गावात आमच्या घराच्या बाजूला महारवडाची आळ होती.गरिब महार आणि चांभार जातीचे लोक बारिकबारिक धंदे करून आपली गुजराण करीत असत.त्यांची लहान लहान मुलं त्या आळीच्या बाहेर येवून मधल्या एका मोठ्या मैदानात खेळायला येत असत.आम्ही पण त्याच मैदानात क्रिकेट खेळत असूं.बाउंडरीवर बॉल मारला की लहान लहान मुलं बॉल परत फेकायची.अशा तर्हेने आमची ह्या मुलांशी दोस्ती झाली होती.सोन्या हा बाबू महाराचा मुलगा.
सोन्याची आई कधीकधी बांबूच्या पट्याची काही खेळणी आणि सुपे,रवळ्या टोपल्या सारख्या गोष्टी घेवून दारो दार विकायला जायची.त्यावेळी हा सोन्या तिच्या कंबरेवर बसण्याच्या वयाचा होता.तेव्हा पासून मी त्याला पाहिला होता.
त्याच्या आईचा आवाज,
“सुपा रवळ्यो टोपल्यो होयेत गे आई?”
असं घरासमोर मोठ्याने ओरडून माझ्या आईला बोलवावयाची.माझी आई तिच्या कडून एखाद दुसरी वस्तु विकत घ्यायाची.
“एकादी फाटकी पैरण नाय तर चड्डी माझ्या सोन्याक नेसूक आसा काय गे आई?”
हे ऐकून माझी आई माझे किंवा माझ्या धाकट्या भावाचे जूने कपडे तिला द्दायची.तर अशा परिस्थितीत वाढलेला हा सोन्या त्या दिवशी मला व्हि.टी. स्टेशनच्या हारभरच्या प्लॅटफॉमवर भेटला.
इतक्या वर्षानी दिसल्यावर ओळख कशी पटायची हा पण योगायोगच म्हटला पाहिजे.गाडी लेट झाली असल्याने तो बसला होता त्याच्या जवळच मी बाकावर बसलो.हारभर गाड्या नेहमीच लेट असतात ह्या विषयावरून आमचं बोलणं सुरू झालं.आणि त्याची बोलण्याची स्टाईल आणि हसंण्याच्या लकबीवरून माझी स्मृती तिस पसतिस वर्षावार गेली.राहवलं नाही म्हणून मीच त्याला विचारलं,
“तू सोन्या महार का रे?”
तो हो म्हणाल्यावर सहाजिक माझी ओळख करायला तो उत्सुक्त झाला.मला त्याने बरोबर ओळखलं.मग काय जुन्या आठवणीना कहर यायला लागला.दोघानी ठरवलं की आपण कुठे तरी निवांत बसून बोलूंया.क्राफोर्ड मार्केटच्या सदानंद रेस्टॉरंट मधे बसून बोलुंया म्हणून आम्ही तिकडे जायला निघालो.संध्याकाळची वेळ होती. ऑफिसीस सुटल्यामुळे त्या रेस्टॉरंट मधे त्यामानाने गर्दी कमी असायची.एका निवांत जागी बसून दोन चहाला ऑर्डर देवून बोलायला सुरवात केली.जुन्या गोष्टी संपल्यावर मी त्याला विचारलं,
“तू आता काय करतोस?”
त्यावर सोन्या म्हणाला,
“गावाहून इकडे मुंबाईला आम्ही सर्व भावंडं आलो.आमचे आई बाबा दोघंही त्यापूर्वी निर्वतले.
इकडे आल्यावर आंम्ही सर्व आमच्या काकाच्या घरात ठाकूरद्वारला रहायला गेलो.चर्नीरोड स्टेशनच्या समोर पारसी अग्यारी वाडीत राहत होतो.
स्वतःच्या भूतकाळापासून स्वतःला दूर ठवणं हे जरा चमत्कारीक वाटतं.
एक दलित माणूस म्हणून मलाच नव्या जगात मी पहातो.मला वाटतं शिक्षणात अशी क्षमता आहे की हे शिक्षण एखाद्दाच्या जीवनात पूर्ण बदलाव आणू शकतं.
मला शिक्षणामुळे ह्या दलित जमातीतल्या जगातल्या एखाद्या सशाच्या बिळातून सुटका करून घेतल्या सारखं वाटतं.मी दीडशे किलोचा भरभक्कम त्या बिळातून सुटलो आणि इतरानी माझ्या पाठोपाठ यावं असा अपेक्षीत राहिलो.आणि आता त्या ऐवजी मलाच मी एका अनोळखी प्रदेशात येऊन,जास्त करून माझा मी राहून ह्या नवीन जीवना बद्दल आश्चर्य करीत राहिलो.
उदाहरणार्थ अलीकडे मी छोट्या छोट्या नाटकात भाग घेऊन पुर्वीच्या झोपडीतल्या चालू करमणुकीतून बाहेर पडलो.मी आता बारबालाच्या कार्यक्रमापासून दूर राहत गेलो.कारण आता मला स्त्रीमुक्तिच्या आंदोलनात डोकाऊन पाहून लक्षात आलं की तसल्या कार्यक्रमातून मिळणारी चेतना त्या स्त्रीयांच्या होणार्या शोषणाचं चिंतन करून फिकी वाटू लागली. अमली पदार्थ वाटणारा तो मवाली मंद दिव्याच्या प्रकाशात मोठ्या डीलर कडून ते पदार्थ घेऊन रेंगाळणारा तो आता त्याचंकाय झालं असेल.?
मी मात्र आता लायब्ररीत दलित लेखकांची पुस्तकं वाचण्यात मग्न असतो.आणि जुने माझे दोस्त आता तुरूंगात जीवन कष्टीत असावेत.
तसा मी मला नशिबवान समजतो कारण असलं काही मुर्खासारखं करून पकडला गेलो नाही.असाच मी जेव्हा रस्त्यावर मोकाट फिरायचो तेव्हा मला असलं काही करण्यात एक्सपर्टच समजत नव्हतो.परंतु त्या तारुण्याच्या काळात मी एका मुलीवर कविता लिहिल्याचं आठवतं.तिला माझा पूर्ण तिटकारा का येतो हा त्या कवितेचा आशय होता.ती कविता मी लोकल मासिकात प्रसिद्धिला दिली.त्यावेळी मला व्याक्रण म्हणजे काय आणि कवितेतले यमकासारखे बारकावे तरी काय हे काही समजत नव्हतं.
म्हणून मी पुन्हा शाळेत जाऊन हे शिकायला लागलो आणि एकातून एक निघायला लागलं.
माझी रस्त्यावरची दादागिरी आता हळू हळू जशी वाफ विरळ होऊन लोप पावते तशी व्हायला लागली.चांगल्या जीवनासाठी जगण्याची माझी इच्छा बळावत गेली.
आता सुद्धा मी झगडतोय पण निराळ्या प्रकारची लढाई आहे.लिहिण्या वाचण्याचे फायदे मला आता कळायला लागले आहेत.चर्चा करणं व्याख्यानं ऐकण्याचेही फायदे मला कळायला लागले आहेत.
माझी ही नवी लढाई आणि रणांगणं म्हणजे दलितांच शोषण,गरीबी,स्त्रीयांच शोषण आणि जातपातीचा धिक्कार अशा पॉलीसीवर चालू राहिली.मला वाटतं मी स्वतःच जागतं बोलतं -शिक्षणात असलेल्या क्षमतेमुळे माणसाचं परिवर्तन कसं होतं ह्याचं- उदाहरण होऊन बसलो आहे.माझी खात्री आहे की नव्या चहर्यांच पीक कॉलेज मधे आलं की मला ते प्रोफेसर म्हणून संभोततील.कदाचीत त्या हॉल मधे मी एकटाच दलित चेहर्याचा आणि दलित जमातीतला असेन.कदाचीत मला वेगळा पडल्याचा डंक दुखवत राहिल.पण मी त्या डंकाशी दोन हाथ करीन.कारण मला त्या बदलावर विश्वास बसला आहे की जो शिक्षणाने आलेल्या क्षमतेमुळेच होवू शकतो.
“सोन्याचं हे सर्व ऐकून मी खरोखरंच अचंबित झालो.म्हणतात ना,
“शेणातले किडे शेणात राहत नाहीत”
तसंच सोन्याचं पारिवर्तन एका सुशिक्षीत माणसात झालं.
श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com
Sunday, August 31, 2008
Friday, August 29, 2008
हे थेंब नसूनी असती तारे
हे थेंब नसूनी असती तारे
येती आकाशगंगे मधूनी सारे
एकावेळी शंभर शंभर उतरती
गगनामधूनी तुझ्याच अंगावरती
मोत्यापरी थेंब नभातूनी दमकत येती
वा कभिन्न रात्री काजवे चमकती
जसे पदरामधे शिरती तुफान वारे
हे थेंब नसूनी असती तारे
येती आकाशगंगे मधूनी सारे
जवळी बसून मला तू सुंदर दिसशी
हाताच्या विळख्यात तू तस्वीर होशी
जसे प्रतिबिंबामधे दिसती अनेक चेहरे
हे थेंब नसूनी असती तारे
येती आकाशगंगे मधूनी सारे
श्रीकृषण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com
येती आकाशगंगे मधूनी सारे
एकावेळी शंभर शंभर उतरती
गगनामधूनी तुझ्याच अंगावरती
मोत्यापरी थेंब नभातूनी दमकत येती
वा कभिन्न रात्री काजवे चमकती
जसे पदरामधे शिरती तुफान वारे
हे थेंब नसूनी असती तारे
येती आकाशगंगे मधूनी सारे
जवळी बसून मला तू सुंदर दिसशी
हाताच्या विळख्यात तू तस्वीर होशी
जसे प्रतिबिंबामधे दिसती अनेक चेहरे
हे थेंब नसूनी असती तारे
येती आकाशगंगे मधूनी सारे
श्रीकृषण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com
Wednesday, August 27, 2008
पुन्हा एकदा आमचे मित्र श्रीयुत. “मी, माझे, मला”
आज पुन्हा आमचे दोस्त श्रीयुत.”मी,माझं,मला”,
एका कार्यक्रमात भेटले.कार्यक्रम संपल्यानंतर आम्ही परत घरी जायला निघालो.वाटेत इतर काही गप्पा झाल्यावर मी त्यांनासहज विचारलं,
“सध्या कसला विषय डोक्यात घोळत आहे.?”
माझा प्रश्न संपतो न संपतो तोच मला हे आमचे दोस्त म्हणाले,
“आता विचारलंत तर चला मी काय ते सांगतो.जवळच्या गुरूप्रसाद रेस्टॉरंट मधे बसून गप्पा मारुया.”
मनात म्हणालो,
“कुठली झकमारली आणि ह्या गृहस्थाना हा प्रश्न केला”
आता काय करणार स्वभाव भिडस्त पडला, नाही म्हणता येई ना.म्हटलं चला.
कॉफीची ऑर्डर देऊन झाल्यावर कसला ही विलंब न लावता ते म्हाणाले,
“ज्यावेळी माझं मलाच समजलं,की मला अजून तेव्हडं बुद्धिचातुर्य-विसडम- आलेला नाही त्यावेळी मी माझा मार्ग उघडा करून ज्याना ते आहे त्यांच्याकडून शिकाण्याचं ठरवलं.मला मीच आणखी एका प्रयत्नात टाकण्याचा चान्स दिला.
एखाद्दाला श्रद्धा असते ह्या विचारा बद्दल माझ्या मनात नेहमीच संभ्रम असायचा. माझ्या आयुष्यातला बराचसा वेळ एक तर मी कुठल्याही घटनेच्या निश्चीततेबद्दल मनात खोल इच्छा रूतून ठेवतो. नाही तर तितकीच ती निश्चीतता असंभवनीय ही असावी ह्या ही समजूतीवर भर देऊन राहतो. अशा ह्या दोन्ही विचाराच्या कात्रीत माझं मन मी द्विधा करून घेतलं आहे.
कधी कधी माझं मलाच समजूत घालून घेण्याच्या माझ्यात असलेल्या क्षमतेमुळे ह्या सिद्ध न होवू शकणार्या घटना काहीशा मानसिक धीर देणार्या ठरायच्या. परंतु ही सोय तात्पुरतीच असायची.जगात सुखापेक्षा दुःखंच जास्त असतात ही एक विचारस्रणी आणि जे काय घडतंय ते अर्थशून्य,जरूरी शिवाय आणि शुन्यकिमतीचं असतं ही दुसरी विचारसरणी ह्या दोन विचारसरणी मधे समझोता आणणं म्हणजे ही एक दोर्यावरची कसरतच होईल असं मला वाटतं.
एका टोका पासून दुसर्या टोकापर्यंत विचार करायला गेल्यावर माझ्या व्यवहारी जगात वावरताना ह्यातला वाद परावर्तीत होऊन कधी कधी अंतःकरणापासून जवळ वाटणार्या चमत्कारीक आध्यात्माची ओढ असायची आणि कधी कधी अलीकडे दिसणार्या त्या छंदीफंदी रात्रीच्या क्लबातल्या संगीताच्या धमाल वातावरणाची ओढ असायची.
श्रद्धा जोपासण्याचा मी आटोटोकाट प्रयत्न केला पण म्हणताना “श्रद्धे वर श्रद्धा” ठेवणं, तसं व्हायचं. सत्य शोधून काढणं कठीण व्हायचं.छोटी छोटी सुंदर प्रोत्साहीत करणारी देवावरची स्तुती करणारी कवनं हळू हळू वैतागी आणि दुःखी वातावरणात विरून जायची.
मला एक धक्का दायक शोध लागला की माझ्या आध्यात्मा वरील समजल्या गेलेल्या अडचणी ह्या आजूबाजूच्या वातावरणाशी संबंधीत नव्हत्या तर त्या माझ्याच आपमतलबी वृत्तीं मुळे होत्या.माझ्या जवळच्याना जे मी दुखवलं आणि दुःख दिलं ते मी माझ्या मतलबी राहण्याच्या स्टाईलमुळे झालं.
अनुभव हाच उत्तम शिक्षक आहे ह्याचा पडताळा मला माझ्याच कर्माचे भोग उपभोगून मिळाला. काहीना अनुभवातून मार्ग दिसतो, मला मात्र हे सहज शिकायला मिळालं नाही. मला कठीण मार्गातून हे शिकायला मिळालं. काही वर्ष मी मलाच हरूवून बसलो होतो.ऐहिक सुखं म्हणजे आनंदीआनंद असं वाटायचं. पण जर का ह्या वातावरणाकडे रेंगाळलेल्या पश्चातापी दृष्टीने लक्षात घेऊन पाहिलं नाही तर त्याची परिणीती एकाकीपणा आणि नैराश्यामधे होऊन ते एक दुष्ट चक्रच व्हायचं.
एकतर आपल्यात बदलाव करावा किंवा मरून जावं अशा पराकोटीच्या स्थितीला माझी मनस्थिती आली.मुलतः मी माझं मनच गमावून बसलो.माझ्या लक्षात आलं की ज्याला मी पूर्वी फूकाचे बोल समजत होतो ते बोल प्रत्यक्षात सत्यच सांगत होते.
“कुणाकडून घेण्यापेक्षा कुणाला तरी द्दावं”
असं कुणी तरी म्हटलंय.पण आता माझ्या लक्षात आलंय की अश्या गोष्टीवर श्रद्धेने न पाहता अनुभव म्हणून पाहणं जास्त संयुक्तिक ठरेल.
हा मार्ग मी तंतोतंत पाळतो असं नाही पण मनापासून सांगू शकतो की भारतीय कवयित्री-तत्वज्ञानी शांतीदेवीच्या उक्ति प्रमाणे
“जगात भरलेला सर्व आनंद दुसर्याला शुभ चिंतूनच अस्तित्वात आहे.उलट जगात भरलेलं सर्व दुःख स्वतःचच सुख पाहिल्यामुळे अस्तित्वात आहे.
माझे हे दोस्त,श्रीयुत.”मी,माझे,मला” स्वतःला काय वाटत असतं ह्याचं आख्यान भिडभाड न ठेवता दुसर्याला सांगण्यात आनंद घेतात.
बाहेर बराचसा काळोख झाला होता.मीच त्याना म्हणालो,
“आपण पुन्हा कधीतरी बोलूया.”
ते कबूल झाल्याचं पाहून सुटकेचा निश्वास टाकून मी त्यांचा निरोप घेतला.
आमचा भिडस्त स्वभाव आम्हाला असा नडतो.
श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोर्नीया)

Monday, August 25, 2008
वस्ती वसविली मी अगदी जगावेगळी
प्रतिमा तुझी माझ्या हृदया जवळी
वस्ती वसविली मी अगदी जगावेगळी
दैव माझे सजवूनी दिलास तू आकार
निष्कामी मला तू बनविलेस मुर्तिकार
शब्द नी शब्द ठेविला मी हदया जवळी
वस्ती वसविली मी अगदी जगावेगळी
आणूनी स्मरणात केली मी पुजा रात्रंदिनी
अचंबीत झालो ततक्ष्णी पाउलांची निशाणी पाहूनी
झुकवूनी मस्तक माझे वाहतो फुलांची ओंजळी
वस्ती वसविली मी अगदी जगावेगळी
करूनी गीतांची माला वाहिली मी तुझ्या गळी
दूर राहूनी पुकारले तुला सकाळ संध्याकाळी
कोणत्या कारणी दिलीस शिक्षा अशी आगळी

Saturday, August 23, 2008
आता दोषारोपाना जागा नाही आता फक्त प्रेम.
जाता जाता मी शिलाला म्हणालो,
“म्हणूनच मी प्रार्थाना करीत असतो,की मला रोज एक नवी चूक करू दे.त्या चुकेतूनच मी काही तरी नवीन शिकेन.आणि म्हणूनच मी मला माणूस समजेन.मात्र तिच चूक परत परत करणारा माणूस होऊच शकत नाही.”
हा पण एक योगायोगच होता.मी माझ्या पुतणीच्या मुलीच्या लग्नाला जातो काय आणि जवळ जवळ चाळीस वर्षानी मला त्या समारंभात शिलाची भेट होते काय.शिला अमेरिका सोडून कायमची इकडे राहयाला आली होती,हे तेव्हाच मला तिच्याशी बोलताना कळलं.प्रथम मी तिला ओळखलंच नाही.सहाजीकच आहे इतक्या वर्षानी पाहिल्यावर माणसाच्या चेहर्यात राहणीत जो बदल होतो तो पटकन लक्षात येत नाही.पण बोलण्याची ढब,हंसतानाची स्टाईल,चेहर्यावरचे भाव हे आपल्या मनात खोल रुतलेले असतात.
“अरे,तू मला ओळखलं नाहिस? मी शिला द्फ्तीदार.तुझ्या बरोबर कॉलेजात होते.प्रो.देसाई आपले पेट होते.”
एव्हडं बोलल्यावर मला तिला ओळखायाला वेळ लागला नाही.
नंतर ती मला म्हणाली,
“तुला लांबून पाहिल्यावर तुझी अंधूकशी आठवण आली.पण मग मी तुझ्या पुतणीलाच विचारून खात्रीकरून घतली,की तो तूच आहेस.”
मी तिला विचारलं,
” तुला मुलं किती?कुठे आहेत ती?”
थोडीशी मायूस झाली.मला म्हणाली,
“नरीमनपॉईन्ट वर मी फ्लॅट घेतला आहे.हे माझं कार्ड.वेळात वेळ काढून ये.”
त्याच वेळी मला वाटलं होतं की ती मला काही तरी जीवाभावाची गोष्ट बहूतेक सांगणार आहे.
ज्यावेळी मी तिच्या घरी गेलो,त्यावेळी आत तिचा एक पंचवीस तीस वर्षाचा मुलगा एका इझीचेअरवर झोपलेला दिसला.ती सकाळी दहाची वेळ होती.माझं स्वागत करून मला बसायला सांगितल्यावर,तिच्या मुलाला उठवून ती त्याला आत घेऊन गेली.
बहूतेक त्याला तिने आत त्याच्या खोलीत झोपायला सांगितलं असावं.एका नोकराला आमच्या दोघांसाठी चहाची ऑर्डर देऊन माझ्या जवळच्या सीटवर येऊन बसली.मला म्हणाली,
“तू आता जेवूनच जा”
तिचा आग्रह पाहून मी ओके म्हटलं.
तिला आपला मुलगा केदार त्याची कथा सांगायची होती.
मला म्हणाली,
“जेव्हा केदार ने कबूल कलं की त्याला दारूच्या व्यसानाची संवय झाली आहे,त्याच क्षणी मी कुणाला तरी दोषपात्र करायला किंवा कुठल्यातरी परिस्थितीला दोषपात्र करायला मार्ग हुडकण्याचा प्रयत्न करू लागले.मी त्याच्या मित्राना दोषी ठरवायचा प्रयत्न केला.मी त्याच्या वडलाना दोषी करण्याचा प्रयत्न केला,मी त्यांच्या-वडिलांच्या- माझ्या मधल्या सतत वाद होत असलेल्या वातावरणला दोष देण्याचा प्रयत्न केला.पण सरते-शेवटी मी मलाच दोष देण्याचा प्रयत्न केला.”
तुमचं मुल वाढत असताना ते पुढे व्यसनी होईल अशी तुम्ही अपेक्षा करीत नाही.मुल जन्माला आल्या क्षणापासून तुम्हाला आशा असते,तुम्हाला स्वप्न पडतात त्याच्या भविष्या बाबत,पण त्या भविष्याच्या यादीत त्याच्या व्यसनाधीन होण्याच्या शक्यतेची नोंद नसते.ही नोंद आपल्या मुलाबद्दल होऊ शकत नाही कारण व्यसनाधीन होण्याच्या क्रियेला सभोवतालचं वाईट वातावरण कारणीभूत असतं,वाईट संगोपन कारणीभूत असू शकतं.कुणाला तरी किंवा कशाला तरी दोष देणं भाग आहे.
ह्या असल्या गोष्टी माझ्या मनात येऊ लागल्या. त्याच्यावर बरेच उपचार केल्यावर आणि बरेच दिवस त्यामुळे त्याच्या पासून दूर राहिल्यामुळे,माझा जो एव्हडा कोंडमारा झाला होता त्यानंतर आता मला वाटू लागलं की कुणाचाच दोष नाही ह्या घटनेत.
केदारने दारूचं व्यसन लागल्याची कबूली दिल्यानंतर मी खूप माझी डोकेफोड केली.माझ्याच मुलाला हे व्यसन कसं लागलं हे मला समजेना.एव्हडा हूषार,उमदा,टॅलेंटेड आणि सगळ्यात प्रेमळ असलेल्या ह्याला हे कसं झालं?.सुरवातीची धक्का लागण्याची वेळ निघून गेल्यावर मी आत्मपरिक्षण करायचा प्रयत्न केला.त्याच्या आयुष्यातल्या “कां आणि कसं” ह्या गोष्टीचा पडताळा लावण्याचा प्रयत्न केला.माझं हवालदिल मन मला समजावू लागलं की मीच त्याला ह्या व्यसनातून परावृत्त करायला हवं होतं.कदाचीत मला त्या परिस्थितीत परत जायला मिळालं असतं तर मी माझ्याच चूका सुधारल्या असत्या.
पुढचे दिवस,आठवडे,महिने मी बारीक बारीक दुवे जमा करून त्याचा एक गोळा तयार करण्याचा प्रयत्न केला.कधी कधी मी हा नाद सोडायची तर कधी सोडायला द्दायची.दोष देण्याची माझी वृत्ति आता मला आशेचा किरण दाखवावला लागली.जे मला माझ्या मुलापासून दुरावत होतं त्या प्रेमाशीच मी दोन हात करायचे ठरवले.
केदारची मी रोज आठवण काढायची.तो घरातून बाहेर गेल्यावर मी मुसमुसून रडायची आणि त्याच्या सुरक्षते बद्दल आणि तो कुठे असेल ह्या बद्दल काळजी करायची.
कधी कधी मी रात्रीची एकदम जागी होऊन घाबरून जायची.पण माझा तो आईचा जीव मला उगाचच वाईट बातमी साठी सतर्क राहण्याचा इशारा द्दायचा.पण त्या सर्व दिव्यातून जाताना मी मनात एव्हडंच म्हणायची की माझं त्याच्यावर प्रेम आहे.
माझा मुलगा का आणि कसा व्यसनी झाला हे मला माहित नाही मी आता अशा पायरीवर येऊन बसली होती की माझ्या मनात म्हणायची काही हरकत नाही.आयुष्य असंच जात राहणार आणि केदार हा अजून माझाच मुलगा आहे.
सकाळी उठून जेव्हा आम्ही दोघं चहा पिण्यासाठी बसतो,त्यावेळी मी केदारला सुधारण्याचा उपदेश वगैरे देत बसत नाही.मी फक्त त्याच्यवर प्रेम करते.कधी कधी दुःख आणि वेदना असतात.पण दोषाला जागा नसते.माझ्या मनात फक्त प्रेमाचाच ओलावा असतो.”
हे सर्व शिलाच्या तोंडून ऐकून मी खूपच सद्गदीत झालो.कुणाच्या हातात असतं हे सगळं?असा माझ्या मनात विचार आला.चूक होऊन गेल्यावर सुधारून राहणं ह्याला माणुसकी म्हणता येईल.पण झालेल्या चुकीचे परिणाम आणि भोग मात्र सुटत नाहीत.मग ते भोग निमुटपणे भोगल्या शिवाय गत्यंतर नसतं.
जाता जाता मी शिलाला म्हणालो,
“म्हणूनच मी प्रार्थाना करीत असतो,की मला रोज एक नवी चूक करू दे.त्या चुकेतूनच मी काही तरी नवीन शिकेन.आणि म्हणूनच मी मला माणूस समजेन.मात्र तिच चूक परत परत करणारा माणूस होऊ शकत नाही.”

Thursday, August 21, 2008
दर्शन प्रियाविणा व्याकूळ होते
पहा पहा वर्षाविणा जलधारा येते
दर्शन प्रियाविणा व्याकूळ होते
प्रियाविणा दुनिया एकाकी होई
दुःख मनाचे दुप्पट होत जाई
जागती दुःखे नशिबही झोपी जाई
लोलक नयनाचे अश्रूनी चमकते
पहा पहा वर्षाविणा जलधारा येते
विरहीण हार फुलांचे गुंफीत जाई
तुटली स्वपने मोती विखरून जाती
ज्योत दिव्याची विझली जाई
स्वप्नं मनातले विरून जाते
पहा पहा वर्षाविणा जलधारा येते
प्रीत आपुली दुनिया खेचून घेई
पिऊनी आंसवे दिवस निघून जाई
असता दूर प्रिया कसले जगणे
पगली दुनिया आता सोडून जाते

Tuesday, August 19, 2008
अवघे पाऊणशे वयमान.
अस्मादिकाना पंचाहत्तर वर्ष पूर्ण झाली.
१४ ऑगस्ट १९३३ हा माझा जन्म दिवस.नंतरचे सगळे वाढदिवस झाले.पण ह्यापुढे कसले वाढदिवस आता राहिले ते काढदिवस.
जन्मापासून दोन वर्षाचा होईपर्यंत,
कुकलं बाळ होतो.
त्यानंतर सहा वर्षाचा होईपर्यंत
अल्लड मुलगा होतो.
त्यानंतर अठरा वर्षाचा होईपर्यंत
शाळकरी होतो.
त्यानंतर बावीस/पंचवीस वर्षाचा होईपर्यंत
कॉलेज वीर होतो.
त्यानंतर थोडी वर्ष
चाकरमानी होतो.
त्यानंतर लग्न झाल्यावर
हाच मुलाचा/मुलीचा बाप होतो.
त्यानंतर मुलं मोठी होऊन शिकायला लागल्यावर
गृहस्थ झालो.
त्यानंतर पन्नासी उलटल्यावर
वयस्कर झालो
त्यानंतर साठी उलटल्यावर
म्हातारा झालो
त्यानंतर आता पंचाहत्तरी झाल्यावर
कदाचित थेरडा होईन
पण काय हरकत आहे असं म्हणून घ्यायला.हे कुणालाही चुकलेलं नाही.जो तो आपआपल्या अक्कले प्रमाणे बोलतो चालतो आणि वागतो.
“दंताजीचे ठाणे सुटले
नन्ना म्हणते मान
फुटले दोनही कान
अवघे पाऊणशे वयमान”
असं काही नाही मंडळी.
जवळचं वाचायला “ढापणं” लागली तरी दूरचं चांगलं दिसतं.
कान शाबूत आहेत.पाल चूकचूकली तरी स्पष्ट ऐकायला येतं
दात अजूनही शाबूत आहेत,कवळी लावावी लागली नाही.
मान ताठ करून अजून चालतो.
जीना चढताना,उतरताना आधार घ्यावा लागत नाही.
हे कसं शक्य झालं असं विचाराल मंडळी तर त्याच उत्तर-
सुपारीच्या खांडाचही व्यसन नाही.सुपारी आडकित्यात कशी कातरतात माहित नाही.
सुपारीचा बेडा कसा सोलतात माहित नाही.
“घुटूं” कधीच घेतलं नाही.वासाने उमळ येते.
“फुंकणीच्या” धुराने घुसमटायला होतं.
“बाळं” लागण्याचे दिवस आता गेले.
पन्नासी नंतर मेदुतले रोज ८० हजार न्युरान्स नाश पावतात असं म्हणतात.पण लेखन वाचनामुळे,लाखभर न्युरान्स नवे फायर होत असावेत.
पु.ल. म्हणतात,
“उतार वयात सकाळी उठल्यावर जर दोनही गुढगे दुखले नाहीत तर समजावं की आपण मेलो.”
तसं काही होत नाही.खडखडीत आहे.
हे काही माझं कौतुक म्हणून सांगत नाही मंडळी.
उद्दांच काही माहित नाही.आज आहे हे असं आहे.
एव्हडं मात्र खरं,
ते दिवस निघून गेले
मातेच्या मांडीवर माथे टेकून
थोपटण्याचा हट्ट करून
झोपी जाण्याचे
ते दिवस निघून गेले.
भावंडामधे हंसून खेळून
कधी मधी नाहक भांडून
क्षमा याचनाचे
ते दिवस निघून गेले
ग्रुहपाठ करून सुद्धा
शाळेत जाऊन
गुरुजीचा ओरडा खाण्याचे
ते दिवस निघून गेले
सुगंधी तेले चोपडून
केसाचा कोंबडा काढून
नेत्र पल्लवी करण्याचे
ते दिवस निघून गेले
घारीच्या पंखाचे बळ घेऊन
निळ्या नभाकडे न्याहाळून
ऊंच ऊंच भरारींच्या स्वपनांचे
ते दिवस निघून गेले
राजा राणीचा संसार करून
मनोरथाचे बंगले बांधून
विश्वाचे रहस्य उलगडण्याचे
ते दिवस निघून गेले
ग्रुहपाठाचे धडे घेऊन
संस्काराचे धडे देऊन
पिल्लांना जोपासण्याचे
ते दिवस निघून गेले
काऊ चिऊच्या गोष्टी सांगून
चिमण्या नातवंडाना अंगाई करून
झोपी जाण्याचे
ते दिवस निघून गेले
या यादीतील स्मृतीना
निश्चीत आहे अंत
त्यानंतर
दिवस निघून जाण्याचे
नसे कसला खंत
तेव्हा मंडळी आहे ते असं आहे.
माझ्या ह्या जन्मदिवशी तुमच्या शुभेच्छा मला लाख मोलाच्या आहेत.त्यामुळे ह्याच लेखातून आपणा सर्वांचे धन्यवाद.

Subscribe to:
Posts (Atom)