Thursday, February 18, 2010

होऊ घातलेला लक्षाधीश.

“ज्या ठिकाणी माझ्या म्हणण्याला अर्थ होता,असं ते ठिकाण आहे अशी माझ्या मनात आशा निर्माण केली गेली आणि शेवटी मी सयशस्वी झालो.”

रघूनाथचा छापखाना आहे हे मला नव्यानेच कळलं.
त्याचं असं झालं,की पब्लिशर ओळखीचा असल्यानंतर छपाई करून घेण्याच्या कामात लागणारे जरूरीचे सोपास्कार करून घ्यायला जरा सोपं जातं हे मला माहित होतं.लहानपणी माझ्या वर्गात बरेचसे मित्र होते त्यातला रघुनाथ हा एक मित्र.त्याचा छापखाना आहे हे मला योगायोगाने कळलं.

फार पूर्वी “रघूवंशी” ह्या टोपण नावाने तो अनेक वर्तमानपत्रात रिपोर्टींग करायचा.मी त्याच्याकडून रिपोर्ट झालेल्या बातम्या वाचल्या आहेत.एकदा माझ्या एका दुसर्‍या मित्राबरोबर पूर्वीचं प्रेस रिपोर्टींग आणि आताचं रिपोर्टींग यावर चर्चा करीत असताना “रघूवंशी”च्या रिपोर्टींग बद्दल संदर्भ आला. आणि त्यावेळी मला कळलं तो “रघूवंशी” म्हणजेच आपला रघूनाथ वाटवे.

सहज म्हणून ह्या छापखान्यात मी माझ्या काही कवितांचा संग्रह छापून घेण्याच्या विचार करून आलो होतो.
“रघूनाथ वाटवे प्रमुख संपादक”
अशी मी एका रूमच्या बाहेर पाटी वाचली.बाहेर बसलेल्या शिपायाला आत जाता येईल का विचारत होतो.माझं व्हिझीटींग कार्ड घेऊन तो शिपायी आत गेला.लागलीच मला आत बोलावलं गेलं.मी रघूला ओळखलं नसतं.फक्त बाहेरच्या पाटीवरून मला अंधूक संशय होता एव्हडंच.मला मात्र रघूने ओळखलं.
“तू हंसलास त्यावेळी तुझ्या गालावरची खळी कुठे लपणार?”
तू सामंत हे मी तत्क्षणी ओळखलं.”
मला रघू म्हणाला.
माझं काम फत्ते होणार हे मी जाणलं.

इकडतीकडच्या गप्पा झाल्यावर मी रघूला म्हणालो,
“तू ह्या व्ययसायात कसा आलास?”
रघूच्या तोंडात पान होतं,ते थुंकून आल्यावर मला म्हणाला,
“तू खूप दिवसानी भेटतोयस.तुझ्या प्रश्नाला उत्तर द्यायला मला बराच वेळ लागणार म्हणून तोंड साफ करून आलो.तुला मी माझ्या जून्या आठवणी काढून सांगतो.ऐकायला तुला वेळ आहे ना?”
रघू मोठा बोलघेवडा आहे हे मला जूनं माहित होतं.
“नसला तरी तुझ्यासाठी काढीन”
असं मी त्याला म्हणालो.

मला रघू म्हणाला,
“कुणाला तरी सांगणं की
“तुमचं जरा कठीण आहे”
म्हणजेच
“तुमचं आयुष्य फुकट आहे.”
असं सांगण्यासारखं होईल.शिक्षक नेहमीच मुलांना सांगतात की
“अभ्यासात तुमचं तुम्ही पाहिलं नाहीत तर तुम्ही नापास होणार.”
बर्‍याच शिक्षकांना वाटत असतं की विद्यार्थी बुद्धिमान असतो जो शैक्षणीक बाबतीत पुढे असतो.दुसर्‍या अर्थाने बघायचं झाल्यास परिक्षेत त्याला जास्त मार्कस मिळालेले असतात.
परंतु,शोध असं सांगतो की,भविष्यात पाहिलं तर जो विद्यार्थी आपल्या अभ्यासात सतत हुशार रहातो तो एखादा चांगला जॉब मिळवून तीकडेच अडकून पडतो.आणि जो विद्यार्थी अभ्यासात सर्वसाधारण असतो तो उद्योगपती होऊन खूप पैसा मिळवतो.
ह्या म्हणण्यावर विश्वास बाळगून मला माझ्याबद्दल थोडी आशा वाटायला लागली होती.मी तसा काही हुशार मुलगा नव्हतो की जो रोज वर्ग सुरू होण्यापूर्वी पाच मिनटं येणारा किंवा वर्गात सगळ्या पहिल्या रांगेत जाऊन बसणारा.आणि खरं पाहिलंत तर प्रत्येकाला तसं करताही येणार नाही.”
रघूला काय म्हणायचं आहे ते माझ्या लक्षात आलं.

मी म्हणालो,
“तुझ्या अभ्यास करण्याच्या शैलीकडे आणि तुझ्या प्रतिभेकडे गुरूजीनी क्वचितच नीट लक्ष देऊन पाहिलं असेल.कारण त्यांचं लक्ष भाषा-विज्ञानाच्या प्रतिभेकडे मुल्यांकन करण्यात जास्त केंद्रीत झालेलं असावं.”
मला म्हणाला,
“मी जाणलं होतं की शाळेत यशस्वी वाचन किंवा लेखन केल्यानेच यशस्वी लक्षाधीश व्हायला ते कारण कारणीभूत असण्याची जरूरी नसावी. माझा त्यावेळी असा भरवंसा होता की तेव्हा आणि भविष्यात संपूर्ण कॉलेजातसुद्धा आणि नंतर जीवनात मला हवं ते मी करू शकतो. कारण मी माझ्या खास आणि अनेकपद्री प्रतिभेवर भरवंसा ठेवीत होतो.”

मी रघूला म्हणालो,
“मला आठवतं,तू मला अनेकदा ही शाळा सोडून जाण्याचा विचार करीत होतास.असं सांगायचास.”
“अगदी खरं”
असं म्हणत रघू पुढे सांगू लागला,
“माझ्या चवथ्या ते सहाव्या वर्गापर्यंत जेव्हा वाचन आणि लेखनावर शाळेत भर दिली जात होती त्यावेळी कंटाळून मला नको ती शाळा असं वाटायचं.परिक्षा हे माझं एक संकट असायचं.त्यामुळे मला भाषेत तसंच गणीतात अगदी कमी मार्क्स मिळायचे.माझे गुरूजी मला वरचेवर म्हणायचे
“तुला खूप अभ्यास करावा लागेल.”
हे ऐकून मी थोडा खचून जायचो, कारण मी खरोखरच खूप अभ्यास करायचो.माझ्या गुरूजीना त्या गोष्टीचं तेव्हा आकलन होत नसावं. माझ्या दुर्दैवाने मेहनतीचं मला फळ मिळत नव्हतं.परिक्षेत कमी मार्क्स पाहून मला वैताग यायचा.मला असे गुरूजी मिळाले होते की माझ्यावर त्यांचा भरवंसाच नव्हता.त्यांना वाटायचं मी कधीच यशस्वी होणार नाही.म्हणजेच त्यांना म्हणायचं असेल की मी आयुष्यात कधीही वर येणार नाही.”

“पण नंतर तू शाळा बदललीस.आणि त्यानंतर आपला संपर्क राहिला नाही.पुढे तू काय केलंस ह्याचंच कुतूहल मला होतं.म्हणूनच ते ऐकायला तुझा मी वेळ घेत आहे”
मी रघूला म्हणालो.

“मला त्या वातावरणातून दुसरीकडे जावसं वाटायला लागलं.मी शाळा बदलली.एव्हडी आशा ठेवून की कदाचीत त्यामुळे मला यशस्वी होण्याचा एक मोका मिळू शकेल.शाळेत बदल केल्याने माझ्या प्रतिभेकडे निराळ्या दृष्टीकोनातून बघीतलं गेल्यास मी भविष्यात लक्षाधीश होऊ शकेन.”
रघू आपल्या मनातलं अगदी सद्नदीत होऊन सांगत होता.

“शेवटी मी शाळा बदलली आणि ते वातावरण बदललं. गंमत म्हणजे, सरतेशेवटी मी जी व्यक्ती बनलो ती मी मला व्हायचं आहे म्हणून आशा करीत होतो त्यापासून फारच निराळी होती.त्यानंतर मी भविष्याकडे पाहू लागलो आणि काय घडेल त्याकडे लक्ष केंद्रीत केलं.
शिक्षणाच्या नवीन वातावरणात आता मी आल्याने त्यावेळी मला दिसून आलं की मी जर माझ्या लक्षाकडे आणि प्रयत्नाकडे नीट केंद्रीत राहिलो तर मी काहीही करू शकतो.ह्या नव्या वातावरणाने उत्तमोत्तम व्ह्यायला मला मोका मिळाला. मला अभिव्यक्त व्हायला मोका मिळाला.ज्या ठिकाणी माझ्या म्हणण्याला अर्थ होता,असं ते ठिकाण आहे अशी माझ्या मनात आशा निर्माण केली गेली आणि शेवटी मी यशस्वी झालो.”

“पण ह्या व्यवसायाकडे कसा वळलास ह्या माझ्या प्रश्नाचं उत्तर तू अजून दिलं नाहीस.”
मी त्याचा बराच वेळ घेतोय हे माझ्या लक्षात यायला वेळ लागला नाही म्हणूनच परत तोच प्रश्न मी त्याला केला.

मला रघू म्हणाला,
“मी पुढे पत्रकार व्हायचं ठरवलं.जर्न्यालिझममधे डिग्री घेतली.प्रथम एका प्रसिद्ध वर्तमानपत्रात रिपोर्टर म्हणून काम केलं.लेख लिहीत गेलो. ह्या छापखान्याचे मुळचे मालक माझे सासरे प्रभाकर मतकरी.
मी प्रथम इकडे सहसंपादक म्हणून काम केलं.मतकरी माझ्या कामावर आणि माझ्यावरही खूश होते.त्यांनी मला जावंई करून घेतलं.आता माझा एक स्वतंत्र छापखाना आहे.लवकरच मी जूनी छापखान्यातली यंत्र रद्द करून नवीन डीजीटल छपाईची यंत्र आणून हा पब्लिशरचा व्यवसाय वाढवणार आहे. आणि मी खूश आहे.”
निघता निघता मी रघूला म्हणालो,
“तू खूश का नसणार.लक्षाधीश झालास की.!”
रघू सातमजली हंसाला.दुसरं पान तोंडात कोंबीत मला म्हणाला,
“तुझ्या कविता छापल्याच म्हणून समज”

माझ्या कविता छापायचं त्याने मला आश्वासन दिलं.हे निराळं सांगायला नकोच.

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com