Thursday, December 20, 2007

असे ही अपुली एक कहाणी

असे ही अपुली फक्त कहाणी


हे गीत प्रीतीचे
ही खैरात लाटांची
नसे हे जीवन अन्य काही
असे ही अपुली फक्त कहाणी

काही मिळवून गमवावे
काही गमवून मिळवावे
असे अर्थ जीवनाचा
येवून जाण्याचा
दोन घडीच्या जीवनातून
आयुष्य प्राप्त करण्याचा

तू प्रवाह नदीचा
मी किनारा तुझा
मी सहारा तुझा
तू सहारा माझा
असे नयनात सागर
पाणावलेल्या आशेचा

हवा वादळी येणार
येऊन ती जाणार
ढग येई क्षणभर
कोसळून जाई नंतर
सावल्या आडोसा घेती
निशाणी ठेवून जाती

जे देई मना शांती
असावी जवळ ती कृती
श्वास कोंडण्या आदी
आवाजा मिळो संधी
होवो आनंदाची बरसात
अन अश्रुंची खैरात
नसे हे जीवन अन्य काही
असे ही अपुली फक्त कहाणी

श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया) shrikrishnas@gmail.com

No comments: