“साध्या साध्या गोष्टीवर भरवसा ठेवा.आणि हा भरवसा तुमचा दृढवि़श्वास होवो.”
मी खालसा कॉलेजमधे गणीताचा विषय शिकायला जायचो.बरेच असे माझे प्रोफेसर सरदारजी होते.प्रो.वर्यामसींग तर माझे खास होते.त्यांची स्टॅटिस्टीकवरची लेक्चर्स मी कधीच सोडली नाहीत.
सॉलीड जॉमेट्री आणि कॅलक्युलस हे ही माझे प्रिय विषय असायचे.
आज मी बरेच दिवसानी खालसा कॉलेजला भेट दिली.प्रो.वर्यामसींग आता प्रिन्सिपॉल झाले म्हणून मी ऐकलं होतं. त्यांना भेटायची मला खास इच्छा वाटत होती.मी टिचर्सरूममधे डोकावून पाहिलं.एक सरदारजी प्रोफेसर माझ्याकडे बघून हंसले.मी पण हंसलो.त्यांच्या हंसण्यात चेहर्यावर मला प्रो.वर्यामसींगची झांक दिसली.कुतूहल म्हणून मी त्यांन विचारलं,
“आपण प्रो.वर्यामसींगचे कुणी लागता का?”
“मी त्यांचा मुलगा प्रो.मोहनसींग”
असं मला ते म्हणाले.
मी सिनीयरला असताना हे मोहनसींग कॉलेजच्या पहिल्या वर्षात शिकत होते.त्यानीही गणीतात पीएचडी करून थोडे दिवस टीआयएफआरमधे गणीताच्या फॅकल्टीमधे संशोधन केलं होतं.ऍडव्हन्स इंटिग्रेशन हा त्यांचा संशोधनाचा विषय होता.त्यांच्या वडीलांनीच त्यांना खालसा कॉलेजमधे शिकवायची विनंती केली होती.
ही सर्व माहिती मला सांगताना त्यांना आनंद होत होता कारण मी पण त्याच कॉलेजचा माजी विद्यार्थी होतो.
पिढ्यानपिढ्या मुंबईत राहिल्याने बर्याच सरदारजीना मराठी अस्खलीत बोलता यायचं.माझे काही सरदारजी मित्र मराठीतच बोलायचे.
प्रो.मोहनसींग पण माझ्याशी मराठीतच बोलत होते.
एक पिर्यड संपेपर्यंत मला त्यांनी बसायला सांगीतलं.नंतर आम्ही कॅन्टीनमधे गप्पा मारायला गेलो.
इकडच्या तिकडच्या बर्याच गप्पा झाल्यावर,बालपणातल्या आठवणी काढून आम्ही बोलत होतो.
दृढवि़श्वास म्हणजे काय?ह्यावर आमची चर्चा चालली होती.
प्रो.मोहनसींग मला म्हणाले,
“मला आठवतं,आमच्या शाळेतले शिक्षक आम्हाला भरवंसा असणं किंवा दृढवि़श्वास असणं म्हणजे काय ते असं विस्ताराने सांगायचे.
“दृढवि़श्वास असणं म्हणजेच एखाद्या विचाराने तुमच्या मनाला त्याबाबत जखडून ठेवणं,बंदिस्त करणं.”
रंगात येऊन पुढे म्हणाले,
“माझा एक मित्र, बोलता आणि ऐकता न येणार्या, मुलांच्या शाळेत शिक्षक म्हणून होता.मला आठवतं एकदा मी सहजच त्याला दृढविश्वास हा शब्द तू तुझ्या वर्गातल्या मुलांना त्यांच्या भाषेत कसा समजावून सांगशील? असं कुतूहलाने विचारलं.
“अगदी सोपं आहे”
मला मित्र म्हणाला.
“उजव्या हाताचं दर्शनीय बोट,आपल्या कपाळाकडे दर्शवून झाल्यावर तोच हात उघडून,तळवा खाली दिसेल असा घेऊन डाव्या बंद मुठीच्या हाताच्या अंगठ्याच्या बाजूला नेऊन चटकन टेकवायचा,जणू माशी पकडल्या सारखं वाटावं”
त्याचा अर्थ दृढविश्वास असं होईल.”
“तुमच्या मित्राने दृढविश्वासाची ती साईन लॅन्गवेज दाखवून केलेली व्याख्या,जरी यथातथ्य असली तरी,मला ती बरीच बुद्धिपुर:सर वाटते”.
मी प्रो.मोहनसींगना माझं मत दिलं.
“खरं आहे तुमचं म्हणणं”
प्रोफेसर मला म्हणाले.पुढे सांगू लागले,
“आता इतक्या वर्षांनी विचार केल्यावर वाटायला लागलं की, दृढविश्वासाचा माझ्या मित्राने दाखवलेल्या साईन लॅंग्वेजचा विचार केल्यावर त्या शब्दाच्या सत्यते ऐवजी, दाखवण्याच्या ढंगाचा त्यावेळी माझ्यावर जास्त प्रभाव झाला होता.”
“अगदी बरोबर मला हेच सांगायचं होतं.”
असं सांगून मी म्हणालो,
“ही सत्यता काय? तर दृढवि़श्वास म्हणजेच तुमच्या मनाला जखडून ठेवणारा विचार,जो तुम्ही काहीही केलंत तरी तुम्हाला त्याला त्याज्य करता येणार नाही. बरोबर ना?”
“प्रश्नच नाही”
असं म्हणून प्रोफेसर सांगू लागले,
“अगदी माझ्या बालपणापासून अजून पर्यंत,ह्याच कल्पनेने माझा ताबा घेतला आहे,जणू मला दाव्याने बांधून ठेवलं आहे.मला जबरद्स्त दृढविश्वास आहे की,प्रत्येक साध्या साध्या बाबतीत सुंदरतेचा आणि संगीताचा अर्थपूर्ण अंश असतो.
मग मी जरी गर्दीत चालत असलो,कॉलेजच्या टिचर्सरूम मधे बसलेला असलो,किंवा घरात वावरत असलो तरी, लहान मुलांत प्रत्येक परिस्थितित जसं औत्स्युक्य असतं,जे अनेक लोकात रोजच्या झकाझकीत लोप पावलेलं असतं,ते माझ्यात परिपूर्ण वास्तव्य करून असतं.
अगदी आत्ता जरी मी माझ्या वर्गामधे बसून खिडकीतून बाहेर पहात असताना एका फांदीवरचं लहानसं पान,येणार्या वार्याच्या झोतीशी संघर्ष करता करता फांदीचा त्याग करून वार्याला कसं शरण गेलं ते पहात असलो तरी.
ह्या असल्या साध्या बाबी इतराना भेट म्हणून द्याव्यात किंवा माझ्या जबरदस्त उत्साहाचा अंश म्हणून त्यांच्याकडे विवरण कराव्यात असं मला वाटत असतं.”
हे ऐकून मी म्हणालो,
“कदाचीत हे खरंही असेल की तुमच्या अशा प्रकारच्या दृढविश्वासातून त्याचा हेतू बराच अस्पष्टपणे दिसला जात असेल.पण तसं असलं तरी तुमच्यातच तुम्ही त्याच्यात असलेल्या विस्मयाचा अर्थ विकसीत करण्याच्या प्रयत्नात असता असं मला दिसून येतं.”
जणू मी त्यांच्या मनातलं बोललो असं वाटून प्रोफेसर मला म्हणाले,
“साधं उदाहरण म्हणून सांगतो,
त्या कोवळ्या सुंदर सूर्यकिरणानी तुमचा चेहरा किती उजळ दिसतो किंवा समुद्राचं पाणी किती नीळंभोर दिसतं हा माझ्या मनात आलेला साधा विचार पण माझ्या मित्रांशी, कुटूंबीयांशी,सहकार्यांशी आणि ओळखदेख असलेल्याशी मी वाटण्याच्या प्रयत्नात असतो.
मी आशा करतो की एकवेळ अशीही येईल की रोजच माझ्या मुलांना अशा लहान लहान गोष्टीतून मिळणारा आनंद आणि त्यावर असलेला त्यांचा दृढविश्वास ती मलाही वाटतील.
मला आठवतं माझ्या सृजनशील आईवडीलांनी आणि उत्तेजन देणार्या शिक्षकानी माझ्या मनात भरवून दिलं की हे जग विस्मयकारी आहे आणि हीच कल्पना मी इतरांच्यात मनात भरवून देईन अशी आशा करतो.
माझ्या भविष्याकडे पाहिलं तर,शिक्षक होण्याच्या माझ्या महत्वाकांक्षेला नकळत इंधन मिळालं ते मी प्रोफेसर आहे म्हणून त्यामुळे विद्यार्थ्यांची मनं जाळ्यात अडकवण्याची शक्यता एक व्याख्येने का होईना,सफल होत आहे.
माझ्यात शब्दबंबाळपणा जरी असला तरी मी जर का एकच व्याख्या निवडली तरी माझे शब्द अगदी सहजसाध्य असतील.”
गणीतासारख्या क्लिष्ट विषयावर पिएचडी घेणारा हा प्रोफेसर जीवनातल्या साध्या साध्या बाबतीत किती स्वारस्य घेऊन असतो हे बघून त्याचं कौतूक करावं असं माझ्या मनात आलं.
माझ्या चेहर्यावरचा भाव पाहून प्रो.मोहनसींग म्हणाले,
“साध्या साध्या गोष्टीवर भरवसा ठेवा.आणि हा भरवसा तुमचा दृढवि़श्वास होवो.”
श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com
Saturday, August 7, 2010
Wednesday, August 4, 2010
ते अजून मजला आठवते
अनुवादीत (वो जमाना याद है…..)
रात्रंदिवशी आंसवे हळूच वहाणे
ते अजूनी मला आठवते
तो जमाना अन प्रणयराधना
ती अजूनी मजला आठवते
पकडून माझा सदरा हिसका देणे
सुंदर मुखकमल पदरामागे दडवीणे
ते अजूनी मजला आठवते
पाहून माझी पराधीनता चेहरा लपवीणे
हातातल्या रंगीत कंगणांनी किणकिणणे
ते अजूनी मजला आठवते
करून मौजमजा अलविदा म्हणणे
सुकल्या ओठावरचे थरथरणे
ते अजूनी मजला आठवते
युगे युगे भेटलो ज्या ठिकाणी
लपत छ्पत येऊनी मिळणे
ते अजूनी मजला आठवते
दुपारच्या प्रहरी भेटलो गच्चीवरी
आलीस तू पळत अनवाणी
ते अजूनी मजला आठवते
पाहून मला लाजत न्याहाळणे
घालून दातांमधे नखे कुरतडणे
ते अजून मजला आठवते
सन्मान करूनी ठेवूनी अभिलाषा
बोलत्या लोचनानी मनातले सुचवीणे
ते अजून मजला आठवते
श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.co
रात्रंदिवशी आंसवे हळूच वहाणे
ते अजूनी मला आठवते
तो जमाना अन प्रणयराधना
ती अजूनी मजला आठवते
पकडून माझा सदरा हिसका देणे
सुंदर मुखकमल पदरामागे दडवीणे
ते अजूनी मजला आठवते
पाहून माझी पराधीनता चेहरा लपवीणे
हातातल्या रंगीत कंगणांनी किणकिणणे
ते अजूनी मजला आठवते
करून मौजमजा अलविदा म्हणणे
सुकल्या ओठावरचे थरथरणे
ते अजूनी मजला आठवते
युगे युगे भेटलो ज्या ठिकाणी
लपत छ्पत येऊनी मिळणे
ते अजूनी मजला आठवते
दुपारच्या प्रहरी भेटलो गच्चीवरी
आलीस तू पळत अनवाणी
ते अजूनी मजला आठवते
पाहून मला लाजत न्याहाळणे
घालून दातांमधे नखे कुरतडणे
ते अजून मजला आठवते
सन्मान करूनी ठेवूनी अभिलाषा
बोलत्या लोचनानी मनातले सुचवीणे
ते अजून मजला आठवते
श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.co
Sunday, August 1, 2010
स्वयंपाक कला.
“खाद्यपदार्थावरचं माझं प्रेम आणि स्वयंपाक कलेचं उच्चतम रूप लक्षात आणून,आणखी पदार्थांचा शोध घेण्यात, स्वयंपाक करण्यात आणि खाद्यपदार्थांची चव घेण्यात मी मला कधीच अटकाव आणणार नाही.”
बबन कॉफी संपवीत म्हणाला.
त्यादिवशी कंपनीच्या कामाला म्हणून मी राजकोटला गेलो होतो.एक दिवस तिथे रहाण्याची गरज भासली होती.कंपनीच्या शिफारीशीतल्या एका होटेलमधे रात्र काढण्याची पाळी आली होती.
रात्रीचं तिथेच जेवायचं मी ठरवलं.कंपनीमधल्या बरोबरच्या सहकार्याबरोबर रात्री होटेलच्या मुख्य डायनींग हॉलमधे आम्ही गेलो.
जेवण फार चवदार होतं.आणखी काही चवी परिचयाच्या वाटल्या.चौकशी केल्यावर कळलं की होटेलचा मुख्य शेफ, स्वयंपाकी,मराठी होता.पुरणपोळ्या राजकोटमधे खायाला मिळणं हे एक कुतूहल होतं.म्हणूनच मी कोणी बनवल्या ह्याची चौकशी केली.
बबन कोचरेकर,हे नाव परिचयाचं वाटलं.म्हणून त्याची भेट घेण्याचं ठरवलं.
बबन दादरच्या कॅटरिंग स्कूल मधे शिकत होता हे मला माहित होतं.तोच की काय हे कुतूहल खरं ठरलं.मलाही त्याने ओळखलं.
खूप दिवसानी भेटल्यावर गप्पा मारायला उत येणं स्वाभाविक होतं.जेवण आटोपल्यावर रात्री एक एक कॉफीच्या कपावर गप्पा मारायचं ठरलं.माझ्याच रूममधे मी त्याला बोलावलं.
कॅटरिंगमधे डिप्लोमा घेऊन झाल्यावर मुंबईत अनेक होटेलमधे बबन नोकरी करायचा.कधी कधी माझी त्याची एखाद्या होटेलमधे भेट व्हायची.तो राजकोटमधे ह्या होटेलात आल्यामुळे मुंबईत हल्ली त्याची माझी भेट झाली नव्हती.मला कळलं की मुंबईला कंटाळून नंतर तो दिल्ली,कलकत्यालाही थोडे दिवस काम करायचा.आणि आता राजकोटला त्याच्याच एका मित्राच्या मालकीच्या होटेलमधे मित्राच्या आग्रहामुळे येऊन काम करीत होता.
मित्राच्या होटेलचं बस्तान बसल्यावर मग तो कायमच्या विश्रांतीसाठी कोकणात जाऊन रहाणार होता.
कॅटरिंगचा अभ्यास करणं केवळ त्या कलेचा हव्यास म्हणून त्याने पत्करलं होतं.त्याचा एक भाऊ इंजीनयर होता, एकाचं कपड्याचं दुकान होतं.
बबनच्या आजोबाची कोकणात खानावळ होती.मला वाटतं त्याचं लहानपण आजोळी गेल्याने खानावळीच्या वातावरणाचे संस्कार त्याच्यावर झाले असावेत.
मी त्याला हाच प्रश्न केला.
“तुझ्या आजोबाचे संस्कार तुझ्यावर झाले असावेत ना?”
मला बबन म्हणाला,
“तुमचं अगदी बरोबर आहे.माझ्या आजोबांनी त्यांची खानावळ, जेव्हा त्यांना वय झाल्यावर झेपेना, तेव्हा बंद केली. आजोबांच्या खानावळीत सुधारणा करून आपण चालवावी हे माझं स्वप्नं होतं.पण प्राप्त परिस्थितीत ते काही जमलं नाही. म्हणून मी मुंबईत नोकरी पत्करली.”
बबनने पाकशास्त्राचा नुसता स्वयंपाक करण्याच्या दृष्टीने व्यवसाय पत्करला नव्हता.त्याच्याशी गप्पा मारीत असताना माझ्या नजरेतून हे निसटून गेलं नाही.बबन जात्याच हुशार होता.तो कविता करायचा.त्याने एक दोन कविता संग्रह छापले पण आहेत.मी जाण्यापूर्वी मला तो त्याचं एक पुस्तक देणार होता.
“जगात ना ना तर्हेच्या कला आहेत.तू म्हणतोस तू ही कला म्हणून शिकायचं ठरवलंस.तू जरा आणखी विस्ताराने बोलशील का?”
माझं बोलणं त्याला आवडलं.अगदी खूशीत येऊन बबन मला म्हणाला,
“रंगचित्रकारी आणि रेखाचित्रकारी ही डोळ्यांना उत्तेजक असते.
आपल्या शरीराची ही एक ज्ञानशक्ति किंवा संवेदना आहे.तसंच संगीत, श्रवणशक्ति कानाला उत्तेजीत करते.अंगाला मालिश केल्याने त्वचा उत्तेजीत होते.जवळ जवळ प्रत्येक कारीगरी कुठल्यातरी संवेदनेकडे केंद्रीत असते.
चित्रकार, आपण कसला आवाज काढतोय ह्याबद्दल चिंतीत नसतो.वाद्य वाजवणार्याला, आपलं वाद्य कसं दिसतं, ह्याची गाणं वाजवीताना चिंता करावी लागत नाही.ही सर्व मंडळी फक्त एकाच, संबंधीत ज्ञानशक्तिच्या चिंतेत असतात.
ह्या सर्व कला तशा कठीण आहेत.पण मला जी कला प्रिय आहे ती नक्कीच कठीण कला आहे.मला म्हणायचं आहे पाककला.ह्या कलेला सर्व ज्ञानशक्तिना आकर्षित करावं लागतं.ह्यामुळेच ही कला जरा जास्त प्रभावशाली असावी असं मला वाटतं.”
मला पाकशास्त्राबद्दल विशेष वाटतं.पाककलेत खाद्यपदार्थाना योग्य उष्णता देण्याइतकं सोपं आणि योग्य अशी रासायनीक क्रिया करून घेण्याइतकं कठीण असं जे काही असतं, त्याबद्दल मला विशेष वाटतं.स्वयंपाक्याला मुख्यतःखाद्यपदार्थ योग्य प्रकारे चवदार होईल ह्याबद्दल खात्री करून घ्यावी लागते. दुसरं म्हणजे तो पदार्थ दिसायला डोळ्यांना आकर्षक वाटला पाहिजे.नंतर पदार्थाचा सुगंध योग्य असला पाहिजे आणि नंतर त्या पदार्थाची बनावट पण तितकीच आकर्षित असायला हवी.
तसं पाहिलंत तर ह्यामुळे पाचापैकी चार ज्ञानशक्ति ह्या कलेत संमिलित होतात.”
मला बबनचं हे स्पष्टीकरण आवडलं.
मी म्हणालो,
“जरा विचार केला तर रंगचित्रकाराला नीळेची जास्त मिलावट करून त्याच्या चित्रावर कसा असर होईल ह्याची चिंता करावी लागेल.तर स्वयंपाक्याला,नारळाचं चून,उदाहरण म्हणून, घालून पदार्थाची चव कशी प्रभावित होईल याचा विचार,आणि बनावट,प्रतिकृति, आणि सुगंधाबद्दलचा विचार करावा लागेल.प्रत्येक सामुग्री सामाविष्ट केल्यावर पाककलेमधल्या समस्या लक्षात येतात हे तुझं म्हणणं मला पटतं.”
बबनला हे माझं स्पष्टीकरण आवडलं.
मला म्हणाला,
मी स्वयंपाक कलेचं आव्हान आनंदाने स्विकारलं. चुलीजवळची उष्णता,आणि गर्दीच्या वेळी घड्याळाबरोबरची चुरस मी आनंदाने झेलतो.थाळीत लागणारा प्रत्येक पदार्थ सामाविष्ट झाला आहे की नाही हे निक्षून पहाण्यात मला आनंद होतो. ठरावीक पदार्थ योग्य उष्णता देऊन तयार झाले की नाही ह्याकडे लक्ष देण्यातही मला हुरूप येतो. अशा तर्हेचं मला मग्न करणारं दुसरं कुठचंही काम विशेष वाटत नाही.
शिवाय,कुठच्याही स्वयंपाक कलेच्या जगतात काम करणं थोड्या थोड्या फरकाने प्रतीत होतं.ताजमहाल होटेल मधला स्वयंपाकी आणि मामा काण्यांच्या होटेलमधले स्वयंपाकी ह्यात नक्कीच फरक असतो.हा फरक केवळ खाणार्याच्या चवीमुळे असतो.कुठचंच होटेल उच्च किंवा नीच असं मानण्याची गरज नाही.अगदी पदार्थांच्या सामुग्रीपासून ते पदार्थाला दिलेल्या उष्णतेपर्यंत लागणार्या कलेच्या आणि अनुभवाच्या क्रमबद्धतेत स्वयंपाक्याला तत्पर असावं लागतं.हे आणखी एक कारण पाककलेला वरचं रूप द्यायला कारणीभूत होतं.”
मी बबनला म्हणालो,
“तुझ्याकडून हे सर्व ऐकल्यावर माझ्या मनात विचार आला की,पाककलेच्या अपरिमित कार्यक्षेत्रामुळे ही कला उच्चतम होऊन सर्वात आकर्षित राहिली आहे.हजारो वर्षापासून पाहिलंत तर खाद्यपदार्थाच्या स्वादाची आणि बनावटीची इतकी असंख्य मिश्रणं आहेत की कुणीही त्या कलेत पूर्णपणे प्रभावित झालेला दिसणार नाही.कुणीही आपल्याला सराव असलेले पदार्थ आठवून पाहिलं,आणि जगात मिळणार्या आणखी अनेक पदार्थांचा त्यात सामावेश करून पाहिलं तर खरीच मजा येईल.”
“खाद्यपदार्थावरचं माझं प्रेम आणि स्वयंपाककलेचं उच्चतम रूप लक्षात आणून,आणखी पदार्थांचा शोध घेण्यात, स्वयंपाक करण्यात आणि खाद्यपदार्थांची चव घेण्यात मी मला कधीच अटकाव आणणार नाही.”

Thursday, July 29, 2010
आत्म-घातकी जोखीम.
“असं पुन्हा होऊ नये म्हणून प्रे.ओबामाच्या सरकारने नियमात बदल आणून धंद्यात जोखीम घेतल्यावर नुकसानी झाल्यास एक कपुर्दाही ह्या अधिकार्यांना मिळणार नाही याची योजना करून ठेवली आहे.”
जेव्हा अमेरिकेतल्या भांडवलदारानी आत्म-घातकी जोखीम घेऊन भांडवलशाहीला कडेलोट होण्याच्या परिस्थितीला आणून सोडली, आणि प्रे.ओबामाने तसं न होण्यापासून त्वरीत उपाय योजना करून भांडवलशाही सावरली तेव्हाच लोकांच्या लक्षात आलं की अमर्याद आणि अविचारी गुंतवणूकीच्या स्वातंत्र्याला आळा घालणं क्रमप्राप्त आहे.पुर्या जगात भांडवलदारानी घेतलेल्या जोखमीचे दुषपरिणाम अनेक देशांना भोगावे लागले.विशेष करून युरोपीयन देशांना चांगलाच फटका बसला.
आज प्रो.देसाई माझ्या अगोदरच तळ्यावर येऊन बसले होते.
“अमेरिकन भांडवलशाही आणि आत्म-घातकी जोखीम “
अशा मथळ्याचं पुस्तक अगदी लक्ष केंद्रीत करून वाचत असताना पाहून मलाही त्यांचं जरा कौतूक वाटलं.मी विचारण्यापूर्वीच मला म्हणाले,
“मला हे पुस्तक पुरं नवाचता हातावेगळं करायला जमे ना.म्हणून मी म्हटलं तुम्ही येई पर्यंत जमेल तेव्हडं वाचावं.”
आणि मला पुढे म्हणाले,
“अमेरिकेतल्या मोठ्या गब्बर बॅन्कानी वाटेल तसं घरावर कर्ज काढणार्यांना कर्ज देऊन,घराच्या किंमती सदैव वाढतच रहाणार अशा खोट्या आशेवर राहून,पत असो वा नसो ज्याला त्याला कर्ज देऊन, लाखो घरांचा खप करून, त्या कर्जावरही विमा उतरवणार्या बॅन्काना ती कर्ज विकून,एक प्रकारचा जुगार खेळून,घरांच्या किंमती उतरण्याचा दाट संभव आहे,घरांच्या किंमती वाढणारा बुडबुडा फुटणार आहे ह्याची जाणीव होत असतानाही त्याकडे दुर्लक्ष
करून, पैसे गुंतवणार्याना आणि इतर अनेक छोट्या-मोठ्या बॅन्काना अक्षरशः रसातळाला आणून सोडलं.”
भाऊसाहेबांचं हे मनोरंजक स्पष्टीकरण ऐकून मलाही जरा आणखी ऐकण्यात स्वारस्य वाटूं लागलं.
मी त्यांना म्हणालो,
“प्रत्येकाच्या अंतर-आत्म्यात एक विश्वास बसावा असं बळ असतं.मनुष्याचा सुरक्षीत मार्ग निवडण्याकडे बहूदा कल असतो. ह्यामुळे आपलं यश आणि अस्तित्व टिकवण्याचा मार्ग जवळ जवळ मोकळा होत असतो.धोका पत्कर्ण्याचा आपण क्वचितच मार्ग पत्करतो.पण हे मात्र खरं की जास्तीत जास्त धोका पत्करल्यावर जास्तीत जास्त फलदायी व्ह्यायला होतं.तुम्ही सांगता त्या मोठ्या बॅन्काच्या अधिकार्यानी जास्त फायद्यासाठीच हा मार्ग पत्करला
असावा. असं तुम्हाला नाही का वाटत.?
“तुमचा प्रश्न फार छान आहे”
असं मला म्हणत भाऊसाहेब पुढे सांगू लागले,
“आणि कधी कधी धोक्याचा मोका घेणं म्हणजे दोरीवर चालण्यासारखं असतं.काही धोके तसे जरा क्षुल्लक असतात. उदा.आपला सेल किंवा मोबाईल फोन, किंवा आपला लॅपटॉप घरी विसरणं,ह्या आधुनीक उपकर्णांच्या कटकटीपासून जरा विरंगुळा मिळावा म्हणून घेतलेला धोका तसा लहानच म्हणायला हवा.जरा जीवनात मजा असावी म्हणून हायवेवर जास्त वेगात गाडी चालवण्याचा प्रकार,हा काहीसा जरा मोठा धोका म्हणायला हवा.आणि
असा विचार करत करत नंतर माणूस पैशाच्या हव्यासाने बेफाम होऊन आत्म-घातकी जोखीम घ्यायला प्रवृत्त होतो. बॅन्केच्या अधिकार्यांना यासाठीच गब्बर पगाराच्या आणि बोनसाच्या नोकर्या असतात.पण हे सर्व करण्यापूर्वी पहिली गोष्ट म्हणजे आपल्यालाच आपण समजून घेतलं पाहिजे आणि दुसरं म्हणजे आपल्याला “आपण” होण्याचा मार्ग शोधला पाहिजे.”
“बॅन्केचे आणि मोठमोठ्या भांडवलदारांच्या कंपनीच्या सिईओना धोका किंवा जोखीम घेण्याची सवय झालेली असते.ही जोखीम किंवा हा धोका घ्यायला हे लोक कसे प्रवृत्त होतात? कदाचीत तुम्ही वाचत असलेल्या पुस्तकात ह्यावर सवित्सर चर्चा झालेली तुम्हाला आठवत असेल ना?”
मी प्रो.देसायांना सरळ सरळ प्रश्न केला.
प्रो.देसाई मला म्हणाले,
“मला जे आठवतं ते तुम्हाला सांगतो.
जो खरा धोका असतो तो एक क्रमवार प्रतिक्रिया चालू करतो. आणि लगोलग आपल्या लक्षात येतं की, आवेश,प्रेम आणि इच्छाशक्ति ह्यांना घेऊन आपण जे जन्माला आलेले असतो आणि ज्याचा आपण आपल्याबरोबर सांभाळ करीत असतो तेच आपण कधी कधी प्राप्त करण्याचा परिश्रम घेत असतो.कंपनीची धुरा सांभाळण्याच्या पदावर असलेल्याना ह्या गुणांची देणगी असावी.
अगदी खूशीत जीवन जगत असल्याने आपण आपल्याच अंतरात डोकावून ओझरतं दर्शन घेत असतो.हा दर्शन घेण्याचा फक्त सेकंद दोन सेकंदाचा क्षण असला तरी तो क्षण आपल्या अंतरातल्या जोषाच्या,आणि शक्तिच्या वलयाच्या गाभ्याचा शोध घेत असतो. आपल्यातल्या जोखीम घेण्याच्या क्षमेतेच्या समिप जाण्याच्या प्रत्येक दिवसाच्या आपल्या प्रयत्नाविषयी आपण कल्पना करीत असतो.”
हे ऐकून मी भाऊसाहेबाना म्हणालो,
“खरंच,ही आपल्यातली कल्पकताच आपल्या ध्येयाकडे आपल्याला ढकलत असते त्याचप्रमाणे आपल्या क्रियाशीलतेकडेही ढकलत असते. प्रत्येक व्यक्तिमधे अगाध सामर्थ्याचा,आवेशाचा आणि सृजनात्मकतेचा झरा वाहत असतो त्यामुळे आपण ज्याची तीव्र इच्छा करतो ते आपण प्राप्त करू शकतो.आपल्या अवगुणावर आपण सफलता आणू शकतो.”
“तुम्ही अगदी माझ्या मनातलं बोललात.”
असं म्हणून थोडा गंभीर चेहरा करून प्रो. म्हणाले,
“पण हे सर्व मिळवण्यासाठी प्रथम आपल्याला आपल्या जीवनभरच्या प्रवासात आपल्यात जो चांगुलपणा आहे तो उद्देशपूर्ण शोधण्याच्या प्रयत्नात असलं पाहिजे.
सगळ्या धोक्यात मोठा धोका म्हणजे पूर्णपणे आणि प्रामाणिकपणे जीवन जगणं.ज्यावर आपण प्रेम करतो ते करणं हे जीवनाचं खरं मर्म आहे.
कुणीतरी म्हटलंय की,
“जीवनात त्याला जास्त करून इनाम मिळतं जेव्हा तो करण्या लायक असलेलं काम खूप परिश्रम घेऊन करीत असतो.”
“आणि अगदी ह्याच्या उलट ह्या अमेरिकन भांडवलदारानी पाऊल टाकलं.”
माझ्या मनात आलं ते मी सांगायच्या प्रयत्नात राहून म्हणालो,
“म्हणजेच ह्यातला सत्याचा भाग असा की,तुम्ही जेव्हा अंगात जोष आणता तेव्हा ते काम तुम्ही सुलभतेने करू शकता.डोळे झाकून जेव्हा अपरिचित असलेल्या संभवतेच्या महासागरात आपण झेप घेतो तेव्हाच तो मोठा जोखमीचा भाग ठरतो.
बर्याच लोकांच्या हे लक्षात येत नाही की,त्यांच्यात असलेलं उत्कट जीवन जगण्याचं परिमाण किंवा ते जगण्याच्या प्रचंड क्षमतेची उपस्थिती किती असावी.आणि केवळ पैशाच्या हव्यासाने,किंवा अधाशी होण्याने ही अमेरिकन भांडवलदारी आपण काय करतो,ह्यात किती लोकांचं नुकसान होणार आहे,किती लोक रसातळाला जाणार आहेत ह्याची पर्वा नकरता आपलाच फायदा करून घेण्याच्या मागे लागले.कॉन्ट्रॅक प्रमाणे जसा कंपनीला फायदा करून दिला गेल्यास त्याचा मोबदला ह्या अधिकार्यांना देण्याचं कंपनीला बंधन असतं, तसंच यदा कदाचीत धंद्यात नुकसान झाल्यास कंपनी बुडाली तरी चालेल आपला फायदा बाजूला करून घेण्यात हे अधिकारी मोकळे असतात.”
“असं पुन्हा होऊ नये म्हणून प्रे.ओबामाच्या सरकारने नियमात बदल आणून धंद्यात जोखीम घेतल्यावर नुकसानी झाल्यास एक कपुर्दाही ह्या अधिकार्यांना मिळणार नाही याची योजना करून ठेवली आहे. त्यामुळे यापुढे आत्म-घातकी जोखीम न घेण्याचा त्याने इशाराच त्यांना दिला आहे.”
प्रो.देसायानी मी अपेक्षा करीत होतो तेच सांगून टाकलं.

Sunday, July 25, 2010
शॉवर खालचं गुणगुणं.
“प्रेम स्वरूप आई…” पासून “जीवनात ही घडी…” पर्यंत किंवा आजचं माझं आवडतं गाणं मी गाते.
“
माझी पुतणी-नंदा-हायकोर्टमधे वकीली करते.रोजच्या केसीस संभाळून,कामाचा रगाडा संपवून मग घरी उशीरा येते.परत घरी आल्यावर एका गृहिणीची कामं आहेत ती उरकावीच लागतात.मला हा तिचा दिनक्रम माहित होता.
अलीकडेच आमच्या बिल्डिंगच्या सोसायटीच्या काही केसीसबद्दल मला तिचा कायदेशीर सल्ला घ्यायचा होता.म्हणून मी तिला फोन केला.सर्व कामं आटोपून ती आरामात असेल म्हणून रात्री दहाला मी तिला फोन केला.ती आंघोळीला गेल्याचं तिच्या नवर्याने सांगीतलं.जाऊ देत. इतक्या रात्री त्रास नको म्हणून मी फोन ठेवला.परत दुसर्या दिवशीच तेच झालं.मग मी ठरवलं की तिला रविवारीच जाऊन प्रत्यक्ष भेटावं.
गेल्या रविवारी मी तिच्याकडे गेलो होतो.मला ती भेटली.जरा निवांत दिसली.म्हणून माझी तिच्याकडची कामं उरकून घेतली.आणि कुतूहल म्हणून तिला विचारलं,
“काय गं? तू रोज घरी आल्यावर रात्री आंघोळ करतेस का?
त्याचं विशेष काय कारण आहे.?जरा मला कुतूहल वाटलं म्हणून विचारलं.”
मला नंदा म्हणाली,
रोज मला आजुबाजूच्या लोकांचं-समाजाचं-मनावर दडपण येत असतं.मी कपडे कसे घातले,काळ्या कोटावर सफेद गळपट्टा कसा बांधते, मी केस कसे विंचरते,मी कशी बोलते,न्या्याधीशाकडे वाद कसा घालते,कशी चालते आणि वागते ह्याबद्दल इतर ज्यावेळी माझ्याबद्दल विचार करताना दिसतात, त्यावेळी मला चिंता लागते.हे दडपण दिवसातून तासनतास माझ्या डोक्यावर भार होऊन रहातं. माझ्या वकीली पेशामुळे रोज शेकडो लोकांना मी सामोरी जात असल्याने ह्या चिंतेत रहाते. शिवाय रोजच्या चिंता असतातच.दुसर्या दिवशीच्या केसीसचा अभ्यास करायचा, मुलांचा अभ्यास,घरच्या कटकटी ह्या चालूच असतात. दिवसाच्या शेवटाला मला अगदी दमायला होतं.”
मधेच मी तिला अडवून म्हणालो,
“आणि दिवसातून दोनदां म्हणजे सकाळी आणि हे रोज रात्री आंघोळ करण्याचं जादा काम घेऊन आणखी तुझं टेन्शन तू वाढवतेस असं नाही का वाटत तुला?”
माझ्या प्रश्ननाचा रोख कळायला ती वकील असल्याने तिला कठीण गेलं नाही.
हंसत,हंसत मला म्हणाली,
“काही कामं केवळ कामं म्हणून पहाता येत नाहीत.त्यात विरंगुळापण असतो त्याशिवाय त्यात फयदापण असतो. रात्रीची गरम शॉवरच्या खालची पंधरा मिनीटांची आंघोळ हा मला त्यातला एक प्रकार वाटतो.कामाच्या भाराखाली दबून गेल्यावर अशाच वेळी-आत्ताच गरम गरम शॉवरच्या खाली आंघोळ घेतली-ह्या अनुभवाची हताशपूर्ण आठवण यायला लागते. ती शॉवर खालची आंघोळ दिवसभरच्या इतरांच्या मागण्यांचं दडपण चक्क धुऊन टाकते.हे मला एक वरदान कसं वाटतं.”
“मला तुझं म्हणणं पटतं.”
असं सांगून मी तिला म्हणालो,
“ते गरम पाणी,सगळ्या विवंचना वितळून टाकत असणार.कुणीही जवळपास नसतं,कुणीही तुला निरखून पहात नसतं.आणि कुणीही तुझ्याबद्दल निवाडा घेत नसतं.तू आणि तूच फक्त असतेस. तुझ्या तू एकटीच सुखद वाटण्यार्या शुद्धित असतेस खरं ना?”
“तुमचं वर्णन अगदी मार्मिक आहे असं मला म्हणाली.
“रोज रात्रीच्या ह्या आंघोळीमुळे मला काहीतरी होतं.मी गुणगुणायला लागते.
अशावेळी मी काही करू शकत नाही.संगीताचे स्वर माझ्या मुखावाटे लहरत बाहेर येतात.
“प्रेम स्वरूप आई…” पासून “जीवनात ही घडी…” पर्यंत किंवा आजचं माझं आवडतं गाणं मी गाते.माझे वयक्तिक श्रोते माझ्या समोर असतात,आणि मी कशी गाते ह्याची त्यांना पर्वा नसते.शिवाय गाणं संपल्यावर माझे श्रोते मला उभं राहून टाळ्या देतात.
संबंध दिवसात माझ्या डोक्यावर भार टाकणार्या दडपणाला केवळ शॉवर खाली गायल्याने उतार येतो. गाण्यातला प्रत्येक स्वर रोजचा चिंतेचा भार आपल्याबरोबर वाहून नेतो आणि पुन्हा रात्रभर तो भार माझ्या मनात येणार नाही ह्याची तजवीज करतो.शॉवर घेऊन झाल्यावर माझं मन स्वच्छ होतं आणि निश्चिंत होतं.ती शॉवर खालची पंधरा-वीस मिनीटं,काहीही वाईट होऊ देत नाहीत, मला कसल्याही चिंतेत टाकत नाही्त.कपडे नेसून झाल्यावर आणि माझा चेहरा बाथरूम मधल्या वाफेने धुसर झालेल्या आरशात पाहिल्यावर माझ्या विषयी आणि माझ्या जीवनाविषयी समझोता करायला मी तत्पर होते.
शॉवर खाली गायल्या शिवाय मला वाटत नाही की मी,इतरांचं माझ्यावर आलेल्या दडपणाला, सामोरी जाईन किंवा कसं.
माझ्या विषयी मला बरं वाटायला मला जे योग्य आहे ते करण्यावाचून गत्यंतरच नाही.”
“शॉवर खाली आंघोळ घेताना गाण्या इतकं ते जर सुलभ असेल तर तू ते नक्कीच करत रहावं,कारण माझ्या एक लक्षात आलं की, ही चैन सगळ्यांनाच उपलब्ध नसावी पण तुला मात्र शॉवर खाली गाण्यात विशेष वाटतं हे मला पटतं.”
मी उठता उठता तिला म्हणालो.

Thursday, July 22, 2010
आठवणी.
स्मरण शक्तिबद्दल मला विशेष वाटतं.आपल्याला जर का स्मरणशक्तिच नसती तर जीवन अगदी कंटाळवाणं आणि अंधकारमय झालं असतं.
मनातल्या स्मृति प्रत्यक्षात आणून जीवन सुखकर होतं.पण स्मरण म्हणजे तरी काय?काहीतरी आहे म्हणून आहे काय?की,जे घेऊनच आपण जन्माला येतो?का ही गोष्टच काही निराळी आहे.?
लहानपणी मी कोकणात असताना उन्हाळ्याच्या सुट्टीत आम्ही आमच्या मावशीकडे जायचो.दर वर्षी आम्ही तिच्याकडे जायचो.करली नदी ओलांडून गेल्यावर शेताच्या कुणग्यातून वाट काढत जावं लागायचं.उन्हाळा असल्याने नदी अगदीच कोरडी व्हायची.
पुलाचा कोणीच वापर करत नसायचा.नदीतल्या पाण्याच्या डबक्यांपासून दूरमार्ग काढून जाता यायचं.
मावशीचं कौलारू घर दुरून दिसायचं.पायवाटेवरून चालताना तिचं घर ठरावीक जागेवरून दिसायचं.कारण तिच्या घराच्या सभोवती माडाच्या झाडांची इतकी गर्दी झालेली असायची की घर छपून जायचं.दिवस मोठे असल्याने संध्याकाळ होऊनही काळोख व्हायला उशीर व्हायचा.
पिवळ्या रंगाने भिंती रंगवलेल्या असल्याने घर आजुबाजूच्या हिरव्यागार वातावरणात उठून दिसायचं.
घराच्या जवळ आल्यावर धुरकट वातावरणात लाकडं जाळल्याचा वास यायचा.कौलांच्या छपरामधून मिळेल त्या खाचीतून चुलीत जळणार्या लाकडांचा धूर हवा तसा बाहेर यायचा.जणू घराला आग लागली की काय असा दुरून भ्रम व्हायचा.
मावशीच्या घरात शिरल्यावर मस्त सुगंधी उदबत्यांचा वास येऊन मन प्रसन्न व्ह्यायचं.मावशी दारातच उभी असायची.डोळ्यात आनंदाची चमक आणि हंशात तृप्तिचे भाव उमटल्याने मावशीला कडकडून मिठी दिल्याशिवाय मन प्रसन्न होत नसायचं.आम्ही आल्याने मावशीच्या घरात सर्व वातावरण उत्तेजीत व्हायचं. त्यामुळे माझ्या मस्तकात जुन्या आठवणींच काहूर माजायचं. थोड्यावेळाने आम्ही सर्व मावशीच्या जेवण्याच्या खोलीतल्या लहानशा टेबलाच्या सभोवती येऊन बसायचो आणि इथेच चर्चा चालू व्हायची.
“आठवतं का?”
ह्या दोन शब्दानी चालू होणारी चर्चा मला याद आणायची की हे स्मरण,ही स्मरणशक्तिच आम्हा सर्वांना जवळ आणत असते.हेच दोन शब्द आपल्याला भूतकाळात नेऊन सोडतात.त्यावेळी सर्व काही औरच होतं असं वाटून अशा विषयाला हात घालून प्रत्येकाचा चेहरा आनंदाने प्रफुल्लीत झालेला दिसायचा.आणि हीच खरी त्या स्मरणशक्तिची किमया म्हटली पाहिजे.
आमच्या लहानपणीच्या आठवणी उफाळून यायच्या.
आमचे आजोबा आमच्याबरोबर काजूच्या झुडपाच्या रानातून डोंगरावरून खाली चालत जाताना कसे पाय सरकून पडले. पडल्यावर ते कसे खजिल झाले होते.त्याना पटकन उठता आलं नाही म्हणून नलुच्या- माझ्या मावस बहिणाच्या-हाताचा आधार घेऊन ते कसे उठले,बिचारे आजोबा पडलेले पाहून पुरूषोत्तम-माझा मावस भाऊ-ओक्साबोक्शी कसा रडायला लागला,आपले आजोबा आता जगणार नाहीत ह्याचं अपरिमित दुःख होऊन तो कसा रडत होता.
आजोबा त्यावेळी त्याला जवळ घेऊन सांगत होते,
“बाळा,आयुष्यात असं खूपदा पडायला होतं.पण खचून जायचं नाही.कुणाचा ना कुणाचा आधार मिळत असतो.तो घेऊन पुन्हा आपल्या पायावर उभं रहायचं.जसा मी आता उठून उभा राहिलो.”
आजोबांचं सांगणं बिचार्या पुरूषोत्तमाच्या त्त्या वतात त्याच्या डोक्यावरून जात होतं,पण तो उपदेश इतर आम्हां सर्वांना होता हे कळायला कठीण झालं नाही.
आमची दुसरी मावशी, लहानपणी तिला शाळेत खेळात मिळाली बक्षीसं एखाद दिवशी पहाटे उठून झाडून पुसून परत कपाटात कशी लाऊन ठेवायची.ती चमकदार धातूची बक्षीसं पाहून तिचा चेहरा किती आनंदी व्हायचा.
ह्या सर्व आठवणीनी मन उल्हासित व्ह्यायचं.
आठवणी तुमच्या जीवनाला पुर्णत्व आणतात.मला काही गोष्टींचं स्मरण व्ह्यायला लागलं की,कुणालातरी सांगावसं वाटत असतं. आपल्या आठवणीचा कुणी भागीदार झाला तर त्याला पण जीवनात नवीन ऐकायला आनंद होतो.ऐकणार्याच्या आणि सांगणार्याच्या भावना ह्या आठवणी ऐकून मतं बदलू शकतात.
जीवनातल्या प्रत्येक अमुल्य क्षणांना चिकटून राहावं.कारण कुणास ठाऊक कदाचीत ते क्षण महान स्मृति होऊन रहातील. आपल्याच मुलांना सांगायला त्या आठवणी उपयोगात येतील. कदाचीत त्या क्षणांचं स्मरण तुमच्या मेंदुत ताजं होऊन राहील. कदाचीत त्यांची उजळणी तुमच्या वयाबरोबर टिकून राहिल. मनात त्या स्मृति कायमच्या रहातील.मला तरी ते महत्वाचं वाटतं.

Monday, July 19, 2010
नीटनेटका बिछाना.
“पण एक मान्य करावं लागेल की, गुबगूबीत,लुसलूशीत उशी कुणालाही कसलीही हानि नक्कीच करणार नाही.”
वसुधा करमरकरने वरळी सीफेसवर नवीन जागा घेतली आणि एक दिवस तिने मला आपल्या घरी बोलावलं होतं. तिच्या मुली आता चांगल्याच मोठ्या झाल्या होत्या.प्रत्येकाची बेडरूम होती.आणि वसुधाची स्वतःची बेडरूम होती.
मी तिच्या घरी गेलो त्यावेळी तिची जागा न्याहाळून पहात होतो.प्रत्येक बेडरूम्सना लहान बाल्कनी होती आणि बाल्कनीत बाहेर आल्यावर समुद्राचं मस्त दर्शन होत होतं.प्रत्येक बेडरूममधे हळूच डोकावून पाहिल्यावर माझ्या नजरेतून एक गोष्ट निसटली नाही आणि ती म्हणजे प्रत्येकाचा बिछाना.
एखाद्या मोठ्या होटेलमधे बिछाने करून ठेवले जायचे तसेच काहीसे नीटनेटके,आणि निरनीराळ्या रंगीत चादरीने आच्छादलेले बिछाने पाहून माझं सहज कुतूहल वाढलं.
वसुधाच्या लहानपणी मी तिच्या घरी वरचेवर जायचो.वसुधाचं घर अगदी नीटनेटकं दिसायचं.प्रत्येक वस्तू आपआपल्या जागी ठेवलेली दिसायची.कालच व्यवस्थीत फासून फुसून ठेवलेली आहे अशी प्रत्येक वस्तू दिसायची. हा व्यवस्थीतपणा म्हणजे त्यांच्या घरातला एक प्रकारचा “मॅडनेस” म्हटलं तरी चालेल.
मी कधी कधी वसुधेच्या आईला म्हणायचो,
“ही शिस्त आमच्या घरी अजिबात पाळली जाणार नाही.तुमच्या सर्वांची कमाल आहे.”
“वसुधाच्या आजीकडून ही शिस्त आमच्या घरात आली आहे.”
वसुधाच्या आईने एकदा मला सांगीतल्याचं आठवतं.
बहुदा,वसुधाने तेच आपले संस्कार आपल्या वरळीच्या घरात परीपूर्णतेला आणलेले दिसले.
मी वसुधाला म्हणालो,
“हा तुझ्या घरातला नीटनेटकेपणा आपल्याला खूपच आवडला.तुझ्या लहानपणी तुझ्या घरी आल्यावर जसं वाटायचं तसंच हे तुझं घर बघून आठवलं.”
माझी ही प्रशंसावजा टिप्पणी ऐकून वसुधाला मला वाटतं, तिचे जुने दिवस आठवले असावे.थोडेसे डोळे तिरके करून आणि भुवया उंचावून ती मला म्हणाली,
“प्रत्येक दिवशी सकाळी उठल्यावर मला माझं अंथरूण-पांघरूण म्हणजेच माझा बिछाना नीटनेटका करायला अजूनही फार आवडतं.मला माहित आहे की रोज रात्री झोपल्यावर आणि नंतर सकाळी उठल्यावर आपण बिछान्याचा सगळा घोळ करून ठेवतो.पण एक मात्र नक्कीच की,सकाळी उठल्यापासून,दिवसभर कामं करून करून हाडांचा चोळामोळा झाल्यावर रात्री नरम गुबगुबीत उशा घेऊन अंथरूणात अंग झोकून दिल्यावर जे काय बिछान्यात वाटतं ते आगळंच म्हणावं लागेल.
मोठी होत असताना हळूहळू अंथरूण-पांघरूण नीटनेटकं करून बिछाना तयार करण्याची कला मी माझ्या आई आणि आजीकडून शिकले.पण मी लहान होती त्यावेळी आजीबरोबर बकबक करीत असताना ती तिचं अंथरूण नीटनेटकं कशी करायची ते न्याहळंत असायची.”
मलाही तिच्या लहानपणाची आठवण आली.विशेषकरून आमच्या बिल्डिंगमधला जिन्या खालच्या धोब्याची. एकवेळ सूर्य जरा उशिरा उगवेल पण वसुधाच्या घरी हा धोबी सक्काळी आल्याशिवाय गत्यंतर नसायचं.वसुधाची आजी दरवाज्यात त्याची वाट पहात असायची.आणि त्याला जरा उशिर होईल असं भासल्यास त्याला ऐकायला जाईल अशा आवाजात आपल्या मोडक्या हिंदीत ओरडून सांगायची,
“भय्याजी,तुमकू कैसा समजता नही? आठ बजनेको आया.हमकू भी काम है!”
भय्या हे आजीचं वाक्य पुरं होण्यापूर्वीच येऊन ठपकायचा.हो,त्याचं बरोबर आहे.वसुधाची आजी त्याचं कायम गिर्हाईक होत ना!
मी वसुधाला तिच्या आजीच्या ह्या वाक्याची आठवण करून दिल्यावर मला म्हणाली,
“मला माझ्या आजीची खूपच आठवण येते.शिस्त आणि स्वच्छता म्हणजे काय ह्याचं बाळकडू आम्ही तिच्याकडूनच प्यालो.
तुम्हाला सांगते,”
असं म्हणत मला सांगू लागली,
“त्यावेळी आमच्या घरात,आठवड्याभरात चादरी किंवा उश्या खराब झाल्यातरच घरी धुतल्या जायच्या, नाहीतर आठवड्याच्या शेवटी सर्वांच्या अंथरूणावरच्या चादरी,उश्यांची कव्हरं आणि पांघरूणं नविसरता धुतली जायची आणि स्वच्छ घड्याकरून कपाटातल्या कप्प्यावर नीट डाळून ठेवली जायची.दर आठवड्याला बिल्डिंगमधल्या जिन्याखालच्या धोब्याकडून चादरीना आणि उश्यांच्या कव्हरांना इस्त्रीकरून सकाळीच त्या आणून द्यायचं धोब्याचं काम असायचं.”
“त्याचा अर्थ तुमचं कपाट बिछान्याच्या उश्या,चादरी आणि पांघरूणं ह्यानी भरून जात असेल नाही काय?”
मी वसुधाला कौतूक म्हणून प्रश्न केला
“हो अगदी बरोबर.ते कपाट खास ह्या गोष्टी ठेवण्यासाठीच होतं.
एक सेट धोब्याकडे दिला असताना दुसरा सेट वापरात असायचा.”
वसुधा म्हणाली.आणि आपल्या शालेय जीवनातली एक आठवण सांगताना मला म्हणाली,
“मला आठवतं मी एकदा दहा दिवस शाळेतल्या मुलींबरोबर ट्रिपला गेले होते.प्रत्येक खोलीत दोन मुली झोपायचो. प्रत्येकाने आपली खोली नीट ठेवायची आम्हाला आमच्या बाईंकडून ताकीद दिली गेली होती. खोलीतला माझा भाग अर्थातच मी व्यवस्थीत ठेवायची.
माझ्या बरोबरची मैत्रीण कुरकूरन का होईना माझ्या संगतीत अंथरूण-पांघरूण व्यवस्थीत कसं ठेवायचं ते ती शिकली. ट्रिप संपल्यानंतर ह्यासाठी तिने माझे निक्षून आभार मानल्याचं मला आठवतं.”
“ते तुझे जीवनातले दिवस पार पडून आता बरीच वर्षं होऊन गेली. आता तुझा संसार तू करायला लागली आहेस.तुझं स्वतःच घर झालं आहे.गंमतीत सांगतो,तुझी खोली हा तुझा गढ झाला आहे आणि तुझा बिछाना हा तुझा खोलीतला बुरूज झाला आहे.”
मी वसुधाला माझा विचार सांगीतला.
“मला आठवतं-त्यावेळी आमची मुलं लहान होती-आमच्या आनंदाच्या दिवसाचा मी, माझा नवरा आणि आमची तीन मुलं आमच्या बिछान्यात एकमेकाला लिपटून पहाटेच्या प्रहरी पेंगुळण्यापासून प्रारंभ करायचो.”
वसुधा सांगत होती,
“खरं पाहिलंत तर आमची मुलं ह्या जगात आली ती मऊ,लुसलूशीत बिछान्यासाठी व्याकूळ होऊनच आली अशी मी कधी कधी कल्पना करते.लहान असताना माझी मुलं सकाळीच बिछान्यातून उठायला फार कुरकूर करायची.
एखादा आमचा दुःखाचा दिवस आम्ही सर्व आमच्या बिछान्यात एकत्रीत होऊन देवाची प्रार्थना करण्यात संपवायचो.
बिछाना करणं हा माझ्या जीवनातला एक गंमतीदार दुवा आहे.
तो दुवा असल्याने त्या दुव्यात भरपूर आठवणी आणि दिलासे, तसंच कुटूंब आणि घर सामिल व्हायला मदत होते. मला माहित आहे नीट बिछाना करण्याने जग काही जिंकलं जात नाही पण एक मान्य करावं लागेल की, गुबगूबीत,लुसलूशीत उशी कुणालाही कसलीही हानि नक्कीच करणार नाही.”
तेव्हड्यात, वसुधेच्या एका मुलीने गरम गरम चहा आणि भजी आणून आमच्या समोर ठेवली आणि ती हंसत हंसत निघून गेली.
चहा घेता घेता आम्ही निराळ्याच विषयावर बोलायला लागलो.

Subscribe to:
Posts (Atom)