“मला त्यात नवल काहीच वाटत नाही”
चहाचा कप पुढे करीत सुधाकर म्हणाला.
गेल्या आठवड्यात माझ्या मित्राला, सुधाकर करमरकरला, भेटायला मी पुण्याला गेलो होतो.गाडी जरा उशिरा पोहचली.मला पाहून सुधाकर म्हणाला,
“चल असेच आपण बाहेर पडूं.माझ्या एका नातेवाईकाचं लग्न आहे.तिकडेच आपण जेवायला जाऊं.”
“अरे मी तिकडे आगांतूक दिसणार.मला काही आमंत्रण नाही. तुच जा बाबा! मी इकडे आराम करतो.”
असं मी त्याला लागलीच म्हणालो.पण सुधाकर ऐकेना.मला घेऊन गेला त्या लग्नाला.
गणपतराव खडसे,,माझे एक जुने सहकारी,मला त्या लग्नात भेटायचे होते.हा योगायोग असावा.कारण मीही त्यांना बर्याच वर्षानी भेटत होतो.ते ह्या लग्नाला सातार्याहून आले होते.
लग्न झालं.जेवणं वगैरे झाली.गणपतराव दुसर्या दिवशीच्या गाडीने सातार्याला परत जाणार होते.कुठे तरी होटेलमधे रहाण्या ऐवजी सुधाकरनेच त्यांना आपल्या घरी झोपायला बोलवलं.बरेच दिवसानी आम्ही तिघे भेटलो होतो.जरा गप्पागोष्टी होतील हा उद्देशही होता.
गप्पांचा विषय निघाला जेवाणावरूनच.खडसे पहिल्यापासून भोजन-भक्त आहेत हे मला माहित होतं.आत्ताच जेवलेल्या लग्नाच्या जेवणावरून विषय निघाला.त्या जेवणात केलेली बासुंदी छान झालेली होती.खडस्यांनाही बासुंदी आवडली होती.
“खूप दिवसानी अशी बासुंदी खाल्ल्ली.मजा आली.”
मी म्हणालो.
मला बासुंदी खाऊन आनंद झालेला पाहून खडसे मला म्हणाले,
“जर समजा बालपणाचा विचार केला किंवा जीवनातला सर्वात आनंदाच्या क्षणाचा विचार केला तर तुमच्या काय लक्षात येतं?
कुटूंबिय,मित्र-मंडळी, हास्य-कल्लोळ,प्रेम,आणि कदाचीत,जर का तूम्ही माझ्यासारखे असाल तर एखादा अन्न-पदार्थ लक्षात येईल.जसा तो तुम्हाला आता लक्षात आला आणि तुम्ही आनंदी झाला”
सुधाकरकडे मी माझा डोळा मिचकवला.खडसे रंगात आले आहेत हा संकेत त्याला द्यायचा होता.
खडसे पुढे सांगू लागले,
“माझ्या डोक्यातली असतील नसतील ती स्मरणं,पुरण पोळी,श्रीखंड,बासुंदी,उकडलेल्या बट्याट्याची भाजी,काही उत्तम मास्यांचे पदार्थ,ह्यांच्याशी तर्क-संगती करतील.किंवा ही स्मरणं,अनेक खाद्यपदार्थ, पिढ्यान-पिढ्या प्रचलित होऊन,लोकांमधल्या वयांच्या अंतरांचे पूल सांधून,मग त्यामधे काहीही साम्य नसलं तरी,फक्त एखाद्या करंजीवरचं प्रेम दाखवायला आणि तिचा आस्वाद घ्यायला मदत करतील.”
मी म्हणालो,
मला खात्रीपूर्वक वाटतं की,अन्नाची, माणसाच्या अस्तित्वासाठी,जरूरी आहेच,नव्हेतर जीवनाला त्याची जरूरी एव्हडी आहे की,ते जीवन जोशपूर्ण ढंगाने उपभोगून,आपल्या मनात असलेला स्वाद त्यात टाकून,इतरांबरोबर त्याचा आनंद घेता यायला पाहिजे.”
आणि नंतर सुधाकरला उद्देशून खडसे म्हणाले,
“तुम्हाला माझं म्हणणं कसं वाटतं?तुम्ही कशावर विश्वास ठेवता?”
सुधाकर जरा डोकं खाजवून विचार करायला लागला.आणि मग हंसत खडस्यांना म्हणाला,
“तुम्ही प्रथमच मला असं विचारल्यावर माझ्या मनात प्रश्न आला की मी कशावर विश्वास ठेवीत असेन बरं? विचार करणं जरा कठीण व्हायला लागलं.माझ्या मनातल्या खरोखरच्या दृढविश्वासाच्या गुढार्थाचं प्रकटन करणं जरा कठीणच झालं.मी राजकारण्या सारखा,काहीसा नकारात्मक, होऊ लागलो आणि नंतर मला वाटायला लागलं की,ज्या गोष्टीमुळे मला आनंद मिळतो,ज्यामुळे मी जोशपूर्ण रहात आहे असं वाटतं त्या अनेक गोष्टीच्या यादीमधे अन्नाचा क्रमांक पहिला लागतो.हे तुमच्या प्रश्नावर माझं उत्तर आहे.”
सुधाकरलाही भोजनाचे प्रकार आवडतात हे ऐकून खडसे जरा खूश झालेले दिसले.आम्हाला दोघांना उद्देशून म्हणाले,
“कल्पना करा की एखाद्या वाटीतलं एक चमचा भरून श्रीखंड तुम्ही तुमच्या जिभेवर उतरवलंत.त्यात एखादा चारोळीचा दाणा,एखादा निमपिवळा बेदाणा,केशराचं न विरघळलेलं एखादं तूस आणि थंडगार झालेलं, साखरेच्या गोडीने माखलेलं ते चमचाभर श्रीखंड तुमच्या जिभेवर वितळायला लागलं की तुमचे डोळे क्षणभर मिटून स्वर्गीय सुख देत असतील नाही काय?.मला अन्नपदार्थबद्द्ल जे वाटतं त्यात तुम्ही भागीदार व्हावं म्हणून मी असं म्हणत आहे.”
मी खडस्यांना म्हणालो,
“तुमच्या सहवासात आल्यापासून मी पाहिलं आहे की,तुम्ही कुठचाही अन्न पदार्थ मस्त एन्जॉय करता.ही आवड तुम्हाला अगदी लहानपणापासून आहे का?”
“मी अगदी माझ्या जन्मापासून अन्नाला आसक्त होतो. अन्नाच्या पोषकतेच्या दृष्टीने नव्हे तर,त्याबद्दलच्या सर्व गोष्टीनी मला अन्नाचा लोभ वाढला.कदाचीत माझ्या आईच्या पाककृतीच्या प्रेमामुळे त्याचा संबंध येत असेल.किंवा कदाचीत इतक्या लोकांना अन्नाचं प्रलोभन असतं हे पाहून मला श्वासाचा सुटकारा टाकायला जमलं असेल.”
खडस्यांनी सांगून टाकलं.पुढे सांगू लागले,
“माझी मुंज झाली तेव्हा भोजनाचा थाट होता,मी पदवीधर झाल्यावर माझ्या मित्रांसह आम्ही पार्टी केली त्यात भोजन होतं,माझ्या लग्नप्रसंगी भोजन होतं,ह्याचं कारण काय असावं?ह्या सर्व घटना होत असताना, भोजन केल्याने, समारंभात रंग येतो,एक प्रकारचा कंप येतो. गप्पा-गोष्टी चालल्या असताना,हास्य-कल्लोळ होत असताना खाण्याच्या सानिध्यात मजा निराळीच असते.अगदी दूरवर विचार केला तर एखाद्याच्या तेराव्याला पण भोजन
समारंभ ह्यासाठीच केला जातो.”
मला हे खडस्यांचं म्हणणं एकदम पटलं.
मी म्हणालो,
“अन्न पदार्थांचा चारही बाजूनी विचार करायला मला आवडतं. एखाद्या पदार्थाचा तो आश्वस्त करणारा परिमल, त्याची ती चव,स्वाद आणि मिलावट एकत्रीत ठेवण्याची विशिष्ठ क्षमता,अन्नात ज्या पद्धतिने अनेक लोकांना एकत्रीत करण्याची ताकद असते ती ताकद,हे सर्व प्रकार पाहून, आनंद घेऊ देण्याचं अन्नाचं सामर्थ्य पाहून मीही चकित होत असतो.
अन्न आनंदाने फस्त करण्याचे अनेक मार्ग आहेत. उत्तरेकडच्या लोकांना “सर्सूका साग आणि मकैकी रोटी” आवडते.दक्षिणेकडचे “इडली डोसा आणि वडा सांभारावर” ताव मारतात.पूर्वेकडचे “मास्यांवर”तुटून पडतात.आणि पश्चिमेकडचा “मराठी माणूस” श्रीखंड-पूरी,आणि झुणका-भाकर तल्लिन होऊन चापतात.
निवडून खाणारे लोक,चवदार पदार्थ कोणता ते बरोबर मेनूकार्डातून शोधून खातात.”
मला मधेच अडवीत गणपतराव खडसे म्हणाले,
“माझ्या बाबतीत बोलाल तर अन्नपदार्थाना माझा जीव कसा पकडीत ठेवायचा हे माहित झालेलं आहे म्हणूनच माझ्या मलाच काय आवडतं,आणि कशामुळे आवडतं हे माहित झालेलं आहे.
ही भोजनं एव्हड्यासाठीच के्ली जातात की,जेव्हा शब्द अपूरे पडतात, तेव्हा भोजन हे दिलासा देण्याचा संकेत म्हणून वापरला जातो.आनंद असो वा दुःख, सर्व काही साईड डिशने सामावून जातं.लग्न जुळो किंवा मोडो एखाद्या आईस्क्रिम डिशने भागून जातं असं मला वाटतं.
जरी बर्याच जणांचं,कदाचीत म्हणणं असेल,की भोजनातून सर्व काही साध्य होत असतं, तरी पण मला वाटतं,त्या भोजनाची तयारी,पाककृती आणि परंपरा ह्यातून खरा प्रबल एकत्रीकरणाचा प्रभाव होत असतो.
आणि ह्या सर्व गोष्टी आईवडीलांकडून,मित्रमंडळीकडून किंवा वयस्करांकडून शिकवल्या जातात,पण त्या एखाद्या पाककला कृतिच्या पुस्तकातून शिकल्या जात नाहीत.सल्ला, पदार्थ करण्याची ढब आणि पाककृति एका पिढी कडून दुसर्या पिढीकडे सोपवली जाते.तांदळाच्या खिरीपासून ते सत्यनारायणाच्या नैवेद्या पर्यंतची पाककला, माझी स्मरण शक्ति जागृत करते.”
सुधाकरला ही जेवणाच्या विषयावरची चर्चा आवडल्या सारखी दिसली.म्हणाला,
“रोजचा रात्रीचा प्रश्न!.आज रात्रीच्या जेवणांत काय आहे? हा रोजचाच प्रश्न माझं डोकं रोज खातो.माझ्या आईने केलेलं रात्रीचं जेवण सहजपणे मी नवरंगी वासावरून हेरू शकतो. माझ्या आईने केलेलं माझं सर्वात मनपसंत जेवण म्हणजे, डाळीची आमटी,भात आणि बटाट्याच्या कचर्या. कोणत्याही वेळेला कुटूंबातल्या कुणालाही राजमान्य वाटणारं हे जेवण.मी गावाबाहेर कुठेही असलो तरी असलं जेवण मला इतर कसल्याही आठवणी पेक्षा माझ्या
घराची याद देतं.
अंड्याचं आमलेट निरनीराळ्या प्रकारे बनवता येतं.पण ते बरेच वेळा “योग्य” प्रकारे बनवलं जात नाही.अंड्याचा रस घोटून घोटून फेसाळला गेला पाहिजे.आणि ते फेसाळणं माझ्या पोटाच्या लहरीवर अवलंबून असतं.टोस्ट,अरे वा! टोस्ट.तूपाने माखलेला,स्वादाने मखमखलेला आणि ब्रेकफास्ट साठी सॅन्डविच म्हणून वापरात आणता येणारा असा असावा.सॅन्ड्विचसाठीच म्हणूनच असावा.वैकल्पिक नसावा.
अन्नपदार्थ कसा चैनी खातर असावा हे लक्षात आणून मी माझी अन्न पदार्थाची व्याख्या तयार करायला सिद्ध होतो.”
मला, मालवणी जेवणातल्या मास्यांच्या पदार्थाची आणि खास कोकणी पदार्थांची आठवण आली.मी म्हणालो,
“माझ्या मते दरएक दिवशी जेवणातला एखादा पदार्थ विशिष्ठतेचा असावा.उदा.काही लोक जेवायला बसतात.पोट फूटेपर्यंत खाण्याचा त्यांचा मानस नसतो.किंवा जास्त खाऊन श्वास कोंडून घ्यायचा त्यांचा उद्देश नसतो.शेवग्याच्या शेंगा घालून केलेला झुणका खाताना,एक एक शिजलेली शेंग सोलून त्याच्या आतला गर, स्वादिष्ट समजून,समोरचे खालचे दांत आणि वरचे दात ह्यांच्या पकडीत धरून सरसरून बाहेर ओढून झाल्यावर,ताटाच्या शेजारी शेंगांच्या सालींचा ढिग करून ठेवण्याचा लज्जतदार प्रकार खाण्याच्या कलेचा भाग म्हणून त्यात सामाविष्ट केला जातो.किंवा करली नांवाचा मासा-अतीशय कांटेरी- तळल्यावर त्याच्या प्रत्येक तुकड्यातले कांटे विलग करून गोड लागणारा गर तेव्हडा तोंडात उतरवून अणकुचीदार कांटे तेव्हडेच निराळे करण्याची कला वेगळीच असते.तसंच काटोकाट भरलेलं ताकाचं ग्लास,सगळं जेवण संपल्यानंतर,डाव्या हाताने,उष्ट्या उजव्या हाताच्या उफरट्या भागावर, डाव्या हातातल्या ग्लासाला टेकू देऊन गट,गट आवाज काढून ताक पिऊन झाल्यावर,शेवटचा ग्लासात उरलेला ताकाचा अंश न विरघळलेल्या मिठाची चव घेता घेता मोठा ढेकर देताना दिलेली,स्वादिष्ट जेवण केल्याच्या कृतज्ञतेच्या पावतीतून, पत्नीला खूष करण्याची कला जगावेगळी नसते.
पोटभरून खाल्याबद्दल नव्हे,तर प्रत्येक खाण्याच्या कलेचा अंतरभाव त्या जेवणाच्या थाळीशी निगडीत असतो.
मला वाटतं अन्न हे आनंद घेण्यासाठी खायचं असतं,प्रेमाने खाण्यासाठी असतं,कुणाशी तरी नातं जुळवण्यासाठी असतं. मग ते स्वयंपाक घरात असो,ताट-पाट ठेवल्यावर ताटात वाढलेलं असो,ते नेहमीच कुणाचे तरी आभार मानण्यासाठी, कुणी तरी त्या क्षणाचा आदरास पात्र आहे असं दाखवण्यासाठी असतं.
प्रत्येक अन्न पदार्थ,त्यात असलेली मधुर आणि रसाळ चव,दिलासा देणारा विश्वास आणि असाधारण विशेषता प्रस्तुत करीत असतो.मात्र हडकुळा स्वयंपाकी, मुळीच विश्वास ठेवण्या लायक नसतो हे लक्षात असुद्या,अन्नात एव्हडी जादूची किमया आहे की,ते अन्न, प्रेरणा देणं,सान्तवन करणं आणि उत्तेजित करण्याचं काम करतं. शिवाय शारिरीक आणि आत्मिक दृष्ट्या समाधानी देतं.
हे अन्न,स्वादाची उत्सुकता वाढवून, जिभेचे चोचले संभाळून अनेकाना एकत्रीत करतं.”
रात्र बरीच झाली होती.डोळ्यावर झोपेची झापड यायला लागली होती.खडस्यांना सकाळीच उठून सातारची गाडी पकडायची होती.त्यांनीच चर्चा आवरती घेण्याच्या उद्देशाने सांगून टाकलं,
“मला मनोमनी वाटतं की,राजकारणातले विरोधी पक्ष, एकमेकाशी भांडणारे शेजारी देशातले लोक,विरोधी धर्माचे लोक जर का,गरमगरम किंवा थंडगार, आत्मा संतुष्ट करणारे,जिभेला चटक लावून देणारे,पदार्थ ताटात घेऊन हाताने भुरका मारून,त्यावर ताव मारतील,ढेकर देतील,असं हे क्षणभर का करीनात,तर लगेचच त्यांच्या लक्षात येईल की,सर्व माणसांमधे काहीच नाही तर निदान भोजनावर ताव मारताना भुरके मारून ढेकर देण्यात साम्य
जरूर आहे.”
सकाळी खडसे निघून गेल्यावर मी सुधाकरला म्हणालो,
“खडसे पक्के भोजन-प्रेमी आहेत.आमच्या ऑफिसात पार्ट्या तेच आयोजीत करायचे.”
“मला त्यात नवल काहीच वाटत नाही”
चहाचा कप पुढे करीत सुधाकर म्हणाला.
श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com
Tuesday, December 14, 2010
Saturday, December 11, 2010
माझ्या आजीची गोधडी.
काल शुक्रवार होता.ऑफिसमधून जरा लवकरच निघालो होतो.अंधेरी स्टेशनवरून येताना धाके कॉलनी बसस्टॉपवर उतरल्यावर,सातबंगल्याच्या चौपाटीवरून येणारा समुद्राचा गार वारा नकोसा झाला होता.लगबगीत आमच्या बिल्डिंगमधे शिरण्याच्या प्रयत्नात असताना,शेजार्यांच्या फ्लॅटच्या समोर असलेल्या बागेतल्या एका झाडात एक रंगीबेरंगी चादरवजा कपडा अडकेलेला दिसला.कुणातरी वरच्या शेजार्यांचा वाळत घातलेला कपडा असेल म्हणून
तो कपडा झाडावरून काढून घडी करून वर नेत असताना कपड्याच्या मागच्या भागावर लाल धाग्यात कोरलेलं नाव वाचलं.”सुनंदा” असं होतं.वर चढत चढत सुनंदाच्या घरची बेल वाजवली.दरवाजा सुनंदानेच उघडला.
“या,या,काका आत या.”
असं म्हणून, लगेचच म्हणाली,
“अरे वा! माझ्या आजीची गोधडी तुमच्या हातात कशी.?बहुदा,वार्याने खाली पडली असावी.आमच्या बाईला, वेंधळीला, मी स्वतः गोधडी धुवून तिला बाहेर बाल्कनीत वाळत घालायला सांगितलं होतं.नवीन आणलेले चाप लाव म्हणूनही सांगितलं होतं.”
मी सुनंदाला म्हणालो,
“मग मला काहीतरी बक्षिस देशील की नाही?”
“या या तुम्ही आत तर या.आज माझ्या आजीचा जन्म दिवस आहे.म्हणूनच मी ती गोधडी धुवायला काढली होती. ती जर हरवली असती.किंवा कुणी घेऊन गेलं असतं तर मला प्रचंड दुःख झालं असतं.माझीच चूक म्हणा.
मला आमच्या अय्यर प्रोफेसरांचं नेहमीचं वाक्य आठवतं.आणि ते मद्रासी हेल काढून म्हणायचे,
“स्मॉल,स्मॉल थिंग्स…व्हेरी इंपॉर्टन्ट थिंग्स….बिग थिंग्स नॉट सो इंपॉर्टन्ट”
ती गोधडी मी स्वतः वाळत घालून चाप लावायला हवे होते.धुण्याचा एव्हडा व्याप केल्यावर वाळत घालायचे कसले एव्हडे श्रम?चुकलंच माझं.”
“एव्हडं का मनाला लावून घेतेस?”
मी सुनंदाला प्रश्न केला.
“तुम्ही जर का मला विचाराल,
“ह्या जगात तुला कशावर विश्वास आहे?”
तर मी लगेचच सांगेन,
“ह्या माझ्या गोधडीवर”
सुनंदा सांगू लागली.पुढे म्हणाली,
“माझी गोधडी तशी जूनी आहे,मळकट दिसते,इकडे तिकडे लक्तरं गेल्या सारखी दिसते शिवाय आता ती माझं पूर्ण अंग लपेटू शकत नाही.पण जगातल्या कुठेच्याही गोधड्यापेक्षा मला माझी ही गोधडी अत्यंत प्रिय आहे.
तुम्ही माझी गोधडी पाहून म्हणाल,
“त्यात काय विशेष आहे?,अशी जूनी गोधडी का आवडावी?”
मला खरंच माहित नाही.मला ह्याच काय उत्तर द्यावं हेच कळत नाही.
मात्र मला एव्हडंच माहित आहे की,माझ्या जवळ ती असल्यापासून त्या पासून दूर जावंस कधीच वाटत नाही.ज्या ज्या वेळी मी ही गोधडी अंगावर घेते त्यावेळी त्यातली उब,त्यातून येणारा सुगंधी वास,आणि तिच्यापासून मिळणारा आनंद मला मिळत असतो.ही गोधडी मला एकप्रकारचं आ़श्वासन देत असते.”
माझं सुनंदाच्या गोधडीबद्दलचं कुतूहल वाढत गेलं.
मी म्हणालो,
“सुनंदा तुझ्या आजीने दिलेल्या या गोधडीबद्दल मला आणखी ऐकायचं आहे.”
“थांबा मी तुमच्यासाठी चहा टाकते.आणि आजीचीच आठवण म्हणून तिने मला शिकवलेला एक पदार्थ चाखायला देते.आज तिचा जन्म दिवस असल्याने तिची आठवण म्हणून मी तो पदार्थ आज केला आहे.”
असं म्हणून माझ्या जवळ खूर्ची घेऊन बसून मला सांगायला लागली.
“ही गोधडी माझ्या अंगावर मी पांघरल्यावर माझ्या जीवाला कसलीच बाधा होणार नाही असा मला एक भरवसा येतो.
माझ्या आजीने मला ही गोधडी दिली होती.माझी आजी तिच्या लहानपणा पासून ही गोधडी वापरायची.
माझी आजी मला सांगायची,
“मला ही गोधडी कुणी दिली ते आठवत नाही.शाळेत मी सर्वांशी चांगली वागायची.पण काही मुली माझा तिटकार करायची.पण कुणाशीही मैत्री करायचं मी सोडत नसायची.माझा तिटकार करण्यार्या मुलींमुळे मला कसं वाटायचं ते मी उघड सांगायला कचरायची नाही. माझ्या अंगात काही उणं असेल ते ही सांगायला मला काहिच वाटत नसायचं.”
माझ्या आजीचं हे ऐकून मला तिचा खूप आदर वाटायचा.
मी लहान असताना,रात्रीची झोपल्यावर माझ्या अंगावर माझी आजी ही गोधडी न चुकता पांघरायची.सुरवातीला मी ह्या गोधडीचा उपयोग मला उब मिळण्यासाठी म्हणून करायची.पण नंतर नंतर ह्या मळकट,जून्या गोधडीबद्दल मला खूप आपलेपणा वाटायला लागला.
आता ज्यावेळी ही गोधडी माझ्या सानिध्यात असते,तेव्हा मला लहानपणाच्या आठवणी येतात.आमचं घर खूपच लहान होतं.काहीसं अस्वच्छ असायचं. माझ्या आजुबाजूला माझी भावंडं-सख्खी,चुलत-वावरायची.पडवीत एका मोठ्या जाजमावर उशा टाकून आम्ही जवळ जवळ झोपायचो.कधी कधी लोळायलापण जागा नसायची.लहान असताना मला त्याबद्दल वाईट वाटायचं,आणि रागही यायचा.पण त्या आठवणी आता मला दिलासा देतात.ही
लहानशी गोधडी तर माझ्या आठवणीना उजाळा देते.
ही जूनी,मळकट गोधडी माझ्या जवळ असे पर्यंत माझं जूनं घर,माझं एकत्र कुटूंब, यांच्याबद्दल उजाळा देत रहाणार.
माझी भावंडं आता कामामुळे एकमेकापासून दूर रहायला गेली आहेत.फार क्वचितच आमची भेट होत असेल.आणि त्यांचा दुरावा मला भासत असतो. त्या सर्वांना भेटणं कदाचीत आता शक्य होणार नाही.म्हणूनच मी माझ्या सर्व आशा-आकांक्षा ह्या गोधडीत राखून ठेवते. माझ्या आजोबांचे मोजकेच पण महत्वाचे बोल,माझ्या आईचं व्यक्तिमत्व,माझ्या वडीलांचं वरचस्वी व्यक्तिमत्व,माझ्या धाकट्या बहिणीचे डोळे,माझ्याकडे टवकारून पहाताना, त्यांना दिसणारं,तिचं विश्व आणि अगदी नचुकता माझी जीवश्च-कंटश्च आजी तिच्या सर्व आठवणी ह्यात सामावलेल्या आहेत.
ह्या सर्व कारणांसाठी माझ्या आजीची ही लहानशी मळकट गोधडी रोज रात्री झोपताना जवळ घेतल्याने सर्व आठवणी उजळतातच शिवाय एक संरक्षणाचं मिथ्या कवच माझ्यावर आहे असं समजून मला अगदी गाढ झोप लागते.”
पाणावलेले डोळे पुसत पुसत सुनंदा उठली.आणि आतून दोन कप चहा घेऊन आली.आणि त्याबरोबर शेंगदाण्याचे दोन लाडू एका डीशमधे घेऊन आली.
मला म्हणाली,
“माझी आजी शेंगदाण्याचे लाडू चिकीच्या गुळात वळायची.त्यात सुक्या खोबर्याचे तुकडे घालायची.थोडी खमंग वास यायला वेलची टाकायची.तिचे लाडू खायला अप्रतिम वाटायचे.हे मी केले असल्याने कसे झाले आहेत कुणास ठाऊक”
असं म्हणून मला तिने दोन्ही लाडू खायचा आग्रह केला आणि एका डब्यात चार-पाच लाडू घालून,डबा माझ्या जवळ दिला.आणि म्हणाली,
“डब्यातले लाडू काकींसाठी आहेत.आणि तुम्हाला बक्षीस म्हणून आहेत.कसे वाटले तुम्हाला लाडू?”
मी उठता उठता म्हणालो,
“अप्रतिम”

Tuesday, December 7, 2010
समुद्राच्या लाटांवरचं आरूढ होणं.
“आतापर्यंत पाहिलेला तिचा चेहरा ह्यावेळी मला निराळाच दिसला.त्यावरचं समाधान,तृप्ति,आणि आनंद विरळाच होता.”
मी पूर्वी मे महिन्यात आठ दिवसांची व्हेकेशन घेऊन वरचेवर गोव्यात जायचो.गोव्याच्या बिचीसमधे मला पोहायला आवडायचं.दरखेपेला निरनीराळ्या बिचवर माझी व्हेकेशन मी घालवीत असे.त्यातल्यात्यात मिरामार बिच,कोळवा बिच किंवा डोना-पावला बिच हे माझे आवडते बिच.
हल्लीच मी बरेच दिवसानी मिरामार बिचवर एका हाटेलात रहायला गेलो होतो.संध्याकाळची वेळ होती.बिचवर मस्त वारा आणि थंड हवा खायला मजा
येत होती.काही वेळ चालल्यावर वाळूत एका जागी बसावं असं वाटलं.म्हणून त्या जागी जावून बसलो.एकाएकी जूनी आठवण येऊन,जसं सिनेमात फ्लॅश-बॅक दाखवतात तसं, माझ्या मनात यायला लागलं.
मला त्याच्या नांवाची आठवण येईना.पण बराच डोक्याला त्रास दिल्यावर माईकल डिसोझा आठवला.
मला हा माईकल नेहमीच बिचवर पोहताना दिसायचा.हळू हळू माझी त्याची ओळख झाली.आणि त्या व्हेकेशनच्या आठ दिवसात,विशेषतः संध्याकाळी, पोहून झाल्यावर माईकलच्या रूम मधे जाऊन फेणीच्या आस्वादाबरोबर गप्पा व्हायच्या.(माईकल फेणी घ्यायचा आणि मी गरम कॉफी.)
नंतर देसायाच्या घरी रात्रीचं जेवण घ्यायचो.
पूर्वी मी कामथांच्या हाटेलात जेवायचो.देसायांकडे घरगुती जेवण मिळतं हे मला माईकलकडून कळलं.मस्त मास्यांचं जेवण असायचं.
माईकल डिसोझा लहान असल्या पासून इकडे लोकांना समुद्रात पोहायला शिकवायचा.ह्या फंदात तू कसा पडलास म्हणून मी माईकलला एकदा विचारलं. माईकल फेणीची चव घेत घेत खूशीत येऊन मला म्हणाला,
“मला आतापर्यंत असा प्रश्न कुणीच केला नाही.
प्रत्येकाला वाटतं की,काहीतरी करण्यात आपण मग्न असावं.काही तरी हरवावं आणि ते गवसण्यासाठी आपण वेळ घालवावा.आपणाला आनंदी रहाण्यासाठी आपल्या जवळ काहीतरी असावं जरी ते “काहीतरी” काहीही नसल्यासारखं असलं तरी.
माझ्यासाठी ते “काहीतरी” समुद्रातून मिळतं.हे समुद्रातलं “काहीतरी” स्वाभाविक दृष्टीने लाटा निर्माण करतं—काहीवेळा ह्या लाटा मोठ्ठ्या असतात आणि काहीवेळा अगदी माझ्या पावलावर आरूढ होतील एव्हड्या लहान असतात.जेव्हा मी समुद्रात पोहायाला जातो तेव्हा ह्या लाटा मला समुद्राच्या प्रचंड क्षमतेत हात घालायला संधी देतात.एकावेळी एकच लाट पूरे होते.”
मला हे माईकलचं ऐकून जरा कुतूहल वाटलं.मी त्याला विचारलं,
“म्हणजे तुझा व्यवसाय पोहायला शिकवायचाच आहे काय?
ह्यातून तुला काय मिळतं?”
माईकल जरा खसखसून हंसला.मला म्हणाला,
“पैसे म्हणाल तर,जे काय मला मिळतं त्यात मी समाधान असतो.
मला आठवतं,माझा सुरवातीचा जॉब,समुद्रात पोहायला शिकवण्याचा होता.मी ह्याच गोव्याच्या समुद्रावर पोहायला शिकलो.ह्या गोव्याच्या बिचवर एका प्रसिद्ध होटेल मधे नव्याने समुद्रात पोहायला येणार्या पर्यटकाना शिकवायचं मला काम मिळालं होतं.बरेचसे परदेशातले पर्यटक समुद्रात पोहण्यात तरबेज असतात,पण सगळ्यांना पोहायला येईल असं नाही.बर्याच वेळा स्त्रीवर्ग ह्यातला असतो.तसंच स्थानीक पर्यटक विशेषकरून उत्तर भारतातून येणारे
पर्यटक ह्यातले असतात.आणि गोव्याच्या सुंदर बीचवर ,दुधाळलेल्या लाटापाहून कुणाला समुद्रात उडी मारावी असं वाटणार नाही?
ज्या बिचवर प्रथमतः मी लाटांवर आरूढ होण्याची कला शिकलो,त्याच ठिकाणी मी हा जॉब करण्याचं कारण मला, ज्या लोकांना लाटांवर आरूढ होऊन मजा करण्यात आनंद घेण्याची उत्कंठा असेल त्या लोकांना,शिकवण्याची असूया होती.”
मी माईकलला विचारलं,
“तुला हेच काम करून कंटाळा येत नाही काय?”
“ह्या माझ्या समुद्रात पोहण्या्च्या वेडेपणाला वाटलं तर,आवेश म्हणा,चट म्हणा,छंद म्हणा किंवा मनोरंजन म्हणा.
कसंही असलं तरी जेव्हा माझं जीवन तापदायक होतं तेव्हा पोहण्यातून मी ते सूरात लावण्याच्या प्रयत्नात असतो. मला समुद्र ही अशी जागा वाटते की,अगदी आत्ताच झालेल्या घटना, ज्या लागलीच निवळून जातात, त्या प्रतिबिंबीत होतात.पुन्हा अशा घटनाना सामोरं जायला मला ही जागा प्रेरित करते.समुद्रात पोहण्याने मी माझ्या जीवनातल्या कटकटीतून अंतिम सुटका करून घ्यायला प्रवृत्त होतो.”
काहीवेळा मी माझ्या मलाच प्रश्न करतो की,समुद्राच्या लाटांवर एकदाही आरूढ झालो नसतो,बहुदा आठावड्यातून तिनदां होतो,तर माझ्या जीवनात काय अर्थ राहिला असता.
मी प्रेरणा विरहीत राहिलो असतो का?का माझं वजन मी वाढवून घेतलं असतं?जीवन अगदीच कसं निराळं झालं असतं? अशी निरनीराळी दृष्य डोळ्यासमोर आल्यावर, माझ्या नक्कीच एक ध्यानात येतं की,मी लाटांवर आरूढ न होता सुखीच झालो नसतो.
माझ्या जीवनातलं प्रभावाचं अधिरोहण,जो मी आता आहे आणि ज्यावर मी भरवसा ठेवतो ते, समुद्रातल्या लाटांवरचं आरूढ होणं हेच आहे.”
“लाटांवर आरूढ होणं म्हणजे यतार्थतः तुला काय म्हणायचं आहे?.मी पण समुद्रात पोहतो.लाट फुटल्यावर फेसाळलेल्या पाण्यात मला पोहायला मजा येते.”
मी माईकलला म्हणालो.
मला माईकल म्हणाला,
“लाट फुटण्यापूर्वी लाटेवर सर्व शरीर झोकून दिल्यावर,एखाद्या घोड्यावर आरूढ झाल्यावर कसं वाटतं अगदी तसं लाटेवर असताना वाटतं.ह्याला मी लाटेवर आरूढ होणं म्हणतो.घोडा जसा आरूढ झाल्यावर सपाटून पळायला सुरवात करतो अगदी तसं ह्या न फुटलेल्या लाटेवर आरूढ झाल्यावर,ती लाट तुम्हाला आपल्या अंगावर घेऊन जोरात पुढे किनार्याजवळ पळत असते.आणि सरतेशेवटी ती लाट फुटते.त्या फेसाळ लाटेत पोहण्यात तुम्हाला मजा
येत असणार.पण न फुटलेल्या लाटेवर आरूढ होऊन तुम्ही एकदा पहा.”
असं म्हणून माईकल विचारात पडल्यासारखा वाटला.आणि लगेचच उठून आणखी एक फेणीची बाटली उघडून रंगात येऊन मला म्हणाला,
“मला एका घटनेची आठवण येते.ती मी तुम्हाला सांगतो.
फेणी घेता घेता तो प्रसंग सांगायला रंगत येणार म्हणून मी ही दुसरी बाटली उघडली.
मला तो प्रसंग आठवतो.
मला एका चवदा वर्षाच्या मंदमतिच्या मुलीला लाटावर आरूढ होण्याचं काम शिकवायची पाळी आली होती.आणि ती घटना मी केव्हाच विसरणार नाही.
तिन आठवडे सतत ती मुलगी सकाळ संध्याकाळ शिकायला यायची.समुद्राच्या लाटांवर आरूढ होऊन पोहण्यात तिला किती जबरदस्त आनंद होत होता ते ती नित्य सांगायची.
ते उन्हाळ्याचे दिवस होते.लहानश्या लाटेवरसुद्धा तरंगत रहाता रहाता एक दिवशी अशी एक लाट तिला मिळाली की,एव्हड्या दिवसाचा पोहण्याचा अनुभव घेत असताना एका मोठ्या लाटेवर ती स्वतःहून आरूढ होऊन बराच वेळ तरंगत राहिली.तो अनुभव तिला खास वाटला.
आणि एका, त्याहून मोठ्या लाटेवर, मी तिला जवळ जवळ ढकलीच होती.दर खेपेला येणार्या लाटेवर आरूढ होतानाचा तिचा चेहरा दिसायचा तसाच ह्यावेळी मला दिसला.पण त्यावर तरंगून झाल्यावर,लाटेबरोबर खाली वाळूत येईपर्यंत ती मुळीच घाबरली नाही.आणि लाटेचा जोर संपल्यावर मागे वळून माझ्याकडे पहात राहिली.आतापर्यंत पाहिलेला तिचा चेहरा ह्यावेळी मला निराळाच दिसला.त्यावरचं समाधान,तृप्ति,आणि आनंद विरळाच होता.
मला इतर काम करून कुठेही जास्त पैसे मिळाले असते.पण मी हे काम करण्याचा स्वेच्छाकर्मी झालो.त्याबद्दल मला जराही पश्चाताप होत नाही.मी एकटाच इथे रहात आहे.सकाळी आणि संध्याकाळी असं दोन वेळा मला हे काम करावं लागतं.आणि ते फक्त पावसाळा सोडून.असं मी काम करीतच आहे.मला शक्य होईतोपर्यंत हे काम मी करणार आहे. दुसरं कसलंच काम मला एव्हडा आनंद देऊ शकणार नाही.
माझं हे भर उन्हाळ्यातलं पोहायला शिकवणं, माझ्या काही ओळखीच्या लोकांना, यातना देणारं वाटतं.ह्यात माझे जवळचे नातेवाईक आणि मित्रगण सामिल आहेत.पण मला विचारालं तर मी सांगेन की,सुमद्रातल्या उंच,उंच लाटावर आरूढ होऊन पोहणं,मला सांगून जातं,मला शिकवून जातं की,खरा आनंद,हवा असल्यास तो आपल्याजवळ किती संपत्ती आहे ह्याचा हिशोब करून मिळणार नाही.खरा आनंद आपल्या घरात,जिथे वातावरणाला,काबूत
ठेवण्यासाठी,निरनीराळी अवधानं वापरली जातात,सुरक्षता पाहिली जाते,त्याकडे काणाडोळा करून किंवा समाधानी मानून मिळणार नाही.
समुद्राच्या लाटांवर आरूढ होऊन पोहण्यामुळे,माझ्या आकांक्षाना खरोखरच एकप्रकारचा भडकावा आणून,मला, माणसाने निर्माण केलेल्या,अनैसर्गिक वातावरणापासून दूर राहून निसर्गाची आणि समुद्राची प्राकृतिक स्थिती अजमावून पहाण्याची संधी मिळते.”
जास्त बोलत राहिलो आणि प्रश्न विचारत राहिलो तर माईकल आणखी एक बाटली उघडल्या शिवाय रहाणार नाही. आणि नंतर देसायांकडे मस्त मास्यांचं जेवण घ्यायला जायला मी जरी चांगल्या स्थितीत असलो तरी माईकल नक्कीच असणार नाही ह्याचा विचार येऊन मीच प्रश्न करण्याचं आवरतं घेतलं आणि त्याला म्हणालो,
“पोटात कावळे कांव कांव करायला लागले.चल आपण देसायांकडे जेवायला जाऊया.ह्या विषयावर पुढल्या खेपेला बोलूया.”
असं म्हणून आम्ही दोघे उठलो.
माझा फ्लॅश-बॅक एरव्ही संपला नसता.
“साब माल मस्त है! आताय क्या?”
हे शब्द माझ्या कानावर पडल्यावर मी जागा झालो.एव्हडा काळोख झाला हे ध्यानातही आलं नाही.
पूर्वीचे गोव्याचे बिच आता राहिले नाहीत हे चटकन माझ्या मनात आलं.
“हांव गोयचोच आसां”
असं त्याला म्हणत मी चालू पडलो.

Sunday, December 5, 2010
आठव माझा येईल तुला जेव्हा
(अनुवादीत)
भिजलेल्या नयनाचे काजळ
अन कचपाशाचा उनाड घननीळ
प्रश्न एकच करतील तुला तेव्हा
आठव माझा येईल तुला जेव्हा
जेव्हा जेव्हा बागेत तू जाशिल
रुदन करताना फुलांना पहाशिल
अपुल्या प्रीतिची पाहुनी दुर्दशा
दव-बिंदूना हंसताना पहाशिल
कांटा फुलाचा कैवारी होईल
आठव माझा जेव्हा तुला येईल
प्रश्न एकच तेव्हा तुला करतील
भिजलेल्या नयनाचे काजळ
अन कचपाशाचा उनाड घननीळ
जमान्या पासून लाख लपविशी
प्रीत अपुली छपविशील कशी
असे नाजुक कांचेसम प्रीत
तोडू जेव्हा अपुली शपथ
कांच तेव्हा खुपसली जाईल
आठव माझा जेव्हा तुला येईल
प्रश्न एकच तेव्हा तुला करतील
भिजलेल्या नयनाचे काजळ
अन कचपाशाचा उनाड घननीळ
श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com
भिजलेल्या नयनाचे काजळ
अन कचपाशाचा उनाड घननीळ
प्रश्न एकच करतील तुला तेव्हा
आठव माझा येईल तुला जेव्हा
जेव्हा जेव्हा बागेत तू जाशिल
रुदन करताना फुलांना पहाशिल
अपुल्या प्रीतिची पाहुनी दुर्दशा
दव-बिंदूना हंसताना पहाशिल
कांटा फुलाचा कैवारी होईल
आठव माझा जेव्हा तुला येईल
प्रश्न एकच तेव्हा तुला करतील
भिजलेल्या नयनाचे काजळ
अन कचपाशाचा उनाड घननीळ
जमान्या पासून लाख लपविशी
प्रीत अपुली छपविशील कशी
असे नाजुक कांचेसम प्रीत
तोडू जेव्हा अपुली शपथ
कांच तेव्हा खुपसली जाईल
आठव माझा जेव्हा तुला येईल
प्रश्न एकच तेव्हा तुला करतील
भिजलेल्या नयनाचे काजळ
अन कचपाशाचा उनाड घननीळ
श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com
Thursday, December 2, 2010
स्पर्श.
“जोपर्यंत आपण कुणाला कसा स्पर्श करावा आणि कसा स्पर्श करून घ्यावा हे शिकत नाही तोपर्यंत आपण आपल्यावर आणि एकमेकावर प्रेम कसं करावं हे शिकणार नाही.”
आज प्रो.देसाई बरेच उदास दिसले.माझ्या आतापर्यंतच्या अनुभवावरून मी ताडलंय, की अशा परिस्थितीत जेव्हा मी त्यांना तळ्यावर भेटतो तेव्हा ते बराच वेळ माझ्याशी बोलत नाहीत.
आता इकडे शरद ऋतू चालू झाला आहे.झाडांची पानं रंगीबेरंगी व्ह्यायला लागली आहेत.प्रत्येक झाडांच्या पानांचा एक एक रंग पाहून निसर्गाच्या कुंचल्याची आणि त्याच्या रंग मिश्रणाच्या तबकडीची वाहवा करावी तेव्हडी थोडीच आहे असं वाटतं.
लवकरच ही रंगीबेरंगी पानं,येणार्या वार्याच्या झुळकीबरोबर,देठापासून तुटून खाली पडणार आहेत.सर्व झाडांच्या फांद्या नंग्या-बोडक्या होणार आहेत.थंडी जशी वाढत जाईल तशी वातावरणात एक प्रकारचा कूंदपणा येणार आहे.
खुपच थंडी पडली की मग आम्ही तळ्यावर फिरायला येत नाही.ह्या वयात तेव्हडी थंडी सोसत नाही.बरेच वेळा मग आम्ही दोघं घरीच भेटतो.
मीच भाऊसाहेबांशी विषय काढून त्यांना बोलकं केलं .
मी म्हणालो,
“भाऊसाहेब, इकडचा शरद ऋतू, निसर्गाला उदास करतो. झाडांची हिरवीगार पानं गेल्यानंतर झाडांकडे बघवत नाही.पक्षीपण दूर कुठेतरी निघून जातात. सर्व वातावरण सुनंसुनं दिसतं.म्हणून मी निसर्गच उदास झाला असं म्हणतो. आपणही काहीसे ह्या दिवसात उदासच असतो.बाहेरची कामं थप्प होतात. कुठे जावंसं वाटत नाही.”
“खरं आहे तुमचं म्हणणं”
असं बोलून प्रो.देसायांनी आपलं मौन सोडलं.
आणि म्हणाले,
“मी बोललो नाही,कारण मी बराच वेळ ह्या शरद ऋतूवर विचार करीत होतो.माझ्या मनात एक कल्पना आली.आता पर्यंत ही झाडांची पानं हिरवी गार होती.वार्याच्या स्पर्शावर ती हलायची. आता हळू हळू वार्याचा वेगही वाढणार आहे. तो वार्याचा स्पर्श त्या पानाना सहन होणार नाही.ती पानं रंगीबेरंगी होत होत काही दिवसानी पडणार आहेत. म्हणूनच ह्या मोसमाला फॉल असं म्हणतात.तुम्हाला आठवत असेल कदाचीत,पण मला आठवतं मी लहानपणी कोकणात रात्रीच्या वेळी पिंपळाच्या झाडावरची पानं वार्याच्या स्पर्शाने सळसळली की घाबरायचो.तसं इथे पिंपळाचं झाड माझ्या पहाण्यात नाही. कदाचीत पिंपळाला इकडची थंडी सोसवली नसती.पण आता ह्या ऋतुत वारा एव्हडा सोसाट्याने वहाणार आहे की,पिंपळाचं झाड असतं तर वार्याच्या स्पर्शाने प्रचंड सळसळ ऐकायला मिळाली असती.”
मी म्हणालो,
“भाऊसाहेब,मला आठवतं,कोकणात आमच्या अगदी लहानपणी आमची आजी ,रात्री आम्ही लवकर झोपावं म्हणून आम्हाला थोपटत असताना पिंपळाच्या झाडाच्या पानांच्या सळसळीकडे आमचं लक्ष वेधून त्या शांत वातावरणातल्या गांभिर्याची भीति घालून म्हणायची,
“मुंजा पिंपळाचं झाड हलवतोय.लवकर झोपला नाहीत तर
तो घरात येईल.”
खरं सांगायचं तर,त्या भीतिपेक्षा आजीच्या थोपटण्याच्या हाताच्या स्पर्शाने आम्हाल झोप यायची.”
“का कुणास ठाऊक,ह्या स्पर्शावरून माझ्या डोक्यात एक विचार सुचला.”
प्रोफेसर जरा मुड मधे येऊन मला सांगायला लागले.
“एखादं लहान मुल रडत असलं तर त्याला नुसता स्पर्श केल्यावर ते ताबडतोब रडायचं थांबतं.एखादी व्यक्ति अगदी शेवटच्या प्रवासात असताना, केलेला स्पर्श तिला किती सांन्तवन दे्तो?,किती दिलासा देतो?,एखाद्याशी नवीन नातं जुळवत असताना केलेला स्पर्श ते नातं अधिक खंबीर व्हायला किती उपयोगी होतं? हे मी अनुभवलं आहे.ह्या स्पर्शाची क्षमता मी जाणली आहे.
कुणालाही आपला हात पुढे करणं किंवा आलिंगन देणं आणि हलो किंवा गुडबाय म्हणणं ह्यावर माझा विश्वास आहे. एखादा जीवश्च-कंटश्च मित्र सोफ्यावर जवळ बसून एकमेकाशी बोलत असताना त्याच्या खांद्याभोवती हात टाकून बसायला मला बरं वाटतं.रस्त्यावरून चालत असताना कुणी चुकून मला धक्का दिला तर “हरकत” नाही म्हणायला मला बरं वाटतं.”
मी भाऊसाहेबांना म्हणालो,
“मला नेहमीच असं वाटतं की स्पर्शाने आपण शाबूत रहातो.
मला असं नेहमीच वाटत असतं की दुसर्याशी स्पर्श झाल्याने ती व्यक्ति आपल्याशी व्यक्तिगत दुवा सांधते,आणि आपण त्या व्यक्तिबरोबर व्यक्तिगत दुवा सांधतो,मानवतेशी दुवा सांधला जातो.
मी पाहिलंय की,स्पर्शाने आपात स्थितीत काम करणार्या व्यक्तिना परिहार मिळतो.साधं हस्तांदोलन केल्याने एकमेकाशी विरोध करणार्या राजकारण्यात समझोत्याच्या सजीवतेची ठिणगी पडून अनेक वर्षाचे तंटे-बखेडे समाप्त होतात.”
माझं हे स्पर्शाबद्दलच मत ऐकून गप्प बसतील तर ते प्रो.देसाई कसे होतील.
मला म्हणाले,
“तुम्ही सांगता ते मला पटतंय.
मी पाहिलंय की स्पर्शाने माझ्याच स्वाभाविक बुद्धिमत्तेचा आणि माझ्या मेंदुतल्या तर्कसंगत हिशोबाचा दुवा सांधला जातो.माझ्या नजरेतून चुकलेलं नाही की,स्पर्शाने माझ्याच संवेदना जागृत होतात. ज्या मी पुर्णपणे हिरावून बसलो असं वाटून घेत असे.
माझी खात्री झाली आहे की,स्पर्शामुळे प्रत्येकात सुधारणा होते, प्रत्येकाच्या संबंधात सुधारणा होते,आणि सरतेशेवटी प्रत्येकाच्या भोवतालच्या जगात सुधारणा होते.
माझी खात्री झाली आहे की प्रत्येकाला जर का सकारात्मक स्पर्शाची जाणिव झाली तर,युद्धाची,जाती-भेदाची, मुलांवर होणार्या अत्याचाराची,स्त्रीयांवर होणार्या अत्याचाराची आणि दुसर्यावर दोष ठेवण्याच्या संवयीची समाप्ती होईल.
स्पर्शाचा विचार केल्यावर माझ्या लक्षात येतं की,स्पर्श माणसाला त्याच्या मनात चांगलं वाटावं,वाईट वाटून घेऊ नये, अशी आठवण करून देतो. आत्मीयतेची भीति मनात असल्याने स्पर्श अनाथ असल्यासारखा आपल्या जीवनात भासतो.माझी खात्री आहे की “तू” आणि “मी” चं “आम्ही” त परिवर्तन करण्यात स्पर्शात ताकद आहे.”
विषय निघाला शरद ऋतूचा.वार्याच्या स्पर्शाचा.पिंपळाच्या पानांच्या सळसळीचा.असं होत होत स्पर्शावर चर्चा वाढत गेली.
काळोख बराच होत आला होता.बोलत बसलो तर हा विषय संपायला बराच वेळ जाईल.म्हणून मी आवरतं घेत म्हणालो,
“शेवटी मी एव्हडंच सांगीन की,जोपर्यंत आपण कुणाला कसा स्पर्श करावा आणि कसा स्पर्श करून घ्यावा हे शिकत नाही तोपर्यंत आपण आपल्यावर आणि एकमेकावर प्रेम कसं करावं हे शिकणार नाही.
माझा स्पर्शावर भरवंसा आहे.”

Monday, November 29, 2010
शुभेच्छा पत्र.
“ज्यावेळी तुमच्या मित्राचं मांजर निर्वतेल,किंवा एखादा जवळचा चांगले गुण घेऊन परिक्षा पास होईल,त्यावेळी त्याला अवश्य प्रसंगाच्या संबंधाने कार्ड पाठवावं.अशा प्रसंगी तुम्ही त्याच्या मनात येता आणि तुम्ही त्याची काळजी घेता हे पाहून त्याला आनंदी करता.”
पोस्टमनने घरात ढीगभर पत्रं आणून टाकली आणि त्यात तुम्हाला एखादं शुभेच्छेचं पत्र असेल तर एका क्षणात तुमचा दिवस आनंदाचा जातो किंवा तुमची लहरपण बदलते.
समजा तुमच्या जीवनातला एखादा दिवस अगदी गचाळ असेल,किंवा तुम्ही नशिबवान असाल तर तो दिवस कदाचीत तुम्हाला आनंद देणाराही असेल, आणि अशावेळी तुम्हाला कुणाचंतरी शुभेच्छेचं पत्र आलं असेल,तर आतुन तुम्हाला नक्कीच बरं वाटतं.
त्यादिवशी माझ्या एका जवळच्या नातेवाईकाला त्याच्या जन्म दिवसा प्रित्यर्थ मी एक शुभेच्छा पत्र त्याला पाठवायचं या उद्देशाने माझ्या एका मित्राच्या दुकानात कार्ड विकत घ्यायला गेलो होतो.मित्र दुकानात नव्हता.त्यांचा विशीतल्या वयाचा मुलगा काऊंटरवर बसला होता.
मला म्हणाला,
“नवल आहे.हल्ली शुभेच्छा संदेश इमेलवरून पाठवतात.त्यामुळे आमच्याकडे असली कार्ड घ्यायला येणारी गिर्हाईकं बरीच कमी झाली आहेत.”
मी त्याला म्हणालो,
“मी त्यातला नाही.शुभेच्छाच द्यायच्या झाल्यास प्रत्यक्ष त्या व्यक्तिच्या घरी जाऊन देण्यात जी मजा आहे ती आगळीच असते.पण सर्वांच्याच घरी जाणं शक्य होत नाही.अशावेळेला निदान शुभेच्छा पत्र आपल्याकडून त्या व्यक्तिला मिळावं अशा विचाराचा मी आहे.”
हे ऐकून तो मला म्हणाला,
“माझ्या लहानपणी मला कुणाची पत्रं येत नसायची.पण माझ्या जन्मदिवशी मला कुणाचं शुभेच्छेचं पत्र आल्यास, किंवा त्यादिवशी माझ्या आजीचं कोकणातून बंद लिफाफा यायचा आणि त्यात थोडे पैसे असायचे अशावेळी मला मी ढगात पोहल्यासारखं वाटायचं.”
आणि पुढे म्हणाला,
“अलीकडे लोक ईमेलने शुभेच्छा पाठवतात.पण मला वाटतं,पुर्वीच्या रीतिप्रमाणे लिफाफ्यावर पोस्टाचा स्टॅम्प असलेलं शुभेच्छा पत्र मिळणं हेच खरं आहे.”
माझ्यापेक्षा लहान असून माझी आणि ह्या मुलाची मत मिळती जुळती आहेत हे पाहून मला विशेष वाटलं.
मी त्याला म्हणालो,
“एखाद्याची तुम्ही किती कदर करता ते अशा पत्रातून दाखवता येतं.मला वाटतं त्यामानाने ईमेलचा तेव्हडा परिणाम होत नसावा.लोक त्यांचं अशा तर्हेचे पत्र इतकं व्यक्तिगत करतात,की त्यांना स्वतःला विशेष समजूनच ते असं पत्र पाठवतात.ज्या व्यक्तिला ते शुभेच्छा पत्र पाठवलं जातं त्याच्या पत्रात मजकूर लिहून त्या पत्र वाचणार्या व्यक्तिला तो मजकूर, आपल्या मनात त्याला विशेष मानुन, लिहिला गेलाय हे भासवायचा त्यांचा खास उद्देश असतो.”
मला म्हणाला,
“खरं म्हणजे माझ्या वडीलांचं ह्या शुभेच्छा कार्डाचं दुकान आहे.पण प्रामाणिकपणे सांगतो की,शुभेच्छा पत्र पाठविण्याच्या माझ्या विचाराशी ह्याचा कसलाच संबंध नाही.
कधी कधी मी माझ्या वडीलांच्या दुकानात असताना,पाहिलंय,कार्ड विकत घ्यायला आलेली गिर्हाईकं कार्डावरचा मजकूर वाचून कधी डोळ्यात पाणी आणतात,कधी चेहर्यावर हंसू आणतात. आणि हे असं होणं, सर्व त्या मजकूरावर आणि वाचणार्याच्या भावनावर अवलंबून असतं.आणि दुसरं म्हणजे,मला माहित आहे की,लवकरच ते कार्ड ज्याला पाठवलं जाणार आहे तोही तसाच डोळे ओले करणार असतो किंवा हंसणार असतो.आणखी एक
म्हणजे, ते शुभेच्छा कार्ड काय म्हणतं हे विशेष जरूरीचं नसून कुणी पाठवलं आणि का पाठवलं हे विशेष असतं.मला असंही वाटतं की शुभेच्छा कार्ड निवडून काढत असताना ती व्यक्तिसुद्धा आनंदी हो्त असते.हे सर्व होत असताना ती व्यक्ति आपल्या जीवनातल्या सर्व कटकटीबद्दल थोडावेळ विसर पडू देऊन, त्या ऐवजी ज्यांना ते पत्र पाठवणार असतात त्या व्यक्ति आपली काळजी घेणार्या असतात हे लक्षात आणून त्यांच्यावर त्याचं लक्ष केंद्रीभूतकरीत असतात.
मी लहान असल्यापासून माझ्या आईने असली मला आलेली सर्व कार्ड जमवून ठेवण्यासाठी एक खोकाच तयार केला आहे.एखादा असाच वाईट दिवस आल्यास मी हा खोका पहातो.आणि माझ्या लक्षात येतं की माझ्यावर प्रेम करणारे आणि माझी काळजी घेणारेकिती व्यक्ति जगात आहेत.
मला ज्यावेळी मुलं होतील तेव्हा मी नक्कीच माझ्या मुलांना हे उदाहरण दाखवून देणार आहे.अर्थात मी माझा हा खोकाही त्यांना देणार आहे.त्यामुळे कदाचीत माझ्या जीवनाकडे त्यांचं लक्ष जाईल आणि मी कोण आणि माझ्यावर प्रेम करणारे कोण ह्याबद्दल त्यांना माहिती मिळेल.”
नवीन घेतलेल्या कार्डाचे पैसे देत मी त्याला म्हणालो,
“मला असं वाटतं,ह्या व्यस्त जगात प्रत्येकजण थकला भागलेला असतो.अशानी आपले काही क्षण वापरून एखादं योग्य शुभेच्छा कार्ड निवडून आपण ज्यांवर प्रेम करतो त्यांना पाठवल्यावर त्यांनाही कळून चुकेल की आपल्या मनात ते किती खास म्हणून टिकून आहेत.
ज्यावेळी तुमच्या मित्राचं मांजर निर्वतेल,किंवा एखादा जवळचा चांगले गुण घेऊन परिक्षा पास होईल,त्यावेळी त्याला अवश्य प्रसंगाच्या संबंधाने कार्ड पाठवावं.अशा प्रसंगी तुम्ही त्याच्या मनात येता आणि तुम्ही त्याची काळजी घेता हे पाहून त्याला आनंदी करता.”

Friday, November 26, 2010
जेव्हा गळाला मासा लागतो
“कधी कधी गळाला लावलेलं सावज, लबाड मासे,गळ गळ्याला लावून न घेता, नकळत खाऊन टाकायचे.”
वेंगुर्ल्याहून आजगांवला जाताना वाटेत मोचेमाड हे गांव लागतं.मोचेमाड येई पर्यंत लहान लहान दोन घाट्या जढून जाव्या लागतात. जवळच्या घाटीच्या सपाटीवर पोहोचल्यावर, त्या डोंगराच्या शिखरावरून खाली पाहिल्यावर, असंख्य नारळांच्या झाडा खाली, छ्पून गेलेलं मोचेमाड गांव दिसतं.पण त्याहीपेक्षा डोळ्यांना सुख देणारं दुसरं विलोभनिय दृष्य म्हणजे मोचेमाडची नदी.
जवळच समुद्र असल्याने ही नदी शेवटी समुद्राला जाऊन मिळते.पण त्यापूर्वी नदीतलं गांवाजवळचं पाणी अगदी गोड असतं.नदीत मासे मुबलक आहेत.समुद्राच्या दिशेने गांवाजवळून गेलेली नदी नंतर गोड-खारट पाण्याची होते.थोडंसं खाडी सारखं वातावरण असतं.त्यामुळे ह्या ठिकाणी मिळणारी मासळी जास्त चवदार असते.नदीतला मासा आणि समुद्रातला मासा यांच्या चवीत जमिन-अस्मानाचा फरक असतो.पण खाडीतला मासा अत्यंत चवदार असतो.
गुंजूले,शेतकं,सुळे ही मासळी लोक उड्यामारून घेतात.त्याशिवाय करड्या रंगाची कोलंबी-सुंगटं-चढ्या भावाने विकली जातात.कारण ती दुर्मिळ असतात.
मी वेंगुर्ल्याला शिकत असताना, माझ्या वर्गातला एक मित्र पास्कल गोन्सालवीस, मला सुट्टीत मोचमाडला घेऊन जायचा.तिथे त्याचं घर होतं. वाडवडीलापासून गोन्सालवीस कुटूंब मोचेमाडला स्थाईक झालं होतं.
पास्कलच्या आजोबापासूनचं नदीच्या किनार्यावर त्यांचं मासे विकण्याचं दुकान आहे.ताजे मासे दुकानात मिळायचेच पण त्याशिवाय दुकानाच्या अर्ध्या भागात तळलेल्या आणि शिजवलेल्या मास्यांचं होटेल होतं.मला पास्कल ह्या दुकानात नेहमी घेऊन जायचा.भरपूर मासे खायला द्यायचा.मला तळलेले मासे जास्त आवडायचे.इकडे लोक तळलेली कोलंबी चहा पितानासुद्धा खातात.
नदीच्या किनार्याजवळच बरीच दुकानं असल्याने,मासे पकडायला जाण्यासाठी लहान लहान होड्या सुंभाने,खांबाला बांधून नदीच्या पाण्यात तरंगत ठेवल्या जायच्या. पाण्यात निर्माण होणार्या लहान लहान लाटांवर वरखाली होताना ह्या होड्याना पाहून मला गरगरायचं.त्यामुळे मला होडीत बसणं कठीणच व्हायचं.
म्हणून पास्कल मला नदीच्या जवळ असलेल्या एखाद्या मोठया खडकावर बसून गळाने मासे पकडण्याच्या कामगीरीवर न्यायचा.वाटेत आम्ही मास्यांविषयीच गोष्टी करायचो.कुठचे मासे गळाला चावतात,कुठच्या जागी चावतात,मास्यांना लुभवण्यासाठी लहान लहान किडे,अगदी छोटे मासे,अगदी लहान सुंगटं एका पिशवीत जमवून ठेवून बरोबर ती पिशवी कशी ठेवावी लागते. गळाला खुपसून ठेवण्यासाठी ती लुभवणी असतात.
गळ,गळाचा हूक,ऐंशीची दोरी,आणि वेताची लवचीक काठी एव्हडा लवाजमा बरोबर घेऊन जावं लागतं.
अलीकडे पास्कल मुंबईला, त्याच्या एका नातेवाईकाच्या लग्नाला, मोचेमाडहून आला होता.त्याच लग्नात त्याची माझी भेट झाली.
मी त्याला माझ्या घरी चहाला बोलावलं होतं.पुर्वीच्या आठवणी निघाल्या.गप्पांना जोर आला.
मला पास्कल म्हणाला,
“आम्ही मासे मारणारे कोळी जास्त सृजनशील असतो.त्याचं कारण अगदी सोपं आहे.गळ पाण्यात टाकून मासा लागण्याची वाट पहात असताना विचार करायला भरपूर वेळ असतो.”
मी पास्कलला म्हणालो,
“रोग आणि त्याच्यावर उपाय,तसंच जागीतीक संघर्ष सोडवण्यासाठी योजले जाणारे उपाय,गळाला मासा लागण्याच्या प्रतिक्षेच्यावेळी केले गेले आहेत.असं मला कुणीतरी सांगीतल्याचं आठवतं.कदाचीत ही अतीशयोक्ति असेलही.”
मला पास्कल हंसत हंसत म्हणाला,
“फीश टॅन्क ऐवजी थिंक टॅन्क म्हणायला हरकत नाही.”
आणि पुढे म्हणाला,
“कुणीसं म्हटल्याचं आठवतं की, गळाला मासा लागायची वाट बघत असताना,व्यस्त राहिल्याने,डोक्यात आलेले सर्व विचार कागदावर टिपून ठेवायला वेळ मिळाला असता तर खूप शोध लावता आले असते.कारण एकदा का गळाला ओढ लागली की मनं बदलून जायची.गळाच्या काठीला किती ओढ असायची यावर लागलेल्या मास्याचा आकार-विकार समजून घेण्यात,अन्य विचारावर स्थिरावलेलं मन, सर्व काही विसरून जाऊन मास्याकडे केंद्रीभूत
व्ह्यायचं.
पास्कलच्या हाटलात तळलेली कोलंबी भरपूर विकली जायची आणि आताही जाते.थाळीतून दिलेली कोलंबी डझनावर मोजली जायची.एक डझन हवी,दोन डझन हवी अशी ऑर्डर मिळायची.
पास्कलच्या हाटेलात मास्यावर ताव मारताना पास्कलबरोबर माझ्या गोष्टी व्हायच्या.मला ते आठवलं.ते सांगीतल्यावर पास्कल म्हणाला,
“आम्ही मासे मारणारे कोळी,जास्त आशावादी असतो.बराच वेळ पाण्यात टाकून राहिलेला गळ मधेच कधीतरी वर काढून घ्यायचो.कधी कधी गळाला लावलेलं सावज, लबाड मासे,गळ गळ्याला लावून न घेता, नकळत खाऊन टाकायचे. तसं काही तरी झालं असावं ते तपासून पहाण्यासाठी गळ पाण्याच्या वर काढायचो.त्यामुळे पहिल्यांदा गळाला लागलेला मासा आणि दुसर्यांदा लागणारा मासा ह्याच्या मधल्या समयात गळ पाण्याबाहेर काढून
तपासण्याचा आणि लागलीच गळ पाण्यात टाकण्याचा एक उद्दोग करावा लागायचा. आठ,आठ तासात एकदाही गळाला मासा न लागणं हे थोडं जिकीरीचं काम वाटायचं.तरीपण आम्ही आशा सोडत नसायचो.कधी कधी आम्ही सूर्योदय पाहिल्यापासून सुर्यास्त पाही पर्यंत पाण्यात गळ टाकून बसतो.जमतील तेव्हडे मासे टोकरीत टाकतो. दिवसभरात पक्षी उडताना दिसतात,मोचेमाडच्या नदीतून खपाटे,गलबतं माल वहातुक करताना दिसतात. त्यामुळे दवडल्या गेलेल्या वेळात कमी मासे मिळाले तरी दिवस अगदीच गचाळ गेला असं वाटत नाही.
गळाला मासे लागणं, हे जणू कसलीच वचनबद्धता न ठेवता स्वर्गाला पोहचल्या सारखं वाटणं.गळाला थोपटलं गेलं, झटका मिळाला,खेचाखेची झाली की समजावं खरा क्षण आला.ऐंसाची लांबच लांब दोरी,लवचीक काठी आणि कमनशिबी गळाला लावलेलं सुंगट, ही सर्व सामुग्री जणू कर्ज फेडीचं धन आहे असं वाटतं.पाण्यातून खेचून आलेला मासा बसल्या जागी आणल्यावर थोडासा विराम घेता येतो.तत्क्षणी काहीतरी प्रचंड झाल्याची ती जागरूकता असते.
पेनिसिलीनचा शोध नसेल,चंद्रावरचं पहिलं पाऊल नसेल पण काहीसं खरंच महान झाल्यासारखं वाटतं.निसर्ग माउलीच्या डोळ्यात धुळ फेकून विनासायास तिच्या कडून बक्षिस मिळालं असं मनात येतं.दोरीच्या शेवटी गळाला लागलेला ऐवज पाहून आपल्या चातुर्याची साक्ष मिळाली असं वाटतं.
पण तो ऐवज,म्हणजे तो तडफडणारा मासा, जरका,मनात भरण्यासारखा नसला किंवा त्याची जास्त तडफड पाहून दया आल्यास पुन्हा पाण्यात सोडून दिला जातो,कदाचीत इतर मास्यांना आपली कर्म कथा सांगायला त्याला मोकळीक दिली गेली असं समजलं तरी चालेल.
हल्ली,हल्ली तर ज्याच्या त्याच्या हाटलात,एका बोर्डावर,आपल्या गळाला लागलेला मोठ्यात मोठा मासा दाखवून फोटो काढला जाऊन,आपल्या कडून विशेष कामगीरी झाल्याचं प्रदर्शन म्हणून चिटकवलं जातं.नदीच्या किनार्यावर बसून निरनीराळे कोळी निरनीराळे मासे हातात धरून फोटो काढतात.
प्रत्येक फोटोत कोळ्याच्या चेहर्यावरचं हास्य बोलकं असतं.”
उठता उठता मला पास्कल म्हणाला,
“वेळ काढून तू नक्की चार दिवस रहायला मोचेमाडला ये.
तुझ्या जून्या आठवणींची उजळणी होईलच शिवाय आता मोचेमाड किती सुधारलंय ते तुला दिसून येईल.”
“लवकरच येईन “
असं पास्कल मी सांगीतलं.

Subscribe to:
Posts (Atom)