Sunday, December 18, 2011
"का राणीच्या डोळा तेव्हा दाटुनि आले पाणी?"
Thursday, December 15, 2011
निचे मुंडी नाणी धुंडी
Monday, December 12, 2011
त्या वडाच्या झाडाखालच्या आठवणी.
Friday, December 9, 2011
झाडा संगत चालणं.
Tuesday, December 6, 2011
विजयचं शहाणं खूळ
“कदाचीत काहीना निसर्गाचं महत्व माहित नसावं,किंवा काहींची ह्या जीवनाशी ओळखही झाली नसावी.”
जेव्हा पहावं तेव्हा विजय आणि त्याचं कुटूंब देशात कुठेतरी सहलीवर गेले आहेत असं ऐकायला यायचं.मुलांना सुटी नसेल तर विजय एकटा कुठेतरी सहलीवर जाऊन यायचा.मात्र सुट्टी लागल्यावर सर्व कुटूंब सहलीवर जायचं.त्या त्या जागी सर्व ऋतूत कसं वाटतं हेही पहायला त्याचं कुतूहल कमी पडत नसायचं.कोकणातला पावसाळा,काश्मिरमधला बर्फ पडण्याचा मोसम, चेरापूंजीला अतोनात पाऊस पडत असताना,हिमाचल प्रदेशात फळफळावळचा सिझन असताना असं हे साधून तो सहली काढायचा.
एकदा मी विजयला मुद्दाम विचारलं,
“अशा ह्या सहली काढणं म्हणजे एक प्रकारचं खूळच आहे असं मला वाटलं तर ते गैर होईल का?”
माझं हे ऐकून विजयला राग येईल असं मला वाटलं होतं.उलटपक्षी त्याचा चेहरा आनंदलेला दिसला.
मला म्हणाला,
“मला हा असा प्रश्न तुम्हीच विचाराल ह्याची मला खात्री होती.कारण इतक्या लांबून ज्याज्या वेळी तुम्ही माझ्या घरी यायचा तेव्ह तेव्हा दाराला मोठं कुलूप बघून कोण वैतागणार नाही?. आणि शेजार्याकडे चौकशी केल्यावर विजय सहलीवर गेला आहे ऐकल्यावर नक्कीच वैताग येणार.
हो! माझं हे सहलीवर जाणं हे एक खूळच आहे.पण कुठचीही गोष्ट कारणाशिवाय नसते.ह्या खूळालाही एक कारण आहे.”
विजयच्या वडीलांनी अर्ली-रिटायर्डमेंट घेतली होती.आणि ते शहरातला ब्लॉक विकून गावात रहायला गेले होते हे मला माहित होतं.विजय त्यावेळी लहान होता.त्यांनी विजयच्या आजीआजोबांच्या शेतीवाडी जवळच एक टुमदार घर घेतलं होतं.आणि ते तिथेच कायमचे रहायला गेले होते.विजयच्या लहानपणचं जीवन हेच तो कारण सांगणार ह्याचा मला अंदाज होता.
मला विजय म्हणाला,
“मुक्काम-पोस्ट बदलणं म्हणजे कुणालाही वैतागल्यासारखं होणं स्वाभाविक आहे.जास्त करून दहाएक वर्षाच्या वयावर.
शहरातला रहाता ब्लॉक सोडून देऊन कुठच्या कुठे रहायला जायचं म्हणजे महाकठिण म्हणावं लागेल.मला आठवतं ज्या टॅक्सीतून आम्ही जात होतो,त्या रात्रीच्यावेळी आजुबाजूने पास होणार्या गाड्यांच्या आवाजाने आणि खड्डे ,खळगे संभाळीत जाताना गाडीला मिळणार्या हेलकाव्याने,त्या टॅक्सीत झोप येण्याऐवजी,आजुबाजूच्या शेतातल्या बेडकांच्या डरांव,डरांव आवाजाने आणि किड्यामकोड्यांच्या किर्र ओरडण्याने माझ्या डोक्यात त्यावेळी त्या आवाजांचे प्रतिध्वनी ऐकायला येत होते.
शेवटी मला दिलेल्या चार भिंतीच्या एका खोलीत मी मलाच जखडून घेतलं होतं.मी अगदी भयभीत आणि बेचैन झालो होतो.ह्या नव्या जागेतलं माझं भवितव्य काय असावं हे माझं मलाच कोडं झालं होतं.
जसजसे दिवस जात होते तसतसं माझ्याच मनात कुतूहल निर्माण होत गेलं.घराला बाल्कनी नव्हती.घराभोवती फेन्सिंग नव्हतं.रस्त्यावरून बसीस जाताना दिसत नव्हत्या.लोकांचा गलबलाट नव्हता.टीव्हीचं कोकाटणं नव्हतं.सगळं कसं शांत शांत होतं.सकाळीच गाईचं हंबरणं,कोंबड्यांच्या बांग, पक्षांची किलबिलाट,कुक्कुट-कोंबड्याचं अंतराअंतराने ओरडणं ह्याच गोष्टी कानावर यायच्या. हे ऐकून मन प्रसन्न व्हायचं हे मात्र निश्चित.
माझ्या अवतिभोवतीचा परिसर पहायची मला उत्सुकता होती. आम्ही आलो हे ऐकताच माझा मामा आमच्या घरी आला होता.माझ्या आजीआजोबांचं घर जवळच होतं.त्याच्या बरोबर मी त्यांच्या शेतावर गेलो.पायवाटेच्या दोन्ही बाजूला सूंदर हिरवी गार भाताची रोपं दिसली.एका कुणग्यात माझी आजी काम करताना मला दिसली.तिने मला पाहिल्यावर हातातलं सर्व टाकून माझ्याकडे लगबगीने आली.खूप दिवसानी माझ्या आजीला पाहून मला जो आनंद झाला तो क्षण मी कधीच विसरणार नाही.
माझा हात तिच्या हातात घेऊन मी आणि माझी आजी आम्ही दोघं रानातून जायला निघालो. वाटेत एक नैसर्गिक झरा वहाताना पाहिला.त्याच्या पाण्याच्या प्रवाहाबरोबर मी आणि माझी आजी पुढे पुढे जात राहिलो.त्या झर्याचं ते सर्व पाणी एका लहानश्या तलावात जमत होतं. आजीने मला तळ्याच्या काठी बसवलं आणि त्यात पोहणारे लहान मोठे मासे दाखवले.असं करत करत मी आणि माझी आजी त्यांच्या घरी आलो.सर्व परिसरात जोमात येऊन बहरलेली वनस्पती मला दाखवायची माझ्या आजीला इच्छा होती असं वाटलं.
शहर सोडून ह्या गावात आल्याबद्दल आता मला मुळीच वैताग वाटत नव्हता.जवळ जवळ ह्या वातावरणात मी आधीन झालो होतो,आहारी गेलो होतो.
शहरात ह्यापूर्वी असा अनुभव मला कधीच आला नव्हता.माझ्या अवतिभोवती अपक्षय आणि पुनर्जीवन होत असताना मला दिसत होतं.
कधीच अंत न होणारं कालचक्र,जन्म,जीवन,अंत आणि पुन्हा पुनर्जीवन ह्याचं दृष्य पहायला मिळत होतं.निसर्ग हेच माझं आश्रयस्थान झालं होतं.
जीवनातले तणाव आणि मागणी यापासून मी सहजच सुटका करून घेत होतो.आणि त्याचबरोबर मनाला विस्कळीत करणार्या विचाराना अडथळा आणीत होतो.हा निसर्गाशी जुळणारा माझा बंध माझ्या अख्या बालपणात वृद्धिंगत होत होता.उन्हाळ्याच्या दिवसात रानात हुदडणं,झर्याच्या पाण्यात पोहणं आणि झाडावर चढणं ह्यात दिवस जात होते.
आता ह्या वयावर निसर्गाचं देणं काय असतं त्याची प्रशंसा करणं खरोखरच जास्त सोपं जात आहे.आता माझ्या कुटूंबाबरोबर मी देशात जमेल तिथे सृष्टीसौन्दर्य पहायला अक्षरशः धावळपळ करीत असतो.धावपळ येवढ्यासाठीच की जसं वय होत जातं तसा प्रवास आणि दगदग जमत नाही.हे होण्यापूर्वीच इच्छा पूरी करून घेणं बरं असं उगाचच मनात येत असतं.
आम्ही देशातल्या सर्व राज्यात एकापाठून एक सहली काढीत आहो.कुठे प्राचिन गुहा दिसल्या की त्यात सरपटत जाऊन पहाणं,कुठे मोठे तलाव दिसले की त्यात मासेमारीचा छंद पुरवून घेणं, डोंगरावरून वाट फुटेल तिथे वरवर चालत जाणं,जाताना अपरिचीत दिसणारी वनस्पती,पक्षी न्याहळून पहाणं,समुद्र चौपाटीवर जाऊन सूर्योदय तसंच सूर्यास्त पाहून घेणं,हे करायला देशाच्या पूर्व आणि पश्चिम किनार्यावर जाणं, असं हे आमचं सारखंच चालू आहे.निसर्ग माझ्या जीवनात माझ्या स्वास्थ्याचं,माझ्या सुखासमाधानीचं गुणसंवर्घन करीत असतो,मला मार्गदर्शन करतो, रोजच्या धकाधकीच्या जीवनात मला प्रेरणा देतो असं मला वाटतं.
मी म्हणतो त्याचा अनुभव घेतल्याशिवाय जाणीव होणार नाही.सध्या आपण अतिवेगवान दुनियेत वावरत असतो.ह्या कटकटीच्या आणि खडतर जीवनात माणसं एव्हडी गुंतून गेली आहेत की, निसर्गरम्य जीवन असतं ह्याचा त्यांना विसर पडत चालला आहे.लोकांचं लक्ष विचलित झालं आहे असं मला वाटतं.कदाचीत काहीना निसर्गाचं महत्व माहित नसावं,किंवा काहींची ह्या जीवनाशी ओळखही झाली नसावी.
माझ्या बालपणाच्या जीवनातल्या अनुभवावरून मी म्हणेन,आपण निसर्गाचा आदर केला पाहिजे, निसर्ग सौन्दर्याच्या कल्पना मनात आणून शोधमोहीम काढून त्यात पूर्णपणे तल्लिन होऊन गेलं पाहिजे.निसर्गाच्याच उपचारात्मक स्वरूपात आनंद घेतला पाहिजे असं मला वाटतं.”
विजयचं हे सर्व ऐकून घेतल्यावर मला त्याच्या खूळाची कल्पना आली.मला कुणाच्यातरी कवितेच्या दोन ओळी आठवल्या.
मी त्याला म्हणालोही,
“तुझे नाही इथले काही, अदृष्टातून आले कूळ
आदीम अंतीम सत्याला की जसे लगडते शहाणे खूळ!”
श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Posted: Wed, 07 Dec 2011 01:58:36 +0000

Saturday, December 3, 2011
जीवनातलं परिवर्तन.
“जीवनातल्या ह्या परिवर्तनामुळेच माफ करणं आणि माफ करून घेणं सोपं होतं.परिवर्तनामुळेच मी माझा उदय करून घेऊ शकते.”
पद्मजा,गिरीजा आणि तनुजा ह्या पटवर्धनांच्या तीन मुली.
पटवर्धनानी त्यांना उत्तम शिक्षण दिलं.मोठ्या दोन मुलींची लग्नपण करून दिली.आणि एकाएकी ऐन उमेदीत असताना पटवर्धनाना मोठा हृदयाचा धक्का येऊन त्यातच त्यांचं निधन झालं.
पटवर्धनांच्या पत्नीला हा धक्का सहन झाला नाही.तिने अंथरूण धरलं.तनुजाने आपल्या लग्नाचा विचार सोडून दिला.आईची सेवा करण्यासाठी तिने आपलं उर्वरित आयुष्य खर्ची घालायचा पक्का निर्णय घेतला.
मी पटवर्धनांकडे अधुनमधून जातयेत असायचो.तनुजाने घेतलेल्या निर्णयाबद्दल मी तिला बरेच वेळा समजूत घालण्याचा प्रयत्न केला.
“आईची सेवा दुसर्या कुणाकडून करून घ्यायची कल्पनाही मला सहन होत नाही.जिने आपल्याला या जगात आणलं,ती स्वतः अशा असाह्य परिस्थितीत असताना माझ्या जीवनात दुसरी कसलीही मजा मला आनंद देऊ शकणार नाही.”
असं मला तनुजाने एकदा सांगीतलं होतं.मी पण तिच्या ह्या म्हणण्यावर खूप विचार केला होता.
मी तनुजाला एकदा म्हटल्याचं आठवतं,
“जेव्हा माणूस आपल्या जवळच्या माणसाची देखभाल करताना ते काम आहे असं समजून देखभाल करतो,त्यावेळी तो चिडचीडाही होऊ शकतो.पण तीच देखभाल तो सेवा म्हणून करतो त्यावेळेला तो मनोभावे काम करतो.असा माझा अनुभव आहे.”
सेवा करीत असताना जेव्हा जीवनात परिवर्तन येत असतं त्याचा अनुभव कसा वाटतो ते मला सांगावं असं मनात आल्याने ह्यावेळेला मी तिला भेटायला गेलो होतो त्यावेळेला तनुजा मला सांगत होती.
“येत रहाणार्या परिवर्तनाचा स्विकार करणं आणि ते अंगीकारणं ह्याची आपल्या अंगात क्षमता असणं हा एक आपल्या जवळ असलेला खजिना आहे असं मला वाटतं.
गाडी काढून गावोगाव फिरायला जाणं,पालक बनणं,जॉब बदलणं,घर बदलणं त्यापुढे जाऊन जीवनाचा दृष्टीकोन बदलणं,जीवन आरामदायी आहे आणि सुरक्षीत आहे मग धडपड कशाला हवी?,आहे त्यात स्थिर होऊन रहाणं ह्या असल्या गोष्टी काहींना सुखकर वाटतात.
माझ्या लहानपणी मला व्यवस्थितपणे रहाण्याची आणि कुठच्याही गोष्टीची ठोस माहिती असावी ह्या गोष्टींची तीव्र इच्छा असायची.बर्याच मुलांना ती असते.माझ्या तीन बहिणींनी आणि मी जीवन कधीच कंटाळवाणी करून घेतलं नाही.असं करण्याचा एक भाग म्हणजे माझी आई.ती सतत बिछान्यावर झोपून असते.आश्चर्य म्हणजे माझी आई मला प्रेरणा आहे.वातावरण आनंदाचं असो वा दुःखाचं, माझ्या आईचं कोलाहलाचं जीवन असल्याने तिचं ते जीवन कोणत्याही परिवर्तनाभोवती फिरायला अक्षम आहे.तिच्या आजारावर दिलं जाणारं औषधच मात्र तिच्या प्रखर किंवा निम्न विचाराना परावृत्त करणारं ठरतंय.ह्या औषधापायी तिला,खूपच शांत रहायला,खूपच बेचैन व्ह्यायला,खूपच थकून जायला,खूपच जागरूत रहायला,खूपच भावुक व्हायला, खूपच संयमशील रहायला अटकाव येतोय. खरोखरंच,औषधामुळे तिचं अस्तित्वच नाकारलं जात आहे.
माझ्या पूर्या जीवनात माझ्या आईला मी संघर्ष करताना पाहिलं आहे.आत्ता तिच्या सहासष्ट वर्षावरच्या उतार वयात तिच्या डोळ्यात रिक्तता आणि खिन्नता दिसून येते.ती मला सांगते की तिच्या अतिमहत्वपूर्ण भावना म्हणजे,रटाळ जीवनाशी चिकटून रहाणं,कुणाशीही मैत्री करण्यात पुढाकार न घेण्याची वृत्ती ठेवणं नवीन काही शिकायलापण हिरीरी नसणं.तिला आठवतं,उत्साहपूर्ण रहाण्याचं,धुंदफुंद रहाण्याचं तरूण वयातलं आत्यंतिक धडपडणं,ती औषधं घेत राहिल्याने संपूष्टात आलं.तिचं आयुष्य आता स्थिर झालं आहे आणि अंगातली ठिणगी विझून गेली आहे.तिच्या जीवनात परिवर्तन असावं अशी जरी तिची तीव्र इच्छा असली तरी तिच तिची मोठी भीती झाली आहे.
ज्या खडतर परिस्थितीतून माझी आई जात आहे ते पाहून,आणि तिचं दुःख हलकं करण्यात मी हतबल होत आहे ते पाहून माझ्या लक्षात एक गोष्ट आली की जीवन म्हणजेच एक परिवर्तन आहे.जीवन असंच चालत रहाणार. जीवनात कसलंच आश्चर्य नसणार अशा समजुतीवर रहाणं ह्या विचाराने माझं मन सुन्न होतं.जीवनात परिवर्तन येत राहिल्याने ते जगावं असं वाटतं.उत्कंठा प्रबल होते.अन्यायाशी दोन हात करता येतात.निरुत्साहावर उपाय साधता येतो.सरतेशेवटी जीवनात येणार्या परिवर्तनाने जो भरदारपणा येतो त्याच्याविना रहाण्याची कल्पनाच करवत नाही.येणारा प्रत्येक नवा दिवस, नवीन अनुभव,नव्यांची भेट,अनपेक्षीत सुख,आकस्मिक दुरभाग्य घटना, अश्या गोष्टी आणतो.
हे तितकच खरं आहे की,परिवर्तनातून मिळणारे धडे शिकायला जरा कठीण असतात.जीवनात पुढे पुढे सरकण्यासाठी तो धोका पत्करायला माझी तयारी आहे.कारण त्याच्या बदल्यात मिळणारं इनाम विस्मयकारक असतं.ह्या परिवर्तनामुळेच माझं काही चुकलं असेल तर ते मान्य करायला मला धीर येतो.कुणाला मी दुखवलं असेन किंवा कोण, कोणत्या दृष्टीकोनातून बोलत असेल ते समजून घेण्यात मी असफल झाली असेन अशावेळीही माझी चुक कबुल करायला मला धीर येतो.जीवनातल्या ह्या परिवर्तनामुळेच माफ करणं आणि माफ करून घेणं सोपं होतं. परिवर्तनामुळेच मी माझा उदय करून घेऊ शकते.
परिवर्तनातल्या गोष्टी अज्ञात असल्याने काही प्रमाणात परिवर्तनाची भीती वाटते. पूर्वानुमान काढण्याच्या क्रियेला हे परिवर्तन बाधा आणते.पण माझ्या आईच्या नीरसता आणि निश्चलता ह्या गोष्टींचा विचार केल्यावर माझ्या आईच्या परिस्थितीची मला आठवण येते.
आईला लागणार्या कष्टांची आठवण येते.त्यामुळे मी परिवर्तनातल्या अज्ञात गोष्टींना जास्त संमत्ती देते.कारण परिवर्तनातल्या अज्ञात परिस्थितीत चाणाक्ष राहिल्यास उपचार,आशा आणि नवजीवन मिळण्यासाठी येणार्या संधीच्या गुंत्याला उकलता येतं.माझ्या आईने मला हेच शिकवलं आहे.”
तनुजाने तिच्या आईची इतकी वर्षं सेवा करीत असताना घेतलेल्या अनेक अनुभवातून जीवनातलं परिवर्तन आणि त्या परिवर्तनातली अज्ञानता ह्याची तुलना आणि जीवन जगत असताना पूर्वानुमान काढून जगण्यात वाटणारी मजा ह्या मधला फरक फारच सुंदर शब्दात सांगीतला.मी तिची पाठ
थोपटली.
श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com