Sunday, February 28, 2010

वाचक हो, तुमच्यासाठी

(सैनिक हो,तुमच्यासाठी ह्या गाण्याचा आधार घेऊन)

आज जणू झालो आम्ही सचीन तेंडूलकर
पाच शतके लेखनाची लिहूनी अमुच्या ब्लॉगवर
येती हे शब्द तुम्हा सांगण्या अमुच्या ओठी
वाचक हो, तुमच्यासाठी

लिहीत लिहीत आम्ही नित्यकर्म अवघे करतो
वाचतो अपुल्या क्षेत्री लेखनाची स्फुर्ती घेतो
परी आठव येता तुमची प्रेरणा स्फुरतसे बोटी
वाचक हो, तुमच्यासाठी

आराम विसरलो आम्ही आळसा मुळी न थारा
राहूनी पश्चिम देशी लक्ष अमुचा मायदेशा सारा
आठवणी तिकडच्या येऊनी डोळ्यात होतसे दाटी
वाचक हो, तुमच्यासाठी

उगवला दिवस मावळतो अंधार दाटतो रात्री
विषय अनेक जमती काय लिहू याची नसे खात्री
स्वपनात येऊनी कविता काळजा खुलविते देठी
वाचक हो, तुमच्यासाठी

रक्षिता लेखन स्वातंत्र्या कायदा घेऊनी हाता
तुमच्यास्तव आमुची लेखने तुमच्यास्तव कविता
एकट्या लेखकासाठी लेखने अनंत होती
वाचक हो, तुमच्यासाठी
वाचक होss तुमच्याssसाठीsss

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com