“मी शिसपेन्सिल नेहमीच वापरणार.जे अगोदरच उत्तमरित्या चालतंय त्यात अवघडपणा आणण्याची काय जरूरी आहे?”
विनय नावाप्रमाणेच विनयशील आहे. त्याला जे वाटतं ते तो अगदी विनयशीलता ठेऊन सांगत असतो. सध्याच्या धामधूमीच्या जगात जितकं साधं रहावं तितकं रहाण्याच्या तो प्रयत्नात असतो.आणि तसं असण्यात त्याला अभिमान वाटत असतो.सध्या्च्या संपर्क साधण्याच्या आणि मनोरंजन करण्याच्या मोबाईल उपकरणापासून तो दोन हात दूरच असतो.ही उपकरणं वापरून मिळणार्या सुविधा त्याच्या मनावर प्रभाव पाडू शकत नाहीत.
त्यासाठी तो त्याला वाटणारं त्याचं प्रांजाळ मत द्यायला कचरत नाही.“सगळं जग पुढे चाललं आहे.नवीन नवीन उपकरणं वापरून लोक आपलं जीवन सुखकर करीत आहेत.तू आयफोन वापरत नाहीस.घरातल्याच लॅन्ड फोनवर भागवतोस.रेडिओवरची गाणी लावून ऐकतोस. आयपॉडवर हजारो गाणी रेकॉर्ड करून लोक मनाला वाटेल ते गाणं,वाटेल तेव्हड्यावेळा ऐकत असतात.तू मात्र त्यातला नाहीस ह्याचं मला कुतूहल वाटतं.हे गौडबंगाल काय आहे.?”
मी विनयला एकदा गप्पा मारताना विचारलं.“मी त्यातला नाही.”
हे तुमचं म्हणणं अगदी बरोबर आहे.आणि गौडबंगाल काय आहे ते मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो. असं म्हणून,थोडासा घसा खाकरून विनय मला म्हणाला,
“एखाद्या साध्या शिसपेन्सीलबद्दल मला विशेष वाटतं. अशा साध्या पेन्सीलचं रुपांतर एखाद्या यांत्रिक गोष्टीत करण्याची जरूरी किंवा एखाद्या विकसित तंत्रविज्ञानविषयक गोष्टीत विकसित करण्याची जरूरी असायला हवी असं मला वाटत नाही.मला नेहमीच वाटत असतं की,जीवनात साधं राहून अर्थपूर्ण नाती ठेवायला मला सोपं जायला हवं.कारण माणसा-माणसातला संबंध,आत्मिक संबंध आणि प्राकृतिक संबंध बाळगण्यात मी आसावलेला असतो.
ह्या जगात जीवनातल्या सहजतेच्या हरएक पैलुमधे तंत्रविज्ञानविषयाने एव्हडी व्याप्ति करून ठेवली आहे की, कुणालाही दुर्लभ अभयस्थान गाठायला जास्त प्रयत्नशील रहावं लागत नाही.
मी पाहिलंय साध्यासुध्या रहाणीमुळे इतरांशी अर्थपूर्ण संबंध ठेवायला मला सोपं होत असतं.
माणसा-माणसातला अर्थपूर्ण संबंध साधण्यात, तंत्रविज्ञानविषयाने अस्तव्यस्त झालेलं जीवन, अडथळा आणत असतं.आयफोन,आयपॉड सारख्या इलेक्ट्रॉनीक उपकरणापासून मोकळं राहिल्याने,रस्त्यावरून चालताना समोरून येणार्यांना मैत्रिपूर्ण हास्य देऊन किंवा मान हलवून सहमति देऊन जायला सोपं होतं.इतरांकडून मिळणारी ही स्वीकृति प्रसन्न रहाण्यास,आनंदात रहाण्यास महत्वाची ठरते.तंत्रविज्ञानाचं महत्व मी काही संपूर्णपणे नाकारत नाही.परंतु,आयपॉड,आयफोन स्वीकारून मी माझ्या इतर मित्र-मंडळीची जागा ह्या उपकरणाना द्यायला कबूल नाही.
साधेसुधेपणामुळे,माझी शारीरीक क्षमता विकसीत करायला मला मदत होते.शारीरीक कष्टांवर आणि आपत्यांवर काबु आणण्याच्या प्रयत्नात, माझ्यातली कमजोरी आणि नश्वरता याबाबत मी जागरूक रहातो. एव्हडंच नाहीतर असं केल्यामुळे मला दिसून येतं की माझ्या मनात असलेल्या मर्यादा मी दाबून ठेवू शकतो.
आपण व्यायामशाळेचं उदाहरण घेऊन पाहूया.
तसं पाहिलं तर,सुनियोजीत व्यायाम शाळा उत्कृष्ट समजल्या पाहिजेत.पण मी पाहिलंय,व्यायाम शाळेतल्या उपकरणा ऐवजी,आणि त्याचा उपयोग कसा करायचा हे शिकवणार्या मद्तनीसा ऐवजी,मी माझ्या मनाला आणि शरीराला उच्च पातळीच्या परिश्रमासाठी तयार करू शकतो.आणि हे करण्यासाठी अगदी कुठेही आणि कमीतकमी उपकरणाच्या मदतीने मला ते करता येतं.मुद्दा असा आहे की,कसरत करण्यासाठी कुठे आणि कसलं उपकरण घेऊन ती केली गेली पाहिजे हा नाही, तर श्रम घेतल्यामुळे आणि त्यात सफलता मिळत असल्यामुळे, कसरत व्हावी म्हणून यापूर्वी कधीही न घेतलेले काहीसे तीव्र आणि कठीण परिश्रम घेऊन मी एक नवीन मर्यादा प्रस्थापित करू शकतो आणि माझ्यात असलेल्या कमजोरीबद्दल आणि क्षमतेबद्दल मला उच्चतम जागरूकता मी आणू शकतो.
माझ्यात ही जाणीव असल्याने मला माझ्या विधात्याबरोबर मजबूत दूवा निर्माण करता येतो.जीवनातला साधेसुधेपणा मला हा दूवा साधण्यात जास्त वेळ देऊ शकतो.
माणसा-माणसातलं नातं साधल्यामुळे आणि माझी प्राकृतिक नश्वरता आणि त्याचवेळी निसर्गाने माझ्यात तयार केलेली क्षमता उघड झाल्याने माझ्यात आत्मिकदृष्ट्या मजबूती आणायला मी समर्थ ठरतो.मला राहून राहून वाटतं की आपण रहात असलेल्या ह्या गतिमान,तंत्रविज्ञानविषयक जगात साधेसुधेपणाची रहाणी उत्तम आहे.मला जरूरी भासते तेव्हा हा तंत्रविज्ञानविषय मी ते एक उपकरण म्हणून वापरतो.पण कोणतेही नवीन तंत्रज्ञान,जेव्हा मी अर्थपूर्ण दूवा साधून माझं जीवन परिपूर्ण आणि सुखी करीत असेन तेव्हा,आड येत असेल तर निश्चीतच तसं येऊ देत नाही.
मी शिसपेन्सिल नेहमीच वापरणार.जे अगोदरच उत्तमरित्या चालतंय त्यात अवघडपणा आणण्याची काय जरूरी आहे?
विनयचं हे तत्वज्ञान ऐकून मी मनात म्हणालो,
“पसंत अपनी अपनी,खयाल अपना अपना.”श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com
-
जीवनभराची शिकवणूक.
Posted: Wed, 09 Nov 2011 02:38:23 +0000
“प्रत्येकाच्या अंगात ठरावीक कला असते तसंच त्याला ठरावीक ज्ञान असतं.असं असूनही आपल्याला खरा माणूस होण्यासाठी,आपला इतरांशी कसा संबंध असतो ह्यावर अवलंबून आहे.कष्ट घेणं हे नुसतच अनिवार्य नसून ते घेत असताना जीवनभराची अत्यावश्यक तालीम मिळणं हे त्याचं फळ आहे.”
आता बरीचशी थंडी पडायला लागली आहे.झाडांची पानं पिवळी व्ह्यायला लागली आहेत.एखाद दुसरं जास्त पिवळं झालेलं पान देठासकट खाली पडून झाडाखाली पानांचा पाचोळा जमायला सुरवात झाली आहे. झाडावरच्या सफरचंदासारख्या फळांनी रंग घ्यायला सुरवात केली आहे.त्याचाच अर्थ आकाराने मोठी असलेली फळं खायला गोड लागणार आहेत.वेळीच ही फळं झाडावरून काढली नाहीत तर देठासकट ती खाली पडणार आहेत.एखाद दुसर्या फळावर पक्षांनी चोच मारून फळ खाल्याचं निदर्शनाला आणून दिलं आहे.म्हणजेच ही फळं खाण्यालायक झाली आहेत.
मुबलक फळफळावळचा हा प्रदेश असल्याने ज्याने त्याने आपल्या परसात फळांची झाडं लावली आहेत. खाऊन खाऊन किती खाणार? शेवटी उरलेली फळं,पक्षी,खारी खाऊन टाकतात आणि झाडाखाली फळांचा खच पडतो.झाडाखाली पडणारी फळं कुजण्यापूर्वीच जमवून काढून टाकून जागा साफ केली नाहीतर गंदगी पसरते.आता जवळ जवळ मार्च महिना येईतोपर्यंत तळ्यावर जायचं विसरून गेलं पाहिजे.काळोख खूप लवकर येतो.संध्याकाळचे पाच म्हणजे रात्रीचे दहा वाजल्यासारखे वाटतात.अशावेळी प्रो.देसायांचा फोन येतोच.
“आपण अधून मधून एकमेकाच्या घरी संध्याकाळच्यावेळी भेटूया.”ह्यावेळी मी भाऊसाहेबांच्या घरी गेलो होतो.मी जाण्यापूर्वीच आणखी एकदोन पाहुण्याबरोबर प्रोफेसरांच्या गप्पा रंगल्या होत्या.मी गप्पांत भाग घेताना म्हणालो,
“मला वाटतं,असे काही लोक असतात की,त्यांना काही गोष्टी खचीतच माहित असतात.पण मला असंही वाटतं की,ह्या बोधगम्य गोष्टींचा,खास असा, परिणाम त्यांच्यावर होत नसावा.
एखादा खास गणीत-तज्ञ संख्येबद्दल खरं काय ते जाणत असेल,आणि एखादा इंजीनियर प्राकृतिक बळाचा त्याच्यासाठी कसा वापर करून घ्यायचा हे चांगलं जाणत असेल.पण गणीत-तज्ञ आणि इंजीनियर ही प्रथम माणसं आहेत,त्यामुळे त्यांच्यासाठी आणि त्यांच्या बरोबर मलाही धरून ,विशेष वाटण्यासारखी गोष्ट म्हणजे, ज्ञान किंवा अंगातली कला ही तितकी मोठी बाब नाही,इतरांबरोबर असलेले संबंध जास्त महत्वाचे आहेत. आपणासर्वांनाच इंजीनियर किंवा गणीत-तज्ञ व्ह्यायची जरूरी नाही पण इतरांबरोबर संबंध ठेवणं सर्वांनाच जरूरीचं असतं.”माझं हे म्हणणं ऐकून प्रो.देसाई म्हणाले,
“आपली ही एकमेकासंबंधीत नाती,जी जीवनात जास्त महत्वाची असतात, ती सांभाळायला कठीण असतात, कारण बरेच वेळा खरं काय आणि खोटं काय ह्याचा प्रश्न उद्भवत असतो.
मला वाटतं,आपल्याला खरं आणि खोटं याबद्दल खास ज्ञान नसतं.आणि जरी माहित असलं तरी,मला वाटतं, आपल्या वयक्तिक स्वारस्याच्या आणि आपल्या प्रवृत्तिच्या विरोधातही जे काही आपल्याला खात्रीपूर्वक खरं आहे असं वाटत असलं आणि शोधून काढणं निरन्तर कठीण आहे असं वाटत असलं तरी ते शोधून काढणं बरं असतं.तसं पाहिलं तर,काय सत्य आहे ह्याबद्दल आपल्याला जमेल तेव्हडं त्याचं उत्तम मुल्यांकन करून त्यानंतर आपणच ,भले त्यावर खात्री नसेना का, ती शर्त समजून कृती केली पाहिजे.
खरं काय आहे ते समजायची खात्री नसल्याने आणि कदाचीत चुकीची समज असण्याचा संभव असल्याने आपल्यात आपण दयाळु वृत्ती आणि मन वळवण्याची वृत्ती ठेवायला हवी.परंतु,त्याचबरोबर खरं शोधून काढायला सफल होण्यासाठी, आपल्याला अविचल आणि हिमती रहायला हवं.
योग्य काय आहे हे दाखवण्याच्या प्रयत्नात,नम्रता आणि कारूण्य ह्याचा मेळ जमवून सफलता आणणं काहीसं कठीण जातं.परंतु,खरं करून दाखवणं हे अंमळ कठीण असतं कारण त्यासाठी स्वतःशीच लढत द्यावी लागते.योग्य तेच करणं म्हणजेच स्वतःशीच लढत देणं,कारण,नैसर्गिक दृष्ट्या,आपण प्रत्येकजण असंच आचरण करण्याच्या प्रयत्नात असतो,प्रत्येकाला वाटत असतं आणि आपण वागतही असतो की,जणू हे विश्व आपल्याच भोवती केंद्रीभूत झालेलं आहे आणि आपलं त्या विश्वात असणं हे ह्या विश्वाचा उद्देश आहे.
मला खात्रीपूर्वक वाटतं,माझं तरी तसं काहीही नाही. परंतु,जणू आहे असं वागून, मी नक्कीच चुक करून घेणार आहे.
त्यासाठी मला नेहमीच स्वतःशी लढत देत राहिलं पाहिजे.याचाच अर्थ,कष्ट,पीडा ही नुसतीच अनिर्वाय नाही तर ती जीवनभराची अत्यावश्यक तालीम आहे आणि ह्यातून मला माझं हित कसं साधायचं हे शिकता येतं.प्रत्येक गोष्ट आपल्या मनासारखी व्हायला हवी असल्यास त्यासाठी कष्ट आणि पीडा सहन करून किंमत मोजावी लागते.तसंच,ती आपल्याला हितकारक होण्यासाठी प्रेमाला अग्रेसर भुमिका द्यावी लागते.अशी ही माझ्या मनातली श्रद्धा कुठून आली असेल तेही मला माहित आहे.मला वाटतं, माझ्या काय किंवा आणखी कुणाच्या काय आपल्या धर्मामधूनच ही शिकवणूक मिळत असते.”
भाऊसाहेब बोलायचे थांबले आहेत असं पाहून मी त्यांना म्हणालो,
“कुणीतरी म्हटल्याचं मला आठवतं,
“हे ब्रम्हांड हा एक एव्हडा मोठी चमत्कार आहे की,तो समजून घेण्यासाठी त्याच्या निकट जायला फक्त एकच मार्ग असणं महाकठीण आहे.”माझं हे विवरण ऐकून चर्चा संपवताना प्रो.देसाई म्हणाले,
“धर्मातून मिळणारी शिकवणूक तसंच समाजातल्या इतर विद्वान लोकांकडून मिळणारी शिकवणूक ऐकून घेऊन मग आपलं मत ठरवण्याचे आता दिवस आलेले दिसतात.”श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com
Friday, November 11, 2011
शिसपेन्सिल.
Tuesday, November 8, 2011
जीवनभराची शिकवणूक.
“प्रत्येकाच्या अंगात ठरावीक कला असते तसंच त्याला ठरावीक ज्ञान असतं.असं असूनही आपल्याला खरा माणूस होण्यासाठी,आपला इतरांशी कसा संबंध असतो ह्यावर अवलंबून आहे.कष्ट घेणं हे नुसतच अनिवार्य नसून ते घेत असताना जीवनभराची अत्यावश्यक तालीम मिळणं हे त्याचं फळ आहे.”
आता बरीचशी थंडी पडायला लागली आहे.झाडांची पानं पिवळी व्ह्यायला लागली आहेत.एखाद दुसरं जास्त पिवळं झालेलं पान देठासकट खाली पडून झाडाखाली पानांचा पाचोळा जमायला सुरवात झाली आहे. झाडावरच्या सफरचंदासारख्या फळांनी रंग घ्यायला सुरवात केली आहे.त्याचाच अर्थ आकाराने मोठी असलेली फळं खायला गोड लागणार आहेत.वेळीच ही फळं झाडावरून काढली नाहीत तर देठासकट ती खाली पडणार आहेत.एखाद दुसर्या फळावर पक्षांनी चोच मारून फळ खाल्याचं निदर्शनाला आणून दिलं आहे.म्हणजेच ही फळं खाण्यालायक झाली आहेत.
मुबलक फळफळावळचा हा प्रदेश असल्याने ज्याने त्याने आपल्या परसात फळांची झाडं लावली आहेत. खाऊन खाऊन किती खाणार? शेवटी उरलेली फळं,पक्षी,खारी खाऊन टाकतात आणि झाडाखाली फळांचा खच पडतो.झाडाखाली पडणारी फळं कुजण्यापूर्वीच जमवून काढून टाकून जागा साफ केली नाहीतर गंदगी पसरते.
आता जवळ जवळ मार्च महिना येईतोपर्यंत तळ्यावर जायचं विसरून गेलं पाहिजे.काळोख खूप लवकर येतो.संध्याकाळचे पाच म्हणजे रात्रीचे दहा वाजल्यासारखे वाटतात.अशावेळी प्रो.देसायांचा फोन येतोच.
“आपण अधून मधून एकमेकाच्या घरी संध्याकाळच्यावेळी भेटूया.”
ह्यावेळी मी भाऊसाहेबांच्या घरी गेलो होतो.मी जाण्यापूर्वीच आणखी एकदोन पाहुण्याबरोबर प्रोफेसरांच्या गप्पा रंगल्या होत्या.मी गप्पांत भाग घेताना म्हणालो,
“मला वाटतं,असे काही लोक असतात की,त्यांना काही गोष्टी खचीतच माहित असतात.पण मला असंही वाटतं की,ह्या बोधगम्य गोष्टींचा,खास असा, परिणाम त्यांच्यावर होत नसावा.
एखादा खास गणीत-तज्ञ संख्येबद्दल खरं काय ते जाणत असेल,आणि एखादा इंजीनियर प्राकृतिक बळाचा त्याच्यासाठी कसा वापर करून घ्यायचा हे चांगलं जाणत असेल.पण गणीत-तज्ञ आणि इंजीनियर ही प्रथम माणसं आहेत,त्यामुळे त्यांच्यासाठी आणि त्यांच्या बरोबर मलाही धरून ,विशेष वाटण्यासारखी गोष्ट म्हणजे, ज्ञान किंवा अंगातली कला ही तितकी मोठी बाब नाही,इतरांबरोबर असलेले संबंध जास्त महत्वाचे आहेत. आपणासर्वांनाच इंजीनियर किंवा गणीत-तज्ञ व्ह्यायची जरूरी नाही पण इतरांबरोबर संबंध ठेवणं सर्वांनाच जरूरीचं असतं.”
माझं हे म्हणणं ऐकून प्रो.देसाई म्हणाले,
“आपली ही एकमेकासंबंधीत नाती,जी जीवनात जास्त महत्वाची असतात, ती सांभाळायला कठीण असतात, कारण बरेच वेळा खरं काय आणि खोटं काय ह्याचा प्रश्न उद्भवत असतो.
मला वाटतं,आपल्याला खरं आणि खोटं याबद्दल खास ज्ञान नसतं.आणि जरी माहित असलं तरी,मला वाटतं, आपल्या वयक्तिक स्वारस्याच्या आणि आपल्या प्रवृत्तिच्या विरोधातही जे काही आपल्याला खात्रीपूर्वक खरं आहे असं वाटत असलं आणि शोधून काढणं निरन्तर कठीण आहे असं वाटत असलं तरी ते शोधून काढणं बरं असतं.
तसं पाहिलं तर,काय सत्य आहे ह्याबद्दल आपल्याला जमेल तेव्हडं त्याचं उत्तम मुल्यांकन करून त्यानंतर आपणच ,भले त्यावर खात्री नसेना का, ती शर्त समजून कृती केली पाहिजे.
खरं काय आहे ते समजायची खात्री नसल्याने आणि कदाचीत चुकीची समज असण्याचा संभव असल्याने आपल्यात आपण दयाळु वृत्ती आणि मन वळवण्याची वृत्ती ठेवायला हवी.परंतु,त्याचबरोबर खरं शोधून काढायला सफल होण्यासाठी, आपल्याला अविचल आणि हिमती रहायला हवं.
योग्य काय आहे हे दाखवण्याच्या प्रयत्नात,नम्रता आणि कारूण्य ह्याचा मेळ जमवून सफलता आणणं काहीसं कठीण जातं.परंतु,खरं करून दाखवणं हे अंमळ कठीण असतं कारण त्यासाठी स्वतःशीच लढत द्यावी लागते.
योग्य तेच करणं म्हणजेच स्वतःशीच लढत देणं,कारण,नैसर्गिक दृष्ट्या,आपण प्रत्येकजण असंच आचरण करण्याच्या प्रयत्नात असतो,प्रत्येकाला वाटत असतं आणि आपण वागतही असतो की,जणू हे विश्व आपल्याच भोवती केंद्रीभूत झालेलं आहे आणि आपलं त्या विश्वात असणं हे ह्या विश्वाचा उद्देश आहे.
मला खात्रीपूर्वक वाटतं,माझं तरी तसं काहीही नाही. परंतु,जणू आहे असं वागून, मी नक्कीच चुक करून घेणार आहे.
त्यासाठी मला नेहमीच स्वतःशी लढत देत राहिलं पाहिजे.याचाच अर्थ,कष्ट,पीडा ही नुसतीच अनिर्वाय नाही तर ती जीवनभराची अत्यावश्यक तालीम आहे आणि ह्यातून मला माझं हित कसं साधायचं हे शिकता येतं.
प्रत्येक गोष्ट आपल्या मनासारखी व्हायला हवी असल्यास त्यासाठी कष्ट आणि पीडा सहन करून किंमत मोजावी लागते.तसंच,ती आपल्याला हितकारक होण्यासाठी प्रेमाला अग्रेसर भुमिका द्यावी लागते.अशी ही माझ्या मनातली श्रद्धा कुठून आली असेल तेही मला माहित आहे.मला वाटतं, माझ्या काय किंवा आणखी कुणाच्या काय आपल्या धर्मामधूनच ही शिकवणूक मिळत असते.”
भाऊसाहेब बोलायचे थांबले आहेत असं पाहून मी त्यांना म्हणालो,
“कुणीतरी म्हटल्याचं मला आठवतं,
“हे ब्रम्हांड हा एक एव्हडा मोठी चमत्कार आहे की,तो समजून घेण्यासाठी त्याच्या निकट जायला फक्त एकच मार्ग असणं महाकठीण आहे.”
माझं हे विवरण ऐकून चर्चा संपवताना प्रो.देसाई म्हणाले,
“धर्मातून मिळणारी शिकवणूक तसंच समाजातल्या इतर विद्वान लोकांकडून मिळणारी शिकवणूक ऐकून घेऊन मग आपलं मत ठरवण्याचे आता दिवस आलेले दिसतात.”
श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com
Saturday, November 5, 2011
साध्या प्रश्नातली ताकद.
“लगेचच माझ्या अंगातला लढा,लढाऊ वृत्ती म्हणा हवं तर,जागृत झाली.मी काय बरं करावं?मी माझं संरक्षण करावं का? का,त्यांने मला धमकावं आणि मी माझा स्वाभिमान कमजोर करून घ्यावा?”
मी मधुकरच्या घरी गेलो होतो.माझं त्याच्याकडे थोडं काम होतं.त्या कामाविषयीच गप्पा चालल्या होत्या. इतक्यात बाहेर रस्त्यावर आरडाओरड चाललेली ऐकू आली.मधुकरचा मुलगा धावत वरती आला आणि आपल्या बाबांना कसली गडबड झाली ते सांगत होता.दोघां माणसात बोलण्या-बोलण्यात बाचाबाची झाली होती आणि प्रकरण हातघाईवर आलं होतं.
मुलाचं सर्व ऐकून घेतल्यावर मधुकर मिष्कील हसला.
मी त्याला विचारलं,
“तुझं हसण्याचं कारण काय?काहीतरी तुला सांगायचं आहे असं दिसतं.”
मला मधुकर म्हणाला,
“माझं हसण्याचं कारण म्हणजे,
“बोलण्या-बोलण्यात बाचाबाची झाली”हे जे माझा मुलगा म्हणाला त्यावरून माझ्याच लहानपणीचा एक किस्सा मला आठवतो.तो तुम्हाला सांगावा असं मनात येऊन मी तो माझा प्रसंग कसा सांभाळला ते आठवून हसू आलं.”
“असं काय ते ऐकूया तर खरं”
मी मधुकरला बोललो.
“मला आठवतं त्यावेळी मी सोळाएक वर्षाचा असेन.”
मधुकर मला सांगायला लागला.
“माझे आईबाबा आणि मी गाव सोडून शहरात रहायला गेलो.माझ्या वडीलाना एका चांगल्या नोकरीची संधी आली होती.पण मला हा बदल तितकासा आवडला नाही.गेली कित्येक वर्षं मी ज्या शाळेत शिकत होतो त्या शाळेचा आणि मित्र-मैत्रीणींचा मला सराव झाला होता.त्यांना सोडून आता मला नव्या वातावरणात आणि नव्या शाळेत एक अपरिचित म्हणून थोडाकाळ का होईना रहावं लागणार होतं.
त्याबद्दल मी नाराज होतो.
मला त्या नव्या शाळेतला पहिला दिवस आठवतो.मी अगदी एकांडा पडलो होतो.लंच घेण्याची घंटा वाजली आणि मी शाळेच्या कॅन्टीनमधे जायला निघालो.बहुदा मी एकदम पहिलाच मुलगा कॅन्टीनमधे प्रवेश करीत होतो.त्या कॅन्टीनच्या मोठ्या हॉलमधे मी एका कोपर्यात असलेल्या टेबलावर जाऊन बसलो आणि मी माझ्या आईने दिलेला डबा उघडून जेवायला सुरवात केली होती.
जसजशी आणखी मुलं हॉलमधे यायला लागली ते पाहून माझ्या लक्षात आलं की एक कंपू माझ्या जवळ आणि जवळच्या टेबलावर येऊन बसला.आणि हॉलच्या दुसर्या कोपर्यात दुसरा असाच कंपू जमा होऊन बसला होता.हे पाहून मला जरा विचित्र वाटायला लागलं.जणू ह्या दोन कंपू मधे एक सीमा आखलेली होती आणि तो हॉल दोघांत विभागला गेला होता.हे आपणहून केलं गेलेलं विभाजन मला जरा नवीनच होतं.पण मी जिथे होतो तिथेच बसलो.
माझ्या जवळच्या कंपूने,मी तिथे बसलो असताना, माझ्याकडे काहीसं विचित्रपणे पाहिल्यासारखं केलं.पण मी माझ्या डब्यातलं निवांतपणे खात बसलो होतो.लंचची वेळ होत असताना मधेच एक उंच,धिप्पाड मुलगा, उठून उभं राहून माझ्याजवळ येऊन टेबलावर हात पसरून माझ्याकडे बघत बसला.आणि मला म्हणाला,
“तू कदाचीत चुकीच्या कंपूत तर नाही ना बसलास?”
असा प्रश्न करून माझ्याकडे पहात राहिला.
लगेचच माझ्या अंगातला लढा,लढाऊ वृत्ती म्हणा हवं तर,जागृत झाली.मी काय बरं करावं?मी माझं संरक्षण करावं का? का, त्यांने मला धमकावं आणि मी माझा स्वाभिमान कमजोर करून घ्यावा?ह्या कंपूतले इतर अगदी शांत झाले.माझ्या प्रतिसादाची वाट पहात असावेत.
तो धिप्पाड टारगट आखाड्यात उतरूं पहात होता पण मी त्याचं आव्हान न घेण्याचं ठरवलं.
मी त्याच्याकडे नजर देऊन,मी अगदी भोळा आहे असं दाखवून त्याला विचारलं,
“चुकीच्या कंपूत म्हणजे तुला काय म्हणायचं आहे?”
माझं हे ऐकून तो आश्चर्याने आवाक झालेला दिसला.माझ्याकडे दोन सेकंद नजर लावून पाहू लागला. आपल्याच मानेला झटका देऊन तो बाजूला झाला.
माझ्या साध्या प्रश्नाने तो निशःस्त्र झाला.माझ्या विश्वासाची मी तडजोड केली नाही.किंवा त्याच्या कंपूगीरीला मी मान्यता दिली नाही.मी हळू हळू शांत झालो.आणि काही प्रकरण न करता मी माझ्या डब्यातलं उरलं होतं ते खाल्लं.
ह्या घटनेने मे एक शिकलो की,एखादा साधासा प्रश्न म्हणजे,
“तुला काय म्हणायचं आहे?”
असा प्रश्न जबरदस्त ताकदवान असतो.त्या प्रश्नातून संदेश दिला जातो की,समजून घ्यायची माझी इच्छा आहे आणि ऐकून घेण्याची माझी तयारीपण आहे.
माझ्या त्या साध्या प्रश्नाने, सहिष्णुतेने असहिष्णुतेशी, टक्कर दिली. असं मला वाटलं.एरव्ही,
“मी जिथे बसलो आहे तिथे बसण्याचा माझा हक्क आहे आणि तुझ्या वाटेने तू जा”
असं मी त्या दांडगटाला सांगून वाद घालू शकलो असतो.परंतु,तसं केलं असतं तर,रक्षात्मक पवित्रा घेऊन, मी जास्त आरडाओरडीला जन्म दिला असता आणि ते प्रकरण जरका तिथेच संपलं असतं तर मी नक्कीच भाग्यवान झालो असतो असं म्हणायला हवं.त्याऐवजी एकाअर्थी मी त्याला माझ्याशी बातचीत करायला आमंत्रण दिलं होतं.
त्यावेळी माझ्या डोक्यात असा विचार आला की माझ्या त्या प्रश्नामुळे त्या धट्टींगणाला, कंपूगीरीशीच त्याने दोनहात करावे, असं आव्हानच दिलं होतं.पण हे कितपत खरं होतं मला माहित नाही.एक मात्र मला कळलं जेव्हा मी,पुढचं अख्खं वर्ष, त्याला कॅन्टीनमधे पहायचो,तेव्हा तो माझ्याजवळ नजर करून पहायचा आणि चालू पडायचा.जरी तो माझ्याशी केव्हाही हसला नाही तरी त्याच्या स्वीकृतीवरून मी एक समजून गेलो की त्याचं ते तसं करणं हा एक माझ्याशी दुवा सांधण्याचा संदेश असावा.”
मला हे मधुकरने सांगीतल्यावर,माझ्या मनात विचार आला की मधुकर त्या लहान वयात विचाराने किती पोक्त होता.
मी त्याला म्हणालो,
तुझं खरंच कौतूक केलं पाहिजे.हातघाईवर जाण्याऐवजी तू त्यावेळी बातचीत करण्याचा मार्ग पत्करलास.
साध्या प्रश्नात काय ताकद असते हा तुझा विश्वास तुला त्या प्रसंगातून सहजच वाचवू शकला.मला वाटतं, साध्या प्रश्नाने, नम्रतेचा आणि आलोचनात्मक ऐकून घेण्याच्या तयारीचा,त्या साध्या प्रश्नातून संदेश दिला जातो. असहिष्णुतेशी दोन हात करण्यासाठी हे अस्त्र किती ताकदवान आहे हे दिसून येतं.”
“मी तुमच्याकडून ह्याच विचाराची अपेक्षा करीत होतो.म्हणूनच मी तुम्हाला तो माझा किस्सा सांगीतला.”
असं म्हणून मधुकरने माझ्या कामाविषयी चर्चा करायला पुन्हा सुरवात केली.
श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com
Wednesday, November 2, 2011
कोकणातला उन्हाळा.
Sunday, October 30, 2011
दावूनी बोट त्याला,म्हणती हसून लोक.
जे.पी रोडवर स्वदेश हॉटेल समोर माझी आणि वंदनाची गाठ पडली.तिला पाहून मी एकदम चकीत झालो.माझा अचंबीत चेहरा पाहून वंदनापण थोडी लाजलेली मी पाहिली.
रस्त्यात गप्पा मारण्यापेक्षा आपण स्वदेशमधे कॉफी पिऊया असं मी तिला म्हणालो.
वंदनानेच मला ओळखलं.एरव्ही मी तिला ओळखलं नसतं.तसं पाहिलंत तर खूप वर्षानी मी तिला भेटलो होतो. माझ्या मनात तिची छबी होती ती म्हणजे जाड काचेचा गोल चष्मा आणि एकदम सुदाम्याची प्रकृती असलेली वंदना.पण आता वयात आलेली तरूण वंदना अगदीच निराळी दिसत होती.चष्मा जाऊन आता तिने कॉन्टॅक्ट लेन्सेस वापरायला सुरवात केली असावी आणि अंगानेपण थोडी भरली होती.
कॉफीचा पहिला घोट घेऊन झाल्यावर मी वंदनाला म्हणालो,
"काही फुलं कशी उशीरा उगवतात तशीच काही मुलं उशीरा मोठी होतात.उशीरा सुंदर दिसतात."
वंदना आता सुंदर दिसते हा माझा शेरा ऐकून वंदना खूपच खजील झाली.
मला म्हणाली,
"तळ्यात पोहत असलेल्या बगळ्यांच्या पिल्लांच्या कळपात असलेलं,काळसर दिसणारं बदक खरं तर राजहंस असतं.जरा मोठं झालं की ते त्या कळपातून सहजच उडून जातं.
माझ्या आईचं मला सर्वांत आवडणारं सांगणं म्हणजे,ती मला म्हणायची की,
"तू मुळीचच पुस्तकी किडा नाहीस."
माझ्या मनात हा विचार आल्यावर माझी मलाच गंमत वाटते.मी अगदीच हाडळकुळी होते.मी इतकी हाडकुळी होते की मला माझे डॉक्टर म्हणायचे की,
"तुझ्यात काही तरी,कमी आहे."
असेल काहीतरी कमी.माझे जाड भिंगाचे दोन चष्मे होते.माझ्या चेहर्याला ते खूप मोठे दिसायचे.अगदी गोल आकाराचेही होते."
मी म्हणालो,
"अगदी लहानपणी मी तुला पाहिल्याचं मला आठवतं.साधारण पहिलीत असशील."
माझं हे ऐकून वंदनाला आपल्या लहानपणची आठवण आली असावी.कॉफीचा घोट घेण्यासाठी उचललेला कप पुन्हा बशीत ठेऊन हसत,हसत मला म्हणाली,
"मला आठवतं, मी पहिलीत असताना,तुम्ही मला पाहिलं असतंत तर,मी आमच्या शाळेच्या खेळाच्या मैदानात असताना घाबरून एव्हडी पळत रहायची की,अगदी दुष्ट विचाराची दोन मुलं माझा खूप पाठलाग करायची. सरतेशेवटी ती दोन दुष्ट मुलं मला पकडायची,कारण माझ्या पायात असलेल्या त्या छोट्याश्या काळ्या बकलच्या बुटात मला जमेल तेव्हडं, जोरात पळायचा मी प्रयत्न करायची.पण ती दोघं मला ढकलून द्यायची आणि
पाडायची.
एक चांगली जोराची धडक मिळाल्याने मी जमीनीवर उलथी-पालथी व्हायची आणि माझ्या आईला आवडणारा हिरवा,लाल,काळा कुठलाही फ्रॉक त्यादिवशी घालून गेलेली मी,खरचटलेला गुडघा आणि गुडघ्याजवळच फाटलेला फ्रॉक घेऊन,लंगडत,लंगडत घरी यायची.
हाडकुळी आणि डोळ्यावर, चेहर्यावर उठून दिसणारा, मोठा चष्मा असलेली ती मी सहासी पण हास्यास्पद दिसायची.माझ्यात आलेला माझा स्वतःचा जोश मलाच सांगायचा की,माझा कुणीही पाडाव करू शकणार नाही.खरं म्हणजे ह्या जोशावर माझ्या आईचा हक्क असायला हवा.
अश्रूनी भरलेले डोळे पुशीत मी ज्यावेळी घरी यायची तेव्हा माझी आई नेहमीच माझा धीर उत्क्षेपक करायची.
अशाच वेळी मी आणि माझी आई एकमेकाजवळ बसून त्या राजहंसाची गोष्ट वाचायचो.माझा तर्क आहे की ह्यासाठीच हे एकशे एकावं कारण असेल मी माझ्या आईवर प्रेम करण्याचं.
पाचवीत असताना मी गावातून शहरात शाळा शिकायला गेली.अजूनही मी विचित्र आणि हाडकुळी दिसायची,अजूनही माझ्या डोळ्यावर जाड काचांचा चष्मा असायचा आणि त्यात भर म्हणून आता मी माझे दात पुढे येऊ नयेत म्हणून तारा लावायची.डोळ्यावरच्या चष्मामुळे आणि दातावरच्या तारेमुळे मी विचित्र दिसते असं माझ्या वर्गाची बाई मला म्हणायची.
मागे वळून पाहिल्यावर मला माझ्या दिसण्याचं हसू येतं.मला वाटतं त्या लोकांचं म्हणणं अगदी योग्य होतं.
एकंदरीत काय? माझी आईच खरंतर बरोबर होती.ज्या गोष्टींमुळे माझा पाणउतारा व्ह्यायचा त्या गोष्टींकडे बघीतल्यावर आता मला गंमत वाटते,आणि माझं मलाच हसू येतं.माझ्या डोळ्यावरचा चष्मा माझ्या चेहर्यासाठी मोठा होता किंवा माझा हाडकुळेपणा कुणाच्या डोळ्यात खुपायचा,पण मी कशाला पर्वा करायची त्याबद्दल.?
माझा तर्क आहे की,असेन मी त्यावेळी दिसत हास्यास्पद, असेनही मी हाडकूळी,माझी समज आहे की,अजुनही मी तशीच आहे.पण माझी मी आहे.आणि सध्या मी जशी आहे तशी आहे हे पण ठीक आहे.मी माझा स्वतःचा स्वीकार केला नाही तर कुणीही मला स्वीकारणार नाही."
वंदनाची सत्य परिस्थिती ऐकून मला ही तिचा थोडा गहिवर आला.
मी तिला म्हणालो,
"एखादी व्यक्ती आतून कशी आहे हे महत्वाचं आहे.चवथीत असताना तो फाल्तू जाड काचेचा गोल चष्मा तुझ्या डोळ्यावर होता तो इतका महत्वाचा नव्हता.
मला वाटतं,कुणालाही राजहंस असण्यासाठी पहिलं पाऊल म्हणजे स्वतःचा स्वीकार त्याने केला पाहिजे.पण काही कारणास्तव कुणी राजहंस नसलं, तरी,ते काळंबेरं बदकाचं पिल्लूसुद्धा तितकच गोजिरवाणं असतं,असं मला वाटतं."
असं म्हणून झाल्यावर वंदनाला काय वाटत असेल हे पहाण्यासाठी तिच्या चेहर्याकडे लक्ष देण्याऐवजी,मी वेटरला पैसे देण्याचा बहाणा करून कॉफीच्या बिलाकडे पहात होतो.
कॉन्टॅक्ट लेन्स असलेले तिचे डोळे कोणत्याही कारणानी ओले झाल्याचं मला पाहायचं नव्हतं.
श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com
Thursday, October 27, 2011
“मला माहित नाही!”
“प्रेम म्हणजे काय असतं हे समजण्याची जरूरी नसण्याची अनुमति माझ्याच मला मी दिली आहे.असं करण्याने प्रेमाचाच सुगावा मला लागलेला आहे.”
मला आठवतं,फार पूर्वी पासून मनोहरशी बोलताना त्याला एखादा प्रश्न केला की बरेच वेळा तो त्याला काही माहित असलं तर ते सांगून टाकायचा.
मला त्यावेळी वाटायचं की मनोहर खरोखरंच साधा सरळ माणूस आहे..कारण असं सांगून टाकण्याने हा माणूस पुढच्या प्रकरणापासून नामानिराळा व्हायच्या प्रयत्नात नसतो हे उघड दिसायचं.
पण अलीकडे,अलीकडे मी पाहिलंय मनोहर,
“मला माहित नाही”
असं कुठल्याही प्रश्नाला उत्तर देण्याच्या प्रयत्नात असायचा.
आपण माहिती दिली म्हणून आपलं नाव उगाचच येऊ नये म्हणून तो तसं करीत असावा असा मी कयास काढला होता.
हल्लीच एकदा मी मनोहरला म्हणालो,
“असा तू पूर्वी नव्हतास.तुला माहित असलेलं सर्व काही निःसंकोच सांगून टाकायचास.आता
“मला माहित नाही”
हे प्रकरण काय आहे.?सांगशील का मला.”
मनोहरची आणि माझी दोस्ती तशीच होती म्हणून मी त्याला सरळ सरळ असा प्रश्न करायला धजलो.
“मला माहित नाही”
असं म्हणायला शिकलं पाहिजे असं अलीकडे मला वाटायला लागलंय.
बराच काळ मी असं समजून होतो की,जीवनात सर्व काही अगोदरच माहित असायला हवं. हे माझं नियुक्त कर्म आहे.आणि काही शिकायची जरूरी नाही.मी कुणाचीही मदत घ्यायला आणि मी अज्ञानी असल्याबद्दल कबूल करायला कांकूं करायचो.माझं ड्राईव्हिंग लायसन्ससुद्धा मी बराच मोठा होईतो घेतलं नाही,कारण अगोदरपासून ड्राईव्हिंग करायला न येणं असं वाटण्याच्या अनुभवाचीच मी घृणा करायचो.
म्हणून मी ड्राईव्हिंग करायचं शिकतच नव्हतो.
जसे दिवस निघून गेले तसं,
“माझं वय जितकं होत जाईल तितकं मी समजून चुकणार आहे की तसं मला कमीच माहित असतं”
ह्या रुढोक्तितल्या अर्थात मी जगत आहे.असं मला वाटायला लागलं आहे.
मला कळत नाही की, काही लोकांची जीवनं इतकी समृद्ध असतात आणि काही लोकांना जीवन जगण्यासाठी एव्हडे कष्ट घ्यावे लागतात.
मला कळत नाही की,लोकं त्यांना हव्या असलेल्या लोकांच्या प्रेमात का पडतात.
मला कळत नाही की,शांती आणि न्यायासाठी केल्याजाणार्या प्रगतीला एव्हडा असाध्य प्रयास का पडावा.
मला कळत नाही की,आपल्या रोजच्या जीवनाला सततच्या परिश्रमाव्यतिरिक्त दुसरा काही अर्थ किंवा स्वरूप आहे का.
मला कळत नाही की,ज्याची प्रेम म्हणून सुरवात होते ते भग्न का होतं.
मला कळत नाही की आपण एकमेकाला आणि स्वतःलापण दुखावून का घेत असतो.
हे सर्व जे मला कळत नाही त्याचा विचार येऊन मी मला बेचैन करून घ्यायला लागलो.अजूनही कधी कधी मला वाटतं की,मागे मी जसा बहाणा करायचो की जीवन काय आहे याचा अर्थ मला माहित आहे,कल्पना करत होतो की,ज्या गोष्टी आहेत त्या तशा का आहेत त्याची मला समज आहे.
ते चालूच ठेवावं.
अजूनही माझ्या विचारसरणीतून माझी धडपड होत असते की,आपल्याला माहित नसणं म्हणजेच ती आपली असफलता असणं.
परंतु,”माहित नसण्याच्या” देणगीचा सुगावासुद्धा मला आता लागला आहे.सर्वच उत्तरं माझ्या जवळ नसण्यातल्या स्वातंत्र्यातली मजा मला कळायला लागली आहे.आता मी दुनियेकडे नव्या दृष्टीने-कुतूहल करून,अचंबा ठेवून आणि मी आश्चर्याचा अपेक्षीत आहे असं भासवून पहात असतो.
प्रेम म्हणजे काय असतं हे समजण्याची जरूरी नसण्याची अनुमति माझ्याच मला मी दिली आहे.असं करण्याने प्रेमाचाच सुगावा मला लागलेला आहे.ज्या गोष्टी घडतात त्या तशा का घडतात हे मला ठाऊक नसण्याबद्दल कबुली देऊन,माझ्या लक्षात आलं आहे की,माझ्या स्वतःच्या आणि इतरांच्या जीवनात मी जास्त हजर असतो.
पूर्वी जेव्हा जेव्हा मला नसमजलेल्या गोष्टीबद्दल उत्तर द्यावं लागायचं तेव्हा तेव्हा मी माझ्या उत्तरातल्या वाक्याला अर्थ येण्यासाठी “चमत्कार” ह्या शब्दाचा वापर करून रिक्त जागा भरून काढायचो.
असं करताना मी त्याकडे तात्पुरतं उत्तर म्हणून-
“नक्कीच सध्या हा चमत्कारच आहे पण एक दिवस मला समज येईल.”
अशी समजूत करून घ्यायचो.
त्यावेळी कधी कधी “चमत्कार” शब्दाचा, उत्तर देताना, त्या वाक्यात वापर करून, त्या शब्दात मला अधीक अधीक गहिरं सत्य दिसायचं आणि ती जबरदस्त देणगी वाटायची.
पण आता,
“माहित नसण्याशी”
मी अधीक अधीक कृतज्ञ व्ह्यायला लागलो आहे.आणि हे सर्व माहित नसण्याने शक्य झालं आहे.”
हे सर्व मनोहरकडून ऐकून माझ्या मनात आलं की,हा गृहस्थ खरोखरच उपजतच साधा सरळ माणूस आहे.कारण
“मला माहित नाही”
ह्या त्याच्या अलीकडच्या उत्तर देण्याच्या प्रयत्ना बाबत मी केलेल्या प्रश्नाचं उत्तर
“मला माहित नाही”
असं देऊन तो मला टाळू शकला असता.पण त्याने तसं केलं नाही.
श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com
Monday, October 24, 2011
दोन वाळूचे कणही सारखे नसतात.
“आज मला वाटतं, एखादा, अतीव दुःखाने डोळ्यातून ठिपकणारा, अश्रू एक अद्भूत प्रकार असून त्याचं अस्तित्व हेच त्याचं खरं स्पष्टीकरण आहे.”
फॉल चालू झाल्यावर इतक्या लवकर इतकी जोरात थंडी पडत नाही हा माझा अनुभव होता.अजून पंधराएक दिवस तळ्यावर फिरायला जायला काहीच हरक नसावी असं मला वाटत होतं.आज सकाळीच खिडकीच्याबाहेर डोकावून पाहिल्यावर काहीच दिसत नव्हतं.एव्हडं की शेजारच्या परसातलं सफरचंदाचं झाड अजिबात दिसत नव्हतं.धुकंच एव्हडं पडलं होतं त्यामुळेच हे झालं होतं.
तेव्हड्यात प्रो.देसायांचा फोन आला.
“आज संध्याकाळी तुम्ही आमच्याच घरी या.खूपच थंडी आहे त्यामुळे संध्याकाळी तळ्यावर जाण्याचं टाळलेलं बरं.”
मी संध्याकाळी भाऊसाहेबांच्या घरी गेलो.प्रो.देसायांबरोबर आणखी दोन गृहस्थ गप्पा मारीत असताना दिसले. त्यापैकी एका गृहस्थाची आणि माझी ओळख होती.दुसर्यांशी माझ्याशी ओळख करून दिली गेली.
भाऊसाहेब मी येताच म्हणाले,
“तुमचीच आम्ही वाट पहात बसलो होतो.तोपर्यंत इकडच्या तिकडच्या गप्पा चालल्या होत्या.”
मी म्हणालो,
“आज गप्पाचा खास काय विषय आहे.?”
“त्याचीच प्रस्तावना करण्यासाठी मी तुमची वाट पहात होतो.ऐकातर.”
असं म्हणून भाऊसाहेब सांगू लागले,
“माझ्या लहानपणी असं सांगीतलेलं मी ऐकलंय की,आकाशातून पडणारे दोन बर्फाचे पापुद्रे सारखेच नसतात. त्यासाठी समुद्रावर जाऊन मुठभर वाळूतल्या कणात साम्य आहे काय, हे पहाण्याचा प्रयत्न मी केला.ते मुठभर वाळूचे कण वेगवेगळे होते.काही काळे आणि तूटलेले तर काही गोल आणि पूर्ण होते.काही चपटे आणि उन्हाने भुरे झाले होते.पण कितीही प्रयत्न करून एकसारखे दोन कण मला मुळीच पहाता आले नाहीत.मला वाटतं, सामान्यतेतच खरी जादू आहे.त्यात विशिष्टता असते,अद्वितयता असते.
प्रत्येक वस्तू विशिष्ट असते,अद्वितीय असते त्याचबरोबर पूर्णपणे सारखी असते.हे पहाण्यासाठी जगाकडे दोन-चार निराळ्या दृष्टीकोनातून बघण्याची जरूरी आहे.उदा.म्हणून सांगायचं झाल्यास,जगातला कोणताही पदार्थ घेतल्यास तो तीन साध्या गोष्टीने बनलेला असतो-प्रोटॉन्स,न्युट्रॉन्स आणि इलेकट्रॉन्स.ह्या तीन गोष्टी एकत्र येऊन एकमेकात त्या वेष्टित होतात,त्यांची चवड होते आणि मग सर्व काही होतं.अगदी शब्दशः प्रत्येक गोष्ट,अन्य गोष्टीने बनते.
हे लक्षात ठेवूनच,बरेच वेळा ह्या क्लिष्ट गोष्टीत असलेली गुढता आणि स्पष्टता समजून घ्यायला मला आधार मिळतो.सरतेशेवटी, तेच नियम आणि तिच नियंत्रण ठेवणारी ताकद, इतर गोष्टी बनवायला अणुचा वापर करते. सहाजीकच मीही स्वतः ह्या अणूंचाच बनलेलो आहे.”
हे प्रो.देसायांचं तत्वज्ञान ऐकून मी म्हणालो,
“ह्यामुळेच मला वाटतं, प्रत्येक प्रश्नाला उत्तर आहे,प्रत्येक वादाला पर्याय आहे,प्रत्येक “कां?” ला स्पष्टीकरण आहे.हे खरं आहे की असे अनेक प्रश्न आहेत की त्यांना माझ्याजवळ उत्तर नाही,पण त्याचा अर्थ ते प्रश्न अस्तित्वातच नाहीत असं नाही.एव्हडंच की त्यांची उत्तर अजून शोधून काढायची आहेत.
उलटपक्षी,मला असंही वाटतं की,प्रत्येक गोष्ट स्वतः पुरती असते.आपल्याला काय वाटतं?”
माझा प्रश्न ऐकून झाल्यावर थोडा विचार करून भाऊसाहेब म्हणाले,
“विशिष्टता आणि अद्वितयता हा दुहेरी सिद्धान्त मनात बाळगून राहिल्याने माझ्या जीवनाने मला नम्र आणि कृतकृत्य बनवलं.कसं ते सांगतो.
एखाद्या झाडाखाली मिळेल ते एखादं पान उचलून पाहिल्यावर त्यात जगातलं आतलं जग,जगावरचं जग माझ्या हातात आहे असं मला वाटतं.ज्या झाडावरून ते पान पडलं त्या झाडाकडे पाहिल्यावर,माझ्यातला आणि त्या झाडातला फरक म्हणजे,अणुची संख्या,त्यांचं क्रमस्थान आणि घनत्व ह्याने झालेली आमच्या दोघांची, म्हणजेच त्या झाडाची आणि माझी, घडण अगदी सरळपणे स्पष्ट होते.
झाड हे झाडासारखंच असणार.पण मी, उठून भोवताली जाऊ शकतो.मला बोलता येतं,पोहता येतं,प्रेम आणि द्वेष करता येतो आणि कसल्याही गोष्टीत भाग घेता येतो ह्यामुळेच मी माणूस आहे हे समजलं जातं. माझ्या भोवतालचं जग माझ्यात बदल घडविण्याऐवजी जगालाच मी हवं तसं बदलू शकतो हे माझ्यातलं सामर्थ्य काय कमी आहे? ह्याचा विचार येऊन मग वाटतं, अणूच्या संम्मिलनाने झालेली माझी ही घडण आहे. मला मिळालेल्या ह्या पर्यायाने माझं मलाच धन्य वाटायला लागतं.
गेली अनेक वर्षं मला लोक विचारतात माझ्या श्रद्धेबाबत.पण आज मला त्याचं उत्तर गवसलं आहे.आज मला वाटतं,एखादा अतीव दुःखाने डोळ्यातून ठिपकणारा अश्रू एक अद्भूत प्रकार असून त्याचं अस्तित्व हेच त्याचं खरं स्पष्टीकरण आहे.ह्या सुंदर,गहन आणि अखंड जगाबाबत मला विशेष वाटतं.
सर्व गोष्टींचं अस्तित्व आणि सर्व गोष्टीत असलेले आपलं अस्तित्व ह्याबद्दल मला विशेष वाटतं.”
मी प्रो.देसायांना म्हणालो,
“खरंच भाऊसाहेब,आजची संध्याकाळ मजेत गेली.काही तरी मी नवीन शिकलो असं मला वाटतं.त्या दोघा गृहस्थानी मला दुजोरा दिला.”
श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com
