर थंडी वाजायला लागली.विषय इकडेच थांबवलेला बरा असं माझ्या मनात आलं.”
वसंत ऋतू येत आहे ह्याची चाहूल लागली.अलीकडे न दिसणारे पक्षी दिसायला लागले आहेत.मलबरी झाडाला आता पून्हा पालवी फुटायला लागली आहे.इकडे पानं पडून गेलेल्या झाडांना पुन्हा पालवी फूटताना फुलं येतात.त्यातून मग पानं येतात. नंतर ज्यावेळी फळं यायची वेळ येते तेव्हा पून्हा झाडाला फुलं येतात.त्यातून मग फळं जन्म घेतात.चक्क उन पडत असल्याने उन्हात बसायला बरं वाटतं हे खरं असलं तरी उन भासत नाही कारण बाहेरचं तापमान थंडी वाटेल एव्हडं असतं.जरा ढग येऊन सावली आली की एकदम कुडकुडायला होतं.निदान आमच्या ह्या वयावर असं वाटतं.
वसंत ऋतूचा पहिला दिवस असल्याने प्रो.देसायाना फोन करून विचारलं की ते आज तळ्यावर येणार का?.भाऊसाहेब हो म्हणालेच आणि वर म्हणाले येताना प्रि.वैद्यांना पण घेऊन येतो.
प्रोफेसरांच्या मनात आज काही तरी नवीन चर्चा करण्याचा विचार दिसतो अशी माझ्या मनात कल्पना आली.आणि ती खरी ठरली.
संध्याकाळी तळ्यावर उन चांगलंच पडलं होतं.मी बराच लवकर येऊन बसलो होतो.येताना चिं.त्र्य.खानोलकरांची कोंडुरा कादंबरी वाचायला म्हणून घेतली होती.पर्शरामतात्यांचं त्यांच्या मनाविरूद्ध तात्यामहाराज म्हणून परिवर्तन कसं होतं आणि लोकच त्याला कसे कारणीभूत असतात हे वर्णन वाचत होतो.प्रो.आणि प्रि. केव्हा आले ते कळलंच नाही.
“कोकणातले संस्कार माणसाना कसं बनवून तयार करतात ह्याचं खानोलकरानी सुंदर विश्लेषण केलं आहे.मी ही कादंबरी वाचली आहे”
असं पुस्तकाचं नाव वाचून भाऊसाहेब म्हणाले.आपल्यावर आपल्या आईचे आणि आजोबांचे संस्कार कसे झाले हे सांगावं असं त्यांच्या मनात आलं असावं.
प्रो.देसाई मला म्हणाले,
“माझ्या आईचा आणि आजोबांचा दुसर्याला मदत करण्याबाबत गहन दृढ विश्वास असायचा.अगदी साध्या पद्धतिने, राहून, विचारपूर्वक राहून,उदार राहून आणि नाम रहित राहून मदत करायची त्यांची पद्धत असायची. आणि हे करीत असताना मनात ते प्रामाणिक श्रद्धा बाळगून असायचे.मी फार क्वचीत माझ्या आईकडून कुणाची अवहेलना झालेली पाहिली आहे. कुणाच्याही संपर्कात आल्यावर त्याच्या अंगचे उत्तमोत्तम गुण ती पाहायची. शेवट पर्यंत ती परिपूर्ण जीवन जगली.चूपचाप भविष्याकडे नजर ठेवून कोणत्याही बदलावासाठी तीचं दार नेहमी ती उघडं ठेवायची.”
हे सांगून झाल्यावर भाऊसाहेबानी प्रि.वैद्यांकडे वळून त्यांना त्यांचं मत विचारलं.
प्रि.वैद्य प्रो.देसायाना म्हणा्ले,
“जीवनातल्या सूत्रांचं विश्लेषण करून ते शब्दात उतरायला जरा कठीणच असतं.ही सुत्रं इतकी आपल्या मनात खोलवर असतात की त्यावर आपली कृती आपण आपोआपच करत असतो.ज्यावेळी मी ह्या कृतींचा विचार करतो तेव्हा माझ्या लक्षात येतं की त्याची उत्पत्ति काही माझ्याकडून होत नाही.मी जे काय ऐकलंय आणि मी जे काय स्वप्नात पाहातोय त्यातून ही उत्पत्ति होत असते.माझी कृती दुसर्यांच्या कृतीवर अवलंबलेली असते. मिळत असलेल्या उदाहरणावरून त्या कृतींचं आयोजन होत असतं.”
हे ऐकून प्रो.देसाई म्हणाले,
“मी ह्याच तत्वावर त्यांच्या पावलावर पाऊल टाकून वागायचं ठरवलं. त्याचा फायदा मला एव्हडा झाला की लोकांकडून मला माझ्यात विश्वास निर्माण करायला मिळाला.कुणाचीही प्रशंसा केल्याने सुखाला आणि यशाला मार्ग खूला होतो हे मला माहित झालं.
व्यक्तिपेक्षा आयुष्य खूपच मोठं असतं.असं असलं तरी जसा मी मोठा होत गेलो तसं माझ्या लक्षात आलं की आपलं त्यामधलं योगदान बरंच कमी असतं.आणि त्यामुळे आपल्यातल्या थोडक्यांचंच नाव इतिहासाच्या पानावर फडकत असतं.”
मी काहीतरी म्हणावं असं भाऊसाहेबांच्या चेहर्यावरून दिसलं.ते तसं म्हणण्यापूर्वीच मी त्यांना म्हणालो,
“पण तुम्ही तुमचं काम निष्टेने करीत राहिला,ज्यात विश्वास ठेवत होता त्यासाठी ते केलं,तुम्ही ते काम स्वार्थी न राहाता केलं,जर तुमच्यातलं कसब तुम्ही तुमच्यासाठी न वापरता दुसर्या कशासाठी वापरलं,तर मग तुम्हाला त्यात नाम रहित अमरत्व मिळेल अशी माझी धारणा आहे.तुमचा चांगूलपणाचा अंश ह्या जगात तुमच्या पश्चात जो राहिल तो राहिल.पण ह्यात काही नवीन असं काही नाही, अपवादात्मक असं काही नाही.परंतु ते तुमच्या विचारसरणीचं वैशिष्ट्य ठरेल एव्हडं नक्की.”
मला प्रो.देसाई म्हणाले,
“माझी स्वप्न साकार करताना मला अपयश येणार हे मला माहित होतं. तरीपण मी प्रयत्नात राहिलो. आज जे काय जगात चालंय,जे काही तणाव आहेत, कुट विवाद आहेत ते मला दुःखी करतात. प्रजातंत्रावर माझा भरवंसा आहे. राजकारणी संप्रदाया्चं प्रजातंत्र मी म्हणत नाही.मी म्हणतो ती प्रजासत्ता ज्यात मुळ कल्पना असते की कुणीही कुणापेक्षा श्रेष्ट वा कनिष्ट नसतो.ह्या जगात जो जन्माला येतो तो स्वतः स्वताचं निवारण करायला येतो. प्रत्येकाला हवी ती संधी मिळायला हवी.मेहनत करून किंवा योगायोगाने काही प्राप्त करू शकला तर ते शक्य झालं पाहिजे.आणि त्याचं प्रतिक म्हणून त्याला इतरांसाठी त्याच्यावर आलेला कर्तव्याचा भार जास्त वाढला आहे हे कळलं पाहिजे.”
मी म्हणालो,
“द्वेष,पक्षपात,विरोध ह्यांची उत्पति वेगळ्या उद्धिष्टाने पाहिल्यावर होते. हे पाहिल्यावर मला याचा अचंबा वाटायला लागतो. नवीन आणि अपरिचीत बाबींकडे प्रत्येकाने मन उघडं ठेवून राहायला पाहिजे. कारण त्यात बदलाव असतो.आणि जीवन म्हणजेच बदलाव आहे ह्यात काहीही वाद असू नये.”
प्रि.वैद्य म्हणाले,
“शक्यतो आपले आदर्श वरच्या पातळीवरचे असावेत.ज्यात विशेषता असते आणि व्यवस्था पण असते.म्हणून जीवनात ह्यापेक्षा चांगली गोष्ट होणार नाही असं कधीच म्हणता येणार नाही.जर का आपल्याला पूर्ण विश्वास असेल,आपल्यात कौशल्य असेल,दृढ निश्चय असेल तर आपण हजारोना आनंदी करू शकू.मनुष्याच्या ज्ञानात भर टाकू शकू.ह्या सर्व गोष्टी आश्चर्य वाटावं अशा तर्हेने आपल्या जीवनाला मार्गदर्शक ठरतात.निक्षून सांगायचं झाल्यास ह्यात काही नवीन असं काही नाही.एकच हा एक सकारात्मकपणे विश्वासलेला विचार आहे.”
हे ऐकून झाल्यावर दोन मिनटं कुणीच काही बोलेना.माझ्या लक्षात आलं,हळू हळू उन्हं कमी व्हायला लागली.अंगावर सावली पडल्यावर थंडी वाजायला लागली.विषय इकडेच थांबवलेला बरा असं माझ्या मनात आलं.सर्वांनीच ते कबूल केलं आणि आम्ही घरी जायला निघालो.

Thursday, March 11, 2010
माधव आणि त्याचे आजोबा.
“मी टॉर्चचा उपयोग करतोच शिवाय शब्दकोशही जवळ ठेवतो. काही शब्द असे पाहिलेत “कर्जफेड”, “अमुच्या गावा”, “आई” “ईश्वर”.
नातवंडांचं आजोबावर प्रेम असणं स्वाभावीक आहे.ती एक नैसर्गीक प्रक्रिया आहे असं म्हटलं तरी अतीशयोक्ती होऊ नये. काहींना आजोबा आपले लाड करतात म्हणून ते आवडता.काहींना आईबाबा रागवल्यानंतर आजोबा आपल्याला जवळ घेऊन आपली बाजू सावरतात म्हणून आवडतात.काहींना आपले आजोबा अनुभवाच्या गोष्टी सांगून समजावतात म्हणून आवडतात. अशी अनेक उदाहरणं देता येतील.पण माधवला आपले आजोबा आवडतात ह्याचं कारण मला जरा जगावेगळं वाटलं.हे कारण कदाचीत जगावेगळं नसावं,मला वाटतं,माधवची अवलोकन करण्याची वृत्ती जरा जगावेगळी वाटली.
त्याचं असं झालं,माधव माझ्या नातवाबरोबर अभ्यास करायला म्हणून आमच्या घरी आला होता.जर्न्यालिझमची दोघानाही आवड आहे.कधी कधी चर्चा करण्यासाठी दोघे एकमेकाला भेटत असतात. माझा नातू त्याच्या आईबरोबर डॉक्टरकडे गेला होता.तो येईपर्यंत मी माधवला बसायला सांगीतलं होतं.
मी त्याच्या आजोबांच्या प्रकृतीविषयी त्याचेकडे पृच्छा केली.ते सांगायला त्याने जी सुरवात केली ती ऐकूनच मी त्याचं अवलोकन बघून थक्क झालो.
माधवने सुरवातच अशी केली.तो मला म्हणाला,
“गेल्या एकदोन वर्षापासून माझ्या आजोबाना हळू हळू अंधत्व येऊ लागलंय असं वाटतंय.माझे आजोबा कॉलेजात प्रोफेसर होते. लिहिणं आणि वाचणं ह्या दोन गोष्टीवर त्यांचं प्रचंड प्रेम आहे.
इच्छा शक्तिवर माझा विश्वास आहे.पण इच्छाशक्तिची वर्णनं पेपरमधे येतात त्या इच्छाशक्तिबद्दल मी म्हणत नाही.जसं माऊट एव्हरेस्टवर चढून जाण्याचं किंवा गेटवे ऑफ इंडीयाकडून एलिफंटाकडे पोहून जाण्य़ाचं अशा प्रकारच्या इच्छाशक्तिचं मी म्हणत नाही.मी म्हणतो ती इच्छाशक्ति जी जीवनात आलेल्या कसोट्यांना,बेअदबीना सामोरी जाऊन पुढे “आगे बढो” असं म्हणते त्या इच्छाशक्तिबद्दल मी म्हणतोय.”
हे ऐकून माझी खात्री झाली की माधवच्या आजोबांच्या प्रकृती विषयीच्या माझ्या प्रश्नाला उत्तर म्हणून माधव नक्कीच काहीतरी त्याच्या आजोबाच्या गंभीर आजाराविषयी सांगण्याच्या प्रयत्नात असणार.
म्हणून मी त्याला म्हणालो,
“वृद्धत्व आल्यावर प्रकृतीच्या संबंधाने काही ना काही कटकटी येतच रहातात.म्हणून कुणीतरी म्हटलंय,
“जन्मापासून मरण येई पर्यंत जीवनात ज्या अवस्था येत असतात. त्यात सर्वांत उत्तम अवस्था म्हणजे म्हातारपण.”
एव्हडं अर्धवट बोलून मी माधवकडे कुतूहलाने बघून त्याची काय उस्फुर्त प्रतीक्रिया येते ते पहात होतो.मला माधव म्हणाला,
“मात्र भरपूर पैसा आणि उत्तम प्रकृती असली तरच.”
माझ्या मनातलं बोललास असं सांगून मी पुढे म्हणालो,
“इतर कुठल्याही जीवनातल्या अवस्थेत,
“गप रे ! तुला त्याचा अनुभव नाही,त्यासाठी वर्ष काढावी लागतात.” असं म्हटलेल्ं ऐकून घेण्याची पाळी येत असते पण आजोबांच्या वयावर तसं त्य़ांना कोण म्हणू शकेल का? हे एक उदाहरण दिलं.पण एकुण सर्व बाबतीत ह्या उतार वयात इतर वयाच्या तुलनेत ह्या वयाचा आदर ठेवला जातो. निदान आपल्या संस्कृतीत तरी.म्हणून मी तसं म्हणालो.”
माधव म्हणाला,
“माझ्या आजोबांकडे भरपूर पैसा नसला तरी आता पर्यंत त्यांची प्रकृती उत्तम होती.म्हणून ते मजेत दिवस काढीत होते. अलीकडे त्यांनाच त्यांच्या प्रकृतीतला फरक दिसायला लागला आहे असं वाटतं.अलीकडे माझे आजोबा भिंग घेऊन वाचायचा प्रयत्न करतात. अलीकडे त्यांचं ऐकणं पण जरा कमी झालं आहे त्यामुळे त्यांच्याशी संपर्क करणं जरा जिकीरीचंच झालं आहे. त्यामुळे ते भारीच वैतागत असतात.इतकी वर्ष वापरात असलेली त्यांची दृष्टी आता एक वाक्य वाचू शकत नाही. माझ्यात आणि माझ्या धाकट्या भावात त्यांना फरक दिसत नाही.मला कळतं की ते काही अमरपट्टा घेऊन आलेले नाहीत. ते कुढत बसलेले दिसतात.निराश झालेलेही दिसतात. माझी आई तीला जमेल तेव्हडं त्यांच्याबरोबर जवळ बसून त्यांच्यासाठी वाचन करीत असते तरीही त्यांची तक्रार असतेच. सर्व ध्यानात रहावं म्हणून ते प्रयत्नात असतात.लिहिण्या-वाचण्याचा तो समय भरून काढण्याच्या प्रयत्नात माझे आजोबा असतात.अंधत्वाची चाहूल त्यांना लागली असली तरी ते वाचण्याच्या प्रयत्नात असतात. जेवणाच्या टेबलावर बसून मोठ्या पेनाने मोठ्या अक्षरात ते कागदावर लिहित असतात.”
मी म्हणालो,
“तुझ्या आजोबांनी तरूण वयात पुस्तकं लिहिलीली आहेत.काही त्यांची पूस्तकं टेक्स्ट बूक म्हणून शाळेत लावलेली मला आठवतात.”
“त्यांना पुस्तक लिहायला खूपच दिलचस्पी असायची.शाळेला लागणारी पुस्तकं ते जेवण्याच्या टेबलावर बसून लिहायचे. आजुबाजूला कितीही गडबड असली तरी त्यांची नजर लिहित्या पानावर केंद्रीत असायची.एखादं वास्तव त्यांच्या सापळ्यात सापडल्यावर ते तसंच वहीत लिहिलं जायचं. इंग्रज भारतात क्रिकेट खेळायला येत होते तिथपासूनचं रेकॉर्ड त्यांच्या पिवळ्या वहित लिहिलेलं असायचं.”
माधवने त्याच्या लहानपणी जे काही त्याच्या आजोबांचं अवलोकन केलं होतं ते तो मला अगदी आनंदाने सांगत होता.
मी म्हणालो,
“मग अलीकडे कसा वेळ घालवतात?”
“अलीकडे ते मित्रांना निरनीराळ्या विषयावर पत्रं लिहायचे.शिवाय दिवाळी,नववर्ष,आणखी कुणाच्या वाढदिवसाला शुभेच्छा पत्र लिहायची माझ्या आजोबाना पूर्वी पासून लय हौस असायची.”
माधव सांगू लागला आणि पुढे म्हणाला,
“माझे आजोबा काहीही वाचायला नेहमीच तयार असतात.चुकून कुणी एखादं पुस्तक वाचता वाचता खाली ठेवलं की ते हरवलं म्हणून समजा. कल्पितकथेचं,किंवा सत्यकथेचं पुस्तक असो,एखादी कादंबरी असो,मासिक असो त्यांच्यासाठी त्यांना सर्वच सारखं असतं.कुणी त्यांना जर का दोन तीन पुस्तकं दसर्यादिवशी वाचायला दिली तर दिवाळी येण्यापूर्वी त्यांनी ती वाचून फस्त केली म्हणून समजा.”
“अरेरे,म्हणजे ज्याची जरूरी आहे ते डोळेच अधू झाल्यावर त्यांची खूपच पंचाईत होत असेल.”
मी म्हणालो.
“तेच तर मला दुःख होतं.पण त्यांनी त्यांची जीद्द सोडलेली नाही. लिहिण्याबद्दलची त्यांची इच्छाशक्ति जब्बर आहे.”
असं सांगून माधव वाईट वाटल्यासारखा चेहरा करून म्हणाला,
“पूर्वी सारखंच अजून स्वतःचं लक्ष केंद्रीत करून ते लिहिण्याच्या प्रयत्नात असतात. पण ते ठळक अक्षर वाचायला त्यांना तेव्हडं सोपं जात नाही. त्यांनी लिहिलेल्या वाक्यांचा शेवट काळ्या ठिपक्यात होतो.किंवा शब्द रेषेच्या वर खाली लिहिले जातात.कधी कधी त्यांच्याकडून कागदाच्या बाहेर जाऊन जेवणाच्या टेबलावर लिहिलं जातं.पण आजोबा लिहितच असतात.कारण लिहिण्याचं सोडलं तर सर्वच सोडून दिल्यासारखं होईल असं त्यांना वाटतं.”
“किती रे,प्रेम करतोस तुझ्या आजोबावर.एव्हडं लक्ष देऊन तू त्यांची लिहिण्यासाठीची धडपड पहात असतोस.”
मला राहवंलं नाही म्हणून मी माधवला असं म्हणालो.
मला म्हणाला,
“तुम्हाला माझ्या आजोबांची आणखी गंमत सांगतो.
त्यांचं हस्तलिखीत आटोपशीर जरी असलं तर ती टेबलावरची अक्षरं सहजा सहजी वाचता येत नाहीत.त्यांचं ताजं ताजं लिहून झाल्यावर किंवा त्या अगोदर कधीतरी त्यांनी जेवणाच्या टेबलावर बसून लिहिल्यावर टेबलावर चुकून लिहिल्या गेलेल्या त्या शब्दांचा किंवा अक्षरांचा अर्थ मी काढण्याच्या प्रयत्नात असतो.अशावेळी मी टॉर्चचा उपयोग करतोच शिवाय शब्दकोशही जवळ ठेवतो.
काही शब्द असे पाहिलेत “कर्जफेड”, “अमुच्या गावा”, “आई” “ईश्वर”.
मी त्या शब्दांचा संदर्भ लावण्याचा प्रयत्न करतो.पण ह्या वयावर त्यांच्या डोक्यात काय चाललं आहे याचा थांगपत्ता लागत नाही.”
मला माधवची खूपच किंव आली.त्याला त्या शब्दातून अर्थ काढता येत नव्हता असं नाही.कारण त्याचे पाणावलेले डोळे मला अर्थ सांगत होते.मी त्याला जवळ घेत एव्हडंच म्हणालो,
“धन्य तू आणि तुझे आजोबा”

Monday, March 8, 2010
सुरेखाचं दुसरं लग्न.
” प्रेमासारख्या गोष्टीवर मी जर भरवंसा ठेवला आणि भीतीविरहीत निर्णय मी घेत गेले तरच नव्या परिस्थितिचा मला स्वीकार करता येईल असं त्यावेळी वाटत होतं.”
“एखाद्या झाडाला निरोगी फळं लागतात पण एखाद दुसरं फळ किडकं पण असूं शकतं.माझं अगदी तसंच झालंय.माझा मोठा भाऊ आणि धाकटा भाऊ सशक्त आणि निरोगी आहेत.माझ्या बाबतीत जन्मतःच माझ्या शरिराला आवश्यक होतं त्याच्या पेक्षा माझं हृदय लहान होतं.असं डॉक्टरानी माझ्या आईबाबाना सांगीतलं होतं.त्यामुळे मी जितकी वर्षं जगेन तेच माझं आयुष्य ठरेल असं भाकित केलं होतं.”
असं अरविंद चिटणीस मला त्यावेळी म्हणाल्याचं आठवतं.
आम्ही एकाच वर्गात होतो.अरविंद माटूंग्याहून आमच्या शाळेत यायचा.पहिल्यापासून त्याचं बोलणं अगदी क्षीण आवाजात असायचं.प्रकृतीने अगदी “पाप्याचं पित्तर” होता.पण स्वभावाने खूपच प्रेमळ होता.चेहरापण खूप मोहक होता. अभ्यासात अवि हुशार होता.त्याचं अक्षर अतीशय सूंदर असायचं.
पुढे खूप शिकायचं असं त्याला नेहमी वाटायचं.त्याच्या वडलांचं दादरला फर्निचरचं दुकान होतं.अरविंदच्या घरी मी कधी गेलो की त्याची आई अरविंदबद्दल काळजीत असायची हे माझ्या लक्षात नेहमीच यायचं.तीच्या तीन मुलात हा एक असा प्रकृतीने अधू असल्याने ती त्याच्यावर जास्त प्रेम करायची.ते मला दिसून यायचं. आणि कुणाच्याही आईला असं वाटणं स्वाभावीक आहे.ती मला म्हणायची,
“शिकतोय तेव्हडा शिकू देत.त्याच्यासाठी त्याच्या वडलानी भरपूर तजवीज करून ठेवली आहे.आमच्या पश्चात त्याचं कसं होणार देव जाणे?.”
“आई माझी उगाचंच काळजी करीत असते.जे विधीलिखीत आहे ते होणारच.”
असं अवि मला म्हणायचा.
करता करता अरविंद बी.ए पास झाला.आणि वडलांच्या फर्निचरच्या दुकानात त्यांना मदत करायला जायाला लागला. काही दिवसानंतर त्याची आई त्याच्या मागे लागायला लागली की त्यांने लग्न करावं.मला एकदा म्हणाला,
“आईला समजत कसं नाही.माझ्याशी लग्न करून त्या मुलीचं भविष्यात नुकसान नाही का होणार?आणि माझ्या अश्या ह्या प्रकृतीला मला कुठची मुलगी पसंत करणार?”
मला आठवतं मी त्याला म्हणायचो,
“असं बघ,ती आई असल्याने तुला तसं सांगते.तीला वाटत असेल की तीच्या पश्चात तुला पहायला कुणीतरी असावं.आणि तुच म्हणतोस ना विधीलिखीत आहे ते होणार.असेल एखादी मुलगी माळ घेऊन.”
आणि खरंच सुरेखा सुळे माळ घेऊन उभी होती.दोघांचा सुखाचा संसार चालला होता.अरविंदला एक मुलगा पण झाला. अविच्या आईला खूप आनंद व्ह्यायचा.ती सुरेखावर पण खूप प्रेम करायची.तीला तीन मुलगे होते.मुलगी नव्हती.त्यामुळे ती सुरेखाला आपल्या मुली सारखीच पहायची.आपल्या पश्चात अविला पाहायला आपल्या सारखीच कुणी तरी आहे हे पाहून तीला समाधान होत असावं.
लग्न होऊन दोन वर्षानंतर अरविंदची प्रकृती ढासळायला लागली. थोडसं काम केल्यावर त्याला थकवा येऊ लागला. आवाज खूपच क्षीण होत गेला. नंतर नंतर तो फर्निचरच्या दुकानात जायचा बंद झाला.पूर्वी बरेच वेळा मी त्याला त्या दुकानात भेटत असायचो.
एकदा मी अरविंदला पाहायला त्याच्या घरी गेलो होतो.त्याची प्रकृती पाहून त्याचं काही खरं नाही असं मला वाटायला लागलं होतं. बिचार्या सुरेखाकडे बघून मला दाटून आलं होतं.अविची आई एकाएकी खूप वयस्कर झालेली मला दिसली.
आणि शेवटी,
“जे घडू नये तेच घडलं”
अरविंद सर्वाना सोडून गेला.अगदी लहान वयात सुरेखावर मोठी जबाबदारी आली.पदरात लहान मुलगा.त्याचं पूरं संगोपन व्हायचं होतं.काही दिवस निघून गेल्यावर सुरेखाची सासू तीच्या मागे लागली,
“तू दुसरं लग्न कर.तुला पूरं आयुष्य काढायचं आहे.”
अरविंद गेल्यानंतर मी चिटणीसांच्या घरी वरचेवर जायचो.एकदा सुरेखाबद्दलचा विचार अविच्या आईने माझ्या जवळही काढला होता. सुरेखाला दिलेला अविच्या आईचा सल्ला मलाही बरोबर वाटत होता.
मी जरी सुरेखाला सरळ सरळ काही सांगू शकलो नाही तरी मी माझ्या मनात प्रार्थना करायचो की देवा तीला तशी बुद्धि दे.
नंतर बरीच वर्ष माझा आणि चिटणीसांचा प्रत्यक्ष संपर्क राहिला नाही.पण त्यांच्या विषयी कुणा ना कुणाकडून माहिती कळायची.
सुरेखाने दुसरं लग्न केलं,अविचे आई आणि वडील जगात राहिले नाहीत.त्यांचं फर्निचरचं दुकान त्यांनी विकलं होतं वगैरे वगैरे.
आज मी माटूंग्याला आलो होतो.चिटणीसांच्या घरी जायला वेळ होता म्हणून त्यांच्या घरी गेलो होतो.मला सुरेखाने ओळखलं.सुरेखाचा मुलगा आता चांगलाच मोठा झाला होता.तो घरी नव्हता.पण सुरेखा म्हणाली तो अगदी अरविंद सारखाच दिसतो.
मी सुरखेकाकडून सर्व काही ऐकायला उत्सुक्त झालो होतो.मला म्हणाली,
“तरूण आणि एकट्याच आई बरोबर एक मुल एव्हडी जबाबदारी घेऊन नुसतंच मुलाचं संगोपन करायला मला धडपड करावी लागली नाही तर त्यापुढे जाऊन ज्या कुटूंबावर माझी श्रद्धा होती,ज्या मनोरथावर भविष्य पहात होते तेच कुटूंब डोळ्यासमोर कोसळत आहे हे पाहून माझी जगण्याची धडपड मी करीत राहिले.
ती घटना होऊन बरीच वर्ष संपली.आणि आमच्या धडपडीमुळे नवं जीवन निर्माण करता आलं. त्या गेलेल्या दिवसातून मी एक शिकले उत्तमोत्तम निवडी प्रेमातून केल्या जातात आणि असं करताना आड येत ती गोष्ट म्हणजे भयभिती.”
कुतूहल म्हणून मी सुरेखाला विचारलं,
“तुला कशाची भीती वाटायची?”
मला म्हणाली,
“मला भिती वाटायची की मी पुरी पडेन का,आमच्या जवळ हवं ते पर्याप्त असेल का,आमच्या नशीबात असलेला आमचा हिस्सा मिळेल का,येऊ घातलेल्या संकटाना आणि व्याधीना मी पूरी पडेन का.जास्त करून मला भिती वाटायची की माझ्या मुलाला वाईट संगत लागेल का.मी माझ्या मुलाला मर्मभेदी दुःखापासून संरक्षण करू शकले नाही.मुळात अशा तर्हेचं संरक्षण असू शकतं हा एक भ्रम आहे म्हणा. श्रीगणेशा पासून पुन्हा कुटूंबाची सुरवात करणं हे मला त्यावेळी जिकीरीचं काम होतं.”
मी म्हणालो,
“नुकसान झाल्यावर पुनर्बांधणी करायला खूप जिकीरीचं जातं.”
मला सुरेखा म्हणाली,
“जरी मनावर जबरदस्त ताण येण्यासारखं काही नसलं,जीवन वाचवण्यासाठी केलेली नाटकी दृश्य नसली,एखादी गोष्ट तात्काल होण्याची घाई नसली तरी ते एक निरस काम होतं,त्यात संगतता होती.ज्यामुळे रोज सकाळी उठल्यावर जिकीरीचं काम करण्याची आठवण करून दिली जायची.आणि हे सर्व करीत असताना जे पूर्वी उपभोगलं ते आता हरवल्याचं स्मरण दिलं जायचं.”
हे ऐकून सुरेखाची मला किंव आली.मला माझ्या मनात जे आलं ते सांगावंसं वाटलं.मी म्हणालो,
“मला वाटतं पुनःप्रस्थापीत न झाल्याने जे हरवलं ते साचपत रहाण्याचा प्रयत्न केल्या सारखं होत असतं.जे करायला हवं त्यापासून पलायन करण्याचा प्रयत्न झाल्यास ज्या गोष्टीपासून आपण भय बाळगून रहातो त्याच संकटाच्या जवळ आल्यासारखं होतं.हे माहित असून भयाचा कुणाला समुळ नाश करता येणार नाही,किंवा त्यातून मार्ग काढता येणार नाही ही गोष्ट अलायदा म्हणा.त्याला सामोरं जाणंच उचित असतं.असतील तेव्हडे भयभीतीचे प्रकार समोर आणून त्यांच्याशी दोन हात करायला हवेत.तू केलंस ते अगदी बरोबर केलंस.”
सुरेखाला माझं ऐकून खूप बरं वाटल्याचं तीच्या चेहर्यावरून मला दिसलं.मला म्हणाली,
“तुमच्याकडून असं ऐकून मला खूपच धीर आल्यासारखं वाटतं.कारण माझं काहीच चुकलं नाही ह्याला दुजोरा मिळतो.
कोसळलेल्या परिस्थितितल्या कुटूंबाचा शेवट केवळ आशा बाळगून आणि चांगले सल्ले मिळवून पुर्णत्वाला येत नाही. तरी पण त्यावेळी मला आशा होती आणि माझ्या जवळ योजना पण होती.प्रेमासारख्या गोष्टीवर मी जर भरवंसा ठेवला आणि भीतीविरहीत निर्णय मी घेत गेले तरच नव्या परिस्थितिचा मला स्वीकार करता येईल असं त्यावेळी वाटत होतं.
कारण अंशतः ते काम आमच्या जून्या जीवनशैलीच्या सुक्ष्मपरिक्षणाखाली होणार होतं.त्या जून्या दिवसातल्या मौजमजेच्या आठवणी आता फक्त आठवणीच राहाणार होत्या.प्रत्येक निर्णय परिस्थितीचा विचार करून घ्यावा लागणार होता.माझं कुटूंब आता परस्पर विरोधी निष्टेच्या जाळ्यात अडकलं होतं.जणू आताचं जीवन स्वीकारल्यास पुर्वीचं जीवन भ्रष्ट होणार होतं.जणू नवीन कुटूंब स्वीकारून जो काही आनंद चेहर्यावर दिसेल तोही छिनला गेला जाणार होता.असंच कधी कधी वाटायचं.”
बराच वेळ झाला होता.माझी माटूंग्याची खेप काही दुसर्याच कामासाठी होती.पण सुरेखाला भेटून मला खूप बरं वाटलं. जुन्या आठवणीना उजाळा आला.उठता उठता मी तीला म्हणालो,
“तुझ्या मुलाला पहायला मी पुन्हा कधीतरी येईन.तो अरविंदसारखा दिसतो हे तू सांगीतल्याने मला त्याला पहायची उत्कंटा वाढली आहे.पण जाता जाता मला तुला एक सांगावंसं वाटतं की कुटूंब आणि प्रेम एकमेकाला पूरक असतात पण तसं असलं तरी बंधन मुक्त असतात.तसंच ते भावार्थाने पाहिल्यास क्रियाशील आणि उदार असतात. माझी खात्री आहे की भयभीती नव्हे तर प्रेमच आपल्याला सहनशीलता प्राप्त करून देतं आणि मर्मभेदी दुःखातून सावरतं.”
बेल वाजल्याने मला उठायलाच लागलं.पण सुरेखाने दरवाजा उघडल्यावर दर्शन झालं ते अरविंदच्या मुलाचं-किशोरचं.
अरविंदची आठवण येऊन माझ्या डोळ्यात पाणी आलं.किशोर ने मला वाकून नमस्कार केला.मी त्याला अलिंगन दिलं. पुन्हा लवकरच भेटू म्हणून सांगून रुमालाने डोळे पुसत मी खाली उतरलो.

Saturday, March 6, 2010
अबोल राहूनी काय साधीशी
अनुवादीत. (वो चूप रहे तो मेरे दिलके दाग जलते है……..)
होशी तू अबोल तेव्हा
अंतरंग माझे जळते
होशी तू बोलती तेव्हा
विझती वात जळते
सांग जळून वा विझून जावे
का असेच ह्या मार्गी चालावे
विझावे जसे अंतरंग विझते
का
जळावे जशी वात जळते
तुझी दूर झुकलेली नजर फेक
वळेलना एकदा तरी माझ्या वरी
दूर तीथे दिसेल तुला वणवा पेटताना
इथे दिसेल प्रीतिचा बगिचा धुमसताना
ऐकीन थोडे तुझ्याकडूनी
का
ऐकशील थोडे माझ्याकडूनी
अबोल राहूनी काय साधीशी
का
प्रमाथ करीशी माझ्या वरती
श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com
होशी तू अबोल तेव्हा
अंतरंग माझे जळते
होशी तू बोलती तेव्हा
विझती वात जळते
सांग जळून वा विझून जावे
का असेच ह्या मार्गी चालावे
विझावे जसे अंतरंग विझते
का
जळावे जशी वात जळते
तुझी दूर झुकलेली नजर फेक
वळेलना एकदा तरी माझ्या वरी
दूर तीथे दिसेल तुला वणवा पेटताना
इथे दिसेल प्रीतिचा बगिचा धुमसताना
ऐकीन थोडे तुझ्याकडूनी
का
ऐकशील थोडे माझ्याकडूनी
अबोल राहूनी काय साधीशी
का
प्रमाथ करीशी माझ्या वरती
श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com
Thursday, March 4, 2010
सुरेश कामताची प्रवृत्ति.
“जीवनात आपल्याला सुख मिळायला सर्वात मोठा वाटा आपल्या प्रवृत्तिचा असतो. आलेल्या परिस्थितिचा नसतो.”
ह्यावेळी सुरेश कामतची आणि माझी गोव्याच्या एका होटेलमधे पुन्हा एकदा भेट झाली.ह्यावेळी आम्ही दोघे भेटलो तेव्हा पण गोव्यात पावसाचे दिवस होते.मला पहिल्यापासून कोकणातल्या पावसाळातल्या दिवसात कोकणात वेळ घालवायला खूप आवडतं.सुरेशचं पण तसंच आहे.तो पूर्वीपासून पावसाळयाच्या दिवसात गोव्याला पंधराएक दिवसाच्या सुट्टीवर येतो. त्याला गोव्याची काजूपासून केलेली फेणी फार आवडते.रशीयन लोकाना व्होडका आवडते तशीच गोव्याच्या लोकांना फेणी आवडते. गोव्याच्या बिचच्या जवळ एखाद्या होटेलात समुद्र दिसेल अशी रूम घेऊन तासन तास खिडकीत बसून फेणीची चव घेत तो दिवस घालवतो.समुद्रात अशा दिवसात तुफानाचं वातावरण असतं.कधी हवा आणि पावसाच्या पाण्याचा एव्हडा कहर होतो की खिडकीतून समुद्राकडे पाहिल्यावर समुद्र दिसतच नाही.
अशावेळेला काही कोळी एकट्याला झेपेल असं जाळं आणून किनार्यावर पाण्यात ते जाळं पसरून लाटेच्या प्रवाहाच्या जोराबरोबर एकटा दुकटा मोठा मासा वाहून आल्यास जाळ्यांत पकडण्याच्या अपेक्षेत असतो.आणि अशा प्रकारच्या बिचवरच्या वातावरणात बिनदास मजा पाहायला येणार्यांची
“जाळ्यात काय गावलं काय? “
हे पहाण्यासाठी कुतूहलता शिगेला पोहचलेली असते.आणि माझ्यासारखा एखादा लागेल ती किंमत देऊन तो मासा विकत घेण्याच्या मनस्थितित असतो.एव्हड्या ताज्या माशाची तीख्खट आमटी किंवा आंबट-तीख्खट तीखलं “दोम्पारच्या जेवणात” मिळाल्यास काय विचारता? आणि सुरेश कामाता सारख्या मुळ गोव्यातल्या माणसाला ह्या जेवणा बरोबर फेणीची संगत “लय भारी” वाटली तर नवल कसलं?
ह्यावेळेला सुरेश एकटाच आला होता.त्याच्या पत्नीबरोबर तो बरेच वेळा आलेला आहे.कधी कधी त्याचा मोठा मुलगा त्याला कंपनी देतो.सुरेशचे मुंबईत दोन पेट्रोल पंप आहेत.पावसाळ्यात मुंबईत पेट्रोलचा खप जरा कमीच असतो.त्यामुळे पंधरा दिवस गोव्यात घालवायला त्याला उसंत मिळते असं मला त्याने पूर्वी सांगीतलं होतं.त्यामुळे सुरेशची भेट मला अपेक्षीत होती.होटेलच्या रजीस्टरमधे माझ्या नावासमोर सही करताना मी सुरेश कामत हे नाव वाचलं.होटेलच्या काऊंटरवरच मी एक फेणीची बाटली विकत घेतली.मी सुरेशला भेटल्याबरोबर ती फेणीची बाटली त्याच्या हातात प्रेझेंट म्हणून दिली.
“आज एक दिवस तू माझ्या खोलीत बस.आपण गप्पा मारूया.मला माहित आहे तू काही “घुटूं” घेत नाहीस.पण तुला जुन्या गोष्टी काढून तासनतास गप्पा मारायला आवडतात.आज पाऊस खूपच पडत आहे.नाहीतरी तू बिचवर फिरायला जाऊ शकणार नाहीस.”
असं म्हणून सुरेशने माझ्यासाठी वेलची घातलेली पाणीकम दुधाची कॉफी आर्डर केली.
“तुला त्या दुधाऐवजी कडक काळ्या स्ट्रॉन्ग कॉफीत दिलचस्पी नाही हे मला ठाऊक आहे.”
असं वर मला म्हणाला.
“कळलं,कळलं हे तू बोलत नाहीस फेणी बोलतेय.”
असं माझ्याकडून बोलून झाल्यावर आम्ही दोघे मनमुराद हंसलो.
फार पूर्वी एकदा सुरेश आणि त्याचा मुलगा असाच गोव्याला पावसाच्या दिवसात गेला होता.आणि गोव्याहून परत आल्यावर पेट्रोलपंपावर ठेवलेल्या त्याच्या गाडीची मागची काच आणि दरवाजाच्या काचा फुटलेल्या अशा स्थितित मी त्याची गाडी पाहिली होती.त्या ट्रिपमधे काहीतरी हातसा झाला होता.त्याची आठवण येऊन मी त्याला म्हणालो,
“आठवतं का तुला तो आंबाघाटातला प्रसंग.ते पावसाचे दिवस,आणि तुझी झालेली चोरी”
“एरव्ही आठवलं नसतं पण तू याद दिल्याने आणि आता पडतोय तो पाऊस बघून त्या प्रसंगाची आठवण यायला वेळ लागणार नाही.”
असं म्हणत सुरेश मला म्हणाला,
“मी आणि माझ्या मुलाने भर पावसाळ्यात आमची गाडी काढून मुंबई ते गोवा चार दिवसाचा प्रवास करायच्या आमच्या विक्षिप्त निर्णयानंतर, नशिबाबद्दलचा विषय पहिल्यांदा आमच्या दोघात निघाला.गोव्याला ऐन पावसात पंधराएक दिवस राहून तिकडच्या बिचवरची मजा लुटायची,पावसात मासे पकडायला समुद्रात पडाव जात नसल्याने खाडीतले मासे गुंजूले, सूळे, शेतकं,बुरयाटे असल्या मास्यांवार ताव मारायचा, भर पावसात सावंताच्या हाटलात जाऊन कांद्याची भजी आणि दुध-कम-पाणी असलेला चहा मारायचा,शांतादूर्गा,मंगेशीच्या मंदिरात जाऊन किर्तनात भागघ्यायचा,ह्यासारख्या मजा करायचं ठरवलं होतं.”
हल्ली तरी हवामान खात्याचा अंदाज बराचसा बरोबर येतो.त्या दिवसात हवामान खात्याच्या अंदाज एक असायचा आणि प्रत्यक्ष घडायचं ते अगदी उलटं असायचं.त्या दिवसात शेतकर्याचं भाकित खरं ठरायचं.ते कसं? असं विचारल्यावर कोकणातला कुठचाही शेतकरी सांगायचा,
“सोपं आहे,आम्ही हवामान खात्याचा अंदाज ऐकून ते सांगतील त्याच्या विरूद्ध भाकित करायचो.भाताच्या लावणीला प्रारंभ करू नका पाऊस उशीरा पडणार आहे असं हवामान खात्याने फरमान काढल्यावर आम्ही लावणीच्या तयारीला लागायचोच.”
हे सर्व माहित असल्याने, आम्ही दोघांनी हवामान खात्याचा अंदाज,
“दोन चार दिवसात कोकणात आणि गोव्या परिसरात जोरदार पावसाच्या सरी कोसळणार आहेत तेव्हा प्रवास जपून करावा”
असं लिहीलेलं पेपरात वाचून निदान प्रवासात पावसाचा त्रास होणार नाही असा अंदाज केला होता.कारण तो हवामान खात्याचा अंदाज होता ना! मग शेतकर्यांच्या म्हणण्याप्रमाणे उलटं होणारच.
पण गंमत म्हणजे उलट्याचं उलटं झालं. ह्यावेळी हवामान खात्याचा अंदाज खरा ठरला आणि ऐन प्रवासात आम्हाला कोकणातल्या पावसाला सामोरं जावं लागलं.
कोल्हापूर सोडल्यानंतर आंबाघाटात जी पावसाला सुरवात झाली ती घाट उतरून गेल्यानंतरही पाऊस थांबेना.पुढे गेल्यावर एका गावाच्या बाहेर गाडी रस्त्यावर ठेऊन काचा वगैरे लाऊन बंद करून एका छोट्याश्या होटेलमधे रात्र काढायची ठरवलं.बाहेरून कुणी संगीतकार मंडळी त्या होटेलात रहायला आली होती.
आणि त्यांचा संगीताचा प्रोग्राम होता.त्यामुळे आमची ती रात्र मजेत गेली.पण दिवस उजाडला तरी पाऊस काही थांबेना. सुट्टीतले दिवस फुकट जाऊ नयेत म्हणून सकाळी उठून आम्ही पुढच्या प्रवासाला निघायचं ठरवलं.
गाडीजवळ येऊन पहातो तर दरवाजाच्या काचा फुटलेल्या दिसल्या.धो,धो पडणार्या त्या पावसात जेमतेम छत्रीचा आधार घेत निरीक्षण करताताना लक्षात आलं की आमची कपड्याची सुटकेस चोरीला गेली होती.जरा आणखी विचार केल्यावर आमच्या लक्षात आलं की आम्ही तसे नशीबवान होतो.गाडीत असतानाच जर का चोरट्यांनी गाडी थांबवून आम्हाला लुटायचं ठरवलं असतं तर कदाचीत आमच्या प्राणावर बेतलं असतं.आम्ही आपआपसात विनोद करीत होतो की आमच्या पाचदाहा जुन्या वापरलेल्या कपड्यासाठी चोरानी जेलमधे जाण्याचा धोका पत्करलेला दिसतोय.
अर्थात आमच्या ह्या घटनेत काही तरी उपयोगातल्या वस्तूंची चोरी झाल्याचं उदाहरण होतं.नशीबाबद्दलचा प्रश्न जास्त किचकट होतो जेव्हा जनन-मरणाचा सवाल येतो तेव्हा.”
सुरेशचा हा नशीबाबद्दलचा तर्कवितर्क ऐकून मला माझ्या वहिनीच्या आजाराची आठवण आली,मी सुरेशला म्हणालो,
“मग मी काय म्हणतो ते ऐक,नित्याची गोष्ट म्हणून माझी वहिनी वार्षीक हेल्थ-चेकअपसाठी डॉक्टरांकडे गेली होती. ब्लडप्रेशर,वजन,आणि ब्लडशूगरची चांचणी केल्यावर लक्षात आलं की तीचं कलेस्टरॉल वाढलेलं आहे.आणि तीला ऍन्जियोप्लास्टी करावी लागेल.हृदयालाच रक्ताचा पुरवठा करणार्या नळ्यांमधे चरबी जमल्याने चोंदलेल्या नळ्यातून रक्तपुढे जायला रुकावट आली होती.ती दूर करण्यासाठी ऍन्जियोप्लास्टी करावी लागते.काही लोकांचं म्हणणं की माझी बहिण तशी नशीबवान समजली पाहिजे.तीचा “तारणारा” तीच्या पाठीशी होता.सर्व साधारणपणे आजारी पडल्याशिवाय लोकं डॉक्टरकडे जात नाहीत असं असताना माझी बहिण वार्षीक हेल्थ-चेक करायच्या फंदात पडली म्हणून ती नशीबवान समजली पाहिजे.
पण माझी बहिण नशीबवान होती असं मानलं तर जेव्हा चरबी तीच्या नळ्यात सांचत होती तेव्हा हा “तारणारा” कुठे गेला होता?.का चोंदलेल्या नळ्या शोधल्या गेल्यामुळे ती नशीबवान होती कारण त्या नळ्या साफ करता येतात.?का ती कमनशीबी होती कारण तीला हॉस्पिटलमधे जाऊन शस्त्रक्रिया करावी लागावी.?
माझ्या बहिणीची घटना जास्त किचकट व्हायला लागली कारण तीच्या दोन वर्षाच्या मोठ्या मुलाकडून प्रताप घडल्यावर हे सर्व जास्तच किचकट मिश्रण व्हायला लागलं होतं.त्याचं असं झालं की माझ्या बहिणीची शस्त्र्क्रिया होण्यापूर्वी तीची नणंद तीला मदत आणि आधार द्यायला तीच्या गावाहून मुद्दाम आली होती.घरी माझ्या बहिणीची दोन लहान मुलं होती.ती सकाळी येऊन पोहचते ना पोहचते तेव्हड्यात बहिणीचा मोठा मुलगा सकाळीच पलंगावरून घसरून खाली पडला आणि त्याचं मनगटाचं हाड दुखावलं गेलं.त्याला ताबडतोब त्याच हॉस्पिटलात प्लास्टर लावण्यासाठी न्यावं लागलं.
सुरेश, तू आता सांगा,त्याची आत्या त्याचवेळी घरी आल्याने तो नशीबवान होता का?का कमनशीबवान होता कारण त्याच हॉस्पिटलात त्याची आई एका खोलीत सर्जरी झाल्यावर सुधारत होती आणि हा प्लास्टर लावून दुसर्या खोलीत उपाय करून घेत होता.
अलीकडे माझ्या वाचनात आलं की कुणीसं म्हटलंय,
“वृत्तिपेक्षा सत्यस्थिती जास्त महत्वाची असते.”
माझा हा किस्स्सा ऐकल्यावर सुरेश जरा गंभीर झालेला दिसला.त्याचा चेहरा तसा दिसत होता.पण माझं अनमान चुकलं असं मला वाटलं.कारण सुरेशचा चेहरा माझ्या किस्स्यामुळे गंभीर झाला नव्हता.फेणीची चव जरा जास्तच झाली असावी.पण तो प्रासंगिकता ठेऊन बोलला.आणि मला त्याचं बोलणं पटलं.
मला म्हणाला,
“ह्या हिरव्यागार धरतीवर रहाणारा प्रत्येकजण कमनशीबाचा अनुभव चाखणारा प्राणी ठरतो.
“अशुभ न बोलेलं बरं”
असं म्हणून किंवा कुणाच्या,
“पांढर्या पायामुळे झालं “
असं म्हणून काही त्यात बदल होणार नाही.समीक्षात्मक मुद्दा असा की जीवनातल्या नकारात्मक घटनेला कोण कसा प्रतीसाद देतो ते पहायला हवं.मला अशावेळी आपली पहाण्याची प्रवृत्ति जास्त भावते.
तुझ्या बहिणीला सर्जरीनंतर प्रकृती नीट व्हायला काही दिवस उपायाना तोंड द्यावं लागलं.पण ती सकारात्मक राहिल्याने आता ती हदयाला झटका येण्यापासून दूर राहिली.ती़च्या मुलाची झपाट्याने सुधारणा होऊन तो आपल्या लहान बहिणीशी खेळायलाही तयार झाला असेल.
ह्या सर्व प्रकारातून मी एका अपरिहार्य निर्णयाला आलो की,कुणी म्हटलंय ते खरं आहे,

माझ्या कपातली कॉफी केव्हाच संपली होती.फेणीची शेवटची चव घेऊन झाल्यावर, सुरेशने जेवणाची ऑर्डर दिली.

Tuesday, March 2, 2010
“जे शोधाल तेच सापडेल”
“हा क्षण माझ्या आयुष्यात गेले वीसएक वर्षं माझ्या डोक्यात ठाण मारून बसला आहे.”
“बहुतेक वेळा लोकं ज्याच्या शोधात असतात तेच त्यांना सापडत असतं असं मला वाटतं. सर्वजण एकाच वास्तविक परिस्थितीत भाग घेत असतात असा मी नेहमी विचार करायचो.पण एकदा माझ्या शाळेत असताना मी निराळाच प्रकार पाहिला.”
माझा मित्र मनोहर मला आपले जूने दिवस आठवून एक प्रसंग समजावून सांगत होता.
तो म्हणाला,
“ते खूपच उकाड्याचे दिवस होते.प्रत्येकजण पावसाची वाट पहात होता.एकाएकी जोराचा वारा आला आणि रस्त्यावरचा आणि आजुबाजूचा कचरा वार्याबरोबर हवेत उडत होता.हवेच्या स्पर्शाने अंगावर थंडावा वाटायला लागला.आणि सर्वांना वाटायला लागलं होतं की आता मस्त पाऊस पडून पावसाळ्याची सुरवात होणार आहे.
माझ्या सकट आम्ही सर्व आमच्या वर्गात जायला निघालो.आणि आपआपल्या सीटवर जाऊन बसलो.ढग आल्याने खिडकीतून पाहिल्यावर बाहेर एकदम काळोख होऊन रात्र झाल्याचं भासत होतं.आमच्यातला एक प्रफुल्लीत होऊन मोठ्या आवाजात ओरडून सांगत होता,
“असे आल्हादायक दिवस आल्यावर प्रत्येकजण खूश नाही का होणार?”
एका क्षणाचाही विलंब न लावता आमच्यातला एक दुसरा पुटपूटला,
“खरं सांगू का,ही नुसती वावटळ आहे पाऊस नक्कीच पडणार नाही.ह्या वर्षी पावसाळा खूपच लांबवलेला आहे.असं म्हणतात.”
मनोहरने हा वर्णन केलेला प्रसंग ऐकून मला वाटलं की त्याला नक्कीच काहीतरी चिंतनीय गोष्ट सांगायची आहे.कारण असे छोटे,छोटे प्रसंग लक्षात ठेऊन कुठचंतरी तत्वज्ञान सांगायची त्याची पहिल्यापासूनची हातोटी मी जाणून होतो.
तो पुढे म्हणाला,
“हा क्षण माझ्या आयुष्यात गेले वीसएक वर्षं माझ्या डोक्यात ठाण मारून बसला आहे.कारण त्यावेळी माझ्या डोक्यात चक्क प्रकाश पडला होता आणि तो धक्कादायक होता की जीवघेण्या उकड्यातून एकदाचा सुटकार मिळण्याच्या आशेत असताना त्याऐवजी त्या दुसर्याने चलाखी करून सोन्याच्या तुकड्याकडे पितळ म्हणून पाहिल्यासारखं केलं. कारण तो चलाखी करून दाखवून देत होता की हे जग जणू शुभचिन्तकानीच भरलेलं आहे.क्षण एकच होता वातावरण एकच दिसत होतं तरीपण विचार भिन्न भिन्न होते. उन्हाळ्याचे दिवस एकदाचे संपुष्टात आले म्हणून मी मनात पाघळत राहिल्याने ज्या शोधाची मला जरूरी होती तेच मला सापडत होतं.आणि त्या माझ्या मित्राचं पहिलं पाघळणं म्हणजे ती त्याची चलाखी जी त्याला सांगत होती की जग खोट्या आशेत आणि विश्वासघातात असतं.तो पण ज्या शोधात होता ते त्याला सापडलं होतं.”
हे ऐकून मी मनोहरला म्हणालो,
“तू शिक्षक आहेस त्यामुळे तुझ्या असल्या चिंतनाचा तुझ्या विद्यार्थ्याना भरपूर फायदा होत असेल.”
मला म्हणाला,
“अलबत,माझ्या विद्यार्थ्याना काही सांगायचं झालं तर मी एकही संधी सोडत नाही.
मी शिक्षक असल्याने माझ्या विद्यार्थ्यानी जगात कशाच्या शोधात असावं हे समजावून सांगण्याची माझी जबाबदारी आहे हे माझ्या लक्षात येत असतं.ज्यामुळे माझ्या विद्यार्थ्यात आशा,विश्वास आणि स्वाभिमान निर्माण झाला पाहिजे. मला हे दाखवण्यासाठी एखादा नकाशा काढून दाखवता येणार नाही की तो पाहून ते यशस्वी होऊन आत्मसंतुष्ट होतील. समजा जर का त्यांना भासलं की ते घाबरले आहेत आणि सापळ्यात अडकून एखाद्या रानात हरवले आहेत तर मग त्यांचं पहिलं पाऊल ह्या रानातून सुटका करून घेण्यासाठी योग्य मार्ग पहाण्याच्या शोधात पडलं पाहिजे.
पण ह्यातून मार्ग नाही असं जर का त्यांनी मनात आणलं तर मात्र कशाचाही शोध ते घेणार नाहीत.”
“म्हणजे,तुझ्या वर्गातल्या त्या मित्राप्रमाणे तुझे विद्यार्थी समजा फक्त पुराव्यासाठीच शोध करू लागले उदाहरणार्थ, त्यांना कसलाच दर्जा नाही,त्यांच्यामुळे जगात काही फरक पडणार नाही,किंवा त्यांची स्वप्न वेडपटासारखी आहेत तर तो सर्व पुरावा त्यांना शोध घेतल्यामुळे सापडेलही.असंच काहीसं तुला म्हणायचं आहे ना.?”
असा प्रश्न करून मी मनोहरला अप्रत्यक्षपणे म्हणत होतो की “शोधा म्हणजे सापडेल असं तुला म्हणायचं नसून “जे शोधाल तेच सापडेल” असं म्हणायचं आहे.
“अगदी माझ्या मनातलं बोललास”
असं चेहर्यावर खूश झाल्याचं दाखवून मनोहर म्हणाला,
“उलटपक्षी मी जर त्यांना विचार करायला लावलं की त्यांच्यात यशस्वी होण्याचा मार्ग आहे,त्यांना स्वाभिमान आहे,तर ते तो सापडूं शकतील.कारण लोकं ज्याच्या शोधात असतात तेच त्यांना सापडतं. ह्यावर माझी श्रद्धा आहे.

Subscribe to:
Posts (Atom)