Friday, October 31, 2008

मुलीला आपली आई माहित हवी.

रेवती त्यांच्या भावंडात सर्वात लहान.तिला त्यामानाने आईचं सूख मिळालं नाही.आणि ह्याबद्दल तिला नेहमीच वाईट वाटत असतं.ती नेहमी म्हणते माझी आई असती तर मी तिला एका मागून एक प्रश्न विचारले असते.
असं मला ती म्हणाल्या नंतर मी तिला विचारलं,
” असे कोणकोणते प्रश्न तू तिला विचारले असतेस?”
त्यावर ती म्हणाली,
“आईला हसायला केव्हा यायचं?ती लहान होती तेव्हा कुणा देवाची प्रार्थना करायची?एखाद्या वाईट दिवशी ती कशी वागायची.?तिला लहानपणी गाणं गायला आवडायचं काय?रस्त्यावरून चालताना ती डाव्या बाजूने चालायची की उजव्या.? वगैरे वगैरे.”
हे ऐकून मी रेवतीला म्हणालो,
“तुझे हे प्रश्न पाहून तू तुझ्या आईला किती मिस करतेस हे मला चांगलंच लक्षात येतं.”
रेवती मला म्हणाली,
“मी पाच वर्षाची असतानाच माझी आई निर्वतली.तिला फिट्स यायच्या.गेली त्यावेळी ती ४२ वर्षाची होती.मला माझ्या आईबद्दल काही माहित नाही.माझे वडील खूपच चांगले आहेत.आणि मला आणखी तीन भावंडं आहेत. मी सर्वात लहान असल्याने माझ्या भावंडाना माझी आई चांगलीच माहित होती.ती सर्व माझ्यापेक्षा नशिबवान आहेत.आमच्या आईचं निर्वतणं हे आम्हा सर्वांना दुःखदायक होतं.माझी काही माझ्या आई बाबत अनुमानं आहेत.खूप दिवसाच्या काळजीपुर्वक ऐकण्यातून ती अनुमानं मी काढली आहेत.माझी आई तशी दोषदर्शी होती तशी ती हजरजबाबी होती.तिच्या चेहर्‍यावर पटकन हसूं दिसायचं. लहान मुलांकडे तिची जिव्हाळ्याची नजर असायची.लिहायला आणि वाचायला तिला खूप आवडायचं.सगळा परिसर तिच्यावर प्रेम करायचा.तिची गैरहजेरी आम्हाला खूपच जाचते.

अलिकडेच मी माझ्या गीताला जन्म दिला.मी तिला म्हणते,
“गीता,मी तुझी आई आहे.तू माझ्यात अडकली आहेस.माझ्या बद्दल तुला काही माहित हवं असेल तर ते माहित होई पर्यंत मी तुला वाटतं तितकी तुझ्या अपेक्षे प्रमाणे नसेनही.पण माझ्या बद्दलच्या छोट्या छोट्या गोष्टी तुला माहित असणं आवश्यक आहे.
जोपर्यंत मी ह्या जगात आहे तोपर्यंत मला तू काहीही विचारून घ्यावस.मला नेहमी वाटतं मुलीला आपली आई माहित हवी.”



श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Wednesday, October 29, 2008

मुलांना आहे तसंच खरं ते सांगाव

रमाकांत परूळेकर आणि त्यांच कुटूंब रत्नागिरीतल्या एका लहानशा परूळे नावाच्या गावात राहातात.रमाकांतचं बरंचस आयुष्य मुलं आणि त्यांच शिक्षण ह्यावर केंद्रित आहे.
ते गावातल्या शाळेत शिक्षक होते.अगदी पहिली पासून ते आठवी पर्यंत प्रत्येक वर्गात त्यांनी शिक्षक म्हणून आपला अनुभव घेतला होता.आता गावात आणखी दोन तीन शाळा झाल्या आहेत आणि ते सध्या शाळेच्या स्कूल बोर्डाचे सभासद आहेत.
परूळ्याला आमच्या घराचं दैवत आदिनायण,त्या दैवताचं पुरातन मंदीर परूळ्यात आहे.ते पहाण्यासाठी मी अलीकडे गेलो होतो.
मंदिरातल्या पुजार्‍याने मला रमाकांत परूळेकरांची ओळख करून दिली.आणि त्यांच्याच घरी मी दोन दिवस राहयला होतो.ह्या मुक्कामात माझी त्यांची चांगलीच ओळख झाली.अनेक विषयावर आमची त्या वेळात चर्चा झाली.हे गृहस्थ परूळ्यात शाळा चालवत होते.त्या संदर्भाने मुलांबद्दल विषय निघाला.
त्यावर ते म्हणाले,

“मला वाटतं जिथे वयस्कर लोक पण आपल्या क्षमतेची हतबलता दाखवतात,तिथे लहान मुलं तोंड द्दायची आणि अर्थ समजायची स्पृहणीय क्षमता दाखवतात.
ही मुलं अस्विकारणीय गोष्ट स्विकार करू शकतात हे पाहून मी चकितच होतो.

त्या दिवशी मला एका मित्राचा फोन आला की त्याच्या बायकोला कॅन्सर झाला आहे असं डॉक्टर म्हणतात.
“मुलांच्या कानावर ही गोष्ट घालू कां?”
असं त्याने मला विचारलं.
“बेलाशक सांग “
असं मी त्याला सागितलं.आणि म्हणालो,
“होय,मला वाटतं तूं सांगावस.त्यांना सत्य कळायला हवं.किती ही मर्मभेदी ते सत्य असे ना का?”
बरेच वयस्कर लोक मुलानी प्रामाणिक असावं असा आग्रह करतात.पण आपल्यापैकी कितीजण आपल्या मुलांबरोबर प्रामाणिक असतो.विषेश करून कठिण विषय असतो तेव्हा,मृत्यु,कामवासना,लाचखोरी,आपली स्वतःची कमजोरी वगैरे वगैरे असताना.

मला वाटतं मुलाना सत्य सांगणं हे त्यांच्या जीवनात त्यांच्या ज्ञानासाठी अत्यावश्यक असतं,त्यांच्या दृढविश्वासाठी,आणि त्यांच्या आचरणासाठी आणि मान्यतेसाठी पण. ह्याचा अर्थ मुलाना नाहक भयभयीत करण्याची जरूरी आहे असं नाही.
बर्‍याच लोकाना वाटतं की मुलाना सत्य न सांगणं हे त्याना सुरक्षीत ठेवण्यासाठी केलं जातं.
आपण जेव्हा मुलांनबरोबर प्रामाणिक असतो तेव्हा त्यांच्या अंतर्बोधाला मान्यता देत असतो.आपण असं मान्य केलं -होय,लोक मतलबी असतात,आजोबांना पिण्याचे प्रॉबलेम आहेत,नवरा बायकोत भांडणं होऊन त्यानी वेगळं होणं हे दुःखदायी आहे,वगैरे वगैर-तर मुलाना आपण त्यांच्या सद्स्द्वेक बुद्धिवर भरंवसा ठेवायला उद्दुक्त करतो.ती मुलं आपला आतला आवाज स्विकार करून त्यावर विसंबून राहतील.आणि तो आतला आवाज त्याना आयुष्यभर साथ देईल.

एखादी विशेष घटना व्हायची असल्यास त्या घटने बद्दल मुलांमधे काही तरी विचित्र समझ येते.आपलं अप्रामाणिक हंसू पाहून सुद्धा त्याना समज येते,आपण बेचैन झालो असलो तरी त्यांच्या लक्षात येतं,आपण असत्य केव्हा बोलतो तेही त्यांना कळतं.
एक दिवशी मी माझ्या थोरल्या दोन मुलींबरोबर तळ्यावर फिरायला गेलो होतो.वातावरण अगदी शांत आणि सुखद होतं-अगदी आंतरीक बातचीत करायला परफेक्ट-ध्यानी मनी नसता एका मुलीने मला विचारलं,
“बाबा पूर्वी तुम्ही कधी दारू प्यायचा का?”
मी एकदम अचंबीत झालो.पण मुलीनी हेका सोडला नाही.त्यानी मला पकडलं होत.आणि त्याना ते अवगत पण होतं.तेव्हा मी सत्य ते सांगितलं.यद्दपी काहीसं संक्षीप्तात.त्या व्यसानाबाबत परिणाम- प्रवर्तक आणि स्पष्ट सांगताना प्रलोभनाचं आणि संकटाचं पण बोलणं झालं.मला वाटतं माझा प्रामाणिकपणाच व्यसानाच्या धोक्यापेक्षा जास्त परिणामकारक झाला.

काळ पुढे चालला आहे आणि तशीच मुलं पण.ह्या मुली आता कॉलेज मधे आहेत.मी जरी आयुष्यात पालक म्हणून भरपूर चूका केल्या तरी माझ्या मुलांबरोबर शुद्ध आणि मोकळं नातं ठेवलं आहे.मला वाटतं माझं त्याच्यांशी सत्यवादी असणं मला फायद्याचं झालं आहे.कारण माझी खात्री आहे की ती मुलंपण माझ्याशी तेव्हडीच प्रामाणिक आहेत.”

हे परूळेकरांचे विचार ऐकून क्षणभर मला असं वाटलं की देवळात येण्याच्या निमित्ताने ह्यांचा अनुभव आणि विचार ऐकण्याचा हा योगायोग होता.



श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलोफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Monday, October 27, 2008

निःशब्द होता सारा परिसर

जहाली असता अर्धी रात्र
निःशब्द होता सारा परिसर
दाहलेल्या मनाची ऐका
रंजलेली ही नीतिकथा

धुमसलेले उश्वास येती वणव्यातून
चांदण्या सांगती डोळे मिचकावून
लोळ हा धुराचा असेल आला धरतीवरून
सांगुया ढगाना विझविण्या पाणी शिंपडून

चंद्र सांगे चांदण्याना ऐकून हा कोलाहल
नसे तसे काही जाहले त्या धरतीवर
गोरगरीब बिचारे राहती त्यांच्या वस्तीवर
घामाच्या दाहाने जाळ पेटती हृदयावर

सांगती चांदण्या प्रवाही होण्या सागराला
जलधारा ओसंडण्या सांगती त्या मेघाला
सांगे चंद्रमा जेव्हा आग लागे हृदयाला
अश्रूंच्या जलधारा विझवीती त्या आगीला


श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Saturday, October 25, 2008

“मेल्यावर जीवाचं काय होतं?”

माझी मेहूणी हेमा माझ्या पत्नी पेक्षा तशी बरीच वयाने लहान.गेले कित्येक वर्ष ती आपल्या नवर्‍याबरोबर इंग्लंडला एडिंबरा इथे राहाते.आता ती आजी झाली आहे तिची नातच पाच वर्षाची झाली आहे.
ह्या गणपतिच्या सणाच्या दिवसात ती तिच्या नातीला घेऊन आमच्याकडे महिनाभर राहायला आली होती.तिच्या नातीला गणपती उत्सव कसा साजरा करतात हे तिला दाखवायचं होतं.
एक दिवशी बोलता बोलता आमचा विषय निघाला की,
“मेल्यावर जीवाचं काय होतं?”
हेमाला गेल्या वर्षाचा एक जुना प्रसंग आठवला.ती म्हणाली,
“मला काय वाटतं आणि त्यावेळी काय घडलं ते तुम्हाला आठवून आठवून सांगते.प्रस्तावना करताना ती म्हणाली,

“मी काही अशी एकटीच मनुष्यप्राणी नाही की ह्या पृथ्वीवर येऊन धप्पकन पडली आहे आणि दिशाहीन होऊन इकडे तिकडे भटकत आहे.मी ह्याच पृथ्वीचा एक भाग आहे आणि तिला सोडून कुठेही जात नाही.”

माझी नात माया चार वर्षाची होती,आणि अलीकडेच तिने आमच्याकडे असलेल्या मांजरा विषयी पृच्छा केली. आमचं मांजर म्रृत पावलं.मायाला हे माहित पण होतं.ती एव्हड्यासाठी अचंबित झाली होती की ते मांजर कुठे गेलं? आणि तिचं काय झालं?कारण ते आता तिच्या खुर्चीच्या खाली म्यांव,म्यांव करीत नाही आणि मायाच्या चमच्यातून टपकणार्‍या थेंबांसाठी बेचैनही होत नाही.
अशाच क्षणी मला राहून राहून वाटायचं की मी ज्या बाबीवर श्रद्धा ठेवते ते काय आहे हे मला कळावं.
माझे आईवडील सरळ सरळ म्हणायचे,
“मेल्यावर आपलं काय होतं आपल्याला ठाऊक नाही.”
मी लहान असताना कदाचीत एक अखंड वर्ष त्या प्रचंड रहस्याचं चिंतन करण्यात घालवलं.माझ्या गादीवर पडून गुबगुबीत पांघरूणाच्या आत भविष्यातल्या शास्वत अस्तित्वहिनतेचं दृष्य डोळ्या समोर आणून अस्तिपंजर परिस्थितीत येऊन आपलं अस्तित्वात नसणं ह्याची ही दुखद घटना पहात असायची.हा विषय माझ्या डोक्यावर भूत कसा बसायचा.
माझ्या मायाची वृत्ति थोडीशी निकोप वाटली.
तिच्या प्रश्नाला उत्तर देण्याची अशी काहीशी कल्पना त्यावेळी माझ्या मनात आली.
थोडासा जड निश्वास टाकून मी मायाला म्हणाले,
”मृगी-आपलं मांजर- शेतात गेलं आहे.जेव्हा असा घरातला पाळलेला प्राणी मरतो तेव्हा त्याला जमिनीत पुरतात,आणि त्यांच मग गवत,फूल किंवा झाड होतं.”
मी मायाच्या सुळसुळीत केसातून हात फिरवीत,तिच्या तुकतुकीत गालाला स्पर्श करून तिची काय प्रतिक्रिया येते ते पहात होते.ती जरा सुद्धा विचलीत झालेली दिसली नाही.उलट एक दिवस आपलं फूलात रुपांतर होतं हे ऐकून ती खूष झाली.
त्या गोष्टीने मी मलाच प्रभावीत करून घेतलं.ह्या आमच्या दोघांच्या समजूती आदान-प्रदान केल्यावर माझ्या चांगलच लक्षात आलं की,ज्यावर माझी श्रद्धा आहे ते जणू माझ्या जीवनातले छोटे छोटे कंगोरे-गांव भटकणं,निसर्गाच्या सृष्टीसौंदर्याचा उपभोग घेणं,सहानुभूतीचं ऋण ठेवणं,उंच,उंच इमारतींचा आणि भयभयीत करणार्‍या समुद्राचा आवाज ऐकून विस्मयीत होणं,प्रेम करणं,विज्ञान काय ते माहिती करून घेणं आणि आई होण्याचं निसर्गाचं गुढ आकलन करून घेणं,हे सर्व जणू एकाएकी माझ्या दृढविश्वासात समाभिरूप झाल्यासारखं वाटलं.जमिनीत एकरूप होऊन वनस्पतिचं खत होण्यात माझं भवितव्य असावं असं माझं म्हणणं नसून माझ्या जीवनात आणखी काहीतरी जीवन आहे असं मला म्हणायचं आहे.
मी काही अशी एकटीच मनुष्यप्राणी नाही की ह्या पृथ्वीवर येऊन धप्पकन पडली आहे आणि दिशाहीन होऊन इकड तिकडे भटकत आहे.मी ह्याच पृथ्वीचा एक भाग आहे आणि तिला सोडून कुठेही जाऊ शकत नाही-जसा एखादा कोनाड्यातला कोळी,किंवा खिडकीच्या दारावरची धूळ,किंवा त्या पुरलेल्या मांजरा सारखी.

मी मायाला विचारात पडून चूरूचूरू कुरमुरे खाताना पाहून,आजूबाजूला अपरिचित शांती अनुभवली.माझं नातं जुळल्या सारखं वाटलं,,मी नम्र झाले आणि सर्वांत जास्त की मला आनंदी झाले.
जीवन,मरण ही दोन्ही माझ्या सभोवती आहेत,जणू माझ्या श्वासात सामावली आहेत असं वाटू लागलं.
नंतर मी माझ्या नातीचा हात हातात घेतला.आणि शेताच्या मेरी वरून जाताना चिखलातून आम्ही चालत गेलो.आम्ही दोघी झाडावरची नवी हिरवी पालवी सूर्याच्या किरणात चमकताना पाहिली, हिरवा पहाडीभाग हवे बरोबर लहरताना पाहिला, हिरवीगार भाताची रोपटं वार्‍या बरोबर डुलताना पाहिली.आणि ह्याच्याही पलिकडे काही न दिसण्यासारखं असलं तरी चालेल असं वाटलं.आणि त्याचं कारण,जीवन चिरस्थायी असून ते प्रत्येक फूलाच्या बहरात सामाविष्ट असतं असं मनोमनी वाटलं.”

ही सर्व घटना सांगून झाल्यावर हेमा क्षणभर गोरीमोरी होऊन माझ्या प्रतिक्रियेची जणू वाट पहात आहे असं मला वाटलं.मी जरा सुद्धा निराशा न करता तिला म्हणालो,
“हेमा,तू ही घटना सांगून मला स्थंभीत केलंस.हा सगळा मेंदूचा खेळ तर नाही ना? असं मला क्षणभर वाटलं बघ.हे असे विचार मनुष्याच्या कसे डोकयात येतात.का हे निसर्गाची आपलं रूप दाखवण्याची चाल तर नसावी?”
हेमा म्हणाली,
” परत अशीच घटना घडली तरी असेच विचार येतील अशी श्वासवती नाही.”
किती समर्पक आहे हे हेमाच उत्तर?



श्रेकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Thursday, October 23, 2008

आम्ही बाराक ओबामाला मत देऊन पण टाकलं.

“अजून ४ नोव्हेंबर उजाडायचा आहे.तो मतदानाचा दिवस आहे मग त्या अगोदर मत देणं कसं शक्य आहे?”
असं आपण म्हणाल.पण खरं सांगू हीच तर अमेरिकेत गम्मत आहे.इथे स्वातंत्र्याला सिमा नाही.मात्र फक्त ते सर्व कायद्दात असलं पाहिजे.हम करे सो कायदा नाही चालत.आणि तसा काही अन्याय वाटला तर जा कोर्टात आणि मांडा तुमची कैफियत.कोर्टपण तत्पर असतं.लगेचच निर्णय.
जाहिर मतदानाच्या तारखे अगोदर एखादा महिना आपल्याला मत देता येतं.मग एक महिना अगोदर मत देऊन पुढच्या त्या महिन्यात जर का परिस्थिती बदली तर तुमची चूक तुम्ही भोगा.म्हणून तुमचं नक्कीच एखाद्दाला मत द्दायचं ठरलं असेल तर मग शेवटच्या दिवसाची वाट बघण्याची काय जरूरी?.द्दा टाकून मत अगोदर.निदान ४ नोव्हेंबरला मतदाना दिवशी तेव्हडीच गर्दी कमी होईल.हा एक फायदा.आणि दुसरी गम्मत म्हणजे मत तुम्हाला कुठेही देता येतं.मत पेट्या ग्रोसरी स्टोअर मधे पेट्रोल पंपावर आणि अशा गर्दी असणार्‍या स्पॉट वर ठवलेल्या असतात.आम्ही आमचं मत मात्र आम्हाला मत पत्रीका घरी मागवून ती भरून पोस्टाने पाठवली. ५० राज्यातील ३० राज्यात एक महिना अगोदर मत द्दायची सोय आहे.
आता तुम्ही म्हणाल आम्ही पतीपत्नीने ओबामाला का मत दिलं?

त्याचं कारण,तो आम्हाला, दूरदृष्टीचा,गोरगरिबाचा,आपल्या सारखाच,आणि त्याशिवाय तरूण,ताज्या दमाचा,बुशच्या मग्रुरीच्या कारभारात बदल आणणारा,इतिहास बदलणारा,थंड,शांत स्वभावाचा,काळा,सहाफूट उंच, स्मार्ट, तरतरीत, अमेरिकेत सध्या नवीन उद्भवलेल्या एकानॉमीच्या प्रॉबलेम बद्दल जरूर ती माहिती अवगत असलेला,वयोमानामुळे अनुभव नसला तरी त्या त्या प्रांतात अनुभवी लोकांचा संबंध ठेवून असलेला,गुणी,दुसर्‍याचा सन्मान बाळगणारा,हंसत, हंसत न चिडता उत्तर देणारा,कुटुंबवस्तल,आजी आजोबा वर प्रेम करणारा, अगदी साध्या राहाणीमानाचा,गोर्‍यापासून काळ्यापर्यंत आणि अल्पसंख्यांकानाही बराचसा आवडणारा,मध्यंवर्गीय लोकांची बाजू घेणारा,सर्वांना हेल्थकेअरची सुविधा हवी असं म्हणणारा, मोठ्या श्रीमंता कडून निवडणूकीला पैसे न घेता गोर गरिबांकडून आणि मध्यवर्गीयांकडून प्रत्येकी पाच,पन्नास डॉलर घेऊन कोट्यानी डॉलर जमवून निवडणूकीचा प्रचारखर्च करणारा, एका एका सभेत लाखो लोकांची गर्दी जमविणारा फ्लूट पाईपर, अतिशय शिस्थितीत निवडणूकीची ऑरगनायझेशन संभाळणारा, अमेरिकन पेसिडेन्टच्या इतिहासात सर्वात वयाने लहान-४७वर्षाचा- आणि पहिला नी-गोरा म्हणून रेकॉर्ड मोडणारा,अश्या हया ओबामा बद्दल किती लिहू?
ह्याला अगोदरच निवडून आम्ही मत दिलं आणि आमचं हे मत नक्कीच फूकट जाणार नाही याची खात्री आहे.

त्याने त्याच्या व्हाईस- प्रेसिडेन्टसाठी पण अशी व्यक्ती निवडली आहे की त्या व्यक्तिला ३०/३५ वर्षाचा राजकारणात अनुभव असून तसाच मध्यमवर्गीय सज्जन माणूस आहे.बाराक ओबामा आणि ज्यो बायडन ही जोडी उठून दिसणारी आहे.आणिलायक आहे असं आम्हाला मनोमन वाटतं.

या उलट जॉन मेकेन आणि सेरा पेलन(तिच्या नावाच्या स्पेलिंगकडे बघून “sarah palin” काही आपल्याकडे तिला सारा पॅलिन म्हणतात ते बरोबर नाही.) ही जोडगोळी अगदीच आमच्या दृष्टीने नष्ट वाटली.मेकेनचे पॉझिटिव्ह पॉईन्ट्स म्हणजे व्हियेटनामच्या युद्धात बंदिस्त झाल्यावर जीव घेण्या छळणूकीची-टॉरचरची-पर्वा नकरता पाच वर्ष त्याने अगणीत छ्ळ भोगले.नाही पेक्षा सव्वीस वर्ष राजकारणात राहून श्रीमंत धारजीण्या रिपब्लीकन पक्षाची री ओढून श्रीमंताना आणखी आणखी करात सवलती देऊन (गरज नसता नाही) देशाची आर्थिक परिस्थिती सुधारते ह्या प्रे.रिगनच्या धोरणाची री ओढून ज्या धोरणाने कर्ज काढा आणि खर्च करा आणि युद्ध करून देशातल्या श्रीमंत लोकांची तुंबडी भरा जे हे धोरण प्रे.बुशने अंगिकारून अमेरिकेला भीक मागण्याच्या स्थितीत सध्या आणून ठेवलं आहे त्याचीच कॉपी कॅट आहे.
आणि ह्या मेकेनची व्हाईस प्रेसिडेन्ट जिला आपल्या मराठीत एखाद्दा व्यक्तिला “अचरट” म्हणू अशा बाईला,देशातल्या समस्त बायकांची आपल्याला मत मिळतील ह्या मुख्य उद्देशाने सनसनाटी म्हणून निवडली आहे.तिचे (दूर)गुण बघून प्रत्यक्ष त्यांच्या पार्टीचेच लोक संतापले आहेत.
आणि तशात हा जॉन मेकेन,सरफिरा,बाष्क्ळबाजी करणारा,भडकू,राग आल्यावर चेहर्‍यावर न लपवू शकणारा,स्वतःला युद्धात निपूण समजणारा,दोन हात आणि एक पाय युद्धात मोडून घेतलेला, सध्या स्किन कॅन्सर होऊन बरा झालेला,चिडखोर वृत्तीचा,सतत बदलणारा,सेरा पेलनला जोडीदार निवडून हंस करून घेतलेला,तिच्यामुळे गर्दी जमते असं फालतु भुषण सांगणारा,नाहितरी रिपब्लिकन पार्टी ह्यावेळेला निवडून न येण्याचे जास्तीतजास्त चान्सीस असल्याने बळीचा बकरा झालेला,अशा ह्या व्यक्तीचे किती दुर्गूण सांगावे.

“बराक ओबामा काळा आहे,तो मुसलमान आहे,तो टेररिस्ट आहे”
वगैर वगैर त्याच्यावर पर्सनल आरोप करून आपण निवडून येऊ अशी जॉन मेकेन समजूत करून घेत आहे.७२ वर्ष वयझालेला हा दोनदा ह्याच प्रेसिडेन्टच्या जागे साठी उभा राहून अपयशी झालेला चेकट वृत्तीचा असून,
“तुझ्या पश्चात तुझी जोडीदारीण प्रेसिडेन्टची जागा संभाळेल काय?”
ह्या सतत विचारलेल्या प्रश्नाला,
”होय” म्हणून निर्भिडपणे उत्तर देतो.
मी मनात म्हणतो उद्दा हा जर का निवडून आला आणि कारकीर्द संपण्यापूर्वी अल्लाला प्यारा झाला-इकडे त्याला वन हार्टबीट अवे-असं म्हणतात तसं झालं तर तिला प्रेसिडेन्ट करून ह्याच्या मागे देशाचं काय होणार आहे ह्याची ह्याला काही फिकीरच नाही.आणि “कंट्री फर्स्ट” असे लिहिलेले त्याच्या सभेत घोषणाचे बोर्ड उंचावून दाखवले जातात.सेरा पेलन ही बया फॉरेन पॉलीसीचं कसलंच ज्ञान नसताना आपल्या घरातून रशिया दिसतो म्हणून आपल्याला,
” तसं अगदीच ज्ञान नाही असं नाही”
असं पत्रकाराला उत्तर देऊन ही आलास्का स्टेटची गव्हर्नर गंभीर चेहरा करून सांगते.
जगातल्या ७० देशात सर्व्हे केल्यावर बाराक ओबामा प्रेसिडेन्ट म्हणून निवडून यावा असं त्या देशातल्या सर्व साधारणजनतेचं मत आहे असं दिसून आलं आहे.
आता सार्वत्रिक निवडणूकीला पंधरा एक दिवस राहिले आहेत.बाराक ओबामा १० पॉईन्टसने पुढे आहे.एक्झीट पोलला इकडे बंदी नाही.एक्झीट पोल वरून मत- परिवर्तन होवून निवडणूकीचा रीझल्ट बदलेल असं कुणालाही इकडे वाटत नाही.अगदी एक पर्सेन्ट लोकांवरही परिणाम होणार नाही.
आता एक गोष्ट खरी आहे की प्रत्येक वादाला दोन बाजू असतात.आम्ही आमची बाजू सांगून बाराक ओबामाला आम्ही का निवडला ते सांगण्याचा प्रयत्न केला एव्हडेच.
तेव्हा ४ नोव्हेंबरची वाट पहात आहो.



श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Tuesday, October 21, 2008

“लळा जिव्हाळा शब्दच मोठे कोण कुणासाठी जगते”

“रामभाऊ” असं न चुकता आम्हीच त्याला म्हणायचो.कुणी त्याला ” रामा” म्हणायचे तर कुणी त्याला ” रे,रामा ” अशी साद घालायचे कुणी ” रामा रे ” असं पण म्हणायचे.सर्व साधारणपणे लोक त्याला “रामा” च म्हणायचे.
तर हा रामा म्हणजेच रामभाऊ गणेश माळगी,अगदी लहान असताना, त्याचे वडील माझ्या आईकडे त्याला घेऊन आले आणि तिला म्हणाले,
“हा माझा मुलगा तुझ्याकडे ठेव,शिक्षणात त्याचं लक्ष नाही,तुझ्या हाताखाली कामाला घे, आणि दोन घांस घाल.मला आता एव्हड्या मुलांना पोसायला जमत नाही.”
आणला त्यावेळा तो दहा वर्षाचा होता.आईने त्याला विचारलं,
”तू शाळेत जाणार का?”
पण तो,शाळेत जायला तयार नसल्याचं तिला दिसलं. निदान घरी काम करून पोट तरी भरील, त्याच्या बापाच्या घरी त्याची उपासमार व्हायची ती तरी होणार नाही,असें आईच्या मनात आलं.
अतिशय गरीब स्वभावाचा रामा, खूप आज्ञाधारक आणि प्रेमळ होता. आई सांगेल ती कामं निष्टेने करायचा. आईला त्याची खूप दया यायची.त्याला ती पोटभर जेवायला घालायची.पण एव्हडं जेवू घालून रामाची शरिरयष्टी दुष्काळातून आल्या सारखीच, असायची. आणि तो म्हातारा होई पर्यंत शरिर तसंच ठेवून होता.

हळू, हळू रामा आईची बाजाररहाट करायला लागला. आणि पुढे पुढे आपल्या आपणच वेळ बघून,
“आई,जरा वांयंच बाजारात जावून येतंय़ं हां!,वेंगुर्ल्यासून माशाची येष्टी येंवचों टायम झालो दिसतां”
असं आईने ऐकलं न ऐकलं असं बोलून “साधना कपडे का साबून ईस्तमाल की जिये ” असं मोठं अक्षरात लिहीलेली पिशवी खांद्दयावर टाकून चप्पल पायातून सरकून चालू पडायचा.त्यावेळी आम्ही सावंतवाडीत राहायचो.
”दहा वांजता वेंगुर्ल्याची गाडी कशी येणार? काही तरी निमीत्त करून हा बाहेर भटकायला जातो.”
असं माझे वडील कुरकुरून पुटपुटायचे.त्यावर आई म्हणायची,
“बिचाऱ्याला घरात काम काम करून कंटाळा येत असेल.”
हे ऐकून वडील गप्प बसायचे.
रामा गटाराच्या बाजू, बाजूने मान खाली घालून चप्पल घसटत, घसटत बाजारा पर्यंत जावून यायचा.वाटेत काही रामाला ओळखणारे दुकानदार किंवा हॉटेलवाले गम्मत म्हणून त्याची फिरकी घ्यायचे
“रामा मासळी कसली ईलीसा?”
यावर रामाचं नेहमीचं उत्तर,
“येंगुर्ल्यासून नुकतीच गाडी सुटली, असां भाटाचो गडी सांगी होतो.बांगडे खूप रापणीत लागले हत असां ऐकलां”
असं धांदात खोटं सांगून वेळ मारून न्यायचा. घरी आल्यावर उशिर झाल्यामुळे स्वतःला गिल्टी समजून, न बोलता सर्व कामं सिरयस होवून हाता वेगळी करायचा.आईच्या हे लक्षांत येत असे पण ती आईच्या ह्रुदयाने त्याला क्षमा करायची. आणि ते त्याच्याही लक्षात यायचं. रामाच्या तोंडात अस्सल मालवणी शब्द होते.बाजारातून जावून आल्यावर काही ना काही बातम्या घरात येवून सांगायचा.
“डुबळ्याचो म्हातारो खवांचलो(वारला)”
”केसरकराचो जांवई सडोफटींग(एकटाच) आसा”
“भाटाचो पंप चॉं,चॉं करून आवाज करतां “
मधेच कधी तरी मराठी मिश्रीत मालवणी बोलायचा.
“आता तुझा बाबा येणार तुला फिरायला “होरणार” (नेणार)”.
” मी हुंतलं(म्हटलं) म्हणून सांगू नका हां!” वगैरे, वगैरे.
बातम्या द्दायला आपण काही कमी नाही असं दाखवायचा त्याचा प्रयत्न असायचा.

काही वर्षानी आम्ही जेव्हा मुंबईला आलो तेव्हा तो पण आमच्या बरोबर मुंबईला आला.सावंतवाडी सोडण्यापुर्वी भेटेल त्याला सांगत राहिला,
“आता तुम्हाला मी गमणार(दिसणार) नाही”
आणि ऐकणारा काही तरी प्रश्न विचारणार याची अपेक्षा करीत थोडा पॉझ घ्यायचा,
“असांss कायss ? “
असा त्याला प्रश्न विचारला जाण्याची अपेक्षा असायची. विचारल्यावर म्हणायचा,
” असां काय म्हणतांss? परत परत येणां जाणां काय सोपा नाही लांबचा प्रवास आणि खर्च काय कमी येतां म्हणून सांगू.?”

असं स्वतःच्याच कल्पनेत जणू हाच खर्च करणार आहे अशा अविर्भावात त्या प्रश्न कर्त्याला जादा माहित देण्याचा प्रयत्न करायचा. ठाण्याचा उत्तरसळला राहून रामा तिथे पण लोकात पॉप्युलर झाला.
“काय रामा कसं आहे?” असं कुणी विचारल्यावर,उत्तर द्दायचा,
“बरां आहे”
दहाएक वर्षानंतर माझा धाकटा भाऊ सावंतवाडीला नवीन धंदा करण्यासाठी गेला तेव्हा रामा पण त्याच्याबरोबर गेला.आतां रामाला लोक “मुबईकर ” म्हणून संबोधीत होते.त्याचा त्याला गर्व वाटायचा. सुरवातील गावतल्या लोकाना आपल्या मनातल्या विचारांची भर घालून मुंबईचे मोठेपण वर्णन करून सांगायचा.
माझ्या भावाच्या फॅक्टरीत पडेल त्या कामाची त्याला मदत करायचा.आतां भावाने त्याला घरीकाम न करता फॅक्टरीत काम करण्याचे जणू प्रमोशन दिलं होतं. आल्या गेलेल्याला “बाबाची” म्हणजे माझ्या भावाची मोठेपणं सांगायचा.त्याचा स्वभाव बघून लोक त्याच्याशी प्रेमाने वागायचे.आलेल्या माणसाला न विचारताही जादा माहिती द्दायचा.माझ्या भावाला त्याला अशी संवय बरी नाही म्हणून समजावून सांगावं लागायचं.वडीलांच्या जागी तो रामाला मानायचा.

त्याच्या “बाबाची” फॅक्टरी चांगली चालली होती.पण जसं वंय होत होत गेलं तसा रामापण थकत चालला होता.
खाकी हाफपॅन्ट-शॉर्ट- आणि वर मोठ्या बटनाचा बुश शर्ट आणि पायांत जूतं-चप्पल-घालून “बरां आहे” म्हणून जबाब देणारा रामभाऊ रस्त्यावर कमीच दिसायचा.घरचे लोक पण त्याला काम देत नसत.बसून खायला रामाला खूप जीवावर यायचं. आपल्या नात्याचा नाही, गोत्याचा,तरी केवळ घरातला म्हणून राहील्याने किती जिव्हाळा लावून होता.
डॉक्टर म्हणाले रामा आता दिवस नाही काढणार.त्याचं हार्ट खूपच वीक झालं आहे.हे ऐकून घरची मंडळी तो अंथरूणाला लागल्यावर अक्षरशः सेवा करीत होते.वय ऐंशी झालं होतं.आणि एक दिवस रामाने ईहलोकाची दिशा धरली.अगदी रक्ताचं माणूस जातं तसं सगळे त्याच्या पश्चात रडले.
तो गेल्याची बातमी ऐकून मला एका कवितेची आठवण आली.त्या कवितेत मी रामाच्या संदर्भात बदल करून ती लिहिली. .
मुळ कविता,
“लळा जिव्हाळा शब्दच खोटे
कोण कुणाचे नाही
राजा
कोण कुणाचे नाही”
लळा जिव्हाळा शब्दच मोठे
कोण कुणासाठी जगते
राजा
कोण कुणासाठी जगते

पिसे,सनतडी.काड्या जमवी
चिमणी बांधी कोटे
दाणा,दाणा आणून जगवी
जीव कोवळे छोटे
चिमणा उचलूनी नेई बाळा
जगविण्या साठी त्याते
कोण कुणासाठी जगते
राजा
कोण कुणासाठी जगते

रक्तहि सगळे नसते
असू शकते माया
कोण कुणाचे नसून ही
अंतरी असते दया
सांगायाची नाती नसेना
प्रेम कुठे जाते
कोण कुणासाठी जगते
राजा
कोण कुणासाठी जगते

माणुस सुद्धा प्रेम करतो
समजून दुसरा अपुला
दुसरा ओळखी उपकाराते
देई सर्वस्व त्याला
कोण कुणाचा जोडू
पाहतो या जगती नाते
लळा जिव्हाळा शब्दच मोठे
कोण कुणासाठी जगते
राजा
कोण कुणासाठी जगते



श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)

shrikrishnas@gmail.com

Sunday, October 19, 2008

“माझी आई हाच माझा विश्वास.”

मुलांच पालन-पोषण करण्यासारखं दुसरं कठीण काम नाही.साध्या भाषेत सांगायचं तर “माझी आई हाच माझा विश्वास.”

ह्यावेळेला मी कोकणात गणपति उत्सवासाठी गेलो होतो.माझ्या आजोळी गणपति आणतात.बरेच वेळी पाच दिवसाचा असतो. कोकण दर्शन ट्रॅव्हल एजन्सी तर्फे मी फार अगोदर तिकीट काढून ठेवलं होतं.दादरच्या ब्रॉडवे सिनीमा समोर ह्या बसचा स्टॉपहोता.सकाळीच उठून जावं लागलं.माझ्या शेजारी एक सदगृहस्थ येऊन बसले.बस चालू झाली तसं आम्ही हॅलो,हाय करून बोलायला लागलो.
गणपति उत्सवात कोकणात किती गर्दी करून लोक मजा करायला जातात.सगळे नातेवाईक एकत्र येऊन तो दीड दिवस किंवा ते पाच दिवस कसं गाणं वाजवणं,घरातच छोटे छोटे कार्यक्रम करून आपली करमणूक करून घेतात.त्याच सुमारास निरनीराळ्या फुलांचा मोसम असल्याने गणपतिच्या मुर्तिची आरास करून ती जागा कशी सुशोभित करतात,ह्या सगळ्या माहितीची आम्ही दोघे एकमेकाला देवाणघेवाण करीत होतो.
मी त्यांना गमतीत म्हणालो,
“आम्ही मासे खाऊ लोक गणपति पुढल्या दाराने विसर्जनाला जाता जाता आमचा रामा मागच्या दाराने बाजारातून मासे घेऊन येतो.”
नंतर हे गृहस्थ- डॉ.सूर्यकांत पारकर- जरा गंभिर होऊन मला म्हणाले.खरं तर ह्यावेळी मी माझ्या आईच्या वर्षश्राद्धाला जात आहे.गेल्या गणपतिच्या दिवसात ती निर्वतली.आईची आठवण काढून त्यांचे डोळे भरून आले होते.
मी विचारलं,
“काय झालं आपल्या आईला?”
त्यावर ते म्हणाले,
“एका एकी तिला मॅसीव हार्ट ऍटॅक आला.मी स्वतःच डॉक्टर असल्याने लगेचच उपाय करण्याचा प्रयत्न केला. पण सगळं संपलं होतं.”
सांगताना फारच भावनावश झाले होते.
मला म्हणाले,
“माझी आई एक घरगृहिणी होती.तिच्या लक्षात आलं की,आयुष्यात सफलता मिळवणारे लोक टी.व्ही. बघण्यात वेळ घालवण्या ऐवजी वाचन करण्यात वेळ घालवतात.तिने आम्हाला सांगितलं की एक दोन कार्यक्रमच आठवड्यातून टी.व्ही.वर पाहायचे.आणि उरलेल्या रिकाम्या वेळात लायब्ररीतून एक दोन पुस्तकं आणून वाचायची आणि काय वाचलं ते संक्षिप्तात लिहून तिला दाखवायचं.ते ती वाचायची आणि तिचे शेरे द्दायची.काही वर्षानी आमच्या लक्षात आलं तिचे ते शेरे ही एक चाल होती.
आमची आई जेमतेम तीन ग्रेड्स शिकलेली होती.
मी हायस्कूलमधे असताना वरचा नंबर घ्यायचो.पण हे जास्त वेळ टिकलं नाही.मला छानछोकी कपडे वापरावे असं वाटायचं. बाहेर कट्ट्यावर बसून गप्पा मारयाला आवडायचं.माझा वर्गातला नंबर घसरत खाली गेला.आई बाहेरची कामं पण करायची.

एकदा मी तिला म्हणालो,
“मला टेरीकॉटनचा शर्ट आणि पॅन्ट हवी आहे”
त्यावर ती मला म्हणाली,
“ठिक आहे मी लोकांच्या घरची जी कामं करते त्याचे पैसे मिळाल्यावर ते सगळे तुला देते.घरचा सर्व खर्च संभाळून उरवशिल त्या पैशातून तुला हवं ते घे.”
मला ही योजना आवडली.पण खर्च संभाळल्यावर काहिच उरलं नाही.
माझी आई किती व्यवहारी होती ते मला कळलं.घर संभाळून,घरखर्च संभाळून आमच्या समोर रोज जेवणाचं ताट वाढून जरूरी प्रमाणे आम्हाला वापरायला कपडे पण घ्यायची.
माझ्या लक्षात आलं की तात्कालिक तृत्पी मला काही ही समाधान देत नव्हती.सफलता मिळवण्यासाठी बौद्धिक तयारी हवी. माझा दृढविश्वास होता आणि माझं स्वप्नही होतं की मी डॉक्टर व्हावं.

माझ्या अभ्यासात नीट लक्ष देऊन परत मी माझा वरचा नंबर मिळवायला लागलो.आणि सरतेशेवटी माझं स्वप्न मी साकार केलं आणि डॉक्टर झालो. कैक वर्षाची माझ्या आईची अविचल देवावरच्या श्रद्धेने मला प्रेरणा दिली.विशेष करून ज्यावेळी अतिशय कठीण शल्यक्रिया करताना मला चिकित्सेची भिती आव्हान देत असे अशा वेळी.

काही वर्षापूर्वी माझ्या लक्षात आलं की मला फार पटकन पसरणारा प्रोस्टेट कॅन्सर झाला आहे.आणि मला कळलं की तो माझ्या मज्जातंतूत पण पसरेल. माझ्या आईची गणपतिवर खूप श्रद्धा होती.ती जरा सुद्धा विचलीत झाली नाही. आणि नंतर कळलं की माझ्या कण्यातला ट्युमर हानीकारक नव्हता.माझी सर्जरी होऊन मी बरा पण झालो.
गणपति दैवतावर आम्हा सर्वांची खूप श्रद्धा आहे.
ह्यावेळेला आम्ही दीडच दिवस गणपति आणणार नाही पेक्षा आई आम्हाला अनंतचतुर्दशी पर्यंत गणपति ठेवायला सांगायची.
माझी कहाणी ही खरं तर माझ्या आईचीच कहाणी आहे.एक स्त्री की जिला औपचारिक शिक्षण अगदी थोडं,तरी पण वडीलकीच्या जागेचा उपयोग करून आम्हा सर्वांच जीवन तिने पालटून टाकलं.साध्या भाषेत सांगायचं तर “माझी आई हाचमाझा विश्वास”

मला ही हे ऐकून गहिवर आला.मी त्यांच्या पाठिवर हात फिरवून म्हणालो,
“काळजी करू नका, हे ही दिवस जातील.”



श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrshnas@gmail.com

Friday, October 17, 2008

नवजात मुलाबद्दलच्या आईच्या अपेक्षा.

आज नंदा पेठे आणि तिची मैत्रीण कविता भिडे दोघी तळ्यावर फिरायला आलेल्या दिसल्या.मला पाहिल्यावर नंदा म्हणाली की,
” भाऊसाहेबांना आज बरं नसल्याने ते येऊ शकणार नाहित.”
तसा त्यानी तिच्या जवळ मला निरोप दिला होता.
नंदा ही प्रो.देसायांची मधली मुलगी.कविता एका कम्युनीकेशन सेंटरवर काम करते.माझी तिच्याशी ओळख करून दिल्यावर नंदा मला म्हणाली,
“कविताला एक लहान मुलगा आहे.ती त्याला आपल्या सासूकडे ठेऊन आली आहे.सहज पाय मोकळे करायला आम्ही तळ्यावर आलो.तुमच्या विषयी हिला भाऊसाहेब नेहमीच सांगत असतात.प्रत्यक्षच तुम्ही दिसला तेव्हा मी तिला म्हणाले मी तुमची ओळख करून देते.”
मी नंदाला म्हणालो,
” तुम्ही दोघं तावातावाने काही तरी बोलत होता हे मी पाहिलं.असा कोणता विषय चालला होता?”
नंदा म्हणाली,
“जनरल विषय चालला होता.जन्माला येणार्‍या मुलाला कोणत्या मुलभूत गुणवत्ता असाव्या ह्या विषयावर तिच्या पहिल्या मुलाच्या वेळी तिच्या नवर्‍याबरोबर चर्चा झाली होती त्याची थोडक्यात ती माहिती देत होती.”
हे ऐकून मी कविताला म्हणालो,
“वा! छानच विषय आहे.मला पण त्यातलं थोडं फार समजलं तर बरं वाटेल”
कविता नंदाकडे हंसत हंसत बघायला लागली.नंदाच्या चेहर्‍यावरून तिला दिसलं की ती तिला सांग म्हणून सांगत होती.तिने सुरवातच केली,

“तुम्ही जेव्हा दुसर्‍याची कदर करता,तेव्हा प्रेम कसं करावं हे जास्त कळतं.आणि प्रेम कसं करून घ्यावं हे पण कळतं”

“मी जेव्हा पहिल्यांदा गरोदर होते,तेव्हा बाथरूम आणि स्वयंपाकघरातल्या फ्रिजकडे आकस्मिक होणारी माझी धांवपळ, ह्यांच्या मधल्या क्षणात मी ही कसली “व्यक्ति” ह्या जगात आणीत आहे ह्याचं चिंतन करण्यासाठी थोडी उसंत घेऊन बसत असे.
“जर का व्यक्तिमत्वाच्या विशेषताची फोड करायची ठरवली तर तीन गुणवत्तेचा विचार करावा लागेल.”
मी माझ्या पतिला म्हणाले,
“तर त्या कोणकोणत्या गुणवत्ता होतील? “
मी मनात म्हणाले जर का मला त्या तीन गुणवत्ता सांगता आल्या तर त्याचं तादात्म्य स्थापित करायचं झाल्यास माझा ज्याच्यावर जास्त दृढविश्वास आहे अशी ती तीन मुल्य असावीत. फक्त तीनच कारण मला वाटतं तेव्हड्या तीन जरी मिळवू शकले तरी नशिब समजायला हवं.कारण “येणार्‍यावर” आपलं अगदी मर्यादीत नियंत्रण असतं.

“सत्यनिष्ठा” ही एक गुणवत्ता असं माझे पति न कचरता मला म्हणाले.माझ्या यादीत ही गोष्ट पहिल्या नंबरावर होती. मला वाटतं जी व्यक्ति सत्यनिष्ठा ठेवून असते ती शक्यतो कसलाही प्रसंग ओढवून घेत नाही.आणि असं प्रामाणिकवृत्ती ठेवून असल्यावर कुठलाही कठीण मार्ग घ्यायला कुचराई होत नाही आणि त्यामुळे आपण आपली उर्जितावस्था करून घेण्याचा मार्ग पत्करतो.आपण प्रामाणिक असल्यावर लोक आपल्यावर विश्वास ठेवतात.आणि तत्क्षणी आपण ही आपल्यावर विश्वास ठेवतो.आणि असं झाल्यावर मला वाटतं उरलेल्या दोन गुणवत्ते करता पायाभरणी झाली आहे असं समजारला हरकत नाही.
थोडा उश्वास टाकून मी म्हणाले दुसरी गुणवत्ता म्हणजे,
“दुसर्‍याची कदर करणं”
फक्त सत्यनिष्ठा कधी थोडी कटू असू शकते. परंतु,अशी व्यक्ति ज्यावेळी दुसर्‍याची कदर करते त्यावेळी हे संमिश्रण त्या व्यक्तिला प्रभावी करू शकतं.जेव्हा तुम्ही दुसर्‍याची कदर करू लागता तेव्हा-आशापूर्वक- तुम्ही कसलाही प्रसंग अंगावर ओढून घेण्याऐवजी एक चांगले नागरीक बनण्याकडे तुमचा कल असतो. मित्रत्व अंगिकारू शकता,आणि तुम्ही हलक्यावृत्तीचे दिसत नाहीत.दुसर्‍याची कदर केल्यावर ते आपली कदर करतात आणि तत्काळ आपण आपलीही कदर करायला लागतो.

हो! आणि हे विसरले,
“तुम्ही जेव्हा दुसर्‍याची कदर करता,तेव्हा प्रेम कसं करावं हे जास्त कळतं.आणि प्रेम कसं करून घ्यावं हे पण कळतं”
आणि आता तिसरी गुणवत्ता.ह्याचा विचार करायला थोडं कठीण गेलं.कारण त्या मुलात सत्यनिष्टा आणि दुसर्‍याची कदर करणं असावंच परंतु, आणखी काय असावं ह्याचा लोभ वाढत चालला. आम्ही जास्त लोभी होऊन विचार करायला लागलो. मुळातच मुल असण्याचा लोभ,आणि नंतर ते सुदृढ असावं,आणि ते सत्यनिष्ठ आणि कदर करणार असावं हे जणू यथैष्ट नव्हतं. एक मोठाली गुणवत्तेची यादी आमच्या सम्मतिची जणू प्रतिस्पर्धा करित होती.जशी,
मेहनती,सहासी,सृजनशिल,बुद्धिमान,दयाशील,आनंदीत वगैरे,वगैरे गुण मनात येवू लागले परंतु,जादा करून ह्या गुणवत्ता आमच्या पहिल्या दोन गुणवत्ते इतक्या काहीश्या मूलभूत वाटत नव्हत्या.ह्या सर्व विचाराच्या ओघात आम्ही दोघं पतीपत्नी इतकी भरकटत गेलो की त्या नंतर मला आठवलं की हे सगळं आपलं विश-फूल-थिंकींग झालं असं वाटायला लागलं.कारण आपण विचार करतो तसं झालं नाही तर?आणि आम्ही मानतो त्या मुलभूत गुणवत्ता मुलात नाही आल्या तर? असं मी माझ्या नवर्‍याला म्हणाली.

नंतर मला माझ्या आजीची आठवण येऊन एक किस्सा डोक्यात आला. माझी आजी माझ्या वडीलांना सांगायची,आणि वडील मला सांगायचे की,
“स्वतःचं स्वतः हंसं करून घ्यायला तयार असावं.”
मला वाटतं आपण आपलं हसं करून घ्यायला लागलो की आपण स्वतःवर प्रेम करू लागतो.त्यामुळे आपण कुणापेक्षा वरचढ ही नाही आणि कमकूवत पण नाही असं वाटू लागतं. त्यामुळे आयुष्यात आनंदी आनंद मिळतो.आणि मुख्यत्वेकरून जर काआपण नेहमीच प्रामाणिक राहू शकलो नाही किंवा नेहमीच कदर करू शकलो नाही तरी कमीत कमी आपण आपल्याला माफकरू शकतो. आणि शेवटी आम्ही असा विचार केला की सत्यनिष्टा आणि कदर करण्याची वृत्ति एखाद्दात नसली आणि एखादा प्रसंग ओढवून घेण्याचा मुर्खपणा जरी झाला तरी निदान झालेल्या त्या मुर्खपणाकडे पाहून स्वतःचं हंसं करून घेऊन स्वतःला माफ करू शकतो.”

हे सगळं ऐकून झाल्यावर मी कविताला म्हणालो,
“तुमची अलीकडची जनरेशन किती खोलात जाऊन विचार करते.पूर्वी पसाभर मुलं व्हायची त्यामुळे म्हणा किंवा तेव्हडा विचार करायची ट्रिगर मिळत नसावी म्हणा एव्हडं खोलात कोण जात नसावं.त्यामुळे प्रसंग एव्हडे यायचे की मुर्खपणा केव्हा झाला ह्याची समजच नसायची.”
असं म्हणून आम्ही सर्व खो खो हंसलो.


श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Wednesday, October 15, 2008

सुप्त राहाणार्‍या प्रतिभेचा इतिहास

मला वाटतं,आपण फक्त आपल्या ऑफिसच्या क्युबिकल्समधेच जखडून ठेवल्यासारखे राहून कसं चालेल? मला वाटतं,आपल्यात परिवर्तन होत असतं आणि आपल्या अंगात असलेल्या रचनात्मकतेचं सामर्थ्य आणि सौंदर्य आपल्याल जोडून ठेवीत असतं.
मी एकदा व्हि.जे.टि.आय.कॉलेज मधे माझ्या एका पूर्वीच्या सहकार्‍याला भेटायला म्हणून गेलो होतो.तो सिव्हिल इंजीनियरींग डिपार्टमेन्ट मधे प्राध्यापक म्हणून काम करीत होता.त्याने मला तिकडेच रमेश चव्हाण नावाच्या त्याच्या एका सहकार्‍याशी ओळख करून दिली.तो सध्या ओरिसा मधे पाण्याचे बांध तयार करण्याच्या प्रोजेक्ट मधे काम करीत होता.

त्याला पाहिल्यावर मला ह्या व्यक्तिला कुठेतरी पाहिल्याचा भास होऊ लागला.
मी त्याला म्हणालो,
“तुम्हाला पूर्वी मी कुठेतरी पाहिल्याचं आठवतं.”
तो चटकन म्हणाला,
“तुम्ही कदाचीत माझ्या पेटीवादनाच्या कार्यक्रमाला आलेले असाल.”
असं म्हणताच माझ्या चटकन लक्शात आलं.
मी त्यांना म्हणालो,
“तुम्ही सिव्हील इंजिनीयर असाल हे मला माहित नव्हतं”
नंतर बोलता बोलता तो सांगू लागला,
”माझ्या नेहमीच्या जीवनात मी एक सिव्हील इंजिनीयर आहे.माझ्या क्युबिकलमधे कार्यरत होऊन समाधानकारक आणि सुखकर जीवन जगत आहे.पण माझ्या इतर जीवनात,मी माझ्या बाजापेटीवर बसून गोविंदराव पटवर्धन,पु.ल.देशपांडे,पुर्षोत्तम वालावलकर यांच्या प्रतिभाशाली पेटीवादनाला अभ्यासण्याचा प्रयत्न करीत असतो.माझ्या इंजिनीयरींग डिग्रीसाठी अभ्यास करीत असताना, एका संगीताच्या वाद्दाची निर्मिती करणार्‍या कारखान्यात हिशोब लिहिण्याचं पार्टटाईम काम करीत असायचो.तिथेच एकदा एका कोपर्‍यात ठेवलेल्या बाजापेटीला पाहून मला ती सहजच वाजवावयाची एक हूक्कीच आली समजा.
“उगीच का कांता,गांजीता” हे पु.लं.च आळवून आळवून वाजवलेलं गाणं मी वाजवीत होतो.बाहेरून येणार्‍या जाणार्‍या माणसाच्या कानावर तो स्फूर्तिदायक,आकर्षून घेणारा ताल आणि सुसंगता कानी पडल्याने बरीच गर्दी जमा झाली होती.
काही लोक दुकानात येऊन मालकाकडे विचारपूस करू लागले.मला येऊन विचारणा झाली की मी हे कुठे वाजवायला शिकलो?मला आणखी काही गाणी वाजवायची फर्माईश द्दायला लागले.गेली कित्येक वर्षे मी माझ्या इंजीनियरींग व्यवसायात गुरफटून घेतल्याने माझं हे संगीतातलं जीवन वाया जावू दिलं होत.पण माझा जेव्हा जेव्हा इतरांच्या रचनात्मक जीवनाशी सामना व्हायचा तेव्हा तेव्हा मला ह्याचं स्मरण व्हायचं.

एकदा मी अशाच पेटी वादनाच्या कार्यक्रमाला गेलो होतो.आणि एक व्यक्ति पु.लं.च ते “रविवारची सकाळ” याकार्यक्र्मात,”चंद्रिका ही जणू”नंतर “मला मदन भासे” नंतर “माडीवरी चल ग सखे”ही गाणी एकामागून एक वाजवलेली ऐकूनमाझ्या डोळ्यातून घळघळा अश्रू वाहू लागले.ते अतिशय सुमधूर,काळजाला भिडणारं वाजवणं होतं.माझ्या नंतर लक्षात आलं की ही पेटी वाजवणारी व्यक्ति माझ्याच बरोबर कित्येक वर्षापूर्वी एका पाण्याचा मोठा बांध तयार करण्याच्या प्रोजेक्टमधे कामाला होती.
मी त्याला असा तसाच समजून गेलो होतो.आणि माझ्या बरोबरचे इतर लोकही असंच त्याच्याकडे पहात होते असं मला वाटतं.ज्यामुळे मी मला माझ्या व्यवसायात संपूर्ण खपून गेलो होतो,आणि दुसरं काही करायला असमर्थ झालो होतो,त्यामुळे मला वाटत होतं की असं मरमरेसो काम करणारे पण असंच माझ्यासारखं जीवन जगत असावेत.परंतु,त्या माझ्या सहकर्‍याने माझ्या सुप्त प्रतिभेला जागृत केलं.

मी नंतर पेटीवर रियाज करायला लागलो.एका प्रेरणा देणार्‍या गुरू कडून शिकवणी घ्यायला लागलो.ते प्रत्येक आठवड्याला,माझी चांचणी घेऊन,दर वेळेला आणखी प्रगती करून घेऊन माझं वाजवणं वरच्या पातळीला आणून घेत होते.मला एका कार्यक्रमात वाजवायची संधी पण त्यांनी दिली.लोक माझं वाजवणं मन लावून ऐकत आणि मला ऐकणार्‍यांच्या चेहर्‍यात आनंद दिसायचा आणि कधी कधी वाहवा मिळायची.

मी विचार केला,मी एव्हडे बांध तयार करण्यात इतराना माझं सहकार्य देण्यात आयुष्य घातलं तरी कुणी माझी अशी वाहवाकेली नाही.
म्हणून मी म्हणतो,
आपण फक्त आपल्या ऑफिसच्या क्युबिकल्समधेच जखडून ठेवल्यासारखे राहून कसं चालेल? मला वाटतं, आपल्यात परिवर्तनहोत असतं आणि आपल्या अंगात असलेल्या रचनात्मकतेचं सामर्थ्य आणि सौंदर्य आपल्याला जोडून ठेवीत असतं.
हे सगळं बोलून झाल्यावर त्याने मला लवकरच होणार्‍या त्याच्या एका प्रोगरामला येण्याचा आग्रह केला.माझी मलाच गम्मत वाटली की मी कोणत्या कामाला आलो होतो आणि काय घडायचं होतं.



श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Monday, October 13, 2008

एका मनीमाऊचा किस्सा

आज प्रो.देसाई एका गृहस्थाना घेऊन आले होते आणि माझी ओळख करून देताना म्हणाले,
“गेली वीस वर्ष हे कैदी म्हणून तुरंगात होते.साध्याश्या गुन्हाचं पुराव्याच्या आभावी,गाढव कायद्दाने आणि नियतीने त्यांच्यावर हा अत्याचार कला होता.सुटून आल्यावर ते स्वतः आता असिस्टंट जेलर म्हणून काम करीत आहेत.त्यांच्या शिक्षेच्या काळात त्यानी मानसशास्त्रावर अभ्यास करून पीएचडी मिळवली आहे.
आमच्या शेजार्‍यांचे ते नात्याचे आहेत.तुमच्या बरोबर ओळख करून देण्यासाठी मी मुद्दामच याना तळ्यावर घेऊन आलो.”
त्यांच्याकडे पाहून मला खरोखरंच कुतुहल वाटत होतं.
पिळदार मिशी, घोगरा आवाज,मोठाले डोळे आणि चेहर्‍यावर किंचीतसं स्मित असलेले हे गृहस्थ खाकी शॉर्ट,त्यावर बरेच खिसे असलेला बुशशर्ट,हातात एक छोटीशी काठी असे हे व्यक्तीमत्व आणि त्यांचा पेहराव पाहून मला क्षणभर पु.लं च्या बटाट्याच्या चाळीतल्या कोचरेकर मास्तरांची आठवण आली.
“अग बाई! हे आपले कोचरेकर मास्तर का?मला वाटलं आपल्या चाळीचा गुरखा”
असं वर चाळीतल्या बायका गॅलरीत येऊन कोचरेकर मास्तराना उद्देशून म्हणाल्याचे संवाद कानात उगाचच गर्दी करीत होते.
“हलो हाय” चे सोपास्कार झाल्यावर मी त्याना म्हणालो,
“तुमचं खरोखरंच कौतूक केलं पाहिजे.एखादा तुरंगातल्या अनुभवाचा किस्सा सांगाल का?”
हे ऐकून भाऊसाहेबानीच त्याना सुनावलं,
“तो तुमचा मला सांगितलेला मांजराचा किस्सा सांगा.मला पण परत ऐकायला बरं वाटेल”
त्यावर ते गृहस्थ सांगू लागले,
“जवळ जवळ वीस वर्ष तुरंगात राहून मला कळून चुकलं की दायाशील असणं हा काही प्रोत्साहित करण्या सारखा गुण न मानता बरेच वेळा ती कमजोरी समजली जाते.
एकदा एक पांढरं काटकूळं, अस्वच्छ मांजर चुकून तुरंगाच्या आवारात आलं,मीच पहिला होतो की त्या मांजराला जवळ घेऊन कुरवाळत बसलो होतो.
कुत्र्याला किंवा मांजराला गेल्या वीस वर्षात मला कधी हात लावायची संधी मिळाली नव्हती.जवळ जवळ मी त्या मांजराला वीस मिनटं,एका कचर्‍याच्या डब्याच्या बाजूला आणि भटारखान्य़ाच्या मागे लोळून मजा करताना कुतुहलाने न्याहाळत होतो.ते मांजर बाहेरून जे व्यक्त करीत होतं ते मी माझ्या अंतरातून अनूभवत होतो.
माझ्या जवळ बसलेल्या मांजराला पाहून मला तो एक प्रकारचा माझाच सन्मान वाटत होता जणू काय मी दुसर्‍या एका प्राण्याचं जीवन संपन्न करीत होतो.
मला वाटतं,एकाद्दाला देखभालीची आवश्यकता असताना तसं करणं ह्यातच खरी माणूसकी आहे.

पुढे काही दिवस मी इतर कैद्दाना त्या मांजराला प्रतिक्रिया देताना पहात होतो.जेव्हा एखादा कैद्दांचा ग्रुप बाहेर उन्हात येत होता त्यातले कैक जण त्या मांजराच्या अंगावरून आळीपाळीने हात फिरवीताना पहात होतो.बहुतांश हे कैदी एकमेकाशी कधी बोलताना दिसत नसायचे.बरेच वेळा जेलर सुद्धा नेहमीचा त्यांच्या वर दादागीरी करण्याची प्रवृती सोडून त्या कैद्दाना त्या मांजराच्या अंगावरून हात फिरवणार्‍याना पहात मजा घेत होता.

दुधाच्या वाट्याभ्ररून आणि पाण्याच्या वाट्याभरून येत होत्या.पावाचे तुकडे कचर्‍याच्या डब्याच्या बाजूला नीट मांडून कावळे खाणार नाहीत याची काळजी घेतली जात होती.मांजर्‍याच्या अंगावरचे केस नीट कात्रीने कापून काही तिची नीगा ठेवीत होते.
काही कैदी म्हणाले,
“मांजर योग्य जागी आल्याने त्याला राजा सारखी वागणूक मिळत आहे.”
हे खरं होतं.पण मी ते स्रर्व न्याहळत असताना विचार करीत होतो की त्या मांजराने आपल्यासाठी काय केलं?
आमच्या कैद्दांच्या जीवनात काय त्रुटी आहेत ह्यावर खूप चर्चा होते.खरं म्हणजे आम्हाला सुधारण्याचे कार्यक्रम ठेवले पाहिजेत.मानसशास्त्र जाणारे लोक आमच्यासाठी आणले पाहिजेत.काही लोक अशीही चर्चा करतात की तुरंगातलं वातावरण दयाळू, सहनशिलतेचं, समजूतीने घेणारं असं असावं.पण मला वाटतं की हे सर्व गूण कैद्दातही असले पाहिजेत. जवळ जवळ वीस वर्ष तुरंगात राहून मला कळून चुकलं की दायाशील असणं हा काही प्रोत्साहित करण्यासारखा गुण न मानता बरेच वेळा ती कमजोरी आहे असं समजलं जातं.पण जनमानसात असं सांगितलं जातं की तुम्ही मान खाली घालून,इतर बाबतीत नाक न खूपसतां,तुम्ही तुम्हाला कमजोर न राहण्याच्या प्रयत्नात असलं पाहिजे.हे कसं शक्य आहे?

काही दिवसासाठी त्या जीर्ण-शीर्ण मांजराने त्या कैदखान्यातल्या वातावरणाच्या नियमाचा भंग केला होता.त्यानी ते मांजर आता इथून हलवलं होतं, बहूदा समुचित वातावरण असलेल्या घरात नेलं असावं.परंतु जाता जाता त्या मांजराने माझ्या आणि इतर कैद्दाच्या हृदयात चांगला प्रकाश टाकल्याचं पाहून बरं वाटतं.
ते काही पीएचडी झालेलं नव्हतं,किंवा अपराध-विज्ञानी नव्हतं,आणि मानसशास्त्री नव्हतंच नव्हतं.पण,
“मला कुणी इकडे मदत करेल कां?”
असा साधा प्रश्न विचारून ते मांजर आमच्यासाठी काहीतरी महत्वाची गोष्ट करून गेलं.त्याला आमची जरूरी होती आणि आम्हालाही त्या जरूरीची जरूरी होती.मला वाटतं आपणा सर्वांना तसं हवं असतं.”

एका सद्गुणी माणसाबरोबर दोन घटका घालवून आयुष्यात काही तरी शिकायला मिळाल्याचं मला समाधान झालं.


श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Sunday, October 12, 2008

काय झाले असे हे एका क्षणा

काय झाले असे हे एका क्षणा
मलाच मी हरववून गेले
वार्‍यासंगे ओढणी बोले
आला श्रावण आला सजणा
छेडी तो मला विनाकारणा
राहू कशी रे सांग तुजविणा
काय झाले असे हे एका क्षणा

नाव चिमुकली घेऊन आशेची
वाट धरी तो नावाडी पूर्वेची
ठुमकत ठुमकत घुंगर बोले
लपवीत छपवीत लज्जा सांगे
कळला ग! तुझा प्रीतीचा बहाणा
येणार येणार तो चितचोर दिवाणा
काय झाले असे हे एका क्षणा

संकुचीत होऊनी बहार फुलांची
लिपटूनी शरीरा सांगू लागती
लपूनी छपूनी चल ग! मैत्रीणी
घट्ट पकडूनी माझी करंगळी
मिळेल मिळेल तुला तुझाच साजणा
काय झाले असे हे एका क्षणा



श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Friday, October 10, 2008

“मी” माझ्या शरीरापेक्षा भव्य आहे.”

त्याचं असं झालं,नलू प्रधान मला अचानक खूप दिवसानी एका समारंभात भेटली.तिची आणि माझी लहानपणची ओळख.ती आणि तिचे आईवडील आणि तिची आजी आमच्या शेजारी राहायची. श्री.वा.य.प्रधान एअर लाइन्स मधे पायलट होते.काही दिवसाने त्यांचं कॅनडात मॉन्ट्रीयल इथे पोस्टींग झालं.नलू त्यावेळी सहा वर्षाची होती.नलू तशी दिसायला खूपच क्युट होती.पण बिचारी एक हाताने अपंग होती.आता मला ती भेटली तेव्हा ती मोठी बाई झाली होती.तिला दोन मुलं होती.तिचा पती फॉरेनर आहे.एका चांगल्या कंपनीत व्ही.पी. आहे.तिच्या अंगातले गुण पाहून त्याचं तिचाशी प्रेम जमलं.तिचं शारिरीक व्यंग त्याने नजरेआड केलं.नलूचा लहानपणी चेहरा जसा गोड होता तसा तो आताही आहे.बोलताना ती अगदी बारीक आवाजात पण मधूर लय काढून बोलते.तिच्याशी बोलत रहावं असं वाटतं.मी तिला घरी जेवायला बोलवलं होतं.बोलता बोलता ती सांगू लागली,

“काही लोक “मलाच” माझं शरीर समजतात.आणि म्हणून माझ्याकडे ते प्रतिकूल दृष्टीने पहातात. आणि माझी करूणा करतात. असं होऊन आता खूप काळ गेला आहे. हळू हळू त्यांच्या त्या माझ्याकडे पहाण्याच्या विचित्र नजरा आणि त्या अर्थपूर्ण हास्याकडे आता मी संपूर्ण दुर्लक्ष करायला शिकले आहे.
रोज आपण चित्रात सुंदर शरीर पाहतो.चित्रातल्या शरीरासारखं निर्दोष शरिर शोधून मिळणार नाही. त्यामुळे प्रत्येकाची खात्री होते की,जे आपलं शरिर आहे तेच आपण आहोत.

वयात आलेल्या शरीराच्या स्तिथ्यंतरातून नंतर प्रौढ होऊन त्यानंतर वयस्कर होई तो पर्यंत मी बराच माझा काळ पिकणारे केस,आणि तोंडावरच्या सुरकुत्या ह्याचा विचार करण्यात घालवला. ज्यावेळी मी पन्नास वर्षाची झाले,त्यावेळी माझ्या लक्षात आलं की माझे आईवडील आता पर्यंत सांगत आले तेच खरं होतं.”मी” म्हणजे माझं शरीर नाही.

मी जन्मतःच दोषविरहीत शरीर घेऊन आले नाही.माझ्या डाव्या हाताला व्यथा होती.तो त्यामानाने तोकडा होता.पण एकाअर्थी मी भाग्यवान होते.माझे आईवडील अत्यंत समजूतदार होते.ते मनाने खंबीर होते.माझ्या वाणीतून “मला जमणार नाही”हे वाक्य त्यानी काढून त्या ऐवजी “मी मार्ग काढीन”असं वाक्य माझ्या वाणीत आणलं.त्यांचा विश्वास होता की मनाची,हृदयाची आणि अंतरआत्म्याची प्रगती तुम्ही कोण आहात आणि तुम्ही कोण होणार हे ठरवते.
मी माझ्या शरीराचा उपयोग बहाणा न समजता त्याचा उपयोग उत्प्रेरक-कॅटॅलिस्ट- म्हणून वापरला पाहिजे.

तरीपण माझं शरीर दुर्लक्षीत झालं नाही.माझ्या शरीराने शल्यक्रिया सहन केली,व्यायामाची फरफट करून घेतली,पोहण्याचे कष्ट घेतले,आणि शेवटी योगाभ्यास पण झाला.पण म्हणून हा सर्व उपचार माझ्या आयुष्यातला केन्द्रबिंदू नव्हता.मला माझ्या आईवडीलानी माझ्या शरीराचा सदैव सन्मान करायला शिकवलं.पण म्हणून हे पण लक्षात ठेवायला सांगितलं की शरीर हे महत्वाच्या बाबी अंगीकारलेलं एक वहान आहे.त्या बाबी म्हणजे माझा मेंदू,मन आणि अंतरआत्मा.शिवाय मला हे ही सागितलं जायचं की शरीर निरनीराळ्या आकाराचं,रंगाच आणि लांबीरुंदीचं असतं.आणि असं असूनही प्रत्येक व्यक्ति काही ना काही तरी अप्राप्तता घेऊन धडपडत आयुष्य काढीत असते.

माझ्या ह्या अपंग शरीरातून मी धैर्य,निर्धारण,निराशा आणि यश काय हे शिकले.माझं हे शरीर पेटी वाजवू शकत नाही,मोठ्या खडपावर चढू शकत नाही,परंतु त्याही परिस्थितीत अन्नाचा घास कसा घ्यायचा ते त्या शरीराने शिकवलं.वही हातात धरून लिहायचं कसं ते शिकवलं.ह्या माझ्या शरीराने दुसर्‍याचा सन्मान कसा करायचा ते शिकवलं-मग तो किडकीडीत असो,सशक्त असो की सुंदर असो- तरीही.
” मी” म्हणजे माझं वक्तव्य,माझ्या कल्पना,आणि माझं कार्य.”मी”आनंदाने,हास्याने, महत्वाकांक्षेने आणि ज्ञानाने परिपूर्ण आहे.
“मी” माझ्या शरीरापेक्षा भव्य आहे.”

तिचं बोलून झाल्यावर मी तिला म्हणालो,
“नलू तू खरोखर ग्रेट आहेस.तुझे विचार,तुझ्या आईवडीलांची तुला मिळाली शिकवण आणि त्याचा तू घेतलेला फायदा,आणि इतके दिवस तू त्यांच्या बरोबर कॅनडात काढलेस त्यामुळे तिकडचे संस्कार आणि विशेष करून अपंगाकडे अतिशय सन्मानाने पहाण्याची त्या लोकांची दृष्टी,आणि तुझी ही परसन्यालीटी पाहून मला असं वाटतं,सर्व त्रुटीवर मात करून तू “शरीरापेक्षाही भव्य” आहेस हे सिद्ध करून दाखवलंस.तुझ्या बद्दल मला खूप अभिमान वाटतो.”
त्यावेळच्या तिच्या बरोबर लहानपणी वाढलेल्या माझ्या कडून हे उद्गार ऐकून ती सद्गदीत झाली. आणि मी पण.



श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Wednesday, October 8, 2008

त्याची मजला भ्रांत नसे

प्रीत केली मी तुजवरी
चुकले माझे यात कसे
इतकी प्रीत तुजवर झाली
त्याची मजला भ्रांत नसे

इतक्या मोठ्या बागेतूनी
फुल खुडले मी कसे
इतक्या मोठ्या नभातूनी
एकच तार्‍या चोरू कसे

गोड गुलाबी स्वपना मधूनी
जागे आपण झालो कसे
आवडशी तू मला एव्हडी
कारण त्याचे माहित नसे



श्रीकृष्ण सामंत (स्यान हिखे कॅलिफोर्नीया)
shrikrishnas@gmail.com

Monday, October 6, 2008

विज्ञानशास्त्र, आपलं मन आणि जीवन विकसित करतं.

आज प्रो.देसाई बरेचसे मुडमधे दिसले.तळ्यावर जाता जाता ते मला वाटेतच भेटले.तिथूनच आम्ही अशा विषयावर बोलायला सुरवात केली,की मला वाटलं भाऊसाहेब आपल्या कॉलेज मधल्या जुन्या आठवणी न काढता काही तरी नवीन माहिती देतील.पण झालं उलटंच.
मी त्याना म्हणालो,
“भाऊसाहेब,आजकाल मुलांना नुसतं वर्गात शिकवत नाहीत.त्यांना जे वर्गात शिकवतात,त्याचं प्रॅक्टीकल दाखवण्यासाठी बाहेरपण घेऊन जातात. आणि अलीकडे सायन्स म्युझीयम,प्लॅनेटेरीयम,मुलभूत संशोधन करणार्‍या संस्था अशा ठिकाणी नेऊनत्याना माहिती देतात.त्यामुळे विज्ञानाचा प्रसार परिणामकारक होतो.तुम्हाला नाही का वाटत?”
मी एव्हडं बोलायचीच फुरसत,प्रो.देसायानी आपल्या लहानपणातल्या शाळेपासून सुरवात करून मला एक माहिती-वजा सुंदर लेक्चरच दिलं.

मला म्हणाले,
“मी अकरा वर्षाचा असेन,आमच्या शाळेतून एका विज्ञानशास्त्र म्युझियमला आमची ट्रिप जायची होती.ती होऊन गेल्यावर माझ्या मनात आलेल्या एका आशंकेने मी सद्नदीत झालो.असं कधी मला झालं नव्हतं.एकप्रकारचा पोटात गोळा आल्यासारखं झालं.
मला माहित झालं की आपली पृथ्वी हा एक खडकाळ ग्रह असून एका तार्‍याभोवती प्रदक्षिणा करतो आणि हा तारा इतर कोट्यानी तार्‍यांपैकी एक असून ते सर्व एका आकाशगंगेत आहेत आणि अशा कोट्यानी अब्जानी आकाशगंगा ह्या ब्रम्हांडात आहेत. ह्या विज्ञानशास्त्राकडे पाहून मला अगदीच खूजं वाटायला लागलं.

त्यानंतर अनेक वर्षानी विज्ञानशास्त्रा बद्दलचा आणि त्याचा समाजात आणि जगात असलेल्या भुमिकेच्या प्रभावाचा माझा दृष्टीकोन फारच बदलला.
अनेक दशकाचा माझा विज्ञान शास्त्राचा अनुभव मला आता पटवून देतो की हा प्रकार गौरव करण्या लायकीचा आहे.आपण ह्या ब्रम्हांडाच्या एका कोपर्‍यातून कल्पकता वापरून आणि दृढनिश्चय ठेवून अंतरिक्षाच्या बाह्य आणि आंतर क्षेत्राला स्पर्श करण्याच्या प्रयत्नात आहो.
आपण पदार्थविज्ञानाचे मुलभूत नियम शोधले.ज्या नियमामुळे तारे कसे चमकतात,प्रकाशाचा प्रवास कसा होतो,वेळेची समाप्ती कशी होते,अंतरिक्ष कसं विस्तारत आहे,ब्रम्हांडाची सुरवात होण्य़ापूर्वीचा किंचीत क्षण कसा होता ह्या सर्व गोष्टीत डोकावून पहाण्याचे नियम शोधले.
ह्यातली कुठलीही उपलब्धता आपण “आहोत ते का आहोत”? किंवा जीवनाचा मतितार्थ काय आहे? ह्याचं उत्तर देऊ शकली नाही. विज्ञानशास्त्र पण ह्या प्रश्नाचं आकलन करू शकणार नाही.परंतु जसं आपल्याला एखाद्दा खेळाचा जास्तीत जास्त अनुभव, त्याचे नियम काय आहेत हे कळल्यावर येतो त्याच प्रमाणे ब्रम्हांडाचे नियम,पदार्थ विज्ञानाचे नियम खोलवर कळू लागतील तसं तसं आपल्या जीवनाच्या अस्तित्वाविषयी आपण प्रशंसा करायला सुरवात करणार.

मला त्याचा पडताळा होतो जेव्हा मी माझ्या विद्दार्थ्यांच्या डोळ्यातली चमक पहातो.मी त्याना ब्लॅकहोल काय आहे बिग-बॅन्ग थेअरी काय आहे हे सांगितल्यावर मी त्यांच्या डोळयातली चमक पहातो. विज्ञानशास्त्रामुळे आपल्याला क्ळतं की ही काहीतरी प्रचंड विश्वव्यापी गोष्ट आहे की ती आपल्या सर्वांना एकत्र बांधून ठेवते. म्हणून माझे विद्दार्थी मला भेटल्यावर ते त्यांचं गणीत आणि शास्त्र केवळ नीरस काम म्हणून पहातात त्यावेळी हे त्यांच पहाणं विपत्तिजनक वाटतं.त्यानी तसं करायला नको हे मला पटतं,पण जेव्हा विज्ञान म्हणजे काही वास्तविकतेचे मासले असून त्याचं पाठांतर करण्याची जरूरी नाही,आणि गणीतशास्त्र म्हणजे एक अमूर्त आकडेमोड असून त्यातली शक्ति ब्रम्हांडातलं रहस्य उकलू शकते हे न दाखवता शिकवल्यास ते कंटाळवाणं होईल आणि मुद्देसूत होणार नाही.

त्याहिपेक्षा जेव्हा माझा त्या विद्दार्थ्यांशी संपर्क येऊन कळतं की त्याना असं सांगितलं जातं की गणीत आणि शास्त्र समजण्याची त्याना क्षमताच नाही, असलं काहीतरी ऐकून खूप त्रास होतो.
मला वाटतं की शास्त्रातला आनंदीत करण्याचा भाग विद्दार्थ्याना समजावून सांगणं हे आपण त्यांच देणं लागतो.
मला वाटतं,मनातल्या भ्रमापासून ते मनात आकलन होईपर्यंतची ही प्रक्रिया अमुल्य असते,किंबहूना भावनाप्रधान अनुभव हा आत्मविश्वासाचा मुलभूत पाया असावा.
मला वाटतं विज्ञानाच्या वास्तविकतेचं मुल्यांकन जरी विवेकपूर्ण असलं,आणि त्याकडे काहींची व्यक्तिगत उदासीनता असली तरी विज्ञानशास्त्र धार्मिक आणि राजनैतीक विभाजनाला पूढे नेतं आणि त्यामुळे आपल्याला प्रतिरोधात जखडून ठेवतं.
मला वाटतं,अद्भुत रहस्याचा उलगडा आत्म्याला उभारा देतो जसं एखादं संगीत मन उल्हसित करतं.
मला वाटतं, विस्मयकारिक विज्ञाना बद्दलच्या कल्पना नुसतं मनालाच नाही तर आत्म्याला पण विकसित करतं.”

प्रों.देसायाना नुसती ट्रिगर पुरी असते.एका नावाजलेल्या कॉलेजात फिजीक्स डिपार्टमेंटचे इनचार्ज राहून इतकी वर्ष ज्ञानोपासना केली ती अशी उफाळून येते.माझाही वेळ मजेत गेला.


श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Saturday, October 4, 2008

एकाकी जीवनाला चैतन्याचा बहर येई

रे अनोळख्या! कोण तू असशी
पाहिले मी तुला ज्या दिवशी
हे जग सारे माझ्या नयनी
घेतले मी तसेच सामाऊनी

झालास तू गीतात माझ्या
सामील जणू ताल जसा
येऊनी तू जीवनात माझ्या
होशील फुलांचा जणू गंध तसा

स्वप्नाचा रंग दिसे माझ्या नजरेला
जणू चित्तातली धडधड लागली उतरणीला
प्रत्येक श्वासातून सूर येई बांसूरीला
वाटे शतवर्षानी प्रकाश मिळे ज्योतीला

अंधेर्‍या रात्री कुजबुज चमकत जाई
रात्र आल्यावरी मोगरा फुलून येई
तुला भेटूनी प्रीतिला मोहर येई
एकाकी जीवनाला चैतन्याचा बहर येई



श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

Thursday, October 2, 2008

“जीवन असं जगावं की नंतर पश्चाताप होऊ नये.”

असाच मी एकदा सूट्टी घेऊन गोव्याला गेलो होतो.गोव्याच्या समुद्राच्या किनारपट्टीवर अनेक छोटी छोटी घरं आहेत.एक घर भाड्याने घेऊन मी थोडे दिवस राहत होतो.आमच्या बाजूच्या घरात एक जोडपं असंच काही दिवस मजेत घालवण्यासाठी येऊन राहिलं होतं.सुरवातीला आम्ही सकाळीच ऊठून समुद्र किना‌र्‍यावर फिरायला म्हणून जात होतो.सकाळीच कोळ्यांच्या मासे जाळ्यात पकडून टोपल्या भरभरून आणणार्‍या मोठ्या होड्या किनार्‍यावर आल्यावर कुतुहल म्हणून निरनीराळ्या प्रकारचे मासे निवडून आणलेल्या टोपल्यामधून आम्हाला हवे ते मासे त्यांच्याकडून विकत घेऊन दुपारच्या जेवणाला त्याचा उपयोग करायचो.ताज्या मास्यांची चव निराळीच असते.त्यामुळे रोज मासे खायची चटकच लागली होती.

आमचे शेजारी सुद्धा हळू हळू आमच्याच बरोबर सकाळीच ऊठून आम्हाला त्यांची कंपनी द्दायला लागले.त्यानाही मासे खाण्यात दिलचस्पी होती. त्यामुळे त्यांची आमची चांगलीच गट्टी जमली होती.हे आमचं शेजारचं जोडपं आमच्या नंतर आणखी काही दिवस गोव्याला राहाणार होतं.
अधिक चौकशी केल्यावर कळलं की त्यांच्या पत्नीला गोवं खूपच आवडायला लागल्याने त्यानी त्यांचा मुक्काम आणखी वाढवला होता. ते जवळपास आमच्या बरोबरच जायला निघणार होते.पण आता त्यानी विचार बदलला होता.बोलता बोलता कळलं की त्यांच्या बायकोला सर्विकल कॅनसरचा आजार झाला असून तिचा तो टर्मिनल आजार होता.हे ऐकून मला खूपच वाईट वाटलं.

गोवा सोडून परत निघण्यापूर्वी एकदा असेच आम्ही संध्याकाळी किनार्‍यावर त्यांच्या बरोबर फिरायला गेलो होतो.पौर्णिमेचा तो दिवस होता.समुद्राच्या फेसाळ लाटावर चंद्राचा प्रकाश पडून त्या जास्तच फेसाळलेल्या दिसत होत्या.थंड वारा पण आल्हादायक वातावरणात भर घालत होता.चालून चालून थोडे पाय दमले म्हणून जवळच वाळूत बसून गप्पा मारत होतो.
बोलता बोलता त्यांची पत्नी म्हणाली,
“माझ्या लहानपणी मला आठवतं माझी आई बरेच वेळा म्हणायची,
“जीवन असं जगावं की शेवटी पश्चाताप होऊ नये.
सदा सर्वदा प्रत्येकजण मरत असतो आणि जगत असतो.तुमचा काय अनुभव आहे ह्याचं यतार्थ चित्र तुम्ही तुमच्या मनात तयार केलं पाहिजे.तुमच्या बुद्धिमतेपूर्वक तुम्ही निवड केली पाहिजे.”
ती तशीच जगली.ती एका प्रसिद्ध मुलींच्या शाळेची प्रिन्सीपॉल होती.खेळाच्या दुनियेत तिनं नांव कमावलेलं होतं.आणि तिन सुदृढ मुलीना जन्म देऊन माझ्या वडीलाना संसारात मदत करून एका खेड्यात निवृतीच्या दिवसात लागणारं छोटसं घर बांधण्यात मदत करूं शकली.तिला हवं ते ती निमूटपणे करून आणि वयाच्या पंचायशी वर्षावर शांतिने निर्वतली.

पश्चाताप न होता आयुष्य़ जगणं हा मला तिच्याकडून मिळालेला धडा होता.मी माझ्या शिक्षणासाठी पैनपै जमवून शिकले आणि देशात जमेल तिथे प्रवास केला.चांगलं कार्य समजून समाजात जमेल तेव्हडी सेवा केली.पंचवीस वर्षाच्या माझ्या करियर मधे मी बर्‍याच मुलीना शिकवलं.
मी आणि माझ्या पतिने तिन मुलांच व्यवस्थित संगोपन केलं.आणि पाच नातवंडाच्या सहवासात आनंदाने जीवन कंठित आहो.
मी मला नशिबवान समजते की माझ्या पतिने मला माझ्या मर्जीचं जीवन जगायला संपूर्ण मूभा दिली.
मला आणखी शिक्षण मिळावं म्हणून त्याने घर संभाळून मदतीसाठी खूप धडपड केली.

अलीकडे एकाएकी माझ्या पोटात वेदाना येऊन खूप दूखू लागलं.आणि त्याचं निदान काढलं गेलं की मला सर्विकल कॅन्सर झाला आहे.त्याच्यावर उपाय म्हणून औषध उपचार केले गेले. मला डॉक्टर म्हणाले की मी जेमतेम एक वर्ष काढीन.पण मी माझं तत्वज्ञान सोडायला तयार नव्हते. मला जरा बरं वाटलं की मी माझ्या अनुभवाचं गाठोडं माझ्या पाठीवर मारते.मी मीत्रमैत्रिणीना भेटते,प्रवास करते,हंसत असते,चांगली पुस्तकं वाचते,नातवंडाबरोबर खेळते आणि जे माझ्यावर प्रेम करतात त्यांचा हृदयापासून सन्मान करते.

माझ्या जीवनावर माझा विश्वास आहे.कदाचीत एकवेळ अशी येईल-बहूदा डॉक्टरांच्या भाकिताच्या पलिकडे जाऊन-ज्यामुळे मला जगताना अत्यानंद व्ह्यायचा तो आनंद कमी होईल.त्यानंतर मात्र माझ्या आई सारखं मी करीन.माझ्या कुटूंबाबरोबरच्या माझ्या आठवणी मी ताज्या करीन.
आणि जो ऐकील त्याला मी सांगेन,
“जीवन असं जगावं की शेवटी पश्चाताप होऊ नये”

किनार्‍यावर एव्हाना खूप काळोख झाला होता.पण चंद्राच्या शितल चांदण्यात आणि त्या थंड वार्‍याच्या
वातावरणात त्यांच्या पत्नीची ही कथा ऐकून माझं मन खूपच उदास झालं .परंतु उद्दा सकाळीच मी गोवं सोडून परत जाणार असल्याने,त्यांची कंपनी पण सोडवत नव्हती.पण काय करणार कुठतरी थांबावं लागतच.



श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com