कोकणातल्या पिंगुळी गावात जाऊन एका शाळेला भेट देण्याचं कारण,मी माझ्या मावशीच्या मांडकूली गावात गेलो होतो.तिथे पिंगुळी गावचा विषय- नलिनीने- माझ्या एका मावस बहिणीने काढला.ती मला म्हणाली,
“अरे पिंगुळी गावात वसुंधरा साने नावाची माझ्या वयाची मुलगी माझ्या जवळ फार पूर्वी आली होती.आणि मी तुझी त्यावेळी तिच्याशी ओळख करून दिल्याचं तुला आठवत असेल.ती आता तशी मुलगी राहिली नाही.मुंबईत चांगलं शिक्षण घेऊन तिकडेच नोकरी करण्याचं नाकारून आपल्या गावाची उर्जितावस्था करण्याच्या इराद्दाने,पिंगुळीला आली.बरीच वर्ष ती इकडे आहे आणि तिने शिक्षणाच्या दृष्टीने खूपच कायापालट केला आहे.हवं तर आपण तिला भेटायला जाऊया.तू तिची स्टोरी ऐकून नक्कीच खजील होशील.मला ही तिला बरेच दिवसानी भेटण्याचं निमीत्त मिळेल.
दुसर्या दिवशी आम्ही वसुंधराला भेटायला पिंगुळीला गेलो.मांडकूली पासून ते अवघ्या तीन मैलावरच आहे.आम्ही चालत चालत गेलो.आम्हाला पाहून वसुंधरेचा आनंद गगनात मावेना.आमचं आगत-स्वागत वगैरे करुन झाल्यावर आमची तिच्या एकंदर कार्याची चर्चा झाली.
मी तिला म्हणालो,
“ह्या व्यवसायात तू स्वतःला कसं झोकून दिलंस?”
मला वसुंधरा म्हणाली,
“जेव्हां जव्हां मी इकडे यायची तेव्हा तेव्हा इथल्या लोकल जनतेचं सांगणं,
“आम्ही खूप प्रयत्न करतो पण मुलंच शिकत नाहीत.”
माझा माझ्या शिक्षणातला अनुभव जमेला धरून मी हे एक चॅलेंज घेतलं की ही सबब खोटी करुन दाखवायची.
मुलं शिकत नाहीत ही सबब मी कधीच स्वीकारू शकत नाही.तुम्हाला मुलांना दोष देता येणार नाही.मुल जर शिकण्यात यशस्वी झालं नाही तर समजावं की त्याच्या सानीध्यात असलेल्या माणसाचं ते अपयश आहे,मुलाचं नाही.
मी ज्यावेळी म्हणते की सर्व मुलं शिकू शकतात आणि हे असं मी मानते हे ऐकल्यावर काही लोकांचा गैरसमज होतो.
कारण मी माझ्या गावातल्या अगदी गरीब लोकांच्या वस्तितल्या मुलांशी जवळून गेली पंचवीस वर्षे काम करीत आलेली आहे.काही लोकाना वाटतं की त्या वातावरणातल्या मुलांमधल्या चांगल्या हुषार मुलांविषयी मी बोलत असते त्या मुलांमधल्या बुद्धिवान मुलांना चांगलं शिक्षण दिलं तर ती यशस्वी होतात असं मला म्हणायचं आहे असं वाटून बोलते.तसं होणं हे अगदी खरं आहे.पण मला तसं मुळीच म्हणायचं नाही.
हे पहा,मला अगदी मनापासून वाटतं की सर्व मुलं शिकू शकतात.मी तसं मानते.मी ते पाहिलंय.आणि मी त्याचा अनुभवही घेतलाय.
मी माझं शिक्षण घेताना अगदी कठीण समस्या असलेल्या मुलांबरोबर काम केलं आहे.भावना दुखावलेली मुलं,स्वलीन(autistic)मुलं,थोड्या मंद बुद्धिची मुलं,वागायला कठीण जातील अशी मुलं,थोडक्यात त्या मुलांच्या आईबाबानी संभाळायला त्यानी हात टेकलेली मुलं अशा प्रकारच्या मुलांबरोबर काम केलं आहे.
एक साधी गोष्ट पहा.मी आणि माझे सहकारी ह्या मुलांबरोबर एखादी खाण्याची गोष्ट कशी बनवायची ह्या पासून सुरवात करायचो.आता नानकटाई बनवण्याचंच घ्या.त्याना बेकिंग पावडर आणि मीठ ह्यातला समोर बघून फरक कळत नसायचा.पण एकदा का ती गरम गरम नानकटाई भट्टीतून काढून त्यावर थोडं साजूक तूप आणि मधाचा एक चमचा वाढून त्यानी खाल्ली,का मग ती मुलं नवीन नानकटाई कशी करायची ह्यासाठी प्रेरीत व्ह्यायची.
एकाएकी जी मुलं स्थीर न बसता सारखी चुळबुळ करीत र्हायची किंवा नीट एकाग्र होत नसायची ती आता एखादी डीश बनवली तर त्याला लागणार्या निरनीराळ्या मूळ पदार्थाचं प्रमाण किती असतं त्याकडे निक्षून बघायची.साध गणीत किंवा स्पेलिंग करायची.कालान्तराने मला आठवतं त्यांचे आईबाबा ही त्यांची प्रगती पाहून आनंदाने रडायची.
नानकटाई,बर कां,खूप चवदारी होती.आणि आता आज मला त्याची चव आठवते. आणि त्याशिवाय त्यानी मला शिकवलेला धडा आठवतो की जरका आपण मोठी माणसं,त्यांच्यासाठी योग्य अशी प्रेरणा त्या मुलासाठी निर्माण केली तर ते मुल शिक्षीत व्ह्यायची आशा करायला हरकत नाही.
सध्या मी आजूबाजूच्या खेड्यातली मुलं शाळेत जावी म्हणून शाळा निर्माण करायच्या खटपटीत असते.शेकडो मुलांबरोबर मी संपर्क ठेवून असते.माझ्या सर्व सहकर्याना माहित आहे,की मला अमुक अमुक मुल शिकत नाही ही सबब मुळीच पसंत नाही.मुलांना तुम्ही दोषी ठरवू शकत नाही.माझ्या कारभारात जर का मुल यशस्वी होऊ शकलं नाही तर त्याचा अर्थ त्याच्या भोवतालची मोठी माणसं अपयशी ठरली आहेत.
त्याचं कारण अति कठीण समस्या घेऊन मुलं एकाएकी स्वतःला शिकवायला जाणार नाहीत.मी मानते की मोठ्यानी त्यांना मदत केली पाहिजे.आणि ते प्रत्येक मुलाकडे निरखून पाहून त्यांना कशाने स्फुर्ती मिळते ते पाहून त्यांच्या त्या स्फुर्तीला अगदी नीगरघट्ट होवून चालना देता आली पाहिजे.
माझे वडील हयात नव्हते.माझ्या आईने आम्हा चार मुलांना वाढवलं.मी तर अभ्यासात दुर्लक्ष करीत राहिले.जर का माझी त्या दोन शिक्षकांशी भेट झाली नसती तर मी कुठच्या कुठे वाईट मार्गाला लागले असते.त्यानी मला आवडतील अशी पुस्तकं-साने गुरजींच काही पुस्तकं,काही सुंदर सुंदर कवितांची पुस्तकं देवून माझ्या मनात वाचनाची गोडी आणून दिली नसती तर हा माझ्यातला फरक तुम्हाला दिसलाच नसता.
अशा चांगल्या चांगल्या लेखकांच्या पुस्तकांचं वाचन माझ्या पचनी पडलं.आता मी माझ्या ह्या गावातल्या आणि आजुबाजूच्या गावातल्या मुलांसाठी वाहून घेतलं नसतं तर माझी होणार असती ती परस्थिती आज त्या मुलांची झाली असती.ती मुलं आयुष्यातून फुकट गेली असती.
माझ्या यशाची पहिली प्रचिती त्यावेळी झाली की ज्यावेळी त्या गावातल्या मुलानी मला जी गरम गरम नानकटाई आणून दिली आणि त्याची चव इतकी मधूर होती की मी मानते तुमच्या डोळ्यातून अश्रू टपकले असते.
मी वसुंधरेला म्हणालो,
“तुझी ही तपश्चर्या बघून माझ्या डोळ्यातून अश्रू नक्कीच टपकले हे निश्चीत.पण तुझ्या नानकटाईची चव मात्र मी घेतल्या शिवाय इकडून जाणार नाही.”
मला वसुंधरा म्हणाली,
“अरे,नानकटाई अवश्य खा.पण त्या अगोदर कर्ली नदीतून गुंजूल्याच्या गातनी एका कोळ्याने मला आज त्याच्या मुलाचा शाळेत पहिला नंबर आला म्हणून खूष होऊन आणून दिल्या आहेत.त्याचं चांगलंच तिखलं करते तू आणि नलिनी जेवूनच जा. मला पण बरं वाटेल.”
मला कुणाच्या आग्रहाला नकार देऊन नाराज करता येत नसल्याने आम्ही दोघं वसुंधरेकडे जेवायला राहिलो.
श्रीकृष्ण सामंत (स्यान होजे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com
Sunday, November 30, 2008
Friday, November 28, 2008
शेवटी कविताच जन्माला आली
संध्याकाळची वेळ होती.नदी खळाळत वहात होती.वीजा चमकत होत्या.राजा-राणी पल्याड जायला आतूर होती. पल्याडला त्या वटवृक्षाखाली त्यांच घरकूल होतं.आत्तांच परत येऊ अशा समजूतीने ती दोघं मुलाना एकटच सोडून नदीच्या अल्याड आली होती.भन्नाड वारं सुटलं होतं.
चमकत्या वीजेच्या प्रकाशात जेव्हा त्याना नाव दिसली तेव्हा केव्हा एकदा नावेत बसून नदी ओलांडून मुलाना भेटू अशी राणीला उत्कंठा लागली होती.
हे चित्र मनात आलं जेव्हा,
(हंसर्या)मुमुक्षुने एक ओळ दिली.
“खळाळत्या नदीतीरी सांज घेते ठाव”
आणि दुसरी ओळच काय ती लिहायला सांगितलं.
पण दुसरी ओळ लिहून झाल्यावर,ओळीवर ओळी आठवायला लागल्या त्याला काय करणार.शेवटी कविताच जन्माला आली.
खळाळत्या नदीतीरी सांज घेते ठाव
लखलखत्या वीजेमुळे किनारी दिसे नाव
वल्हवतवल्हवत कधी जाउं या पल्ल्याड
सांग साजणा! कभिन्न रात्र येईल का रे आड
घन घन घटा जमूनी कोसळतील धारा
सजणा बिलगू देईना हा खट्याळ वारा
नको रे चंद्रा! लपू तू ढगा मागे
पडू दे लख्ख चांदणे अमुच्या मार्गे
आवर ग! सरिते आता तुझी खळखळ
होईना सहन अमुच्या बछड्यांची हळह्ळ
दिसू लागले अमुचे घरटे वटवृक्षा खाली
पिल्लाना गोंजारण्याची वेळ आता आली
श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)

Wednesday, November 26, 2008
दुसर्याच्या नेत्रातून जीवन पहावं.
लहानपणी आम्ही आमच्या आजोळी उन्हाळ्याच्या सुट्टीत जायचो.आजगावला आमचा ब्राम्हणांचा एक वाडा होता. दहा पंधरा घरं असतील एका वाड्यात.घरातली सर्व कामं नोकर चाकर येऊन करायची.पण गाई म्हशीना चरायला न्यायचं,त्याना नदीवर धुवायचं,घरी त्याना आणून गोठ्यात बांधून ठेवायचं,त्यांच्या समोर चारा वाढायचा,उरलेल्या अन्नाचा-पेज,उष्ट अन्न,-आंबवण त्याना खाऊ घालायचं ही कामं गावतल्या महारवाड्यातून काळू महार आणि त्याच्या बायका, मुलं येऊन करायची.
जाता जाता त्याला उरलेलं जेवण देऊन त्याच्या हातावर चवली ठेवायचं माझ्या आजीचं आणि चुलत आजीचं रोजचं काम असायचं.
माझी आई दरखेपेला अशीच आमच्याबरोबर येताना न चूकता आमचे जूने कपडे काळू महाराच्या मुला मुलीना वापरायला द्दायची.त्यांची ही गरिबी बघून मला त्यावेळी खूपच त्यांची दया यायची.काळूचा बाप आणि आजा मरेपर्यंत असलीच काम येऊन करायचे.हे त्यांचं पिढीजात काम असायचं.असं माझे आजोबा सांगायचे.आम्ही उन्हाळ्याच्या सुट्टीत आल्यावर ही सर्व आजोळची वहिवाट पाहून मी त्यात स्वारस्य घेऊन पहायचो. मुंबईला असले व्यवहार होत नसल्याने हे बघायला जरा कौतूक वाटायचं.आणि दुःखही व्ह्यायचं.काळू महाराचा मुलगा-दगडू- मात्र असली कामं करीत नसे.तो शाळेत जाऊन शिकत असल्याने त्याचा अभ्यास करण्यात वेळ जायचा.
शिक्षणामुळे त्याच्या इच्छाशक्तिचा आणि शैलीचा उपयोग उपयुक्त प्रारंभीक सामाजीक क्रियांच्या व्याख्या करण्यात आणि वापर करण्यात झाला. धर्माचा खरा उपयोग अश्या काही लोकाना होतो की ज्याना त्यांच्या मनुष्य म्हणून जन्माला येण्याच्या योग्यतेच्या पलिकडे त्या धर्माची गरज, सहारा घेण्यात आणि दिलासा घेण्यात होते.एकप्रकारची मंत्रमुग्ध सुंदरता दुःखाने भरून वहाणार्या खोल नदीतून उफाळून येऊन,ती सुंदरता जणू मानवी जीवनाच्या छपलेल्या झर्यांना छूत आणि अछूत यातल्या धार्मिक अभिव्यक्तीला स्पर्श करते.शिक्षीत दगडूला हे आता भासू लागलं होतं.माझी खात्री आहे की,मनुष्याला चांगला किंवा वाईट हे समाजच बनवतो.हाच समाज आपल्या व्यक्तित्वाला, नीतिशास्त्राला आणि आपल्या सामाजीक आदर्शाना रूप देतो.
दगडू महाराचा विचार केल्यावर त्याच्या जीवनाच्या तर्कशास्त्रात माणसा माणसातल्या असमानतेचा असंधिक्त विचार मी करू लागलो.
मला असं वाटतं,ज्यावेळेला माझी आई ह्या समाजातल्या लोकाना बोलावून आमचे सर्वांचे,तसेच आमच्या शेजार्यापाजार्यांचे वापरलेले कपडे मुद्दाम जमा करून आणून त्यांना द्दायची त्यावेळी त्या महारवाड्यातून त्यांच्या आया बहिणी कच्ची बच्ची सर्व आशाळभूत होऊन यायची. ते देण्यात कुणाला काय तर कुणाला काय दिलं जायचं.पण मग मला आवर्जून वाटायचं,की जरी कपडे देण्याच्या क्रियेत असामनाता राहिली तरी मुळातच त्या अच्छूत गरिबांच्या सामाजिक आणि आर्थिक वातावरणात असमानता असण्यात कसली प्रामाणिकता आली असावी.
हे सांगण्याचं कारण एका वर्षी माझ्या आईने हे दरवर्षीचं कपडे देण्याचं काम एकदा माझ्यावर आणि माझ्या बहिणीवर सोपवलं.ह्या मिळालेल्या संधीतून मला वरील विचार सुचला.ह्या संधीने मला अचंबा होण्यासारखा,आणि नवीन जागृती होण्यासारखा एक मार्ग दिसू लागला.त्यामुळे सामाजीक धारणे बाबत एका महत्वाच्या बाबीवर माझा मजबूत दृढविश्वास बसाला. आणि तो असा की कुणाही व्यक्तीची ईमानदारीने पारख करायची झाल्यास त्याच्या नेत्रातून जगाकडे दृष्टी टाकली पाहिजे.मग ती त्यांची गरीब आजी असो किंवा तरूण बहिण असो,किंवा म्हातारा आजा असो.त्यानंतर ज्या ज्या वेळी मी माझ्या आजोळी येत असे त्या त्या वेळी मी हे कपडे तर घेऊन यायचोच,त्या शिवाय लहान मुलाना खेळणी, शाळेत जाणार्याना गंमतीच्या गोष्टी असलेली पुस्तकं आणि वृद्धासाठी त्या वयात लागणारी नेहमीची औषधं आणून द्दायचो.अशा तर्हेने मी माझ्या अंतरदृष्टीचं आयोजन करायचो.
आतापावेतो दगडू चांगलाच शिकून मोठा झाला होता.मी त्याला विचारलं,
“तुझे वाडवडील ज्या तर्हेने राहायचे आणि आता तू शिक्षण घेऊन तुझी जी प्रगती केलीस त्यानंतर तू तुझ्या जीवनाकडे कसं पहातोस?”
त्यावर तो मला म्हणाला,
“जीवनाकडे मी अशा दृष्टीने पहातो की जे सतत पुनर्रचनेच्या प्रक्रियेत आहे.अशी पुनर्रचना की जीला नेहमीच बदलत्या दृश्यांची आणि परिस्थितीची जरूरी भासावी.पण त्यातून मी अशी आशा करतो की ती परिस्थिती जीवनातल्या येणार्या कठिण संबंधातून काही पोषक गोष्टी खेचून घेत असेल.जीवन हे मला अंत नसलेलं आव्हान आहे.असं आव्हान की ज्यावर निसर्गाचे आणि सामाजिक जीवनाचे दबाव लादलेले आहेत.मला असं अनुभवायला आवडेल की ते जगातलं आत्मीक जीवन आहे आणि जे दुनियादारी,हाव आणि संवेदनाशुन्यता ह्या ज्या माणसाच्या मोठ्यात मोठ्या गरजा आणि अभिलाषा आहेत त्यावर त्याचा मोठा दबाव असेल.
काही लोक त्या आत्मीक जीवनाला “निसर्ग” समजतात तर काही “देव” समजतात.”
दगडू महाराचं हे छोटसं भाष्य ऐकून मला इतका आनंद झाला की निदान ह्याच्या पिढीला नव्हेतर ह्याच्या नंतरच्या कुठच्याच महाराच्या पिढीला आमची ती कामं करावी लागणार नाहीत आणि मला जुने कपडेपण कुणाला द्दायला नकोत.त्याला दोन कारणं झाली.एक म्हणजे माझ्या मामानी गाईम्हशीना डेअरीत देऊन टाकून तो गाईम्हशीचा गोठा बंद करून टाकला आणि आता त्याना सेंट्रल डेअरीतून मुबलक दुध मिळायला लागल.आणि दुसरं कारण म्हणजे दगडू पासूनची आणि नंतरची पिढी हळू हळू सुशिक्षीत होऊन त्याना साजेशी कामं करायला लागली. तो त्याच्या पूर्वीच्या पिढीचा आशाळभूतपणा डोळ्यासमोर आल्यावर मला खूप दुःख होतं.पण ही नवीन सुधारणा पाहून मात्र अत्यानंद होतो.

Monday, November 24, 2008
गुरू शिवाय विद्दा कसली?
नृत्यकलेत योग्यते शारिरीक हावभाव करावे लागतात.त्या नृत्यातून नृत्यकरणार्याचं अविर्भावातलं सत्य विशद व्हावं लागतं.आणि त्याचं व्यक्तित्व प्रदर्शीत व्हावं लागतं.हे मी रोहिणीकडून ऐकलं.
यशोधरा साखरदांडे आणि हिची मुलगी रोहिणी,जी आता रोहिणी गायतोंडे म्हणून ओळखली जाते ती नृत्यकलेत निपूण असून अलिकडे रंगमंचावर अभिनय करते हे मला जेव्हा कळलं तेव्हा मी अंधेरीतल्या एका नृत्यशाळेत तिचा अभिनय पहाण्यासाठी एका मित्रा बरोबर गेलो होतो.रोहणी त्यावेळी आपल्या विद्दार्थिनीबरोबर रियाज करण्यात दंग झाली होती.
मी तिच्या आईवडीलांना चांगलाच ओळखतो. तिचे वडील माझ्या बरोबर टाटा इन्सस्टिट्युटमधे माझे सहकारी होते. त्यांच्या घरी मी बरेच वेळा जातयेत असे.यशोधराचं आणि माझें दूरचं नातं होतं.रोहिणी त्यावेळी अगदीच लहान होती.मला इतक्या वर्षानी पाहून तिला तिची लहानपणाची आठवण आली.
तिचे वडील आता हयात नाहीत.ती ज्यावळी माझ्या बरोबर बोलायाला म्हणून रंगमंचावरून खाली आली.तेव्हा सहाजीकच तिच्या वडीलांचा विषय निघाला.जुन्या आठवणीना उजाळा आला.मला ती म्हणाली,
“काका तुम्ही माझ्या घरी नक्कीच या.मी इस्ट अंधेरीला गोल्डस्पॉटच्या फॅक्टरीच्या बाजूला उंच इमारत आहे त्या बिल्डिंगच्या एकदम वरच्या मजल्यावर राहते.जेवायलाच या.माझी आई पण तुम्हाला भेटेल.खूप वर्षानी तुम्हाला पाहून तिला खूपच आनंद होईल.”
मी तिचा पत्ता घेतला आणि विकएंडला तिच्या घरी गेलो.
यशोधरेला बघून मला आणि तिला खूपच आनंद झाला.इकडच्या तिकडच्या गप्पा होई पर्यंत रोहिणीने चार पाच फोन करून घेतले.
रोहीणी मला म्हणाली,
” ह्या व्यवसायात पडल्यावर आपलं जग आपलं राहत नाही.सदाची मी बिझी असते.तुम्ही आज येणार म्हणून मी शक्यतो मला मोकळी ठेवली आहे.माझा सेक्रेटरी आता काय ते संभाळून घेईल.”
मी तिला म्हणालो,
“ह्या व्यवसायाची मला विषेश माहिती नाही.पण नृत्याबद्दल माहिती असावी असं मला नेहमी वाटायचं आणि त्याचं मला कुतुहल पण आहे.आणि तुझ्या इतक्या जवळच्या व्यक्तिशिवाय मला वर्णन करून कोण सांगणार?तेव्हा तू मला सगळं समजावून सांग.त्यातल्या खाचा आणि खळगे सुद्धा.
रोहिणी मला म्हणाली,
“माझ्या बाबांचेच उद्गार मी प्रथम तुम्हाला सांगते.
ते नेहमी म्हणायचे,
” आपण सर्व ह्या पृथ्वीवर थोड्याच काळासाठी आहो आणि त्या काळात आपण काहीतरी चांगलं करावं.ते पुढे म्हणायचे मला वाटतं ह्या वास्तविकेत पावित्र्य आहे ते असं की “चांगले व्हा” हेच सांगणं.हे उद्गार माझ्या वडीलानी निर्वतण्यापूर्वी काढले”
माझ्या जीवनात आणि माझ्या कलाकृतीत मला असं दिसून आलं आहे की सत्यनीष्टा आणि चांगुलपणा बरोबरीने असतात. माझी आई म्हणते,
“स्वतःशी प्रथम प्रामाणिक असावं”
माझ्या रियाज करण्याच्या स्टूडियोमधे वास्तविक राहण्याचा मी प्रयास करते.
माझा स्टुडियो ही मला एक पवित्र जागा आहे जिथे स्वतःचं व्यक्तित्व आणि स्वतःच्या भावना प्रदर्शीत करता येतात.जणू माऊंट एव्हरेस्टवर उभं राहून श्वास घेतल्या सारखं वाटतं. ह्या स्टुडियोतल्या उंचीवर एकजीव राहून काहीतरी उद्देश्यपूर्वक करीत असल्यासारखं वाटतं.
मी नर्तकी म्हणून आहे आणि नृत्य-परिक्ष्क म्हणून पण अनुभव घेतला आहे.दोनही पार्ट मला माहित झाले आहेत.नर्तकी नृत्य-प्ररिक्षकाला समर्पीत होते आणि नृत्य-परिक्षक नर्तकीला समर्पीत होतो.आम्ही निष्कारण तयार झालेले भावनांचे कटू थर उतरून ठवतो.
छुपीवृत्ति नाहिशी होते,आणि सत्यनिष्टा आणि नीश्छलता असलेलं आमचं बालवय उभारून येतं.अशा तर्हेने एकमेकात आत्मसमर्पीत झाल्यावर काहीही होऊं शकतं.
नृत्यकलेत योग्यते शारिरीक हावभाव करावे लागतात.त्या नृत्यातून नृत्यकरणार्याचं अविर्भावातलं सत्य विशद व्हावं लागतं.आणि त्याचं व्यक्तित्व प्रदर्शीत व्हावं लागतं.
एकदा माझी एक नृत्य करणारी विद्दार्थिनी दिसायाला सुंदर आणि शरिरसौष्टव मोहक असलेली असतानाही तिला हावभाव प्रकट करता येत नव्हते.एकदा आम्ही नृत्याची रियाज करीत असताना तिचं पाच मिनीटांच सोलो नृत्य होतं.एकदा करून तिला श्वास लागला.मी तिला परत करायला सांगितलं.ती करण्यात मग्न झाली.ती तिच्याशी प्रामाणिक होती.सरते शेवटी तिने अत्युत्तम नृत्य केलं.
नर्तक म्हणून आम्हाला आमचा सर्व अनुभव रंगमंचावर आणावा लागतो.आम्हाला किती फिरक्या घेता येतात किंवा किती उंच उड्डाण करता येतं,किती उंचीवर पायाची हालचाल करता येतं हे दाखवून प्रेक्षकाला रोमांचीत करायचं नसतं.सतत केलेल्या संवयीने बर्याच लोकाना ते करता येईल.आम्हाला आमच्या सत्यनिष्टेशी एकरूप व्हावं लागतं.त्याचा एक हिस्सा व्हावं लागतं. जेव्हा अभिनय वाखाणला जातो तेव्हा नुसते हातवारे मनात ठेवावे लागत नाहीत. तर अभिनयातून एक प्रकारची संवेदना येते,आणि ती संवेदना नृत्यकाराच्या प्रकटनातून येते.
रंगमंचावरच्या उत्तम अभिनयाने श्रोतेगणाना अशा पातळीवर न्यावं लागतं की ते त्यातून स्वतः बद्दल काही तरी शिकतील.हे आपल्या सर्वांसाठी आहे असं त्याना वाटावं.हे सर्व निपूणता प्राप्त करण्यासाठी आहे असं त्याना वाटावं.आणि सर्वांत जास्त ते सत्यनिष्टेशी संबंधीत आहे हे तर नक्कीच वाटावं.
माझी खात्री आहे की स्वतःहून चांगलं असणं म्हणजेच जसं माझे बाबा म्हणायचे, तसं आपण आपल्याशी सत्यनिष्ट असणं. “
नृत्य करणं दिसायला सहज सुलभ वाटतं.पण रोहिणीने जे समजावून सांगितलं ते ऐकून माझ्या मनात आलं की गाण्याबरोबर हातवारे करणं इकडून तिकडे उड्या मारणं हे करत असताना आणखी ज्या गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतात त्याची माझ्या सारख्या सर्व साधारण माणसाला कल्पना पण करता आली नसती.गुरू शिवाय कसली विद्दा हेच खरं.

Saturday, November 22, 2008
“शब्दांवाचून कळले सारे”
मी तळ्यावर पुस्तक वाचत प्रो.देसायांची वाट बघत बसलो होतो तेव्हड्यात एक व्यक्ति माझ्या जवळ येऊन हंसली.मी पण त्याच्याशी हंसलो.इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्यावर माला कळलं ही व्यक्ति भाऊसाहेबाना पण ओळखते.त्याच्या बरोबर एक मोठा सफेद रंगाचा कुत्रा होता.तो सतत वळवळ करत होता.
मी म्हणालो,
“तो तुम्हाला घरी जावूया म्हणून सांगतोय.”
त्यावर ते गृहस्थ मला म्हणाले,
“नाही नाही प्रो.देसाई समोरून येत आहेत ते त्याने लांबून पाहिलंय.त्याना तो चांगलाच ओळखतो.भाऊसाहेब पण त्याच्यावर खूप प्रेम करतात.प्रोफेसर जेव्हा जवळ आले तेव्हा तो जास्तच चूळबूळ करू लागला.भाऊसाहेब जवळ आल्यावर म्हणाले,
“ह्या मोत्याच्या मागे गंमतीदार इतिहास आहे.सांगा हो ह्याना जे तुम्ही मला सांगितलंत ते ह्या मोत्या बाबत.”
पडत्या फळाची आज्ञा घ्यावी तसंच भाऊसाहेबांच्या विनंतीला मान देऊन ते गृहस्थ सांगू लागले,
“तो ज्या तर्हेने आपलं जीवन जगतो ते मी मानतो. आणि त्याच्या सारखं आपण जगावं असा माझ्या मी प्रयत्न करतो. त्याच्या सुखाची पातळी पाहून त्या पातळीवर येण्याचा मी प्रयास करतो.जसं तो जेव्हा जेव्हा त्याच्या प्रत्येक जेवणाकडे किती प्रशंसाकरून आणि संतुष्ट होवून पहातो अगदी तसं. जसं मी फ्रिझमधून प्रत्येक खाणाच्या वस्तु पाहून हे खाऊ का ते खाऊ असा विचार करताना आणि अमुक अमुक वस्तु खायला नाही हे पाहून थोडा नाखूष होतो,तसाच तो जमिनीवर गोल गोल फिरून उत्तेजीत होऊन तेच तेच जेवण तेव्हडाच वाटा आणि तेच नेहमीच्या वेळी रोज मिळणार म्हणून अपेक्षीत असतो.
तो वर्तमानात रहातो हे मी मानतो.
ज्यावेळी माझा दिवस तणावाने भरलेला,गर्दीच्या प्रवासाने कंटाळवाणा झालेला,अगणीत अंतिम निर्णयाने अपेक्षीत झालेला असतो त्यावेळी मी घरात एकटाच असलेल्या मोत्याची आठवण काढतो.त्याचा दिवस कंटाळवाणा आणि थकलेला असावा पण मी घरी आल्यावर तो ह्या सर्व बाबी विसरून माझ्याशी एकरूप होतो.कुणी कुठच्याही जातीचा,धर्माचा आणि कसाही दिसणारा असेना सगळ्याशी मोत्या समान भावनेने वागतो.त्याला कसलाच फरक दिसत नाही.तो कधीच पुर्व-ग्रहीत नसतो.
मोत्या माझ्या घरी येण्यापूर्वी मी रसत्यावरून जाताना कुणाशीही बोलत नसायचो ना कुणाकडे बघत बसायचो,किंवा कुणाशिही ओळख व्हावी याचाही विचार करायचो.मोत्याबरोबर रसत्यावरून जाताना ह्या सगळ्या गोष्टीत आता माझ्यात बदल झाला.आता कुणी माझ्याशी हंसल्यास मी पण हंसतो आणि मोत्या शेपटी हलवीत एखाद्दाकडे थांबला तर मी पण त्याना हलो करून त्याच्या बरोबर थांबतो.
पूर्वी माझ्याकडे कुत्रा नव्हता.एका माझ्या मित्राने माझ्यावर दबाव आणला माझं एकाकी जीवन पाहून त्याला त्याच्या जीवनाची आठवण येऊन तो प्रभावित झाला.आणि हा मोत्या मला त्याने दिला.रात्री रात्रीपर्यंत कामावर राहायचं,विकएंडचा एकटेपणा,किंवा एकदोन फोन ऐकून होय नाय बोलण्यापुरते संवाद करायचे. आणि फोनवर तरी कसली बोलणी? माझ्याबद्दल सारं आणि माझ्या जीवनात काय कमजास्त आहे ते.एकतर मी कामावर असायचो किंवा कामाबद्दल बोलायचो त्यामुळे मला कुणी मित्र वेळ घालवायला बोलवायचेच नाही.
एका रविवारी मला एकाएकी लक्षात आलं,की कुणाशी ही सहजासहजी माझी मैत्री होण्याची चिन्ह कमीच आहेत पण जर का मीहून प्रयत्न केला तर होईल.आणि म्हणून मी मोत्याला माझ्या मित्राकडून आणलं.
एकाएकी जिथे माझ्यावर कुणी अवलंबून नसण्याची प्ररिस्थिती होती तित मोत्यामुळे बदल आला.माझ्या अंगावरचा स्वार्थीपणा पूरा धुऊन निघाला.
बाहेर घेऊन जा,जेवायला घाल,साफ कर.ह्यामुळे माझ्यावर कुणीतरी अवलंबून आहे हे मला आवडायला लागलं.त्याच्या जरूरती मी भागवायचो आणि तो माझ्या.
मोत्याची उत्कृष्ट ईमानदारी मी मानली.माझा दरवाज्याजवळचा हासभास त्याला माझं स्वागत करायला उत्तेजीत करायचं.
आता माझी पत्नी कामावरून परत आल्यावर मी तिचं स्वागत करायला मोत्याकदून शिकलो.”
त्याच हे सर्व वर्णन ऐकून झाल्यावर मी त्याला म्हणालो,
“मग आता तुमच्या पत्नीला ह्याच्या बरोबर राहायला जमेल का?”
मला म्हणाला,
“ती माझी पत्नी होण्यापूर्वी मी तिला हीच मोत्याची हकिकत सांगितली.आणि तिच्या प्रतिक्रियेची वाट बघत होतो.लगेचच तिने मोत्याला जवळ घेऊन त्याला गोंजारायला लागली.”
असं म्हणून तो माझ्या प्रतिक्रियेची वाट पहात राहिला.
मी गुणगुणलो,
“शब्दा वाचून कळले सारे शब्दांच्या पलिकडले”
माझी ओळ संपता संपता तो म्हणाला,
“प्रथम तिने ऐकिले अन,मना सारखे घडले”

Thursday, November 20, 2008
प्रत्येक व्यक्ती सन्मानाला पात्र असते
आज प्रो.देसाई खूप दिवसानी आपल्या नवीन मित्राबरोबर तळ्यावर आले होते.माझी ओळख करून दिल्यानंतर आम्ही नेहमीप्रमाणे इकडच्या तिकडच्या गप्पा करायला सुरवात केली.त्यांचा हा माझा नव्याने ओळख झालेला मित्र आपली नोकरीत असतानाचे काही अनुभव सांगण्याच्या ओघात एका मजेदार किस्याला त्यानी हात घातला.ते एका सॉफ्टवेअर कंपनीचेसि.इ.ओ होते ते ओघाओघाने मला कळलं.
ते म्हणाले,
“कामानिमीत्त मी एका शहरातून दुसर्या शहरात जाताना बरेच वेळा त्या कंपनीची गाडी येऊन मला त्यांच्या मिटींगच्या जागी घेऊन जायची.पण कधी कधी मला एअरपोर्टवरचीच टॅक्सी करून जावं लागायचं.असंच एकदा बंगलोर एअरपोर्टवर टॅक्सीत बसल्यावर ड्राईव्हर बरोबर हलो-हाय झाल्यानंतर इकडच्या तिकडच्या गोष्टी करीत असताना,माझ्या लक्षात आलं की तो ड्राईव्हर साधारण साठएक वर्षाचा असावा.माझ्या मनात आलं की ह्या वयावरही त्या बिचार्याला हा साधा जॉबकरून मेहनत करायला किती कष्ट पडत असतील.नंतर चौकशी केल्यावर लक्षात आलं की तो पण एका मोठ्या कंपनीतून चीफ फायनॅन्स मॅनेजर होऊन रिटायर्ड झाला होता.आणि पुन्हा आपल्या अनुभवासाठी त्याला दुसर्या कंपन्या मिटिंगसाठी बोलवत राहयचे.तिच तिचमंडळी तेच तेच विषय याला तो कंटाळून त्याला ती कामं नकोशी झाली.आणि हा टॅक्सी चालवायचा जॉब त्याने घेतलाहोता.मी हे ऐकून थोडा स्तिमीतच झालो.मी असं का म्हणून विचारल्यावर मला म्हणाला,
“इतर जगाशी संबंध रहावा,निरनीराळे लोक भेटावे, आणि वेळ निघून जावा यासाठी टॅक्सी चालवण्याची त्याला कल्पना सुचली.जाता जाता त्याने मला फायनॅनशीयल बाबतीत एक उपयुक्त उपदेश पण दिला.मला वाटतं,प्रत्येक माणूस आदर सन्मानाला पात्र असतो.आणि प्रत्येकाकडून नवीन काही शिकायाला मिळतं.
त्यामुळे मी एक निर्धार केला होता की टॅक्सी ड्राईव्हर पासून साध्या चपराश्यापर्यंत त्यांच्या गोष्टी ऐकून घ्याव्या.आणि त्यामुळे प्रत्येकजण मला त्या जागी- मी कधी भेट दिली नसती अशा जागी- येण्याचा अवसर द्दायचा, किंवा मी स्वतःहून कधीच केली नसती अशी गोष्ट करायला मोका द्दायचा.
मी पाहिलंय की बरेचसे लोक माझ्याशी समजूतदारपणे वागतात.जेव्हा मी त्यांच्यात स्वारस्य दाखवतो आणि त्यांना सन्मानाने वागवतो तेव्हा.ते काय म्हणतात ते सारं ऐकून घेतो तेव्हा.सन्मान द्दायचा याचा अर्थ प्रत्येक गोष्टीत त्यांच्याशी सहमत झालं पाहिजे असं काही नाही.माझ्या कामातही शंका, गैरसमज,आणि चूका व्हायला वाव असायचाच.
प्रत्येक बाबतीत सभ्यता ठेऊन वागायचं आश्वासान देता जरी आलं नाही तरी मला आठवत नाही एखाद्दाच्या संस्थळावर जाऊन त्या लेखावर कटूप्रतिक्रिया देऊन झाल्यावर खरमरीत प्रतिसाद त्यावर आला नसावा. आणि कालांतराने मी अपमानजनक वागल्याचं आठवून मलाच अनुचीत आणि खराब वाटायचं.
काही लोकाना वाटतं ही संस्थळं माणसामाणसातला जीवंत संबंध विलग करतात.पण मला ते पटत नाही. प्रत्यक्षपणे ते एक दुवा ठेवण्याचं माध्यम आहे.
कधी कधी संस्थावळरच्या विचारांची देवाण-घेवाण चिडचीडी झाली की बरेच वेळा इमेलने किंवा फोन करून त्यातील सामुहीक संकेत थोडे विचारपूर्ण करून कटूता कमी करता येते.
निव्वळ शब्दाचं वाचन बरेच वेळा अनर्थाला आमंत्रण देतं.हे चांगलं लक्षात ठेवून राहणं ही संस्थळाच्या वाचनाची क्लुप्र्ती आहे.
संस्थाळावर असो किंवा प्रत्यक्षपणे असो मी ज्यावेळी नव्या लोकाशी परिचय करतो त्यावेळी मी जर का उघड मनाचा, आणि जिज्ञासू राहून वागलो तर मी नवीन गोष्टी नक्कीच शिकतो.
मला वाटतं,दुसर्या व्यक्तिला सन्मानाने वागवणं हे अत्यावश्यक आहे-वाटलं तर स्वार्थीपणाचं-म्हटलंत तरी चालेल.
भाऊसाहेबांच्या ह्या नवीन मित्राबरोबर चर्चा करण्यात माझा वेळ मात्र मजेत गेला.

Monday, November 17, 2008
घडता घडता घडेल ते घडेल
माझा एक मित्र अरूण ढवळे जे.जे.स्कूल ऑफ आर्टस मधे डिप्लोमा घेऊन झाल्यावर एका नावजलेल्या वर्तमानपत्रात कार्टूनीस्ट म्हणून काम करायचा. धोबीतलावला त्याचा एक स्टुडियो पण आहे. आणि बरं चाललं आहे.मी मेट्रोसिनेमा जवळ बसची वाट बघत उभा असताना आमची नजरा नजर झाली. मला त्याने बसला उभ्या राहिलेल्यांच्या रांगेत हाताला ओढून माझ्या बरोबर चल म्हणून घेऊन गेला,तो एकदम त्याच्या स्टूडियोत.
निरनीराळे फोटोझ,फ्रिहॅन्ड स्केचीस,कार्टून्स,म्युझीयम मधे ठेवण्यालायक काही आडव्या फोटो फ्रेम्स,लॅन्डस्केप्स वगैरे बघून मला बरं वाटलं.
एका गिर्हाईकाला पटवून झाल्यावर माझ्या बरोबर गप्पा मारायला बसला.लंच टाईम असल्याने शेजारच्या हॉटेल मधून दोन प्लेट्सची ऑर्डर देऊन आला.जुन्या आठवणीना उधाण आलं.माझ्याकडून काही गोष्टी त्याने ऐकल्यावर मी म्हणालो,
“आता तुझा जीवन प्रवास कसा झाला तो सांग”
अरूण सांगू लागला,
“माझ्या पूर्वीच्या कथा ऐकशील तर तू तोंडात बोटच घालशिल.कुठे हा माझा फोटो स्टुडियो आणि कुठे मी सुरवातीला कित्येक वर्षापूर्वी प्रयत्न केलेली आणि असफल झालेली माझी खानावळ.
कोकणात काहीच नाही जमलं तर खानावळ घालण्याचा प्रयत्न अगदीच असफल होईल असं नाही.म्हणजे मी तो धंदा काही असातसा समजत नाही.पण अन्नछत्र उघडण्याचं एक पुण्यकर्म करतो हे वाटत असताना अगदी नव्याने प्रयोग करण्यात खूप काही भांडवलाची जरूरी भासत नाही.
असाच विचार करून मी वेंगुर्ल्या जवळ उभ्यादांड्यावर एक छोटीशी खानावळ उघडली.सुनील गांवसकरचं हे मुळगांव हे तुला माहित असेलच.चिं.त्र्य. खानोलकरची पण अशीच एक खानावळ होती.आणि त्या धंद्यात त्यांच लक्ष लागत नव्हत.पण पोट्यापाण्याची सोय म्हणून करीत होते.
खानोलकरांच उदाहरण देण्याचा मतितार्थ असा की कुठे खानवळीचा धंदा आणि कुठे शेवटी महान नाटककार कथाकार म्हणून नावाजायला येणं.माझं थोडंफार तसंच झालं.त्या अयशस्वी प्रयत्नातून पुढे जे.जे स्कूल ऑफ आर्टसमधे शिकून इथे आता हा स्टुडियोच्या धंद्यात गुरफटणं.”तरट्यात”काय लिहून ठेवलेलं असतं हे कळत नाही तेच बरं.
मी म्हणालो,
“तुझ्या त्या खानावळीचं काय झालं ते सांग”
अरूण म्हणाला,
“तेच सांगायचं आहे.सहा ताटं,तीन फूलपात्र असली तरी बारा लोकांची जेवायची सोय करायला कठीण वाटण्याचं काहीच कारण नाही.चहाचे कप,किंवा पितळेच्या वाट्या पाणी पिण्यासाठी,आणि केळीची पानं किंवा फणसाच्या पानाच्या पत्रावळी ताटं म्हणून वापारता येतात.एकदा एका मित्राच्या घरी पार्टी होती म्हणून चिकन तयार करण्यापूर्वी चिकन कापायला एकच सूरी होती तरी मी कात्री वापरून काम पार पाडलं होतं.मी तसा ह्या बाबतीत सुधारणावादी आहे.ही माझी वृत्ति उत्तेजन देणारी, साहसी,आव्हान देणारी आणि सृजनशील बनायला अवसर देते.
योजना आखून,निर्धारीत मार्ग पत्करून अडकून रहाण्यापेक्षा अशा तर्हेने काम करताना गंमतीदार गोष्टी घडायला मोका मिळतो.पदार्थ बनविण्याच्या सुची प्रमाणेच डीश बनवली पाहिजे असं नाही.मी नेहमीच एखाद्दा पदार्थात तूप आणि लसूण सुचीपेक्षा जास्तच वापरायचो.एकच दुष्परीणाम म्हणजे थोडं वजन वाढतं.
मी कुणाकडून खानावळ कशी चालवायची याचे धडे घेतले नव्हते.घडता घडता घडेल ते घडेल हीच वृत्ती ठेवली.खानावळ चालवण्याच्या स्वैर कल्पनेने मी भारावलो होतो.त्यात मी अपयशी होईन असं मला कदापी वाटलं नव्हतं.खानावळ चालू केल्यावर तसं होईल असा मला भासायला लागलं.पण त्याला उशिर झाला होता.
आणि अर्थात पैसे कमविण्याचा मुद्दा माझ्या यादीत अगदी शेवटचा होता.त्यामुळे काही तरी अद्भुत करून पाहाण्याकडे लक्ष केंद्रीत करायला मला स्वातंत्र्य मिळालं. कुठलीही गोष्ट कशी असावी ह्याचं माझ्याकडे कसलंच अनुमान नव्हतं.गाडा मी पुढे रेटीत गेलो आणि ना ना तर्हेच्या संभावनांचा शोध लावला,बरोबर खूप चूका पण केल्या.खरंच ह्यामुळे शिकायला मोठी संधी चालून आली.एखादी गोष्ट यशस्वी झालीच तर ठीक आहे. झालीच आहे.आणि नाहीच झाली तर मात्र मला का नाही झाली ह्याचा विचार करावा लागायचा आणि यशस्वी व्हायला नंतर कुठला दुसरा मार्ग हुडकून काढावा लागायचा.
चुका होतानाच शोध लागतात.कलिंगड खाताना चिमूट भर मीठ चोळ तेच कलिंगड किती गोड लागतं हे लक्षात येईल.विश्वास ठेव माझ्यावर.एकदा करून बघ.साखरेच्या चिमूटा ऐवजी मी चुकून मीठाची चिमूट कलिंगडाला लावली होती.
माझ्या खानावळीत वेटर म्हणून शिकलेली पोरं मी ठेवली नाहीत.ते इतकं मला महत्वाचं वाटलं नाही.जोपर्यंत गिर्हाईकाला काय हवंय हे ओळखणं,त्यांच्याशी चांगली वागणूक ठेवणं, आणि गिर्हाईकाचं समाधान होईल अशी त्याना ट्रिटमेंट देणं हे झाल्यावर वेटरला युनीफॉर्म असला पाहिजे ह्याची मी कधीच पर्वा केली नाही.त्यांचे कपडे स्वच्छ असले म्हणजे झालं.
खरं म्हणजे विचित्रताच प्रत्येकाला विपुलता आणते.
काही लोक मला म्हणाले खानावळीचा माझा धंदा अपयशी ठरला.का तर मला दिवाळखोरी करावी लागली.खरं तर मी एव्हडा धनवान-पैशाच्या दृष्टीने नव्हे- होतो की दुसरा एखादा यशस्वी खानावळवाला एव्हडं स्वपनातही आणू शकणार नाही.
माझ्या सुधारणावादावरच्या विश्वासाला माझी खानवळ बंद करून पुष्टी मिळाली.खानावळ सरळ बंद करून मी चालू पडलो.मी कसलेच प्लॅन केले नाहीत.मागे सगळं टाकून मुंबईला आलो.चित्रकला शिकलो आणि हा स्टुडियो घातला.
मला वाटतं कोणतीही गोष्ट करायला एकच मार्ग नसावा.जो मार्ग माझ्या कामाला येतो तो आता आहे तोच.पण हा उद्दा बदलू शकतो.”
अरूण ढवळ्याचं हे सर्व ऐकून त्याचं एक म्हणणं पटलं की “कुणाच्या तरट्यात काय लिहून ठेवलंय कुणाष्टाऊक”

Subscribe to:
Posts (Atom)