Wednesday, April 30, 2008

आता कशाला उद्दयाची बात

आज कालचा उद्दया असतो
आणि
आज उद्दयाचा काल असतो
मग
उद्दया जेव्हा ’आज’ होईल
आणि
’आज’ त्याचा ’काल’ होईल
तेव्हा
त्या उद्दयाच्या उद्दयाला
’आजचा’ ’उद्दयाच’ म्हटलं जाईल
आता
आज जे होत राहिलंय
त्याचं
काल म्हणून होत जाणार
जे
उद्दया म्हणून होणार आहे
त्याला
आज म्हणून म्हटलं जाणार
म्हणून
"आता कशाला उद्दयाची बात
बघ उडुनी चालली रात
भर भरूनी पिऊ
रस रंग नऊ
चल
बुडुनी जाऊ रंगात"
हे माणूस सिनेमातलं गोड गाणं शांताबाई हुबळीकरांच्या तोंडून ऐकून मजा यायची.

श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Tuesday, April 29, 2008

मी तुजवर प्रीति करू की काव्य करू

मी तुजवर प्रीति करू
की काव्य करू
नीष्टा माझी बहरून येईल
होवून एक सुगंध
मनात माझ्या सदैव राहिल
तुझाच एक छंद

नशिब माझे चमकून दिसेल
मिठीत तुझ्या राहून
सूर मुरलीचे ऐकून म्हणतील
लोक अपुले मिलन

तुझ्याविना जीवन माझे राहिल
सदाचे दुर्दम
तुझ्या नी माझ्या श्वासामधून
गुणगुणेल सरगम

श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Monday, April 28, 2008

नाहीतर माणूस कंप्युटर सारखाच असता.

“अमुक अमुक असा,असा,होता.तसा,तसा होता. पण मात्र तो माणूसही होता”असं काही व्यक्तिना श्रद्धांजली देताना म्हणतात ते उगाच नाही.

त्याचं असं झालं,अलीकडे मला जरा थकल्या थकल्या सारखं वाटू लागलं होत.माझ्या डॉक्टरांकडे ही माझी तक्रार मी गेले कित्येक दिवस करीत होतो.ह्यावेळी परत तेच माझं रडगाणं ऐकून डॉक्टर मला म्हणाले आपण तुमचं पुर्ण चेकअप करून घेवूया.पण त्यासाठी मी सांगतो त्या नर्सिंग होम मधे तुम्हाला कमीत कमी एक आठवडा ऑबझरव्हेशन खाली राहवं लागेल.मी मनात म्हणालो ’बापरे! काय बुद्धि मला झाली आणि ही नर्सिंग होंम मधे राहण्याची बला मी माझीच मला करून घेतली.
माझी जी बेड होती तिच्या बजूच्याच बेडवर एक सदगृहस्थ कसल्या तरी ट्रिटमेंटसाठी माझ्या अगोदर एक दोन दिवस आले होते.सहाजीकच दिवस जाता जाता त्यांच्याशी ओळख झाली.बोलता बोलता मला कळलं की ते एक डॉक्टरच होते हे त्यानी मला नंतर सांगितल्यावर कळलं. ते जनरल चेकअपसाठी आले होते.एक दोन दिवसात परिचय वाढत गेल्यावर गप्पा गोष्टी करता करता ते मला एक दिवस म्हणाले,
“तुम्हाला मी एक गम्मत सांगतो. मी पण एक डॉक्टरच आहे.आपलं तनमन,शक्ति,आणि आपली आध्यात्मिक श्रद्धा ह्या बद्दल जागृत न राहिल्यास आपल्या डॉक्टरी उपचार करण्याच्या क्षमतेची आपल्या आपण मर्यादा घालून घेतो.मला वाटतं आपली विचारशक्ति पण तसं करायला कारणीभूत असते.
मला वाटतं,आपल्या मनातले उद्देश आपण काबूत ठेवू शकतो.आणि ही एक फार महत्वाची बाब आहे. डॉक्टरी उपचार करायला जर का मला कुणाचं सहाय्य करायचं असेल तर प्रथम माझा उद्देश पडताळून पाहिला पाहिजे असं मला वाटतं पाश्चिमात्य औषध प्रणाली बाबत मी जसा असमाधानी होवू लागलो तसा मी दुसऱ्या उपचाराच्या प्रणालीचा अभ्यास करू लागलो. शरिराच्या शक्तिकडे निराळ्या दृष्टिकोनातून पाहून त्याचा अभ्यास करू लागलो.एक बाई माझ्या क्लिनीक मधे आली.
माझी तिची नजरा नजर झाल्यावर मला ती जरा साशंक वृत्तीची दिसली.तिची मेडिकल हिस्ट्री कळण्यासाठी मी तिला नेहमी प्रमाणे प्रश्नाचा भडीमार केला.काही वेळाने माझ्या लक्षात आलं की तिच्या डोक्यावर परिणाम झाला असावा. मी जरा मनात चलबिचल झालो. कारण हिच्या उपचारावर माझा बराच वेळ जाणार होता. डॉक्टरी उपचारासाठी आपला उद्देश कसा पडताळून पाह्यचा ह्याचा जो मी अभ्यास करीत होतो,तो विचार माझ्या एकसारखा मनात येवू लागला.ती बाई माझी पेशंट असल्याने तिला काय होतंय ह्या बद्दलचा उपचाराचा विचार मला मनात आणणं भाग होतं.मी ठरवलं की तिला माझ्याकडून जास्तीत जास्त आदर देणं,तिच्याकडे सतत लक्ष देणं,आणि तिच्याबरोबर प्रेमळपणाची वागणूक असणं ह्याची जरूरी होती.तसं केल्यानंतर ती बाई माझ्याकडे आता त्या नजरेनी न पाहता एखादी बारा वर्षाच्या अल्लड मुली सारखी बोलू लागली.मी पण तिच्याशी हसंत खेळत रहिलो.
तिची खरीतर पाठ दुखत होती.आणि त्याच्यासाठी मी तिला फिझीकल थेरपीसाठी एका डॉक्टरकडे पाठवलं.आणि नंतर काही दिवसानी मला येवून भेट म्हणून सांगितलं होतं.काही आठवड्यानंतर मला तिच्या मुलीचा कॉल आला,की खूपच पाठीत दुखत असल्याने सध्या ती एमरजन्सी म्हणून एका हॉस्पिटलात ऍडमिट झाली आहे.तिच्या पाठीच्या मणक्यात ट्युमर असल्याने तिच्यावर शस्त्रक्रिया करावी लागणार होती.त्यानंतर ती फक्त एकच आठवडा जगली.
मला तिची मुलगी म्हणाली,
“आपल्याला कॉल करून आपण जगणार नाही हे कळवायला सांगितलं होतं.त्यामुळे आपली भेट होणार नाही.असंही पुढे म्हणाली होती.”
तिने आपल्या जाण्यापुर्वीच्या शेवटच्या दिवसात पण माझी आठवण काढली ह्याचा विचार येवून मला दुःख असह्य झालं.तिच्या शेवटच्या दिवसात सुद्धा ती माझी आठवण ठेवून होती ह्याचा विचार येवून मी सद्गदीत झालो.
त्या घटनेचा विचार येवून मी अजून गर्भगळीत होतो.त्या घटनेनेच माझ्यात बदल आला.माझ्या मनातल्या विचाराना कसलीच कारणमिमांसा नसते असं मनात आणण्याचं मी सोडून दिलं.माझा आता जगाकडे पाहताना ते जग माझ्या भोवती मीच निर्माण करतो असं दिसूं लागलं.मला आता असं वाटू लागलं,की जेव्हा मी आनंदी किंवा रागाचे विचार मनात आणतो तेव्हा एक प्रकारचं केमिकल माझ्या शरिरातल्या प्रत्येक सेलमधे जावून पोहोचत असावं आणि त्यांना समजत असावं की मी आनंदात तरी आहे किंवा रागात आहे. माझं शरिर माझ्या भावना प्रत्येक सेलला नुसतंच कळवत नसून माझ्या शरिरातल्या शक्तिची क्षमता माझ्या त्या भावनेप्रमाणे बदलते आणि माझ्या बद्दल इतराना माझ्या भावनापण कळत असाव्यात.
काही लोक ह्या सहज न कळणाऱ्या भावने विषयी फार जागृत असतात तर काही त्यातून विलग व्हायला शिकत असतात.”

हे त्या डॉक्टरचं सगळं बोलणं ऐकून झाल्यावर माझ्या मनात विचार आला किती दूरवर हे डॉक्टर लोक विचार करीत असतात.मशिन रिपेअर करणं आणि माणूस रिपेअर करणं ह्या मधे यांत्रीक बाब वगळल्या नंतर माणसाचं मन,भावना, आनंद,राग असल्या बाबी देवाने किंवा निसर्गाने केल्या नसत्या तर माणूस मन नसलेला कंप्युटर म्हणून सहज काम करू शकला असता आणि कंप्युटर मन नसलेला माणूस म्हणून काम करू शकला असता.
एखादा माणूस निर्वतल्यावर,

“अमुक अमुक असा,असा,होता.तसा,तसा होता. पण मात्र तो माणूसही होता” असं त्याला श्रद्धांजली देताना म्हणतात ते उगाच नाही हे लक्षात येतं.

श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Saturday, April 26, 2008

तुटू न जावो तुझी कंगणे

अर्ध्या रात्री खणकली माझी कंगणी
आलास का रे साजणा माझ्या अंगणी

जा सांग रे! काळ्या काळ्या घना
माझ्या करीता माझ्या साजणा
प्रीतिच्या रंगामधे रंगविली मी
कोरी चुनरी तुझ्या कारणी
अर्ध्या रात्री खणकली माझी कंगणी
आलास का रे साजणा माझ्या अंगणी

ऐकूनी खणखणे कंगणाचे गे! साजणे
नसे कठीण काय ते समजणे
कोण पुकारून सांगे हे इशारे
समजलो काय ते समजणे
समोर मी उभा असे गे! साजणे
होईल ते होवूदे काहीही यापुढे
तुटू न जावो तुझी कंगणे

श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Thursday, April 24, 2008

ह्याव ए नाईस डे

“मला खरंच उभं आयुष्य खर्चून सुद्धा फक्त एखादा दिवस इतका चांगला असू शकतो हे शिकायला मिळालं”

असं विरेन मला ज्यावेळेला मी त्याच्या घरी तो एकाएकी आजारी झाल्याचे कळल्यावर भेटायला गेलो तेंव्हा सांगत होता.
विरेन माझ्या मित्राचा मोठा मुलगा.त्याचे वडिल माझा मित्र,तो संगीततज्ञ माणूस.
तो मराठी सिनेमात खूपदा पार्श्वसंगीत द्दयायचा.त्याचा वाद्दयवृंद पण होता. निरनिराळ्या महाराष्ट्रातल्या मोठ्या मोठ्या शहरात निमंत्रण मिळाल्यावर हा वाद्दयवृंद घेवून जायचा.
अलीकडे प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांने हा सर्व कामाचा भार विरेन वर- आपल्या मुलांवर- टाकला होता.
नेहमीच गावोगाव फिरून, नाही म्हटलं तरी खाण्या पिण्याची आणि विश्रांती आणि झोपेची नकळत आबाळ होत असतेच.
विरेनला असंच कुठेतरी इंनफेक्शन झाल्याने त्याला अचानक हॉस्पिटलात जावं लागलं. आठदहा दिवसांनी त्याच्या आजाराला उतार मिळाल्याने डॉक्टरनी त्याला घरी पाठवलं होतं.आणखी थोडी विश्रांती पण घेण्याची सुचना केली होती.
विरेन मला म्हणाला,
” आठ दिवसापुर्वी मला हॉस्पिटल मधून डिस्चार्ज मिळाला.मला छातीत खूप कळा येवून भयंकर श्वास लागला होता.स्कॅन केल्यावर माझ्या फुफ्फुसात ब्लडक्लॉट आला होता असं समजलं.
मी वाचलो हे पाहून सर्वजण मला तक्दीरवान म्हणत होते.रोगाचं इंग्लीश नांव मला माहित असलं नसलं तरी,ते दुखणं,ती भिती आणि त्यातून आलेले ते डिप्रेशन ह्याची मला मुळीच कल्पना नव्हती.”
मी त्याला म्हटलं,
“सतत कामात व्यग्र असलेल्या तुला एव्हडे दिवस काढायला मोठं संकटच वाटलं असणार.”
त्यावर म्हणतो कसा,
“सांगतो काय! रोजच्या डॉक्टरच्या व्हिझीट्स,नर्सीसचे तासा तासाने औषध आणि इतर उपाय,ते हॉस्पिटलातलं वरचेवर येणारं खाणं,याने वेळ जात होता.पण आता घरी आल्यावर ही नकळत मला मिळणारी विश्रांतीची भेट अगदी जीवावर आली आहे.एखादं पुस्तक वाचायला घेतलं तर लक्ष केंद्रीत होत नाही.रेडिओ चालू करून नकोसा होवून परत बंद करावासा वाटतो.साठलेल्या कामाचे काळे ढग माझ्या डोक्यावर जमा होतात,पण एखादी औषधाची गोळी घेवून,किंवा एखादा व्हिडीयो पाहून काळजी दूर जात नाहीत.
हा अनपेक्षित मिळालेला विरंगुळा नकोसा होतो,जणू शाप कसा वाटतो.बरेच दिवस न भेटलेल्या एखाद्दया मित्राचा फोन आला तर जरा वेळ जातो.”

मग मी त्याला विचारलं,
“मग तू तुझा वेळ कसा घालवतोस?”
त्यावर त्याने मला एक गम्मतीदार किस्सा सांगितला.

तो म्हणाला,
” एखाद्दया अनोळख्याचं गोड स्मित पुन्हां आयुष्याची दोरी पकडून धरायला उद्दुक्त करतं.माझीच एक विद्दयार्थीनी मला त्यादिवशी भेटायला आली.आणि नंतर जाताना मला

”ह्याव ए नाईस डे” म्हणाली.

तिच्या नजरेत मला सच्चायी दिसली.ती निघून गेल्यावर माझ्या मनात आलं,की आजचा माझा हा दिवस,नव्हे तर उद्दयाचा दिवस, कदाचित येणारे पुढचे दिवस मी सदिच्छेने संभाळले पाहिजेत.
माझ्या डॉक्टरला विचारून सुद्धा, तो माझा जीवघेणा दिवस माझ्या आयुष्यात का आला ह्याचं समर्पक उत्तर मिळालं नाही.आणि त्या माझ्या विद्दयार्थीनीने मला तो दिवस चागला जाण्याची दिलेली सदिच्छा ही मला करून दिलेली एक भरवंशाची आठवण असावी.”
हे विरेनचे उद्गार ऐकून मी त्याला विचारलं.
” मग आज मी तुला भेटायला आलेला दिवस तुला कसा वाटला?”
मला म्हणाला,
“काका,त्यानंतर मी एव्हड्या झपाट्याने बरा होत आहे,की रोज मी माझ्या आई बाबाना नतमस्तक होवून अस्थाला जाणाऱ्या सूर्याचे दर्शन घेवून विश्रांतीसाठी सध्यातरी लवकर झोपायला जातो.
मला खरंच उभं आयुष्य खर्चून सुद्धा फक्त एखादा दिवस इतका चांगला असू शकतो हे शिकायला मिळालं”

श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया )
shrikrishnas@gmail.com

Tuesday, April 22, 2008

देवदूत ही इथे निःशब्द असती

तरूण आहे किती दुनिया प्रीतिची
वाटे कसे हे शांत शांत ह्या एकांती

ह्या उंच उंच पर्वतांच्या मग्रूर सावल्या
सांगत आहेत नजर भिडवीण्या
देवदूत ही इथे निःशब्द असती
वाटे कसे हे शांत शांत ह्या एकांती
तरूण आहे किती दुनिया प्रीतिची

नाही इथे कसला पडदा नाही झालर
ठेविल्या पाउली सर्वच घसरण
पावला पावला खाली सोडते निशाण
वाटे कसे हे शांत शांत ह्या एकांती
तरूण आहे किती दुनिया प्रीतिची

श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Monday, April 21, 2008

किती सत्य आहे

“माझं मन मला म्हणालं,आजच्या आज पेक्षा उद्दयाचा उद्दया नक्कीच ग्रेट असणार.ज्या जगात माझी पिढी वाढणार आहे ते जग नक्कीच जास्त चांगलं असणार,वाईट नक्कीच नसणार.”

त्यादिवशी तळ्यावर मी प्रो.देसायांची वाट बघत बसलो होतो.नेहमीच्या वेळेवर प्रोफेसर काही आले नाहीत त्यावेळी मी समजलो की आता जास्त वेळ त्यांची वाट बघण्यात अर्थ नाही.म्हणून मी उठतो उठतो तोच त्यांचा नातु माझ्या मागे उभा असलेला दिसला.
मला म्हणाला,
“काका,आजोबाना आज जरा बरं नाही,तुम्ही त्यांची वाट बघत राहाल म्हणून मला त्यानी तसा निरोप द्दयायला तुमच्याकडे पाठवलं आहे.”
बरेच दिवसानी त्यांच्या नातवाची आणि माझी भेट झाली.
काय कसं काय चालंय वगैरे विचारून झाल्यावर माझ्याशी विषय काढत म्हणाला,
” तुम्हाला माझ्या मनात आलेला विचार सांगायचा आहे.”
मी मनात म्हणालो बापरे, भाऊसाहेबांचा नातु पण आजोबा सारखाच विचारी वाटला.रक्ताचा अस्रर कुठे जाणार म्हणा.
“खरं म्हणजे मी हे माझ्या आजोबांशीच डीसकस करणार होतो.पण म्हटलं तुम्ही आणि आजोबा नेहमीच काही ना काही तरी डीसकस करत असताच मग तुम्हाला माझा विचार सांगून तेव्हडंच होणार आहे.”
मी त्याला म्हणालो,
“ऐकुया तर काय तू म्हणतोस ते”
त्यावर मला म्हणाला,
“काका,परवा दिवशी रात्री, ह्या शनिवार,रविवारी काय करायचं,कुणा मित्राकडे जायचं वगैरे वगैरे गोष्टींचा मी विचार करीत असताना,माझे आईवडील काही तरी माझ्या विषयी डीसकस करीत होते ते माझ्या कानावर पडलं.
माझे वडील थोडेसे अपसेट झालेले दिसले.म्हणजे ते नेहमीचं बोलणं जे आईवडील आपल्या मुलांबद्दल करतात, आणि त्याबाबत काळजीत असतात,जसं मी कोणत्या कॉलेजमधे जावं,घरापासून कॉलेज किती दूर असावं,आणि खर्च किती यावा अशा पैकी नव्हतं.”
मी म्हणालो,
” अरे,तू तर प्रो.देसायांचा नातू.तू त्यांच्या सारखाच हुशार असणार.त्यामुळे तुझ्या बाबतीत हेच विषय जास्त डीसकस केले जाणार नाही काय?”
त्यावर मला म्हणतो कसा,
” नाही,नाही,ऐका तर खरं. हे सगळं जगावेगळंच होतं.
वडील आईला वैतागून म्हणत होते,’ आमच्या पश्चात आणि आम्ही जाता जाता आमची पिढी ह्या नव्या पिढीला कसलं जग देवून जात आहे? पुढचे ह्यांचे दिवस महा कठीण आहेत भविष्यपण दारूण आहे.’ जणू आमच्या ह्या पिढीला भविष्यच नसणार असा काही तरी त्यांचा त्रागा होता.”
ज्या अविर्भावात तो मला सांगत होता ते बघून मला त्याचं खरंच कौतुक वाटत होतं.
मला पुढे कसा म्हणतो,
“मी खरा आमच्या गेस्ट रूम मधे बसलो होतो,आणि तिकडून हा त्यांचा वैताग माझ्या कानावर पडत होता.आणि काका, मी तुम्हाला गम्मत सांगतो,हे ऐकत असताना माझं लक्ष माझ्या आजीआजोबांच्या फोटोवर केंद्रीत झालं होतं.तो आजोबांचा टाय,सूट,बूट घातलेला प्रोफेसरांचा वेष,आणि त्याच्याच बाजूला माझ्या पणजोबा-पणजीचा फोटो,त्यात माझ्या पणजोबांचे ती डोक्यावर पुणेरी पगडी एका कानात बिगबाळं,भरपुर मिशा,घट्ट गळ्याचा कोट,त्यावर सफेद उपरणं आणि खाली स्वच्छ मसराईझ्ड धोतर,त्याउप्पर जावून त्यांच्या तोंडावर दिसणारं ते समाधान पाहून मला खूपच धीर आला.
माझं मन मला म्हणालं,आजच्या आज पेक्षा उद्दयाचा उद्दया नक्कीच ग्रेट असणार.
ज्या जगात माझी पिढी वाढणार आहे ते जग नक्कीच जास्त चांगलं असणार,वाईट नक्कीच नसणार.त्या त्यांच्या फोटोना पाहून मला असं कां वाटावं, ते समजायला एक प्रकारची मदतच केली आहे.”
मला ते त्याचं म्हणणं ऐकून खूप कुतुहल वाटलं.ओघानेच मी त्याला म्हणालो
“का रे,सांग बघू!”
मला म्हणाला.
“सांगतो ऐका. माझ्या आजीआजोबांच्या आणि पणजीपणजोबांच्या वेळी झालेल्या गंभीर आणि नुकसानदायी घटनांचा मी विचार केला.
दोन जागतिक युद्धं,ऍटॉमीक बॉम्बस,महाभयंकर रोगाच्या सांथीतून झालेला संहार,आणि बरोबरीने चांगल्या गोष्टी पण त्यानी पाहिल्या.दोन्ही महायुद्धांचा शेवट,रोगावर निरनिराळी व्हयाक्सीन्स,रेडिओचा शोध,विमानाचा शोध,असल्याही गोष्टी त्यानी पाहिल्या आहेत.”
मी म्हणालो,
“मग आता,तुला तुझ्या जगात काय चांगल्या गोष्टी दिसणार ह्याचं भाकित काय आहे ते तर ऐकूया”
मला म्हणाला,
“हा तुमचा प्रश्न मला आवडला.माझ्या आजोबानी पण असाच प्रश्न विचारलेला असता.
मला वाटतं माझी पिढी एडसवर जालीम औषध,कॅन्सरचा निप्पात, कदाचीत जगात शांती येईल,मंगळावर माणूस,असल्या गोष्टी पाहील.
आता हेच बघा,माझ्या आजोबाना माझ्या आताच्या वयावर म्हणजे सोळा वर्षावर चंद्रावर माणूस जाईल हे विचारात आणणं देखील शक्य नव्हतं, तसंच माझ्या वडिलांच्या सोळाव्या वर्षी इंटरनेटचा विचार सुद्धा त्याना शक्य नव्हता.”
काका,मी ज्यावेळी लहानपणी एखाद्दया दिवशी थोडा नर्व्हस असायचो त्यावेळी माझे बाबा माझ्या खांद्दयावर अलगद प्रेमाने हात ठेवून म्हणायचे ’द्दयाटस ओके, उद्दयाचा दिवस नक्कीच तुला बरा जाईल.’
मी त्यांना म्हणायचो कशावरून?त्यावर ते म्हणायचे’मला तसं वाटतं त्यावरून!’ मी त्यांच्यावर विश्वास ठेवला.माझ्या पणजोबांचा असाच विश्वास असावा,माझ्या आजोबांचा पण असाच विश्वास असावा,आणि आता माझा पण.”
उशिर होत आहे असं पाहून जाता जाता तो मला म्हणाला
” मला आणि माझ्या पिढीला काय भविष्य असावं ह्याचा त्या रात्री कष्टी होवून विचार करताना माझ्या आईबाबाना पाहून मला क्षणभर वाटलं काका,मीच बाबांच्या खांद्दयावर हात ठेवून म्हणावं,’द्दयाट्स ओके बाबा,नका वरी करू! उद्दया नक्कीच चागलं असणार!’

श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishans@gmail.com

Sunday, April 20, 2008

मिळाले मनाचे आज काफिले

तुझ्या प्रीतीची संगती सोडून
सांग मी कुठे जावे
मनी आली भीती माझ्या
खुशीने मिठीत तुझ्या मी
आज कसे मरून जावे

मिळाले मनाचे आज काफिले
आहोत जवळ उभे पाहत मंजिले
मिष्कील हसुनी जेव्हा तू पाहिले
मिटून गेले हसत क्लेश मनातले
प्रेमळ असती हे सुंदर क्षण
त्यां इथे थांबण्या तूच सांगावे
खुशीने मिठीत तुझ्या मी
आज कसे मरून जावे

पाऊली तुझ्या मी वाहू हे जीवन
का वाहू तुझ्या पाऊली देदीप्य लोचन
होशील जर तू खूष तुला वाहिन
मनातल्या सद्भावना रात्रंदीन
सुखवीन मी मला रे सजणा
नजरेत माझ्या तू सदैव असावे
तुझ्या प्रीतीची संगती सोडून
सांग मी कुठे जावे

श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Saturday, April 19, 2008

वा…बाबा..वा!!…..किंचीत विडंबन..क्वचित विडंबन.

वृद्ध आई नेहमीच ढळाढळा अश्रू ढाळत असावी….बिचारी आई अशा ही वेळी.

वा…बाबा..वा!!
आज तुम्ही आम्हाला घरा बाहेर काढता
पुन्हा पुन्हा डोळे भरून येतात
तुम्ही मात्र डोळ्याला डोळा देत नाहीत
असं हो काय…निघता निघता
साध्या आशीर्वादालाही दोन हात लावत नाहीत

का आशीर्वादाच्या हक्कापासून आम्हाला तुम्ही वंचीत करता
वा…बाबा..वा!!
आज तुम्ही आम्हाला घरा बाहेर काढता

नव्हतं पटंत मान्य..
कदाचित आमचंही काही चुकलं असेल
आमची अडचण…अधे मधे करणं
तुम्हालाही कधी खटकत असेल

म्हणून काहो कचऱ्यासारखं घराबाहेर फेकतां
वा…बाबा..वा!!
आज तुम्ही आम्हाला घरा बाहेर काढता

मित्र मंडळी…तिकडे
आम्हाला भरभरून म्हणे मिळतील
गप्पागोष्टीत…नी थट्टा मस्करीत
तुम्हाला विसरण्यात जातील

पण नातवाशी खेळायचं होतं..ते स्वप्न कसं पुरं होणार…
वा…बाबा..वा!!
आज तुम्ही आम्हाला घरा बाहेर काढता

वेळ भरभर जाणार….
हो..म्हणजे शॉर्टकटने सोयीना गाठायच..
लांब लांब पावलावर उभ्या आहेत त्या
नाहीतरी आता कोणासाठी त्या करायच्या..
.
घाबऱ्या घुबऱ्या जीवाला कसं अचूक वेळी
सोडता…
वा…बाबा..वा!!
आज तुम्ही आम्हाला घरा बाहेर काढता
आयुष्याच्या सुरवातीला…
आम्हाला वेगळं घर घ्यायला सांगता..
तुमचं ऋण फेडायला कधी चान्स देता?



हो! प्रत्येक विचाराला दोन बाजू असतात. मला “वृद्धांच्या व्यथेपेक्षा भिन्न व्यथा-मुलांची,मुलगा किंवा मुलगी- कशी असू शकते ह्याची कल्पना येवून त्या “आज तू आमचं सारं ऋण फेडलंस” कवितेचा सुंदर गाभा तसाच ठेवून ती भिन्न व्यथा लिहावी असं मला वाटलं.

गम्मत अशी की ती परम पूज्य माऊली दोन्ही प्रसंगात बिचारी अश्रू ढाळण्यापलिकडे काही करू शकत नाही.”लळा जिव्हाळा शब्द्च खोटे”असंच तिचे अश्रू सांगत नसतील ना?
श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Friday, April 18, 2008

आदर करण्याची कदर

“आदर नसला की दुसऱ्याची पर्वा नसते,आणि दुसऱ्याची पर्वा न करतां रहाणं म्हणजे एकप्रकारचं उजाड वाळवंटात राहिल्या सारखं आहे.”

ज्यावेळी मी अगदीच तरूण होतो,त्यावेळी होणारी घटना आणि आजूबाजूचे लोक यांच्याबद्दल माझी समजूत अगदी सरळ होती.
एखादी गोष्ट चांगली तरी असते किंवा वाईट असते.ह्या विचारामुळे सभोंवतालच्या जगाशी मला वागायला सोपं जायचं.नंतर मी जेव्हा पोक्त तरूण झालो तेव्हां हे सर्व जरा क्लिष्ट व्हायला लागलं.एक तर पांढरं नाही तर काळं असं पहात असताना मला आता ग्रे पण सर्व ठिकाणी दिसायला लागलं.
त्यामुळे माझं जीवन, उद्देश,अर्थ आणि निर्णय ह्या तिन्ही गोष्टीशी जास्त घण झालं आणि तसंच ते जगायला कठीणही होत गेलं.आता मी जेव्हां जरा मिड्ल एज मधे आलो आणि एका मुलीचा बाप झालो तेव्हां त्याच जीवनाकडे पहाण्याचा माझा दृष्टीकोन हळू हळू साधा सरळ होत गेला.”

समीर जेव्हां मला हे सांगू लागला तेव्हां मला ते ऐकण्याचं कुतुहल वाढू लागलं.
मी म्हणालो,
“सांग बाबा,काय म्हणतोस ते ऐकायला मजा येते”

मला पुढे म्हणाला,
“अशा ह्या वृतीचं कारण,मी मला एक समजूतदार पालक समजून माझ्या मुलीला चार गोष्टी शिकवायला लागलो.सहाजीकच मी गुंतागुंतीच्या गोष्टी लहान लहान करून त्याचा अर्थ तिला समजावयाला लागलो.सर्व पालक असंच करतात. जीवन जास्त सोपं करून सांगता सांगता मी पुर्वीच्या मुठभर मुळ गोष्टी जगायला कशा कारणीभूत होतात ह्या विचाराकडे परत आकर्षित झालो.

मी म्हणालो,
“अशा कुठच्या कुठच्या गोष्टी सांग बघू”

त्यावर समीर हंसत हंसत म्हणतो कसा,
“त्यातल्या त्यात मला जास्त वाटू लागलं ते म्हणजे “आदर” किंवा “सन्मान”ह्या वृत्ती बद्दल. स्वतःबद्दलचा आदर,इतरांचा आदर,जगातल्या सर्व प्राणीमात्रांचा आदर ह्या गोष्टी बद्दल.
मी माझ्या मुलीला एखादं वाद्दय वाजवायला, एखादी कविता लिहायला,एखादा गेम खेळायला प्रयत्न कर असं सांगत असतो.आता तसं करत असताना अपयश येणं आणि त्याबद्दल दुःख वाटणं स्वाभाविक आहे पण प्रयत्नच न करणं हे महादुःख आहे.कारण ते नकरणं म्हणजेच आपला आपण आदर न करणं.आणि हे सर्वमान्य आहे की आपला आपण आदर केला नाही तर दुसरा कोणही तो आपल्या साठी करायला मागणार नाही.”

“इथपर्यंत पटलं पुढे काय? “
मी म्हणालो.

त्यावर समीर म्हणाला,
” स्वाभिमान हा एक स्वतःचा आदर करण्याचा प्रकार आहे,तो काही गर्व होत नाही. हा प्रयत्न अभिमानाने करण्याचा, आपआपल्या पद्धतीने आणि आपल्याला जमेल तव्हडं करण्याचा असा हा प्रकार होईल.प्रत्येक जण परफेक्ट नसतो.आणि ही गोष्ट ज्याने त्याने समजून घेतली पाहिजे आणि मान्य पण केली पाहिजे.त्यानंतर इतरांची विकनेस आणि स्ट्रेन्थ मान्य करायला सोपं जातं.मला वाटतं ही वृत्ती प्रेमा सारखीच दुवा जोडणारी आहे.आदर नसला की दुसऱ्याची पर्वा नसते,आणि दुसऱ्याची पर्वा न करतां रहाणं म्हणजे एकप्रकारचं उजाड वाळवंटात राहील्या सारखं आहे.”

मी म्हणालो,
“मी सुद्धा आता तुझ्या सारखी वृती ठेवण्याचा प्रयत्न करीन.”
समीरला नक्कीच हे ऐकून बरं वाटलं.

श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Wednesday, April 16, 2008

उद्धवा! अजब तुझे सरकार

दिवस उजाडूनी होतो सुरू
होतात अवहेलना अन तक्रारी
त्याही पेक्षा ती रात्र बरी

उजळणी होते रात्रीची
स्मरूनी बाचाबाची सकाळची
तू तू अन मी मी ची
अन खऱ्या खोट्याची


उद्धवा! अजब तुझे सरकार
जनार्धनाची हीच तक्रार
तुझ्याच दारी न्यायमंदिरी
खोटे बोलणे झाले असुनी
खरे मानण्याची कसली जबरी
सत्तेची ही कसली खूमखूमी

श्रीकृष्ण सामंत (स्यान ओझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Tuesday, April 15, 2008

“खेळ खेळूया सारे आपण”

आज खूप दिवसानी प्रो.देसाई तळ्यावर भेटले.बरेच दिवस मी एकटाच तळ्यावर फिरायला जायचो.भाऊसाहेब आपल्या मुलाकडे काही दिवस राहयाला गेले होते ते मला त्यांच्या मुलीकडून कळलं होतं.

मला म्हणाले,
“संध्याकाळची मी तुमची खूप आठवण काढायचो.मुलाच्या घरी सुद्धा फिरायला खूप जागा आहे,पार्क्स आहेत पण असं तळं नाही.”
मी म्हणालो,
“भाऊसाहेब,तुमच्या गैरहजेरीत मी काही कविता केल्या आहेत.पुढल्या खेपेला मी तुम्हाला वाचून दाखवीन.”
भाऊसाहेब म्हणाले,
“आज मला तुम्हाला माझ्या लहानपणाची एक गमतीदार गोष्ट सांगायची आहे.
ज्याची मी तुम्हाला गोष्ट सांगणार आहे तो गृहस्थ अलिकडेच मला एका दुकानात भेटला होता.प्रथम मी त्याला ओळखलं नाही.सहाजीकच खूप वर्षानी मी त्याला पाहिलं होतं.
कोकणात आम्ही जिथे राहत होतो,त्यापासून दोन तीन वाड्या पुढे हा राहायचा.ह्याच्या लहान पणीच ह्याचे वडील निर्वतले होते आणि ह्याच्या आईच्या डोक्यावर परिणाम झाला होता.त्यामुळे ह्याच्या हंसण्याखेळण्याच्या दिवसात ह्याची खूप हेळसांड झाली होती.मित्र सवंगडी चांगले न मिळाल्याने हा बराचसा उनाड आणि बेजबाबदार झाला होता.
लहान वयात खेळण्या बागडण्याच्या दिवसात,अशा मुलांचा खेळात किवा तसल्या काही activities मधे वेळ गेला तर त्या समाजविघातक संवयी पासून ही मुलं बचावली जातात.

आणि अगदी हेच ह्या मुलाच्या बाबतीत झालं.माझा एक भाऊ मुंबईला श्रीमंत लोकांच्या मुलांच्या शाळेत फिझीकल ट्रेनींगचा शिक्षक होता. त्याला त्या शाळेने इंग्लंडला पाठवून प्ले थेरपीस्टचं पुर्ण ट्रेनींग देवून मग इकडे त्यांच्या मुलांच्या शाळेतल्या खेळाच्या विभागाचा मुख्य केलं होतं.
तो असाच एकदा कोकणात काही दिवसासाठी घरी आला होता.त्याचं ह्या मुलावर लक्ष गेलं.माझ्याकडे त्याने त्या मुलाबद्दल चौकशी केली.

ते ऐकून मला म्हणाला,
“हा मुलगा जात्याच असा उनाड दिसत नाही.त्याच्यावर काही मानसिक आगाध झाले असावेत.दिसायला हा जरी आडदांड,रागीट आणि हट्टी दिसला तरी हे वय त्याचं हंसण्या खेळण्याचं आहे.त्याच्या ह्या असल्या संवयी त्याच्या आईच्या आजाराने आणि आईला सोडून म्हाताऱ्या आजीकडे पोरका म्हणून राहिल्याने त्याच्या ह्या संवयीत नकळत भर पडली आहे. माझ्या ह्या मुक्कामात मी त्याला सुधारण्याचा प्रयत्न करतो.”

भाऊसाहेब पुढे म्हणाले,
“रोज हा माझा भाऊ त्याच्या घरी जायचा.त्यानेच मला सांगतलं,”
“ह्या मुलाला प्रथम मी प्ले थेरपीच्या नियमानुसार काही मर्यादा मला त्याला घालाव्या लागल्या.प्रथम त्याला मी म्हणालो, कुठल्या गोष्टींची जरूरी असते आणि कुठल्यांची नसते हे समजावून घे.मी चित्रकलेसाठी नाही,मला चित्रकला येत नाही. खेळणी तोडण्यासाठी नसतात. पुस्तकं खिडकीच्या बाहेर फेकून देण्यासाठी नसतात.माझ्या प्रत्येक सुचना त्याने आदरपुर्वक मानल्या पण एकदा म्हणाला,

“खिडकीतून फेकून देण्यासाठी काय असतं?”
मी त्याच्या बरोबर कागदाचे छोटे,छोटे तुकडे करून एक एक खिडकीच्या बाहेर टाकून देत
म्हणालो आपण दोघानी मिळून हे ठरवलंय तसं करतोय.

हे त्याल सांगून काय मिळालं याचा मी विचार करीत होतो.तो पर्यंत तो एका अडगळीच्या जागी जावून लपला.मी त्याला बाहेर यायला सांगितलं.

त्यावेळी तो मला ओरडून म्हणाला
“मी शोधून काढण्यासाठी नाही.”
कोणत्या गोष्टीच्या काय मर्यादा असतात हे त्याला कमीत कमी कळलं,हे पाहून मला बरं वाटलं.
दोन दिवसानंतर हळू हळू तो माझं ऐकून लक्षात घेत होता हे माझ्या लक्षात आलं.त्याला माझा आधार वाटत होता आणि म्हणून तो माझ्याशी काहीतरी संबध जुळवायला पहात होता. त्यानंतर आणखी काही दिवसानी असल्या त्याच्या माझ्या लहान लहान खेळामुळे तो स्वतःहून निर्णय घेवून स्वतःला आणि दुसऱ्याला आदर देवून वागायला लागला.मी त्याची किती कदर करतो आणि तो जे काय म्हणतो ते पण कसं समजावून घेतो हे शिकायला लागला.
द्दयायला आणि घ्यायला तो शिकला आणि स्वतःवर प्रेम करू लागला.त्याला समजलं की दुस्रऱ्यानी त्याच्यावर प्रेम करायच्या लायकीचा तो आहे आणि हे ज्ञान मनात ठेवून स्वतःत बदल करू शकला,वाढू लागला आणि नवीन प्रकारचं वागणं शिकू लागला.”

नंतर माझा भाऊ मला पुढे म्हणाल्याचं आठवतं,
“मला त्या शाळेने ह्या शिक्षणासाठी परदेशी पाठवलं,त्यातून मी एक गोष्ट चागली शिकलो की ही लहान मूलं खेळणी वापरून आणि खेळ खेळत असताना त्याचा उपयोग एकमेकाशी दुवा वाढवण्यासाठी नकळत ही कला वापरत असतात.हे पण मला ठावूक झालं की काही तरी जादू होत असावी की ही मूलं आपलं अंतरमन वापरून काही तरी नजरेत येईल असं खेळ खेळताना दाखवतात.
तसं पाहिलं तर खेळ हा एक चालू पास टाईम आहे.खेळता खेळता पोक्तपणा येतो आणि शिकायला मिळतं,खेळत असताना स्वतः हजर असल्याने आपल्या अस्थित्वाची जाणीव होते.
त्या मुलाला काय किंवा आपल्या सर्वांना काय हा एक चान्स आहे की मनाच्या आतून काय हवंय आणि माणुसकीला धरून आपण ते किती आनंदाने घेतो.”
हे सर्व सांगून प्रो.देसाई जरा स्तब्ध झाले.
आणि मला पुढे म्हणाले,
“हा अलिकडेच दुकानात भेटलेला गृहस्थ हा तोच मुलगा होता हे आठवून मी क्षणभर अचंबीत झालो.माझ्या भावाची त्यावेळेला त्याला झालेली मदत,त्याच्या आयुष्यात एक परिवर्तन होण्यात झालं.तो लहानपणापासून त्याच्या आईला समजावून घेवू लागला.तिचा काहीच दोष नाही हे त्याला त्यानंतर लक्षात आलं असावं.एकदा माझा भाऊ मला भेटला होता,ह्याचा विषय आमच्या दोघांच्या बोलण्यात आला होता.मोठ्या विश्वासाने भाऊ सांगत होता की ती केस यशस्वी होणार याची त्याला खात्री होती.”

मी भाऊसाहेबाना उठता उठता म्हणालो,
“तुम्ही जर मला ही गोष्ट सांगितली नसती तर खेळणी आणि खेळ हे मी सर्वसाधारण पास टाईमच समजलो असतो.त्याचं मला महत्व कळलं.भाऊसाहेब मला एक गाणं आठवतं,

“जगताचे हे सुरेख अंगण
खेळ खेळूया सारे आपण
मुलां संगती छान
खेळूया मुलां संगती छान
याला जीवन ऐसे नांव
दोन घडीचा डाव
याला जीवन ऐसे नांव”

श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Monday, April 14, 2008

प्रीत तरी मी कां केली

प्रीत तरी मी कां केली
करूनी मनाला उदास
वाट पाहिली सांज प्रभाती
करूनी प्रतिक्षा दीन रात्री

नयनी घालून काजळ
माथ्यावरती बिंदी
अशा वेळी तुझी प्रतिक्षा
करून होईन मी छंदी
नकळत माझ्या चेहऱ्यावरती
येई लज्जेची छटाई
पाहूनी कुणी म्हणेल काही
होईल ना अपुर्वाई

शृंगार तरी मी का केला
करूनी मला उदास
वाट पाहिली सांज प्रभाती
करूनी प्रतिक्षा दीन रात्री
प्रीत तरी मी कां केली

ज्या दिवसाची वाट पाहूनी
झाले मी राधा
आज मनाची बेचैनी
वाढत जाई जादा
प्रीतिमद्धे खावूनी धोका
सोडून जाई मर्यादा
न होवो आजतरी
खोटा मिलनाचा वादा

भरंवसा तरी मी का केला
करूनी मला उदास
वाट पाहिली सांज प्रभाती
करूनी प्रतिक्षा दीन रात्री
प्रीत तरी मी कां केली

श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Saturday, April 12, 2008

प्रो.देसायांच्या नातवाचं तत्वज्ञान

“पण अलिकडे मला वाटू लागलं की देवाची जरूरी आहे.मी मानतो की सायन्समुळे विश्वकर्त्याची जरूरी भासत नाही पण हे एक त्याचे रूप असावं.”

आज जरा गम्मतच झाली.आज प्रो.देसाई आपल्या नातवाबरोबर तळ्यावर फिरायला आले होते.रोजच्या ठिकाणी मी भाऊसाहेबांची वाट पहात बसलो होतो.
गम्मत झाली हे म्हणण्याचे कारण, आजोबा आणि नातू तावातावाने बोलत येत होते.दोघांचा कोणत्या विषयावर वाद चालला होता,ह्याचं मला जरा कुतुहल होतं.ते जवळ आल्यावर त्या दोघानां उद्देशून मी म्हणालो,
“भाऊसाहेब,तुमचा नातू आपल्या दोघांनाही वादात हरवणार ह्याची मला खात्री आहे.अहो,पुढची पिढी नक्कीच जास्त इंटिलीजंट असते असं मी कुठेतरी वाचलंय.हा तर आपला नातू म्हणजे तो आणखी एक पिढी पुढे गेलेला,मग काय विचारता.”
हे ऐकून प्रोफेसर मला म्हणाले,
“अहो,तो वाद घालत नाही काय,तो त्याचं तत्वज्ञान सांगतोय आणि तेही देवाच्या अस्थित्वा बाबत.”
मी म्हणालो,
“भाऊसाहेब,तुमचा नातू आहे.तेव्हां तो लेक्चर देत असेल तर तसं करणं त्याचा हक्कच आहे”
माझा सपोर्ट बघून भाऊसाहेबांचा नातू मिष्किल हंसू लागला.
मी त्याला म्हणालो,
“ऐकूया तर खरं तुझं चिंतन”
हे ऐकून खूषीत येवून तो बोलू लागला,
“मला वाटतं ईश्वराला भविष्य माहित नसावं,कसं ते सांगतो.मी ह्या निर्णयाला यायला मला खूप लांबचा आणि कठिण प्रवास करावा लागला.आणि तो सुद्धा जी श्रद्धा मी वाढत असताना माझ्या मनाशी जोपासून ठेवली होती ती ठेवून.अगदी लहानपणी मला खूप लोक सांगायचे की ’देवाला सर्व माहित असतं’ बराच काळ मी माझा हा विश्वास ह्या समजुतीवर जखडून ठेवला होता.पण शेवटी मी माझ्या स्वतःच्याच विश्वासाला घेवून एक मोठी झेप घेण्याचा प्रयत्न केला.मी असा विचार केला की ईश्वराला रुढीमुळे असलेल्या विश्वासापेक्षा एखाद्दयाचा प्रामाणिकपणा जास्त आवडत असावा.माझं चैतन्य जिथे मला नेईल तिथे मी जायचं ठरवलं.

मला वाटतं जगाचं भवितव्य धर्माच्या पुस्तकात लिहील्याप्रमाणे नसून निसर्गाच्या नियमानुसार असणार. बऱ्याच लोकाना वाटतं,की सूर्योदय,सूर्यास्थ,जीवन,मरण,भूकंप आणि पूर वगैरे हे दैविक असतात.
पण मी शास्त्रज्ञ काय म्हणतात त्याच्यावर विश्वास ठेवतो.या पृथ्वीवरचे होणारे बदल,हवामान वगैरे गोष्टी ह्या निसर्गाच्या ठरलेल्या नियमानुसार होत असतात.हे माहित झाल्यामुळे मला वाईट गोष्टी देव कसा करू देतो असल्या म्हणण्यावर काहीच त्रास होत नाही.त्यामुळे क्रिकेट मॅच जिंकायला देवाची मदत हवी असते हे मुळीच पटत नाही.खरं म्हणजे कोण जिंकणार हे कुणालाच अगोदर माहित नसतं देवाला सुद्धा.
मी सायन्स आणि इंजिनीयरींग शिकायला लागल्या पासून मला खूप लोकांना भेटल्यावर कळलं की देवावर कुणीच विश्वास ठेवू मागत नाहीत.ते म्हणतात जर का सायन्स सर्व काही समजावून सांगू शकतं इलेक्ट्रॉन्स पासून गॅल्याक्सीस पर्यंत,तर मग देवाची कुणाला जरूरी आहे.

पण अलिकडे मला वाटू लागलं की देवाची जरूरी आहे.मी मानतो की सायन्समुळे विश्वकर्त्याची जरूरी भासत नाही पण हे एक त्याचे रूप असावं.पदार्थविज्ञानाचे गणीताचे नियम जरी अगदी नेमके आणि व्यक्तिसादृश्य नसतात,तरी जगात आणखी अनेक अशा गोष्टी आहेत जसे की आपल्या सारखे प्राणीमात्र आहेत त्यांना वगळून चालणार नाही.आणि त्याचं कारण त्यांच्या अस्थित्वाला काहीनाकाही उद्देश आणि अर्थ असतो.चंद्र तारे आणि गुरुत्वाकर्षणाशी त्याचा काडीचाही संबंध नाही.
विज्ञानाला आवाजाच्या लहरी आणि संगीत यातला फरक कळत नाही.प्रेम आणि दुःख हयातलाही फरक कळत नाही.
विज्ञानाला माझ्या शरिराबद्दल सांगता येईल पण माझ्या आत्म्याचं काही सांगता येत नाही हाच खरा फरक आहे.
मला वाटतं माझा आत्मा मला चैतन्य देवून दुखापतीचं दुखणं कमी कसं करावं ही क्षमता देतो.कुणाला स्पर्श करून त्याच्या बद्दल प्रेमाची भावना जागृत करतो.प्रयत्न करूनही कधी यश मिळतं कधी अपयश. एखाद्दया चांगल्या दिवशी सर्व दिवस आनंदात जातो.
मात्र हे पाहून देव आनंदाने आश्चर्य चकित होतो,असं मला वाटतं”
हे त्याचं सर्व चिंतन ऐकून मी त्याला म्हणालो,
“म्हणजे ह्याचा अर्थ प्रत्येकाने बॅलन्स ठेवून राहिलं पाहिजे.कुठचीही टोकाची भुमिका घेवून चालणार नाही.असंच तुला म्हणायचं आहे नां?”
“काका,तुम्ही अगदी माझ्या मनातलं बोललात”असं म्हणत आम्ही सर्व घरी जायला उठलो.

श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
sharikrishnas@gmail.com

Friday, April 11, 2008

सांभाळा हो! मला कुणीतरी

पाहूनी तुझे नयन गुलाबी
मन माझे झाले शराबी
सांभाळा हो! मला कुणीतरी
माझेच सांभाळणे मला
झाले आता अशक्यपरी

असते एकच जशी प्रतिमा
भिंतीवरच्या तस्वीरी
आहे तशी तुझी प्रतिमा
सदैव माझ्या अंतरी

का झालो तुझ्यावर फिदा
कळेल का एकदा
विचार करूनी कळे ना मला
संताप येई माझ्याच प्रीतिवरी

ऐकून माझ्या मना
गेलो मी पस्तावूनी
माझाच मी नाही आता
काय करू मी साजणी

जादू तुझ्या नयनातली पाहून
झालो मी तिचा दुष्मन
वाटे सदैव मला रहावे जपून
अनेक सुंदरी पासून
शपथ तुझी सांगतो तुला
वाचवी स्वपनातुनही मला

अरेरे! मिळाले नयनासी नयन
जरासे हास्य तुझे पाहून
तसाच झालो मी घायाळ

श्रीकृष्ण सामंत(स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Thursday, April 10, 2008

सैनिक हो! तुमच्या साठी.

अलिकडेच माझ्या एका मित्राचा मुलगा त्याच्या वडिलांबरोबर माझ्या घरी आला होता.माझा मित्र डॉक्टर आहे आणि हा मुलगा सायकॉलॉजीस्ट आहे.
गप्पा मारता मारता मुलगा म्हाणाला,
“आलेल्या संकटाला तोंड देवून पुनरप्रस्थापीत होण्याची निसर्गाने मनुष्याला दिलीली शक्ति”
ह्या विषयावर आपण थोडी चर्चा करूंया.
मला ह्या विषयावर अगदीच तुटपुंजं ज्ञान असल्याने मी ऐकून घेण्याचीच जास्त भुमीका घेतली.
सुनील देवधर,हा माझा मित्र कारगीलच्या युद्धात जखमी जवानाना ट्रिटमेंट देवून त्यांना बरं करण्याच्या सेवेत होता.
मुलगा म्हणाला,
काका,मला लोकांच ऐकून घेण्यासाठी पैसे मिळतात.मी अमेरिकेत आल्यावर युद्धावरून परत आलेल्या सैनिकांच्या सुख दुःखाच्या परिस्थितीतून त्यांचा संभाळ करण्य़ाच्या आणि त्यांच्या सोयी पाहून त्यांना आयुष्यात स्थैर्य आणण्यासाठी योजना पाहाण्याच्या संस्थेमधे कामाला लागलो होतो.ते व्हेटरनस हॉस्पिटल होतं.
ह्या सैनिकांकडून मला, मनुष्याला असंभवनीय परिस्थितीला तोंड देण्याच्या प्रयत्नाना सामोरं जाताना कसल्या कसल्या प्रसंगातून जावं लागतं,त्याचा त्यांनी पाहिलेला आखोंदेखा हाल त्यांच्याकडून ऐकायला मिळाला.
प्रत्यक्ष एकेकाने अतिगंभिर परिस्थितीत समोरासमोर हातापायी करून त्यातून सही सलामत सुटल्याबद्दलच्या त्यांच्या गोष्टी ऐकून घेण्याची पाळी माझ्या वर आली होती.
वैद्दयकीय विभागातल्या आणि तोफगोळ्या विभागातल्या सैनिकाना आलेल्या अनुभवातून समजलेल्या गोष्टी ऐकून, तसंच इथे आल्यावर जगू न शकलेल्या सैनिकाना त्यांच्याच आईवडलाना आपल्या मुलांच्या शेवटच्या क्रियेला प्रत्यक्ष हजर रहाण्याचे आलेले प्रसंग पाहून, आणि हे सर्व आश्चर्य वाटण्या इतके अनुभव पाहून, मनुष्याची आलेल्या प्रसंगाला तोंड देण्याची शक्ति आणि क्षमता किती टोकापर्यंत जावू शकते ह्याचा विचार मनात आल्यावर ह्या सर्वांचं खरंच कौतुक करावं असं वाटतं.

हे सैनिक, जखमी भावनेत असूनही, स्वतःला सावरून परत मानसिक धक्का घेवून कल्पने पलिकडचे प्रसंग सांभाळून पुढे मार्ग काटत जायचा त्यांचा निर्धार पाहून सतत एक प्रकारची स्फुर्ती माझ्या अंगात यायची.
इराकच्या लढाईतून परत आलेले सैनिक त्यांच्यावर होणाऱ्या असंभवनीय आय-ई-डीचे हल्ले,अदृश्यपणे होणारे बंदुकीच्या गोळ्यांचे वर्षाव कसे होत, याचं वर्णन करून सांगतात.
घरी परत आल्यावर त्यांना रस्त्यावर साधी गाडी चालवणं पण अशक्य होतं.जुन्या मित्रां बरोबर एका खोलीत राहायला जमत नाही.एक तर सैनिक सांगत होता की मानसिक सुन्नता आणि रागाची खून्नस, ह्यांच्या कचाट्यात अडकून घेतल्या सारखं त्याला सतत वाटतं.

असल्या भयंकर आघातातून बाहेर पडून हया बऱ्याचश्या इराकहून परत आलेल्या सैनिकांची पुनरप्रस्थापीत होण्याची इर्षा आणि ज्याचा अंदाज ही नाही अशा मार्गाने जावून आपल्या आयुष्याला काही अर्थ यावा असं करण्याची त्यांची धडपड पाहून त्यांचं आश्चर्य न वाटल्यास नवल म्हटलं पाहिजे.
उदाहरणार्थ,एक सैनिक होता त्याचा ह्या आजारावर जालीम इलाज म्हणजे आपल्या आजीच्या लहानश्या हॉटेलच्या धंद्दयामधे तिला मदत करण्याची त्याची इच्छा. ह्या मदतीच्या कारणाने त्याला आपल्या आजीशी भावनात्मक संबंध ठेवून सकाळी उठून तिला मदत करण्याचं एक सुंदर कारण मिळत होतं.
हे कदाचीत साधसुधं कारण वाटत असेल पण प्रत्यक्षात लांबवत जाणारी ही ट्रिटमेंट तशी कठीणही असते आणि प्रत्येक इलाजाचा शेवट गोड होईल असं नाही.
काही काही दिवशी मी ज्यावेळी घरी जातो,त्यावेळेला माझं डोकं खूप दुखत असतं.कधी मी मनातून दुःखी होवून, माझ्यावरच मी रागवून अपसेट व्हायचो.ह्या दिवशी माझं मलाच संभाळावं लागायचं. आणि पुढचा मार्ग चालू ठेवावा लागायचा. ज्या लोकांबरोबर मी त्यांना बरं करण्यासाठी आयुष्य घालवतो तेच लोक मला मी स्वतःला कसं संभाळून घ्यायचं तेच शिकवीत होते.त्या लोकांच्या निरनीराळ्या प्रकारच्या व्याधीवर असलेली यादी माझ्या डोक्यांत ठेवून ही यादी माझी मार्गदर्शिका म्हणून वापरून पुनरप्रस्थापनेसाठी मनुष्य काही गोष्टी कसा आत्मसात करू शकतो ह्याची आठवण म्हणून मनात ठेवतो.

परंतु हे लोक माझ्या ह्या विचाराचं किती कौतुक करीत असतील देवजाणे.पण मी त्यांच्याशी संबंध ठेवून माझ्या भविष्यातल्या अडचणीना तोंड द्दयायला शक्ति मिळवण्याचा प्रयत्न करतो.
अशी ही आशा, मला एक चांगली देणगी म्हणून मिळाली आहे असं समजून मी अगदी अदबीने इच्छा करतो की ती आशा मी माझ्या जवळ दुसरी कोणतीही व्यक्ति बसेल तिच्या बरोबर वाटून घेण्याचा प्रयत्न करीन.”

माझ्या ह्या मित्राच्या सायकॉलॉजीस्ट मुलाचे विचार ऐकून माझ्या मनात आलं की कारगिल वरून असेच किती तरी सैनिक अशा तर्हेच्या व्याधी घेवून आले असतील परंतु असले सायकॉलॉजीस्ट आणि असले डॉक्टर त्यांना उपाय करायला मिळाले असतील का?
आपल्याकडे सुद्धा अशा तर्हेच्या संस्था असतील का की जिथे ह्या सैनिकांची इतक्या निगेने काळजी घेतली जाते.

श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Wednesday, April 9, 2008

सांग काय करावे तरी

मन लागेना तुजवीण
मन शमेना तुजवीण
तुच सांगशी ग साजणी
मी काय करावे तरी

तडपूनी मनाला दाह देणे
न शोभे तुला
नजर चुकवूनी छपून जाणे
न शोभे तुला
उमेदीचा बहर तुडवीणे
न शोभे तुला
करमेना आता तुजवीण
मन लागेना तुजवीण
मी काय करावे तरी

करीन मी तुजवर प्रीती
परी लाभेल का मला ती
अगणीत दुःखे असती दुनियेत
काही अपुली काही परकी
दुःखी होई ही प्रीति एकांती
मन विचलीत करीशी तू
सांग काय करावे तरी

दे विझवून आग मनाची
वा
येऊ दे झुळुक थंड हवेची
दे वचन तुझ्या निष्टेचे
जो
देईल तुला मोल त्याचे
मन विचलीत करीशी तू
सांग काय करावे तरी

श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Monday, April 7, 2008

अज्ञातवासातला एक पांडव….अर्जून (दिगसकर).

“अजाबात पडून घेवचंय नायं.असात तो पाटील गांवचो.म्हणून काय भर नाटकांत, अर्जूनान हार खांवूक होयी? आणि पडान घेवूंक होयां?महाभारत असो नायतर रामायण असो,पायलीक पांच शेर लेखक मियां पण बघीतलेत.”

आता पर्यंत अगणीत लेखक महाभारतकारावर आणि रामायणकारावर टीका करीत आले आहेत.Copy Right चा हक्क तेव्हा अस्थीतवात नसल्याने,अद्दयाप पर्यंत कोर्ट कचऱ्यात खेचण्यापासून हे लेखक बचावले गेले आहेत.
उदा.
रामाने सीतेला मात्र आपल्याबरोबर वनवासात नेलं,
“निरोप कसला घेतां आता
जेथे राघव तेथे सीता”
ह्या गीत रामायणातल्या दोन ओळी कश्या विसरता येतील.हे सीतेचे रामाला उद्देशून म्हटलेलं लक्षात घेवून,
“उर्वशीवर झालेला अन्याय”
असा विषय घेवून बऱ्याच लेखकानी त्यावर खर्डे घासलेत ते काय कमी आहेत? काही कविनी पण उर्वशीवर झालेल्या अन्यायावर काव्ये पण केली आहेत.
उर्वशीची बाजू घेवून कुणीसं म्हटलंय,
“पण म्हणून लक्षमणाने आपल्या- बायकोला उर्वशीला- कां नेलं नाही आपल्याबरोबर वनवासात? .हा तिच्यावर अन्याय नाही काय?.
रावणाने सीतेला उचलून नेई पर्यंत रामाला वनवासात पत्नी सूख मिळत होतं मग लक्षमणाने काय गुन्हा केला होता.?”

आणखी कुणीसं रामायणावर टीका करताना आपल्या लेखात म्हटलंय,
“उर्वशी म्हणते,मला सोडून लक्ष्मण वनवासात निघून गेला.जाताना माझ्यासाठी लक्ष्मणरेषा आखून गेला. सासू-सासऱयांची, कर्तव्याची, अपेक्षांची”वाट बघ माझी ” अशी शिक्षा मला देऊन गेला अनेकदा वाटल, सगळ सोडून वनवासात निघून याव. पती नसलेल्या संसाराला त्यागून जाव,वनवास मीही भोगलाय हया राजमहालातपण माझा संयम कोणी जाणलाच नाही”

असल्या काहीशा कपोलकल्पीत टीका डोक्यांत आणून बऱ्याच लेखकानी महाभारतकारावर आणि रामायणकारावर रकानेच्यारकाने कागदावर ओढले आहेत.पुर्वी internet आणि blog वर लिहीण्याची आता सारखी सोय नसल्याने काही लेखक आपले लेख मासिकात फूकट publish करीत असत. आणि काही मासिके पण असल्या लेखावर जगत असत.

हे सगळं सांगण्याचा मतितार्थ असा की कोकणात “धयकालो” नावाने उस्फूर्त नाटकं व्हायची.
“धारणकाराचो धयकालो ईलो हा रे!”
असं गावातला एक माणूस दुसऱ्याला सांगायचा.आणि बातमी अख्या गावात पसरायची. लहानपणी आम्ही हटकून ह्या धयकाल्याला जायचो.नाटक-पार्टीने कुठे तंबू ठोकले आहेत ते आमच्यापैकी एक शोधून काढायचा.नाटक पाहून झाल्यावर दुसऱ्या दिवशी परत त्या तबूं जवळ घुटमळत रहाण्यात आम्हाला मजा यायची.
त्यावेळी पुरूष, स्त्रीपार्ट करायचे. द्रौपदी,कुंती,गांधारी हे स्त्रीपार्ट करणारे पुरूष सकाळी उठल्यावर दाढीमिशी करताना पाहून जरा गम्मत वाटायची.
” रे मन्या,तो बघ द्रौपदी दाढी करतां!”
असं म्हटल्यावर आम्ही त्या न्हाव्याला कौतुकाने नटाच्या गम्मती विचारायचो.पुरूष असून स्त्रीपार्ट करण्याची जबाबदारी असल्याने डोळ्यात काजळ घालून,लांब लांब केस ठेवून स्टेजवरची चाल बायकी राहण्याची संवय म्हणून दिवसा पण तसेच चालताना ह्या नटाना पाहून जरा कुतुहल वाटायचं.
नेहमीच्या व्यवहारात बोलताना सुद्धा ते बायकांसारखे लाडिक हावभाव करून बोलायचे हे पाहून सुद्धा हसूं आवरंत नसायचं.
कधी कधी एखादा नट आयत्यावेळी हजर नसायचा.कधी कधी दारू झोकून तर्र असायचा अशावेळी त्याच्या कडून ऐनवेळी काम करून कसं घ्यायचं हे नाटकाच्या मालकाला संकट व्हायचं.

“मेल्या ही काय वेळ दारू पिवची?.अरे,तुझो पार्ट येवची वेळ आयली मरे.”
असं दिगंबर गुरुजी - नाटकाचे डायरेक्टर -वैतागून म्हणायचे.पण दुसरा काही उपाय नसल्याने कोण जवळपास दिसेल त्याल तो पार्ट करावा लागायचा.
तेच तेच नाटक बरेच वेळां पाहिल्याने डायलॉग सर्व पाठ झालेले प्रेक्षक कमी नसायचे.असंच एकदा दुर्योधन दारू पिवून आयत्यावेळी तर्र झाला होता.दिगंबर गुरूजीने गावातल्या पाटलाला दुर्योधनाची भुमिका करायला विनंती केली,नव्हे तर ते त्यांच्या गळीच पडले.

धयकाल्याची आयत्यावेळी लाज राखावी म्हणून बाबलो पाटील - गावातला प्रतिष्टीत आसामी- कुरकुरून का होईना तयार होतो.गुरुजी,त्याचा पार्ट येण्यापुर्वी थोडेसे संवाद बाबल्या पाटलाला येतात याची खात्री करून घेवून त्याला दुरयोधनाचे कपडे चढवायला सांगतात.
अर्जून दिगसकर दिसायला स्मार्ट, तरतरीत नाक,आणि नाटकाचे संवाद स्पष्ट बोलायला तत्पर असल्याने त्याला गुरुजी अर्जूनाची भुमिका देतात. अर्जून दिगसकर गावातली एक सर्वसाधारण व्यक्ति असते. तसंच दुर्योधनाची भुमिका करणारा बाबल्या पाटील दुर्योधनाला शोभेल असा दंडकट, राबस-रोबस्ट-आणि काळसावळा दिसायला असतो.
अर्जूनाचा आणि दुर्योधनाचा वाद होवून लढाई होते असा सीन असतो.दोघांच्या वादसंवादाच्या ओळी बोलून झाल्यावर घनघोर युद्ध व्हायचं असतं.म्यानातून तरवारी काढून दोघे ही एकमेका वर तरवारीने वार करण्याचा पार्ट करतात. सीनच्या शेवटी दुर्योधनाने पडायचं, असा सीन असतो.आणि मग अर्जून त्याच्यावर शेवटचा वार करण्यापुर्वीत्याला लाथेने ढकलतो. आणि ठार मारण्या ऐवजी माफ करून सोडून देतो.

अर्जून हा पांडवातला एक पांडव अज्ञातवासात असल्याने दुर्योधनाला हा अर्जून आहे हे खऱ्या गोष्टीत माहित नाही असं समजायचं असतं.काही झालं तरी दुर्योधन खाली स्टेजवर पडण्याचा सीन करत नाही हे पाहून गुरुजी आतून प्रॉम्ट करतात आणि दुर्योधनाला-म्हणजे बाबल्याला- सांगतात,
“लढाई खूप झाली आता तू जमिनीवर पड.”

पण ते कसं शक्य आहे.बाबल्या पाटलाला जमिनीवर पडून अर्जूनाची लाथ खावून वर,
” जा,तुला जीवदान दिले “
असं म्हणून घ्यायची तयारी नसते.कारण प्रेक्षकात गावातल्या बायका आणि त्याची सुद्धा बायको बसलेली असते. ईतर लोकही बसलेले असतात, त्यांच्या पुढे लाज जाईल असं कसं करायचं.असं दुर्योधनाला म्हणजे बाबल्या पाटलाला वाटतं.
अर्जूनाला डोळे करून दुर्योधन सांगतो की तू पड मी पडणार नाही.अर्जूनही त्याला डोळ्याने खुणावतो की सीन मधे तू पडायचं असतं मी नाही.बराच वेळ हा सीन जरूरी पेक्षा जास्त वेळ चाललेला असतो.प्रेक्षकाना सुद्धा स्टोरी माहित असल्याने त्यांचे पण पेशंस संपत येतात.

शेवटी बाबल्या पाटील म्हणजेच दुर्योधन उस्फूर्त गाणे म्हणून गाण्यातून त्याला संदेश देवून चिडून सांगतो,
“अर्जूनग्या माय‌‍++ या पडान घे
रे पडान घे.
मी आसंय पाटील गावचो
माकां अपमान नाय करून घेवचो
(प्रेक्षकांत)
चेहरो दिसतां माझ्या बायलेचो
अर्जूनग्या माय‌‍++ या पडान घे
रे पडान घे.”
( टीप. कर्म धर्म संयोगाने नाटकातल्या अर्जून ह्या भुमिकेचं आणि खऱ्या नटाचं नाव अर्जून (दिगसकर) असणं हा योगायोगच म्हटला पाहिजे)
गाणं ऐकून प्रेक्षक हंसायला लागतात.दिगंबर गुरुजीनां हे सर्व कळल्यावर नाटकाचा पडदा पाडल्याशिवाय त्यांना गत्यंतरच उरत नाही. पडदा पडल्यावर अर्जून दिगसकर गुरुजीना सांगतो,
”अजाबात पडून घेवचंय नायं.असात तो पाटील गांवचो.म्हणून काय भर नाटकांत, अर्जूनान हार खांवूक होयी? आणि पडान घेवूंक होयां?महाभारत असो नायतर रामायण असो,पायलीक पांच शेर लेखक मियां पण बघीतलेत.”

तात्पर्य अ़सं की अनादिकालापुर्वी लिहीलेल्या रामायण आणि महाभारत ह्या दोन असामान्य ग्रंथावर प्रत्येकाने आपाआपले विचार सांगून भरपूर तोंडसूख घेतलं आहे.
कोकणातला धयकाला हा त्यातला अलिकडचा एक प्रकार.

श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

दोन शब्दांची असे ही कहाणी

दोन शब्दांची असे ही कहाणी
एक तर असेल प्रीत नाही तर जवानी

नका विचारू अर्थ मनातील शंकेचा
नका विचारू अर्थ आता कसल्याही प्रकारचा
जिच्या साठी असे ही दुनिया दीवानी
एक तर असेल प्रीत नाही तर जवानी

किती तोटके असे आयुरमान जीवनाचे
दिवस किती सुखाचे किती दुःखाचे
ये मिठीत माझ्या वसंत आला बहरूनी
एक तर असेल प्रीत नाही तर जवानी

गात असे कसले गीत हा नावाडी
आठवूनी त्याची प्रिया असे जी पैलतडी
जिच्या साठी असे ही दुनिया दीवानी
एक तर असेल प्रीत नाही तर जवानी

दोन शब्दांची असे ही कहाणी
एक तर असेल प्रीत नाही तर जवानी

श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Saturday, April 5, 2008

संगीतातला माझा सहकारी.

“मला वाटतं, आपण आपल्या आतल्याआवाजाच्या पलिकडे जावून शोध घेत मनुष्याच्या स्वभावगुणधर्माच्या लयीमधे आणि कंपनामधे आपली जागा कुठे आहे हे शोधावं.”

“मला वाटतं मी मनुष्याच्या अंगातल्या अगणीत प्रकारच्या स्वभावगुणधर्मावर जास्त केंद्रीत असतो.”
“असं का तू म्हणतोस?” असं मी मला संगीतात मदत करणाऱ्या सहकाऱ्याला विचारल्यावर तो मला म्हणाला,
“मी देशाच्या तिन निरनीराळ्या प्रांततल्या रीतिरिवाजात वाढलो आहे.हे माझ्या म्हणण्याचं कारण आहे.माझे आईवडिल कलकत्याचे,मी गुजराथ मधे जन्मलो,आणि महाराष्ट्रात, मुंबई मधे वाढलो.
मी ज्यावेळी तरूण होतो,त्यावेळी हे सगळं मला जरा गोंधळात टाकायचं.प्रत्येक प्रांतातले लोक त्यांचे रीतिरिवाज उच्च आहेत असं म्हणायचे.पण माझी खात्री होती की त्यांचं म्हणणं सर्वच काही बरोबर नव्हतं.
मला वाटत होतं जो तो समजायचा की मी बंगाली,गुजराथी किंवा मराठी असावा.बरीच वर्ष मी तिन्हीतही स्वारस्य घ्यायचो.प्रत्येका सारखं व्हायचा प्रयत्न करायचो परंतु एकातही समाधान वाटत नव्हत.मला वाटतं मी माझी निवड कुणा एकात करण्याची जरूरी नव्हती,आणि निवड ते काय याचा अर्थही मला कळत नव्हता आणि निवड न करणं म्हणजे काय हे ही मला समजत नव्हतं.
तरीपण प्रत्येकाचे रीतिरिवाज समजून घेताना मी बरंच काही शिकत होतो.प्रत्येकात सामावून घेण्याच्या माझ्या धडपडीत मला दिसून आलं की प्रत्येकजण आपआपल्यापरीने विशेष आहेत.
असं करताना माझी खात्री झाली की एकाच्या रीतिरिवाजाची निवड करताना दुसऱ्याचा दुरावा करण्याची जरुरी नाही.उलटपक्षी तिन्ही मधून निवड करणं मला जास्त उचीत वाटत होतं. आणि एका पेक्षां दुसरं चांगलं म्हणण्याची जरूरीही नव्हती.
बंगाली संस्कारातून मी त्यांच्या साहित्यीक प्रगतीचा,आणि टागोरांच्या रविंद्र संगीतातल्या सरशीचा सन्मान करतो,गुजराथी संस्कारातल्या त्यांच्या बिझीनेस बद्दलची वेडी चुरस करण्याचे गुण आणि कुणालाही प्रेमाने आणि आदराने “भाय किंवा भेन “म्हणून संभोदण्याच्या रिवाजाचा सन्मान करतो,तसंच मराठी संस्कारातील शिवाजीमहाराजांच्या मर्दुमकीची परंपरा,आणि लोकांचे संगीत नाटकाचे वेड ह्याचाही सन्मान करतो.
ह्यामुळे एकाच संस्कारात जखडून घेण्यापेक्षा मी आता सरमिसळ तिन्ही रीतिरिवाजातून मिळणाऱ्या मौल्यावर प्रेम करू लागलो.प्रत्येक दिवशी मला जे कळत नाही ते कळण्यासाठी ते जवळून न्याहाळतो आणि ही अशी भटकंती करीत असताना अपघाताने मला कांही नवीन शिकायला मिळतं. त्याशिवाय माझ्या आयुष्याला एक आकार पण येतो.
संगीत क्षेत्रात काम करत असताना,हीच कल्पना अंगीकारतो.जे संगीत मी करतो ते माझ्या सारखंच आहे ते काही एकाच रिवाजाचं नसतं, अलिकडे मी संगीतातले पण खूप रिवाज पडताळून पाहिले आहेत.असं करीत असताना माझी अनेक संगीतकारांची ओळख झाली आणि ते पण मानतात की संगीत निर्मीतीच्या क्षमतेचा उगम हा अशाच संस्कारांच्या सरमिसळतेतच असतो.हे संगीतकार आदरार्थी ह्या रिवाजांचे माझे गुरूंच झाले आहेत.किती आभार मानू त्यांचे आणि त्यांच्या संगीताचे,कारण माझ्याच संगीतामधे मला हा एक नवीन अर्थ गवसला.

खरोखर हे किती चम्तकारीक आहे की हे लोक ,आणि त्यांचं संगीत आणि त्यांचे रिवाज ह्यांत कसे आपसूप सुधारणा करीत आहेत.जो अनुभव मिळतो आणि जो मार्ग ते स्विकारतात ते खरं तर असंभवनीयअसतात.आपलं कुटुंब, शेजार, रीतिरिवाज,आणि प्रांत ह्याने याला आकार मिळतो,आपण प्रत्येकजण शेवटी ह्या पद्धतीतून जात असताना कोणा कडून किती शिकत असतो आणि शेवटी आपलं पण कशात परिवर्तन करून घेतो हे लक्षात ठेवण्या सारखं आहे.
मला वाटतं, आपण आपल्या आतल्याआवाजाच्या पलिकडे जावून शोध घेत मनुष्याच्या स्वभावगुणधर्माच्या लयीमधे आणि कंपनामधे आपली जागा कुठे आहे हे शोधावं.”

श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishans@gmail.com

Friday, April 4, 2008

नसे उमेद आता कसली

नसे उमेद आता कसली
नशिबी माझ्या येवून
का जाशी मला तूं सोडून

प्रीति जर प्रीतिच नसेल
तर समोर माझ्या येवून
संबंध प्रीतिचे देशी तोडून

मानतो मनात तू माझी
असेल का माझ्या नशिबी
होण्या तुझाच मी सर्वस्वी

विसरून जाईन मी
क्षण जीवनातले
करीत असता प्रीति
ते क्षण आनंदलेले

विसरून जाईन मी
क्षण मनातले
असता मी उच्छृंखल
ते क्षण बहरलेले

असे हीच माझ्या
मनाची खंत
हे दुःखच माझे
करील शेवटी अंत

श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Thursday, April 3, 2008

लेखन चौर्य आणि पॉझिटीव्ह थिंकींग म्हणजे रे काय……भाऊ?

ग्लासातलं अर्ध पाणी पाहून कुणी म्हणतो ग्लास अर्ध भरलेलं आहे किंवा तेच ग्लास अर्घ रिकामं असं म्हणारे लोकही असतात. पहिल्याचं “पॉझिटीव्ह आणि दुसऱ्याचं निगेटेव्ह थिंकींग”अस सगळे ह्या थिंकींगवर उदाहरण देतात.आणि हे जगजाहिर उदाहरण आहे.

आता हेच बघा.एका सदगृहस्थांनी माझ्या ब्लॉगवर जावून त्यांनी माझे बरेचसे पोस्ट वाचले वाचून त्याना खूप आवडले.
मला लिहीतात,
“मी तुमचा ब्लॉग पाहिला आणि काही पोस्ट वाचले.मी समजून चालतो की ती सर्व आरटीकल्स तुमचीच आहेत.तुम्ही चांगले लिहीता.मला काही आरटीकल्स आवडली. उदा.योगायोग हा तुमचा पोस्ट.
मी सिनीयर सिटीझन आहे आणि ह्या ब्लॉगच्या-जगाशी परिचीत नाही.पण बहूदा तुमची आरटीकल्स पहात (वाचत) राहीन.”

आता बघा,ह्यानी लिहीलेलं एकच वाक्य मला वाचताना खटकलं.
” मी समजून चालतो की ती सर्व आरटीकल्स तुमचीच आहेत.” हे त्यांच म्हणणं.
म्हणजे एखादी आई आपल्या मुलांच्या घोळक्यात बसली आहे आणि एका नव्यानेच पाहाणाऱ्या माणसाने तिला म्हणावं,
“किती सुंदर आहेत तुमची मुलं,मला खूप आवडली पण काय हो ही तुमचीच मुलं आहेत नां?”
सकृतदर्शनी कसं वाटेल त्या आईला?

ब्लॉगवरून हल्ली लेखन चोरीची काही चर्चा मी अलिकडेच “मराठी ब्लॉग विश्वावर” वाचली.माझ्या मनात पाल चुकचुकली.हे त्या वाचकाचं खटकणारं वाक्य वाचून मनात आलं,
“काय रे बाबा?आता माझ्यावर कुणी शुक्लकाष्ट दाखवतो की काय?”
पण म्हटलं,
“कर नाही त्याला डर कसली?”

अलिकडे पोस्ट वरच्या तारखावरून पण “मराठी ब्लॉग विश्वावर” चर्चा झाली. मला वाटलं होतं पुर्वीच्या तारखेचा ब्लॉगवरच्या पोस्ट पाहून, नंतरच्या तारखेच्या कुणा दुसऱ्याच्या ब्लॉगवरच्या पोस्टची कॉपी (चोरी) केली जाते असं होवूं शकत नाही आणि हे उघड आहे.त्यामुळे नंतरच्या तारखेचा पोस्ट लिहीणारी व्यक्तिच आपला पोस्ट असं दाखवायला पुर्वीच्या कुणा पोस्ट्ची कॉपी करू शकते.
पण गम्म्त म्हणजे माझ्या वाचनात आलं की ह्या तारखांची पण अदलाबदल करता येते.असं कुणी उदाहरण देवूनही दाखवलं.
ह्या सगळ्या प्रकाराचा विचार करून मी ठरवंल होईल ते होईल आपण त्या गृहस्थाना
”तुम्ही असं का लिहीलत?”
असं विचारावं-मात्र पॉझिटीव्ह थिंकींग करून-आणि मी तसं त्याना विचारलंपण,
” मी समजून चालतो की ती सर्व आरटीकल्स तुमचीच आहेत.”
असं आपण विचारलंत ते वाचून मी जरा खट्टु झालो.आपलं हे विचारणं पण जरा स्पष्टच वाटलं.पण माझं मन सांगतं की तुमच्या मनात माझ्या ह्या लिखाणा बद्दल किंतू नसावा. कदाचीत तुम्हाला ते मला कळवताना नीट मांडता आलं नसावं असा माझा समज आहे.”
पुढे मी त्यांना लिहीलं,
“कविता किंवा लेख लिहीण्याची कला ही कुठल्याही वयांवर माणसाला लिहायला उद्दयुक्त करते. तसंच आणखी मला वाटतं ही कला एखाद्दया व्यक्तिला एक दैवीक किंवा नैसर्गिक देणगी म्हणून मिळत असावी अशी माझी समजूत आहे. मी ज्या काही “अनुवादित” कविता लिहीतो त्या मी मला समजणाऱ्या कुठल्याही भाषेतून मराठीत भाषांतरीत करून लिहीतो. आणि तसं करताना कवितेचा आशय घेवून लिहावं लागतं. शब्दानुशब्द तसंच लिहीलं तर ते कॉपी केल्यासारखं होईल.आणि जी अनुवादित कविता होते ती “अनुवादित” ह्या कॅट्यागरीत टाकतो.आणि जी माझीच कविता असते ती मी “कविता”ह्या कॅट्यागरीत टाकतो. कविता सोडून ज्या गोष्टी, म्हणजे लेख,चर्चा वगैरे असतात त्या अजिबात अनुवादित वगैरे नसतात.अशा लेखात एखादं वाक्य, जे माझं नाही, ते मी ज्या व्यक्तिचं असेल त्याचं नांव देवून उदघोषित करतो,आणि नांव न आठवल्यास,
”कुणी तरी म्हटल्याचं आठवतं”
असं लिहून ते माझं नाही हे दर्शवितो. आणि असं लिहायला मला अभिमान पण वाटतो.

पुढे त्याना मी लिहीलं,
“कुणीही व्यक्तिने काही ही लिहीलं,तरी शब्दानुशब्द त्याच्याच डोक्यातून आलेले आहेत आणि ते त्याचंच लिहीणं आहे असं अपवादानेच होईल.बऱ्याच व्यक्तिचं लिहीणं पुर्वीच्या झालेल्या घटेनेशी संबंधीत असतं. वाचून,संशोधन करून,कधी कधी चर्चा करून नंतर त्यावर आपल्या डोक्यातून आलेले विचार घेवून त्या विषयात सुधारणा करून किंवा बदल करून मग नव्यात रूपांतर झाल्यावर ते नंतर त्याचं प्रॉडक्ट होतं.
ज्ञानेश्वर,तुकाराम आणि अलिकडचे पु.ल. किंवा ना.धों.मनोहर,शिरवाडकर यांचं सभोवतालचं वातावरण,त्यांची आत्मबुद्धि, आत्मज्ञान, आत्मग्रहणाची क्षमता(ऑबझरवेशन) शिवाय त्यांच दांडगं वाचन,मग ते संस्कृतमधे असो वा फारशी भाषेत असो वा इंग्रजीत असो, हे सर्व असल्याशिवाय त्यांच्या प्रतिभेची चुणुक येवू शकत नाही.

संगीत चोरी काही लोक करतात.उदा.अन्नु मलिक ह्यात प्रसिद्ध आहे असं म्हणतात.पण संगीत चोरी मधे लयीची चोरी होते, चालीची चोरी होते,पण शब्द निराळे ठेवून चालीची चोरी केलेलं गाणं, ऐकायला मजा येत नाही असं नाही.आणि चाल चोरी झाली ह्याच ते गाणं ऐकणाऱ्याला विषेश काही वाटतही नाही.तो गाणं एन्ज्यॉय करतो.मात्र लेखन चोरी आणि कविता चोरी केल्याचं लक्षात आल्यावर त्या चोरी करणाऱ्या व्यक्तिची घृणा येते.दुसऱ्याच्या मुरंब्याच्या बरणीतून बोट घालून,चोरून मुरंबा चाटताना तेव्हड्या पुरतं त्या व्यक्तिला बरं वाटतं पण जर का कुणी चोरी उघडकीस आणली तर ती किती शरमेची बाब होईल.? “
मी त्या सदगृहस्थाना पुढे म्हणालो,
“माझंच लिखाण कुणी माझ्या नकळत copy (जशास तसं) केलं असल्यास माझा नाईलाज आहे.पण लिखाण केव्हांचं आहे हे वेळकाळावरून कुणी कुणाला copy केलं ते सहजच कळू शकतं. मात्र तारखेची अदलाबदल न केल्यास.
लहानपणी कुणी विचारलं
“कुणाचं हे चोरलंस रे?”-ती कुठलीही गोष्ट असो.- त्यावर आपण म्हणतो ना
”आईची शप्पथ ते माझं आहे”
अगदी तस्संच,
”आईची शप्पथ ते सर्व माझं लिखाण आहे.”
असं मी त्यांना म्हणालो.ह्या पलिकडे माझ्याकडे काही प्रुफ नाही. आणि इतकही करून माझ्या कोणत्याही पोस्ट सारखं copy to copy दुसऱ्या कुणाच्या पोस्टमधे वाचल्याचं आपल्या आढळात आलं, तर मला अवश्य कळविण्याची तसदी घ्यावी ही विनंती”

हे सर्व वाचल्यावर,त्यानंतर मला त्या गृहस्थानी कळवलं,
“आपण निरनीराळ्या विषयावर आपल्या ब्लॉग मधे लिहीलेले पोस्ट पाहून मी तुम्हाला तसं विचारलं हे तुमचं compliment करण्याचा इराद्याने होतं. तसं लिहील्याने आपल्याला वाईट वाटल्यास,क्षमस्व.”
आता सांगा,सुरवाती पासून मी “ग्लास फूल” ची वृत्ती ठेवल्याने हा प्रश्न समाधानाने सोडवता आला.त्यांच्या त्या एका वाक्यावर मी “हाफ एम्टी” (निगेटीव्ह थिंकींग) वृत्ती ठेवली असती तर कदाचीत त्या सदगृहस्थांकडून निराळी रियाकशन आली असती.

पण कधी कधी टू मच “पॉझीटीव्ह थिंकींग” करून आपल्याला त्रास ही होतो.ते कसं ते मी माझ्या एका पोस्टवर लिहीलं आहे.शिर्षक आहे “मला वाटतं…. 3Feb 08″ तो अवश्य वाचावा.
तुर्तास एव्हडं पुरे.

श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Tuesday, April 1, 2008

“काय करूं मी बोला,घरी बाळ ना पुन्हां” ललिताचं जीवशास्त्र

“ते इवलंस मृत- शरिर माझ्या हातावर होतं,आणि माझ्या हाताच्या बोटांच्या टोकांवर त्याचं डोकं संभाळलं होतं आणि त्याचे इव्हलेशे कुल्हे माझ्या हाताच्या तळव्यावर सामावून गेले होते.मला त्यावेळी रडूं पण आवरंत नव्हतं.पण काय करणार?”

गडकऱ्याना तिन मुली.त्यांची धाकटी मुलगी त्यामानाने हुषार होती.तिला पहिल्यापासून वैद्दयकीय शास्त्राची आवड,आणि तिच्या मनासारखे परिक्षेत मार्कस मिळून ती कॉलेज मधून पहिली आली होती.गडकरी तिच्या बद्दल नेहमीच मोठ्या विश्वासाने बोलत असायचे. ती आयुष्यात विषेश काही करून दाखवणार असा त्यांचा होरा होता.तिला मलेशियात एका हॉस्पिटल मधे रिसर्च करण्याची संधी मिळाली म्हणून ती तिकडे जाणार होती.तिने लग्न करून जावं असं गडकऱ्यांच मत होतं.

तिने वडलाना कसतरी समजावलं की मी एक दोन वर्षात पुन्हा येईन तेव्हा नक्कीच तुम्ही म्हणता तसं लग्न करीन.असं म्हणून ती मलेशियाच्या ट्रिपवर निघाली.योगायोग पहा, त्याच विमानात एक उमदा तरूण वसंत केळकर,हा त्याच हॉस्पिटलात मलेशियात मॅनेजरच्या नोकरी साठी जात होता.तिची आणि त्याची विमानातली ओळख पुढे त्यांच्या लग्नात परिवर्तन होण्यात झाली.वसंत आणि ललिता यांच्या सलगी बद्दल ललिता, गडकऱ्याना वरचेवर कळवित होती.त्यानीच तिला त्याच्याशी लग्न करून मोकळी हो असा सल्ला दिला.पाच सहा वर्ष तिकडे राहून हे केळकर जोडपं मुंबईत कायमचं रहाण्यासाठी परत आलं.त्यांना एक सुंदर बाहुली जशी मुलगी होती.ललिता तिची खूप काळजी घ्यायची.

एकदां मी त्यांच्या घरी गेलो होतो.तिने आपल्या वडलांना गडकऱ्याना- पण बोलावलं होतं.इकडतिकडच्या गप्पा झाल्यावर, कुतुहल म्हणून मी ललिताला विचारलं,
“तू तुझ्या ह्या मुलीची खूपच काळजी घेतेस, असं मी मघापासून पहातोय. मला ती प्रकृतीने सुद्दृड दिसते.तिला बरं आहे नां?”
हुषार डॉक्टरच ती.माझ्या ह्या प्रश्नाने ती जरा उद्दयुक्त झाली.मला म्हणाली,
“जे दिसायला अगदी साधं आणि सोपं दिसतं त्याच्याकडे अगदी क्षुल्लक गोष्ट म्हणून पहाणं आणि त्याचावर गैरविश्वास दाखवणं ह्यात पुर्वी स्वतःला मी विषेश समजत होते.नंतर मागल्या फ्रेब्रुवारीत मला पहिली मुलगी झाली.ती जन्मतःच मृतावस्थेत होती.तशी ती मला पाचव्याच महिन्यावर झाली. कारण ते माझ्या शरिराचं अपयश होतं,असं मला वाटतं.ती इवलीशी माझी मुलगी इतकी लहान होती की तिला स्वतःलाच श्वास घ्यायला त्राण नव्हता.तिची फूफ्फूसं मजबूत करायला दिल्या जाणाऱ्या औषधाला पचवायला पण ती लहान होती. व्हेन्टीलेटर्स लावून घ्यायला पण ती कमजोर होती.थोडक्यात ती जगायलाच कमकूवत होती.कशावर तरी विश्वास ठेवण्याची पाळी यायला ही मला चालून आलेली वेळ होती.देवावर विश्वास ठेवून आमची श्रद्धा ज्यांच्यावर आहे त्या आमच्या गांवच्या मंदिरातल्या पुजाऱ्याचे शब्द माझ्या कानात घोळवायला ही वेळ मदत करीत होती.त्या मुलीच्या जन्मामुळे पुनर्जन्माच्या गहन विचारावर विश्वास ठेवण्याची ती वेळ होती.किंवा माझ्या पुर्वकर्मामुळे हताश होण्याची पाळी माझ्यावर आली असावी असं समजण्याची ही वेळ आली होती.

पुढलं पुर्ण वर्ष मी आशेवर घालवलं.गणपतिच्या मंगल दिवसात मला परत दिवस गेल्याचं लक्षांत आलं.आणि आशेचे हे दोर मी पुन्हां बाळंत होईतो मजबूत ठेवून होते.अत्यंत आनंदलेली मी, आशेच्या पलिकडे नजर टाकू लागली. नशिबावर माझा विश्वास वाढू लागला.ही मुलगी मला होणं ही माझी योग्यता आहे असं वाटूं लागलं.
आई होण्याच्या आणि आपल्या मुलावर प्रेम करण्य़ाच्या सुखाला मी वंचित झाले नाही याचंमला समाधान वाटत होतं.नशिबात येतं आणि जातं, कुठच्याही गोष्टीला लायक असणं ही तत्कालीक संबंधाची बाब असू शकते असं वाटत होतं. असं सर्व वाटत असताना परत मला दिवस गेले.पुन्हा तोच प्रसंग उद्भवला.जगायला समर्थ नसलेला नाजूक जीव जन्माला आला.
आशा,नशिब,दैव ह्या सर्व गोष्टी पुन्हा अर्थहीन वाटू लागल्या. उघड,उघड वाटला तो फक्त जीवशास्त्राचा अर्थ.माझ्या नवबालकाचं जगणं न जगणं हे एक माझ्या शरिराचं अपयश असावं असं वाटू लागलं. कारण शरिर जीवशास्त्राच्या धर्मानुसार वागत होतं.
ह्या मुलीचं शरीर जणू मला जीवशास्त्राचा अभ्यासाचा धडाच होता.लक्षात ठेवण्या सारखी त्यात एक सुंदरता होती.शरिर विज्ञानाचं चिमुकलं पुस्तकहोतं. सचित्र स्नायुचं,हाडांचं, शुद्ध-अशुद्ध रक्त वाहिन्यांचं जाळं होतं.असं मृत शरिर हातात घेवून त्याचा स्पर्श कधी यापुर्वी जाणवला नव्हता.तिच्या जवळ राहून माझ्या स्वतःच्या चालत्या बोलत्या सळसळणाऱ्या रक्ताच्या आणि हवा आत बाहेर करणाऱ्या शरिराचा अचंबा वाटत होता.ते इवलंस मृत शरिर माझ्या हातावर होतं,आणि माझ्या हाताच्या बोटांच्या टोकांवर त्याचं डोकं संभाळलं होतं आणि त्याचे इव्हलेशे कुल्हे माझ्या हाताच्या तळव्यावर सामावून गेले होते. मला त्यावेळी रडूं पण आवरंत नव्हतं.पण काय करणार?

मृत्यू ही कुणाची योजना नसते.मृत्यू कुणाच्या कमनशिबाने येत नसतो.किंवा तो दुरघटना म्हणून होत नसतो.मृत्यू होणं हे फक्त शरिराच्या काम करण्याच्या पद्धतीतलं एक स्थित्यंतर असतं एव्हडंच.कुठच्याही गोष्टीवर विश्वास सहजासहजी येत नाही. पण माझ्या आणि माझ्या मुलीच्या शरिराने मला जागं केलं.आता माझा जीवशास्त्राच्या आणि आपल्या शरिराच्या गुंतागुंतीचा प्रकार पाहून विश्वास वाढला.हा गुंता सुटत जातो आणि सर्व काही मजबूत होतं. अगदी आवश्यक बाबी कधी कोडमळतात तर कधी कोडमळत नाहीत. शरिराच्या सहजगत्या न कळणाऱ्या बाबी आणि त्या घडण्यात बिनभरंवसा मधे असतो ह्याचा विचार येवून डोकं सुन्न होतं.

तिन मुलीमधे वाचलेली ही माझी मुलगी,तिचं जीतं जागतं शरिर पाहून आणि दर वेळेला मी तिला जवळ घेते तेव्हा, आणि तिला स्पर्श करते तेव्हा, मला तिची निराळ्याच प्रकारची जगण्याची ताकद पाहून माझा जीवशास्त्रावरचा विश्वास आणखी बळावतो.”
मी मधेच तिला थांबवीत म्हणालो,
“ललिता मी उगाचच तुला प्रश्न केला.तुझी ही बॅकग्राउंड थोडी तरी मला माहित असती तर मी तुला असं ट्रिगर केलं नसतं.”
ललिता म्हणाली,
“तुम्ही काहीच चूक केली नाहित.माझ्या मनांत हे केव्हां पासून होतं,की माझ्या बाबांना सांगावं म्हणून. आणि माझ्या बाबांना एकटं पाहून सांगायला जरा जड झालं असतं. तुम्हा दोघांना एकाच वेळी बसून सांगताना माझा डोक्यावरचा भार हलका झाला.”
ही तिची सर्व गोष्ट ऐकून माझ्या मनात त्या एका जुन्या गाण्याच्या दोन ओळी घोळायला लागल्या,
“काय करूं मी बोला
घरी बाळ ना पुन्हा
नवनवतीचा बाळ माझा
येईल का हो पुन्हां “

श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com